Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

Day
Night

Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

Textbook Questions and Answers

1. कोणास उद्देशून म्हटले आहे ते लिहा:

प्रश्न 1.
कोणास उद्देशून म्हटले आहे ते लिहा:
उत्तर:

 1. वानरेया – [ ]
 2. सर्वज्ञ – [ ]
 3. गोसावी – [ ]

2. आकृती पूर्ण करा:

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
उत्तर:

3. प्रस्तुत दृष्टान्तातील उपदेश तुमच्या शब्दांत सांगा.

प्रश्न 1.
प्रस्तुत दृष्टान्तातील उपदेश तुमच्या शब्दांत सांगा.
उतर:

डोमग्रामी गोसावीयांचा ठायी उदयाचे मातीकाम होत होते. ते सी बाजत होते: तेणे भक्तीजनासी व्यापार होववे नाः आन भट व्यापार करू लागलेः नाथोबाए म्हणीतलें: “नागदेयाः तू कैसा काही हीवसी ना?” तवं भटी म्हणीतलें: “आम्ही वैरागी: काइसीया हीवुः” यावरी सर्वज्ञ म्हणीतलें: “वानरेयाः पोरा जीवासी वैराग्य मिरवु आवडेः हाही एकू विकारुचि की गाः” यावरि भटी म्हणीतलें: “जी जी: निर्वीकार तो कवणः”

सर्वज्ञ म्हणीतलें: “वानरेयाः पोर जीव वीकारावेगळा केव्हेळाही जालाचि नाही: मा तु काइ वेगळा अससिः” “हो कां जी:’ यावरि गोसावी कीर्ती कठीयाचा दृष्टान्त निरोपीला: “कव्हणी ऐकू कठीया असे: तो भोगस्थानाची सुश्रुषा करीः झाडीः सडा संमार्जन करीः ते देखौनि गावीचे म्हणतिः ‘कठीये हो नीके करीत असा: बरवे करीत असाः’ ते आइकौनि दीसवडीचा दीसवडी हात हात चढवीः तयासि देवता आपुले फळ नेदीः तयासि कीर्तीचेचि फळ झालेः”

4. पुढील शब्दांना प्रमाणभाषेतील शब्द सांगा.

प्रश्न 1.
पुढील शब्दांना प्रमाणभाषेतील शब्द सांगा.

5. आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो, हा विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

प्रश्न 1.
आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो, हा विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर:
नागदेवाचार्य हे महानुभाव पंथातील एक ज्येष्ठ शिष्य होते. त्यांची पंथाच्या विचारांवर निष्ठा होती. ते अगदी निष्ठेने पंथाच्या विचारांनुसार आचरण करीत असत. त्यामुळेच असे आचरण करताना ते कष्टाची पर्वा करीत नसत. एके दिवशी सकाळी सकाळी ते पंथासाठी मातीकाम करीत होते. कडाक्याची थंडी पडली होती. सर्व शिष्यांना थंडीत काम करणे अवघड बनले होते. पण कष्टांची पर्वा न करता नागदेवाचार्य काम करीत राहिले. हा त्यांचा खूप चांगला गुण होता. मात्र, आपण वैरागी आहोत, आपण हे कष्ट सहन करू शकतो, असा अहंकार त्यांच्या मनात निर्माण झाला. म्हणजेच, नागदेवाचार्यांचा चांगला गुण त्यांना हानिकारक ठरला; अवगुण ठरला.

6. पाठातील दृष्टान्त वेगळ्या उदाहरणादवारे स्पष्ट करा.

प्रश्न 1.
पाठातील दृष्टान्त वेगळ्या उदाहरणादवारे स्पष्ट करा.
उत्तर:
आमच्या परिसरात अगदी अलीकडेच घडलेली घटना आहे. आमच्या परिसरातील शाळेचा एस.एस.सी. परीक्षेचा निकाल खूप चांगला लागला. यशस्वी विदयार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सर्व विदयार्थ्यांना व पालकांनाही शिक्षकांबद्दल कृतज्ञता वाटत होती. त्यातही श्री. वसंतराव नाटेकर या शिक्षकांबद्दल तर खूप आदर वाटत होता. ते भाषणाला उभे राहिले, तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.

