Chapter 5 वीरांना सलामी

Day
Night

Chapter 5 वीरांना सलामी

Chapter 5 वीरांना सलामी

Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कृती करा.

प्रश्न 1.


उत्तर :


आ. चौकटीत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.

 1. तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेले स्मारक [ ]
 2. भयाण पर्वतांवर चढणार [ ]
 3. मृत्यूलाच आव्हान देणारी [ ]
 4. कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देणारी [ ]
 5. चोवीस जणांची लडाख भेट [ ]

उत्तर :

 1. तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेले स्मारक – ऑपरेशन विजय
 2. भयाण पर्वतांवर चढणार – आमचे धैर्यधर सैनिक
 3. मृत्यूलाच आव्हान देणारी – 22-23 वर्षांचे तेजस्वी तरुण
 4. कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देणारी – ड्रायव्हर स्टानझिन
 5. चोवीस जणांची लडाख भेट – मिशन लडाख

इ. कारणे लिहा.

प्रश्न 1.
थरथरत्या हातांनी आणि डबडबलेल्या डोळ्यांनी ‘ऑपरेशन विजय’च्या स्मारकाला सलाम केला, कारण ………
उत्तर :

थरथरत्या हातांनी आणि डबडबलेल्या डोळ्यांनी ‘ऑपरेशन विजय यांच्या स्मारकाला सलाम केला; कारण ते स्मारक होते हुतात्मा झालेल्या 22 – 23 वर्षांच्या कोवळ्या तरुणांचे!

प्रश्न 2.
‘मिशन लडाख’ साठी ‘राखी पौर्णिमे’चा मुहूर्तनिवडला, कारण ……………
उत्तर :
‘मिशन लडाख ‘साठी ‘राखी पौर्णिमे ‘चा मुहूर्त निवडला; कारण आपल्या रक्षणकर्त्या प्रत्यक्ष भेटून राखी बांधली, आशीर्वाद दिले, तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल, असे लेखिकांना वाटत होते.

प्रश्न 3.
लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ॠणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं, कारण…
उत्तर :
लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं; कारण लष्कर म्हटले की रुक्ष, भावनाहीन माणसे या कल्पनेच्या अगदी विरुद्ध असे त्यांचे वर्तन होते. अत्यंत प्रेमाने ते सर्वांचे आतिथ्य करीत होते.

प्रश्न 4.
लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ॠणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं, कारण …………..
उत्तर :

लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं; कारण लष्कर म्हटले की रुक्ष, भावनाहीन माणसे या कल्पनेच्या अगदी विरुद्ध असे त्यांचे वर्तन होते. अत्यंत प्रेमाने ते सर्वांचे आतिथ्य करीत होते.

प्रश्न 5.
समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल कर्नल राणा थोडे व्यथित होते, कारण ……
उत्तर :

समाजात होत जाणाऱ्या बदलाबद्दल कर्नल राणा थोडे व्यथित होते; कारण समाजात वाढलेल्या उथळपणामुळे नवीन तरुणांमधून खरा सैनिक घडवणे जिकिरीचे बनले होते.

ई. पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न 1.
एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार वाटत होता.
उत्तर :

आपली माणसे, आपला गाव सोडून सैनिक हजारो मैल दूर वर्षानुवर्षे राहतात. आपली माणसं, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याशी वागताना मिळणारा भावभावनांचा गोड अनुभव त्यांना मिळत नाही. म्हणून लेखिका व त्यांच्या सोबती यांचा अल्पसा सहवासही त्यांना सुखद वाटतो.

प्रश्न 2.
‘सेवा परमो धर्म:’
उत्तर :

लेखिका कारगिल-द्वास येथून परतत असताना घडलेला प्रसंग आहे हा – रात्रीचे साडेदहा वाजले होते. मिट्ट काळोख पसरला होता. खल्सेचा पूल कोसळला होता. मागे-पुढे कुठेही जाण्याची सोय नव्हती. कर्नलना फोन लावला. विशेष म्हणजे ते फोनची वाटच पाहत होते. कर्नल लष्करी अधिकारी. कार्यव्यग्र. पण तशातही त्यांनी आठवण ठेवून लेखिकांसहित सर्व 34 जणांची खाण्यापिण्याची व राहण्याची सोय केली. दुसऱ्या दिवशी सकाळी भेटण्याचे आश्वासन दिले. सेवावृत्ती असल्याशिवाय इतका प्रतिसाद मिळालाच नसता.

