Chapter 3 पाऊस आला! पाऊस आला!
Textbook Questions and Answers
1. खालील प्रश्नांची एक दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
प्रश्न अ.
विजा केव्हा चमकल्या?
उत्तर:
विजा ऐन दुपारी चमकल्या.
प्रश्न आ.
सुटलेला वारा कसा होता?
उत्तर:
सुटलेला वारा भणाणवारा होता.
प्रश्न इ.
पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले?
उत्तर:
पाऊस आल्यामुळे आजोबांनी छत्री शिवली.
प्रश्न ई.
आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली?
उत्तर:
बाबांना आधीच उशीर झाला होता व त्यातच पाऊस पडला म्हणून बाबांनी चडफड केली.
प्रश्न उ.
पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले?
उत्तर:
पावसामुळे आईचे पापड भिजले.
2.
प्रश्न अ.
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. उदा., वारा-गारा
उत्तर:
(अ) कुत्री – छत्री
(आ) गिल्ला – किल्ला
(इ) पापड – चडफड
(ई) पळा – घोटाळा
(उ) कुट्टी – सुट्टी
प्रश्न आ.
कडकड, चडफड, तडफड यांसारखे आणखी शब्द तयार करा.
उत्तर:
- धडधड
- गडगड
- बडबड
- खडखड
- रडरड
- गडबड
- पडझड
3. खालील शब्दांचे वचन बदला.
प्रश्न 1.
खालील शब्दांचे वचन बदला.
उत्तर:
(अ) माणूस – माणसे
(आ) गाय – गाई
(इ) दप्तर – दप्तरे
(ई) पाणी – पाणी
(उ) वह्या – वही
(ऊ) पत्र – पत्रे
4. अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली आहे का? तो प्रसंग वर्गात सांगा.
प्रश्न अ.
अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली आहे का? तो प्रसंग वर्गात सांगा.
उत्तर:
एकदा ताई आणि मी बाजारात गेलो होतो. अचानक पाऊस आला. छत्र्या नव्हत्या. आम्ही झाडाखाली उभे राहीलो पण पूर्ण भिजलो होतो. रस्त्यात पाणी तुंबले होते. रिक्षा बंद झाल्या होत्या. दोघे कसेबसे घरी पोहोचलो. आईने पापड, मिरच्या वाळवण ठेवले होते. तेही भिजले. बाबांना घरी यायला खूप उशीर झाला. बाहेर वाळत घातलेले कपडेही भिजले. पावसामुळे खूप धावपळ झाली.
5. अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते चार-पाच वाक्यात लिहा.
प्रश्न अ.
अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते चार-पाच वाक्यात लिहा.
उत्तर:
दिवाळीत आम्ही सर्व मुलांनी मिळून किल्ला बांधला होता. त्यावर शिपाई, रखवालदार ठेवले होते. मातीच्याच प्रतिमा असल्याने त्या तुटून गेल्या. किल्ला ढासळला. ताईने दारात काढलेली रांगोळी पुसली गेली. आमचे फटाकेही भिजले.
6. सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्ये लिहा.
प्रश्न अ.
रिमझिम पाऊस पडत होता.
उत्तर:
- पाणी झुळझुळ वाहत होते.
- खारूताई झाडावर सरसर चढली.
- गांधीजी झरझर चालत जात.
- आजीचे हात थरथर कापत होते.
प्रश्न आ.
रिक्षा खडखड करत थांबली.
उत्तर:
- मुले भरभर चालत होती.
- पंख्याची घरघर सुरू होती.
- हृदय धडधड करीत होते.
- पंखांची फडफड थांबली.
7. ‘वारा’ या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा. त्यांचा वाक्यात उपयोग करा. उदा. भणाणणारा वारा सुटला होता.
प्रश्न अ.
‘वारा’ या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा. त्यांचा वाक्यात उपयोग करा. उदा. भणाणणारा वारा सुटला होता.
उत्तरः
- मंदमंद – पहाटे मंदमंद वारा सुटला होता.
- गिरक्या – मैदानात वाऱ्याच्या गिरक्या येत होत्या.
- जोरदार – जोरदार मोसमी वारे सुटले होते.
- थंडगार – हिमालयाचा वारा थंडगार होता.
- झोंबणारा – हिवाळ्यात नदीकाठचा वारा झोंबणारा होता.
8. पापड कशाकशापासून बनवले जातात याची माहिती आईला विचारून लिहा.
प्रश्न अ.
पापड कशाकशापासून बनवले जातात याची माहिती आईला विचारून लिहा.
उत्तर:
पापड विविध प्रकारचे असतात. उडदाची डाळ, मिरे यांपासून उडदाचे पापड बनतात. तांदळापासून तांदळाचे पापड बनतात. काही पापड पोयांपासून तर काही नाचणीपासून बनतात. साबूदाण्यापासून व बटाट्यापासूनही उपवासाचे पापड बनतात.
9. उन्हाळ्यांमध्ये वाळवून साठवण्याचे कोणकोणते पदार्थ आई करते ते लिहा.
प्रश्न अ.
उन्हाळ्यांमध्ये वाळवून साठवण्याचे कोणकोणते पदार्थ आई करते ते लिहा.
उत्तर:
उन्हाळ्यात वाळवून साठवण्याचे पदार्थ – पापड, कुर्डया, सांडगे, शेवया, मिरच्या, आंबापोळी, फणसपोळी, उपवासाच्या चकल्या, उपवासाचे पापड, आमचूर, बोरकूट इ.