आपण विदयार्थ्यांसाठी किती कष्ट घेतले, रात्ररात्र जागरणे केली, जेवणाखाण्याची पर्वा केली नाही. स्वत:च्या कुटुंबाकडे लक्ष दिले नाही, वगैरे त्यागाचे वसंतरावांनी भरभरून वर्णन केले. हे सर्व खरेच होते. पण बोलता बोलता ते स्वत:ची स्तुती करू लागले. तेव्हा लोक नाराज होऊ लागले. शेवटी तर “मी नसतो तर विदयार्थ्यांना एवढे यश मिळालेच नसते,” असेही ते म्हणाले. यावरून त्यांना प्रचंड गर्व झाल्याचे दिसत होते. म्हणजे केवळ चांगला गुण असून उपयोगाचे नाही. गर्वामुळे चांगला गुणही वाया गेला. पाठातील तत्त्व आम्हांला या प्रसंगात पाहायला मिळाले.

भाषाभ्यास:

1. व्यतिरेक अलंकार:
खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.
उदा., ‘अमृताहुनि गोड नाम तुझे देवा’
वरील उदाहरणातील उपमेय – [ ] उपमान- [ ]

व्यतिरेक अलंकाराचे वैशिष्ट्य- उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते. वरील उदाहरणात परमेश्वराचे नाव गोडीच्या बाबतीत अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे, असे मानले आहे. जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, असे मानले जाते तेव्हा तिथे व्यतिरेक’ अलंकार होतो.

प्रश्न 1.
पुढील उदाहरण वाचा व तक्ता पूर्ण करा:
तू माउलीहून मयाळ । चंद्राहूनि शीतल ।
पाणियाहूनि पातळ । कल्लोळ प्रेमाचा ।।

उत्तर:

Additional Important Questions and Answers

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:
उत्तर:

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा:
उत्तर:

प्रश्न 3.
योग्य पर्याय ओळखून विधान पूर्ण करा :
………………………, म्हणून स्वामींनी दृष्टान्त सांगितला.
उत्तर:
(य) व्यापार चांगला व्हावा
(र) लोकांचे मनोरंजन व्हावे
(ल) नागदेवाचार्यांचा गर्व नाहीसा व्हावा
(व) कामातले कष्ट कमी व्हावेत.

प्रश्न 4.
दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडा:
1. डोमग्रामी सकाळी सकाळी पुढील काम चालू होते: (भोगस्थानाची शुश्रूषा / जीवाचे वैराग्य /मातीचा व्यापार/मातीकाम)
2. श्रीचक्रधरस्वामी यांनी ज्यांना दृष्टान्त सांगितला, तेः (गोसावी / कठीया / नागदेवाचार्य / पुजारी)

उत्तर:

1.

2.

3. नागदेवाचार्यांचा गर्व नाहीसा व्हावा, म्हणून स्वामींनी दृष्टान्त सांगितला.

4. मातीकाम

 1. नागदेवाचार्य.

5. प्रस्तुत दृष्टान्तातील उपदेश: आपले मन सर्व विकारांपासून दूर ठेवले पाहिजे. आपण एखादा चांगला गुण आत्मसात केला किंवा एखादी चांगली कृती केली, तर त्याचासुद्धा अहंकार बाळगता कामा नये. हा अहंकार म्हणजे विकारच होय. सर्व विकारांपासून दूर राहून मन शुद्ध राखले, तर तो खरा वैरागी होय.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
पर्यायांतून योग्य पर्याय निवडा:

 1. महानुभाव पंथाचे संस्थापक – (श्रीचक्रधरस्वामी, म्हाइंभट, नागदेवाचार्य, श्रीगोविंदप्रभू)
 2. मराठीतील पहिला चरित्रग्रंथ – (गोविंदप्रभुचरित्र, श्रीकृष्णचरित्र, लीळाचरित्र, दत्तात्रयप्रभुचरित्र)
 3. लीळाचरित्राचे लेखक – (श्रीचक्रधरस्वामी, म्हाइंभट, नागदेवाचार्य, श्रीगोविंदप्रभू )
 4. श्रीचक्रधरस्वामींचे गुरू – (भटोबास, म्हाइंभट, नागदेवाचार्य, श्रीगोविंदप्रभू )
 5. ‘कीर्ती कठीयाचा दृष्टान्त’ हा दृष्टान्त कथन करणारे – (नाथोबास, नागदेव, म्हाइंभट, श्रीचक्रधरस्वामी)

उत्तर:

1. [नागदेवाचार्य]

 1. [श्रीचक्रधरस्वामी]
 2. [श्रीचक्रधरस्वामी]

2.