प्रश्न 3.
गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या.
उत्तर :

लडाखच्या दऱ्याखोऱ्यात, मिट्ट काळोखी रात्र. पावसामुळे जमिनीवरून पाण्याचे ओहोळ वाहत होते. खल्सेचा पूल कोसळला होता. काळजाचे पाणी पाणी करणारा प्रसंग! अशातच लेखिकांनी कर्नल राणा यांना फोन केला, तेव्हा त्यांचा आशादायक, दिलासादायक स्वर लेखिकांच्या कानांवर पडला. त्यांनी सर्व व्यवस्था आधीच केली होती. लेखिकांचे मन भरून आले. त्यांच्या डोळ्यांतून कृतज्ञतेचे, आनंदाचे अश्रू येऊ लागले.

प्रश्न 4.
लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात.
उत्तर :

लष्कराबद्दल सर्वसाधारण नागरिकांत गैरसमज फार असतात. लष्करातील जीवन अत्यंत खडतर असते. तेथे सुखकारक काहीच नसते. संपूर्णपणे बंदिस्त जीवन असते. सतत घरादारापासून दूर राहावे लागते. म्हणून बुद्धिमान तरुण लष्कराकडे वळत नाहीत. मुली सैनिकांशी लग्न करण्यास राजी नसतात. एक प्रकारे लष्कर आणि सामान्य जनता यांच्यात फार मोठी दरी निर्माण झाली आहे. ही दरी भरून काढण्याचे व दोन्ही बाजूंमध्ये संवाद निर्माण करण्याचे कार्य लेखिका त्यांच्या उपक्रमांद्वारे करीत होत्या.

2. व्याकरण

अ. खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.

प्रश्न 1.
जमीन अस्मानाचा फरक असणे.
उत्तर :

अर्थ – खूप तफावत असणे.
वाक्य – सुशिला समंजस व सुनिला हेकट आहे. दोघींच्या स्वभावात जमीन अस्मानाचा फरक आहे.

प्रश्न 2.
अंगावर काटा येणे.
उत्तर :

अर्थ – तीव्र मारा करणे.
वाक्य – भारतीय जवानांनी शत्रूवर तोफांतून आग ओकली.

प्रश्न 3.
आग ओकणे.
उत्तर :
अर्थ – भीतीने अंगावर शहारा येणे.
वाक्य – जंगलातून जाताना अचानक समोर वाघ पाहून प्रवाशांच्या अंगावर काटा आला.

प्रश्न 4.
मनातील मळभ दूर होणे.
उत्तर :

अर्थ – गैरसमज दूर होणे.
वाक्य – मनीषा पटेल असा त्याच्या वागण्याचा खुलासा केल्यानंतर सुदेशच्या मनातील मळभ दूर झाले.

आ. खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.

उत्तर :

इ. खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.

उत्तर :

ई. योग्य पर्याय निवडा व लिहा.

प्रश्न 1.
तुम्ही गाडीतच बसा. या वाक्यातील प्रयोग-
अ. भावे प्रयोग
आ. कर्तरी प्रयोग
इ. कर्मणी प्रयोग
उत्तर :

तुम्ही गाडीतच बसा. या वाक्यातील प्रयोग – कर्तरी प्रयोग.

प्रश्न 2.
त्यांना आपण जपलं पाहिजे. या वाक्यातील प्रयोग-
अ. कर्तरी प्रयोग
आ. भावे प्रयोग
इ. कर्मणी प्रयोग
उत्तर :

त्यांना आपण जपलं पाहिजे. या वाक्यातील प्रयोग – भावे प्रयोग.

प्रश्न 3.
पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य-
अ. त्यांनी आम्हांला दृक्-श्राव्य दालनात नेले
आ. भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच
इ. आम्ही धैर्याचा मुखवटाच चढवला होता
उत्तर :

पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य – आम्ही धैर्याचा मुखवटाच चढवला होता

3. स्वमत.

प्रश्न अ.
‘जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो ।’ असे शहीद झालेल्या वीराच्या आईने का म्हटले आहे, ते स्पष्ट करा.
उत्तर :

जेव्हा जेव्हा देशावर शत्रूचे आक्रमण होते किंवा अतिरेक्यांचे हल्ले होतात, तेव्हा नागरिकांची देशभक्ती जागी होते. सैनिकांबद्दलचे प्रेम उफाळून येते आणि वीरमरण आलेल्या सैनिकांवर फुलांचा वर्षाव होतो. त्याच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंनी लोक उपस्थित राहतात. एरव्ही सर्व नागरिक आपापल्या सुखात मशगुल असतात. देशावर प्रेम करायचे म्हणजे नाटक, सिनेमाच्या वेळी राष्ट्रगीताला उभे राहायचे किंवा १५ ऑगस्ट – २६ जानेवारीला झेंडावंदन करायचे. शेवटी, मूठ वळलेला हात हवेत उंचावून ‘भारतमाता की जय’ असे जोरात म्हणायचे! हीच देशभक्ती! आपली देशभक्ती कल्पना एवढ्यापुरतीच मर्यादित आहे.