10. पावसाळा सुरु होताच तुम्ही पावसातून बचाव करण्यासाठी कोणकोणती पूर्वतयारी करता?
उदा. छत्री खरेदी करणे.
प्रश्न अ.
पावसाळा सुरु होताच तुम्ही पावसातून बचाव करण्यासाठी कोणकोणती पूर्वतयारी करता?
उदा. छत्री खरेदी करणे.
उत्तर:
1. रेनकोट, चपला खरेदी करणे.
2. घराची डागडुजी करणे, दुरुस्ती करणे.
3. वाहने गंजू नये त्यासाठी उपाय करणे.
Important Additional Questions and Answers
रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा.
प्रश्न 1.
- ……………….. भणाण वारा.
- दिवाळीतला ………………..
- आजोबांनी ………………..
- बाबा गेले ………………..
- ……………….. पापड
- हसत म्हणाल्या ………………..
- ‘………………..’, शाळेला सुट्टी!
उत्तर:
- कडाड कडकड
- खचला किल्ला
- शिवली छत्री
- करीत चडफड
- आईचेही भिजले
- मॅडम कुट्टी
- चला पळा.
प्रश्न 2.
एका शब्दांत उत्तरे लिहा.
- ऐन दुपारी चमकल्या
- जिकडे तिकडे
- भुंकत सुटली सगळी
- मुलांनी केला एकच
उत्तर:
- विजा
- गारा
- कुत्री
- गिल्ला
खालील प्रश्नांची एक दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
मॅडम हसत काय म्हणाल्या?
उत्तर:
मॅडम म्हणाल्या, ‘चला पळा, शाळेला सुट्टी!’
खालील प्रश्नांची दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
ऐन दुपारी काय झाले?
उत्तर:
ऐन दुपारी विजा कडाड कडकड चमकल्या. भणाण वारा सुटला. जिकडे तिकडे गारा पडू लागल्या व पाऊस
पडू लागला.
प्रश्न 2.
पावसामुळे काय काय झाले?
उत्तर:
ऐन दुपारी पाऊस पडला. दिवाळीतला किल्ला खचला. सगळी कुत्री भुंकत सुटली. आजोबांनी छत्री शिवली. बाबांना आधीच उशीर झाला होता, त्यातच पावसाने घोटाळा केला. ते चडफड करीतच गेले. आईचे पापड भिजले.
प्रश्न 3.
शाळेतील मुलांनी गिल्ला का केला?
उत्तर:
अचानक दुपारी पाऊस पडू लागला. सर्व मुलांना मजा वाटली. त्यातच मॅडमनी शाळेला सुट्टी दिली. त्या आनंदात मुलांनी गिल्ला केला.
व्याकरण व भाषाभ्यास:
प्रश्न 1.
खालील शब्दांचे वचन बदला.
- छत्री
- कुत्री
- वीज
- किल्ला
उत्तर:
- छत्र्या
- कुत्रा
- विजा
- किल्ले
जोड्या जुळवा.
प्रश्न 1.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. आजोबा | (अ) आई |
2. मॅडम | (ब) कुत्रा |
3. बाबा | (क) सर |
4. कुत्री | (ड) आजी |
उत्तर:
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. आजोबा | (ड) आजी |
2. मॅडम | (क) सर |
3. बाबा | (अ) आई |
4. कुत्री | (ब) कुत्रा |
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
उदा. वारा – गारा
प्रश्न 1.
1. जिकडे
2. आला
उत्तर:
1. तिकडे
2. केला
प्रश्न 2.
‘पाऊस’ या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा. त्यांचा वाक्यात उपयोग करा.
उत्तर:
- मुसळधार – मुसळधार पावसाने पूर आला.
- रिपरिप – दिवसभर रिपरिप पाऊस होता.
- झराळ – झराळ पावसात आम्ही ओलेचिंब झालो.
- धोंधों – धोंधों पावसाने गावाचे नुकसान झाले.
- रिमझिम – मुलांना रिमझिम पावसात भिजायला आवडते.
प्रश्न 3.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
- खचणे
- चडफड
- गिल्ला
- ऐन दुपारी
- भिजणे
उत्तर:
- ढासळणे
- राग
- गोंगाट, गोंधळ
- भर दुपारी
- ओले होणे
प्रश्न 4.
खालील शब्दांचे विरूद्धार्थी अर्थाचे शब्द लिहा.
- भिजणे
- आला
- शिवणे
- खचणे
- उशीर
उत्तर:
- वाळणे
- गेला
- उसवणे
- उभारणे
- लवकर
Summary in Marathi
काव्य परिचय:
प्रस्तुत कवितेत पडणाऱ्या गारा, पावसामुळे आई बाबांची उडालेली तारांबळ, शाळेला मिळालेल्या सुट्टीचा आनंद वर्णन केला आहे.
शब्दर्थ:
- ऐन दुपारी – भर दुपारी (in the afternoon)
- खचला – ढासळला (collapse)
- किल्ला – दुर्ग (fort)
- जिकडेतिकडे – सर्वत्र (everywhere)
- गारा – पावसाच्या पाण्याचे बर्फासारखे खडे (hailstones)
- भुंकणे – कुत्र्याचा आवाज (to bark)
- चडफड – आतल्या आत राग करणे (to get angry, restlessness)
- गिल्ला – आवाज, गोंगाट (noise, shouting)
- कुत्रा – श्वान (dog)
- शिवणे – (to stitch)
- घोटाळा – गडबड, गोंधळ (disorder, chaws)