3. श्रीचक्रधरस्वामी

 1. लीळाचरित्र
 2. म्हाइंभट
 3. श्रीगोविंदप्रभू
 4. श्रीचक्रधरस्वामी

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

समास:

 • कमीत कमी दोन शब्द एकत्र येण्याच्या प्रक्रियेला समास म्हणतात.
 • दोन शब्द एकत्र येऊन तयार होणाऱ्या जोडशब्दाला सामासिक शब्द म्हणतात.
 • सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह म्हणतात.

उदा.,

समासाचे प्रकार:

 1. समासात कमीत कमी दोन शब्द असतात.
 2. समासातील शब्दांना ‘पद’ म्हणतात.
  पहिला शब्द → पहिले पद दुसरा शब्द → दुसरे पद
 3. समासातील कोणते पद महत्त्वाचे म्हणजेच प्रधान आहे, यावरून समासाचे मुख्य चार प्रकार पडतात.

महत्त्वाचे पद म्हणजे प्रधान पद (+)
कमी महत्त्वाचे पद म्हणजे गौण पद ( – )

समासांचे मुख्य चार प्रकार होतात:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 9

लक्षात ठेवा:

 1. अव्ययीभाव समास → पहिले पद प्रधान (उदा., दररोज).
 2. तत्पुरुष समास → दुसरे पद प्रधान (उदा., विदयालय, क्रीडांगण).
 3. वंद्व समास → दोन्ही पदे प्रधान (उदा., भाऊबहीण).
 4. बहुव्रीही समास → दोन्ही पदे गौण (उदा., नीळकंठ).

या इयत्तेत आपल्याला:

1. कर्मधारय
2. द्विगू
3. वंद्व (इतरेतर/वैकल्पिक/समाहार)
हे समास शिकायचे आहेत.

1. कर्मधारय समास:

 • कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचाच एक उपप्रकार आहे.
 • ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद विशेषण असून दुसरे पद नाम असते, त्यास कर्मधारय समास म्हणतात.

उदा.,

म्हणून ‘नीलकमल, मातृभूमी’ हे कर्मधारय समास आहेत.

2. द्विगू समास

 • द्विगू समास हा तत्पुरुष समासाचाच एक उपप्रकार आहे.
 • ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्याविशेषण असून दुसरे पद नाम असते, त्या तत्पुरुष समासाला द्विगू समास म्हणतात.

उदा.,

म्हणून ‘त्रिकोण, नवरात्र’ हे द्विगू समास आहेत.

3. द्ववंद्ववं समास:

ज्या समासातील दोन्ही पदे महत्त्वाची असतात, त्याला वंद्व समास म्हणतात.

द्ववंद्ववं समासाचे उपप्रकार:

द्वंद्व समासातील सामासिक शब्दांच्या विग्रहाच्या पद्धतीवरून द्वंद्व समासाचे

 1. इतरेतर द्वंद्व
 2. वैकल्पिक द्वंद्व व
 3. समाहार वंद्व असे तीन उपप्रकार पडतात.

1. इतरेतर द्वंद्व समास

पुढील सामासिक शब्दांचा विग्रह कसा होतो, ते नीट पाहा:

1. स्त्रीपुरुष → स्त्री आणि पुरुष
2. आईवडील → आई व वडील

वरील दोन्ही सामासिक शब्दांचा विग्रह करताना आपण ‘आणि’, ‘व’ या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला.
जेव्हा वंद्व समासातील सामासिक शब्दांचा विग्रह करताना ‘आणि, व’ अशा उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात, तेव्हा त्यास इतरेतर वंद्व समास म्हणतात.
म्हणून ‘स्त्रीपुरुष, आईवडील’ हे इतरेतर द्वंद्व समास आहेत.