वीरमरण आलेल्या सैनिकाच्या आईचे उद्गार सर्व देशवासीयांच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहेत. ती आई सर्वांना देशावर थोडे तरी प्रेम करा, असे विनवीत आहे. देशावर प्रेम करणे याचा खरा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे.

देशावर प्रेम करायचे म्हणजे देशाचे भले चिंतायचे, देशाचे ज्या ज्या गोष्टीत भले होते, त्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत आणि ज्या गोष्टी देशाला हानिकारक आहेत त्या सर्वांचा त्याग केला पाहिजे. आता हेच बघा ना – काही काळापूर्वी कोरोनाचा कहर चालू झाला होता. लागलीच नाक-तोंड झाकायचा पाच रुपयांचा मास्क पंचवीस रुपयांना विकला जाऊ लागला. ताबडतोब काळाबाजार सुरू. काही समाजकंटक वापरलेले मास्क इस्त्री करून विकत होते.

दुधात भेसळ, अन्नधान्यात भेसळ, भाज्या तर 150 200 रुपयांना किलो अशा सुद्धा विकल्या गेल्या होत्या. लोक लाच घेतात. कामात घोटाळे करतात. कोणतेही काम प्रामाणिकपणे करीत नाहीत. त्यामुळे उत्पादने वाईट निर्माण होतात. सेवा चांगल्या मिळत नाहीत. हे सर्व देशाचेच नागरिक ना? असे केल्याने देशाची प्रगती कशी होईल?

सगळ्यांनी प्रामाणिकपणे उत्कृष्ट काम करणे ही देशभक्ती आहे. हेच देशावर प्रेम आहे. विद्यार्थ्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत सगळ्यांनीच सचोटीने कामे केली तर देशाची प्रगती होईल.

प्रश्न आ.
ब्रिगेडियर ठाकूर यांनी शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना मार्गदर्शन करण्याची विनंती लेखिकेला का केली असावी, ते स्पष्ट करा.
उत्तर :
सर्व लोकांच्या मनात सेनादलांविषयी गैरसमज फार आहेत. परकीयांचे आक्रमण होते त्या वेळी सेनादलांबद्दल अफाट प्रेम आणि अभिमान उफाळून येतो. पण गैरसमज वितळून जात नाहीत.

सेनादलातील जीवन खूपच कष्टाचे असते. ते नियमांनी करकचून बांधलेले असते. त्यात वैविध्य नसते. म्हणून ते कंटाळवाणे असते. सेनादलांविषयीचा हा दृष्टिकोन वरवर पाहिले, तर बरोबर आहे, असे वाटेल. पण हे गैरसमज आहेत. अगदी घट्ट रुतून बसले आहेत.

मुलांनी आपले शिक्षण पूर्ण करीत आणले की भविष्याचा विचार सुरू होतो. कुशाग्र बुद्धिमत्तेची मुले MBBS, IIM, B.Tech, M.Tech, BE, ME या अभ्यासक्रमाकडे डोळे लावून बसतात. बाकीचे विद्यार्थी आपापल्या मगदुराप्रमाणे अभ्यासक्रम निवडतात. पण कोणीही अगदी कोणीही, ‘मी सेनादलात जवान म्हणून जाईन, अधिकारी म्हणून जाईन,’ असे म्हणत नाहीत. हे कशाला? मुलीच्या लग्नाच्या वेळी कोणीही सेनादलातील मुलांचा नवरा म्हणून विचार करीत नाही. यामागे खरे तर गैरसमज आहेत.

कष्ट काय फक्त सैन्यातच असतात. सध्या आयटीमधील मुले 12 – 12, 15 – 15 तास काम करतात. घरी आल्यावरही ऑफिसचे काम असतेच. हे काय कष्ट नाहीत? वास्तविक लष्करातील कष्टाची व शिस्तीची शिकवण मिळाली, तर माणूस जीवनातील कोणत्याही क्षेत्रात सहज यश मिळवू शकतो. तसेच, लष्करी जीवनात प्रचंड विविधता असते.