2. वैकल्पिक द्वंद्व समास

पुढील सामासिक शब्दांचा विग्रह कसा होतो, ते नीट पाहा:
1. सुखदुःख → सुख किंवा दुःख
2. भेदाभेद → भेद किंवा अभेद

वरील दोन्ही सामासिक शब्दांचा विग्रह करताना आपण ‘किंवा’ या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला. जेव्हा द्वंद्व समासातील सामासिक शब्दांचा विग्रह करताना ‘किंवा, अथवा, वा’ अशा उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात व दोन्ही पदे परस्परविरोधी असतात, तेव्हा त्याला वैकल्पिक द्वंद्व समास म्हणतात. म्हणून ‘सुखदुःख, भेदाभेद’ हे वैकल्पिक द्वंद्व समास आहेत.

3. समाहार वंद्व समास

पुढील सामासिक शब्दांचा विग्रह कसा होतो, ते नीट पाहा:

1. गप्पागोष्टी → गप्पा, गोष्टी वगैरे
2. मीठभाकर → मीठ, भाकर वगैरे

वरील दोन्ही सामासिक शब्दांत अनेक गोष्टींचा समावेश आहे. म्हणून त्यांचा विग्रह करताना आपण ‘वगैरे’ या शब्दाचा वापर केला.
जेव्हा वंद्व समासातील सामासिक शब्दांत इतर अनेक गोष्टींचा समावेश असतो व ज्यांचा विग्रह करताना ‘वगैरे, इतर, इत्यादी’ अशा शब्दांचा वापर होतो, तेव्हा त्याला समाहार द्वंद्व समास म्हणतात. म्हणून ‘गप्पागोष्टी, मीठभाकर’ हे समाहार वंद्व समास आहेत.

4. समास:

प्रश्न 1.
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा:

 1. त्रिगुण
 2. भाऊबहीण
 3. नीलकमल
 4. स्त्रीपुरुष.

उत्तर:

 1. त्रिगुण → तीन गुणांचा समूह
 2. भाऊबहीण → भाऊ आणि बहीण
 3. नीलकमल → निळे असे कमल
 4. स्त्रीपुरुष → स्त्री आणि पुरुष.

5. शब्दसिद्धी:

प्रश्न 1.
पुढील शब्द वाचून उपसर्गघटित व प्रत्ययघटित यांत वर्गीकरण करा: (नम्रता, उपवास, विरोधक, ममत्व)
उत्तर:

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
समानार्थी शब्द लिहा:
1. बरवे = ……………….
2. दृष्टान्त = ……………..
उत्तर:
1. बरवे = चांगले
2. दृष्टान्त = दाखला.

प्रश्न 2.
प्रचलित मराठीतील समानार्थी शब्द लिहा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 12
उत्तर:

प्रश्न 3.
विरुद्धार्थी शब्द लिहा:
1. सुरुवात × ……………
2. प्राचीन × ……………
उत्तर:
1. सुरुवात – शेवट
2. प्राचीन × अर्वाचीन.

प्रश्न 4.
पुढील शब्दापासून तयार होणारे चार अर्थपूर्ण शब्द लिहा : वीकारावेगळा : ……………………
उत्तर:

 1.  काळा
 2. राग
 3. वेग
 4. वेळा.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:
1. निर्वीकार, निविर्कार, निर्विकार, नीर्विकार.
2. दृश्टांत, दुष्ट्रान्त, दृष्टान्त, दृष्टांत.
उत्तर:

1. निर्विकार
2. दृष्टान्त.

Summary in Marathi

प्रस्तावना:

‘लीळाचरित्र’ हा मराठीतील पहिला ग्रंथ मानला जातो. इ. स. 1283 च्या सुमारास हा ग्रंथ लिहिला गेला आहे. महानुभाव पंथाचे ज्येष्ठ शिष्य म्हाइंभट यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. ते बुद्धिमान, विद्वान व व्यासंगी होते.

‘लीळाचरित्र’ म्हणजे महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधरस्वामी यांचे चरित्र होय. स्वामींच्या उत्तरापंथ प्रयाणानंतर म्हाइंभटांनी खूप परिश्रम घेऊन स्वामींच्या आठवणी एकत्रित केल्या. त्या आठवणी म्हणजे ‘लीळाचरित्र’ होय. यांतील एकेक आठवण म्हणजे एकेक लीळा होय. येथे कीर्ती कठीयाचा दृष्टान्त’ ही लीळा अभ्यासासाठी नेमलेली आहे.

प्रत्येक जीव विकारांच्या जाळ्यात अडकलेला असतो. विकारांपासून कोणीही दूर नाही. आपण अनेकदा केवळ वाईट विकार-वासनांनाच या बाबतीत गृहीत धरतो. पण चांगल्या गोष्टींचा गर्व बाळगणे हासुद्धा विकारच होय, अशी स्वामींची शिकवण होती. तीच या पाठात सांगितली आहे.

हा ग्रंथ प्राचीन भाषेतला आहे. त्या काळातील भाषा आणि आधुनिक काळातील प्रचलित मराठी भाषा यांत फरक आहे. म्हणून या पाठाचा आधुनिक मराठी भाषेत सरळ अर्थ दिला आहे.

पाठाचा सरळ अर्थ:

एके दिवशी डोमग्राम या गावात सकाळी सकाळी श्रीचक्रधरस्वामींकडे मातीकाम चालू होते. त्या वेळी खूप थंडी वाजत होती. त्यामुळे भक्तांना काम करणे कठीण जात होते. मात्र भटोबास (नागदेवाचार्य) यांनी कामाला सुरुवात केली. तेव्हा नाथोबांनी त्यांना , विचारले, “नागदेवा, तुला कशी थंडी वाजत नाही?” तेव्हा नागदेव म्हणाले, “आम्ही वैरागी. आम्हां वैराग्यांना कसली आली थंडी!’

त्यावर स्वामी म्हणाले, “राजे हो, (हे नरश्रेष्ठा,) प्रत्येक जीवाला वैराग्य मिरवायला आवडते. हासुद्धा एक विकारच आहे.” मग नागदेवांनी विचारले, “हो; तर मग निर्विकार कोण?”

स्वामी उत्तरले, “जीव विकारापासून वेगळा कधी झालाच नाही. मग तू या जीवांपेक्षा वेगळा कसा काय?” नागदेव म्हणाले, “बरं, बरं.’ त्यावर स्वामींनी ‘कीर्ती कठीयाचा दृष्टान्त’ सांगितला. तो दृष्टान्त असा: कोणी एक पुजारी होता. तो भोगस्थानाची (नैवेदयाच्या जागेची) देखभाल करीत असे. साफसफाई करीत असे. सडासंमार्जन करीत असे. (जमीन सारवून रांगोळी काढीत असे.) ते पाहून गावकरी म्हणू लागले, “गुरवांनो, तुम्ही खूप नेटके करीत आहात. छानच करीत आहात.” ते ऐकून तो पुजारी (स्तुतीने खूश झाला आणि) रोजच्या रोज अधिकाधिक चांगले काम करू लागला. परंतु देवता त्याला कोणतेही फळ देत नाही. त्याला फक्त कीर्ती मिळाली, म्हणजे त्याला कीर्ती हेच फळ मिळाले. अन्य काही नाही.

शब्दार्थ:

 1. सी बाजत होते – थंडी वाजत होती.
 2. व्यापार – काम.
 3. होववे ना – होईना, करता येईना.
 4. हीवसी ना – गारठला नाहीस, थंडी वाजली नाही.
 5. काइसीया – कशी काय, का, कशाला, कोणत्या कारणाने.
 6. हीवु – थंडी, गारठा.
 7. कवण – कोण.
 8. केव्हेळाही – कधीही.
 9. जालाचि – झालाच.
 10. कठीया – गुरव, पुजारी.
 11. भोगस्थान – देवाला नैवेदय दाखवण्याची जागा.
 12. सडासंमार्जन – सकाळी झाडलोट करून, जमीन गाईच्या शेणाने सारवून त्यावर रांगोळी काढणे.
 13. गावीचे – गावातले लोक, गावकरी.
 14. नीके – स्वच्छ, शुद्ध, नीटनेटके.
 15. बरवे – छान, चांगले.
 16. आइकौनी – ऐकून.
 17. दीसवडी – दररोज, प्रतिदिनी.
 18. नेदी – देत नाही.

टिपा:

1. डोमग्राम – डोंबेग्राम (गावाचे नाव), सध्याचे नाव ‘कमालपूर’, ता. नेवासे, जिल्हा अहमदनगर.

2. पाठात उल्लेखलेल्या व्यक्ती:

 1. गोसावी – श्रीचक्रधरस्वामी.
 2. भक्तीजन – श्रीचक्रधरस्वामींचे भक्त.
 3. भट – नागदेवाचार्य, ज्येष्ठ भक्त. यांनाच भट, भटोबास, नागदेव या नावांनीही संबोधले जाई. ते सतत चपळतेने वावरत. सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी आपले भक्त नागदेव यांना प्रेमाने ‘वानरा’, ‘वानरेश’ असे संबोधित असत. ‘वानर’ किंवा ‘वानरेश’ यांमधील ‘वा’ हा प्रशंसावाचक शब्द असून, ‘नर’ किंवा ‘नरेश’ म्हणजे नरश्रेष्ठ राजा हा अर्थ पंथीय परंपरेनुसार रूढ झालेला आहे. ‘वानरा/वानरेश’ म्हणजे ‘वा राजे’ किंवा ‘वा नरश्रेष्ठा’ असा पंथीय परंपरेतील रूढ अर्थ आहे.
 4. सर्वज्ञ – श्रीचक्रधरस्वामी.
 5. कठीया – गुरव, पुजारी, मंदिरातील पूजाअर्चा, मूर्त्यांची देखभाल, गाभाऱ्याची देखभाल वगैरे कार्ये ज्याच्यावर सोपवलेली असतात ती व्यक्ती.
 6. गावीचे – गावचे, गावातील लोक, गावकरी, ग्रामस्थ.

3. दृष्टान्त – एखादे तत्त्व समजावून सांगण्यासाठी एखादा दाखला दिला जातो, एखादी कथा सांगितली जाते, त्या वेळी त्या दाखल्याला किंवा त्या कथेला ‘दृष्टान्त’ किंवा ‘दृष्टान्तकथा’ म्हणतात. इसापनीतीमधील सर्व कथा या दृष्टान्तकथाच होत.

4. महानुभाव पंथ: हिंदू धर्माच्या अंतर्गत निर्माण झालेला हा एक पंथ आहे. इसवी सनाच्या १३व्या शतकात हा पंथ निर्माण झाला. , रिद्धिपूरचे ईश्वरावतार श्रीगोविंदप्रभू यांचे ते शिष्य. खेडोपाडी जाऊन पुढे दोन-तीन शतके या पंथाचा खूप प्रसार झाला. विशेषतः महाराष्ट्र, त्यांनी आपल्या आचारधर्माचा व तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. ते मध्य भारत, पंजाब व काश्मीर एवढ्या भूभागांत या पंथाची वाढ है अहिंसेचे पूजक होते. जातीयतेचे कट्टर विरोधक होते. आपल्या झाली.

हा पंथ अहिंसेचा पुरस्कर्ता आहे. त्या काळात कर्मकांडांचे स्तोम माजले होते. त्यामुळे खरा धर्म बाजूला पडला होता. कर्मकांडांतून जनतेची सोडवणूक करण्यासाठी श्रीचक्रधरस्वामींनी या पंथाची स्थापना केली. या पंथाचा जातीयतेला प्रखर विरोध आहे. जातिनिरपेक्षता, समानता व अहिंसा ही या पंथाची महत्त्वाची तत्त्वे आहेत.

5. श्रीचक्रधरस्वामी: हे महानुभाव पंथाचे संस्थापक होत. रिद्धिपूरचे ईश्वरावतार श्रीगोविंदप्रभू यांचे ते शिष्य. खेडोपाडी जाऊन त्यांनी आपल्या आचारधर्माचा व तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. ते अहिंसेचे पूजक होते. जातीयतेचे कट्टर विरोधक होते. आपल्या अनुयायांना ते आचारधर्माचे कठोरपणे पालन करायला लावत. मात्र, ते कोमल अंत:करणाचे होते. केवळ माणसांविषयीच नव्हे, तर प्राणिमात्रांविषयीही त्यांना ममत्व वाटे. आपल्या पायाखालची मुंगीही मरता कामा नये असे त्यांना वाटे.