किंबहुना लष्करातील थरारक अनुभव अन्यत्र कुठेच मिळू शकत नाही. शिवाय, लष्करात गेले की लढाई होणारच आणि आपण मरणारच असे थोडेच असते? नागरी जीवनात अपघाताने मृत्यू येत नाही? मुले आयुष्यभर कुटुंबापासून दूर राहतात, हेही पटण्यासारखे नाही. अलीकडे मुले अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया असे किती तरी दूर दूर जातात. त्याचे काय?

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लष्करात फक्त पाच वर्षे नोकरी केली की मुक्त होता येते. ही सोय इतरत्र असते का? लष्कराचे अत्यंत मूल्यवान प्रशिक्षण मिळाले, तर नंतर कुठेही चमकदार जीवन जगता येऊ शकते. पण हे कोणीतरी जिव्हाळ्याने समजावून सांगितले पाहिजे आणि हे काम लेखिका अनुराधा प्रभुदेसाई करू शकतात, असा विश्वास ब्रिगेडियर ठाकूर यांना वाटत होता.

प्रश्न इ.
‘आम्हांला सैनिक नावाचा माणूस कळू लागला’, या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
उत्तर :

कर्नल राणा लेखिकांशी अत्यंत आत्मीयतेने बोलले. त्यांच्या बोलण्यात रूक्षपणा, परकेपणा किंवा केवळ औपचारिकपणा नव्हता. त्यांच्या मनात सेनादलाविषयी विलक्षण कळकळ होती. ती कळकळ लेखक समजून घेऊ शकत होत्या. याचा कर्नल राणा यांना खूप आनंद झाला होता. त्यांच्या मनात सैनिकी जीवनाविषयी ठाम धारणा होत्या. त्या धारणांना अनुसरून सैनिक घडवायला हवा, असे त्यांना मनोमन वाटत असे. तसा सैनिक घडवणे आता जिकिरीचे बनले होते. राणा यांना ही स्थिती तीव्रपणे जाणवत होती.

सध्याच्या तरुणांवर टीव्ही व सामाजिक माध्यमे यांचा फार मोठा प्रभाव आहे. टीव्हीवरील कार्यक्रम बहुतांश वेळा वास्तवापासून दूर गेलेले असतात. किंबहुना प्रेक्षकांना वास्तवापासून दूर नेणे हेच त्यांचे उद्दिष्ट असते. त्या कार्यक्रमांतील सामाजिक समस्या या वास्तव नसतात. त्या काल्पनिक असतात. एखाद्या कार्यक्रमातील कथानकात वास्तवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न असतो, नाही असे नाही.

पण ते वास्तव खूप सुलभ केलेले असते. त्यातले ताणतणाव अस्सल नसतात. ते सुलभीकृत असतात. त्यामुळे त्यातील चित्रणात, जीवनाच्या दर्शनात उथळपणा असतो. सैनिक घडण्यासाठी ज्या धारणांची आवश्यकता असते, त्या धारणा तरुणांना परिचयाच्या नसतात. त्यामुळे त्यांना सैनिक म्हणून घडवणे जिकिरीचे बनते. सेनादलातील वास्तव हे रोकडे, रांगडे असते. तर टीव्हीमुळे सैनिकांविषयी रोमँटिक कल्पना निर्माण केली गेलेली आहे. सेनादलाला रोमँटिकपणा, हळवेपणा चालत नाही. तेथे रोखठोक, कठोर वास्तवाला सामोरे जावे लागते. हे नवीन तरुणांना जमत नाही.

नागरी जीवन व सैनिक जीवन यांच्यात अंतर पडलेले आहे. चांगला सैनिक होण्यासाठी हे अंतर दूर करणे आवश्यक आहे. तरच देशाला चांगला सैनिक मिळू शकतो. त्यासाठी आपण प्रथम सैनिक समजून घेतला पाहिजे. लेखिकांना कर्नल राणांकडून हा दृष्टिकोन मिळाला. या जाणिवेमुळे सैनिकातला माणूस समजून घेणे आपल्याला अधिक सोपे जाईल, असे लेखिकांना वाटले. ही भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी ‘आम्हांला सैनिक नावाचा माणूस कळू लागला,’ असे विधान केले आहे.

4. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
सैनिकी जीवन आणि सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दांत करा.
उत्तर :

सैनिकाला स्वत:चे जीवन हजारो मैल दूर अंतरावर, कुटुंबीयांपासून लांब राहून जगावे लागते. आपल्या माणसांत राहून, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत रोजचे जीवन जगता येत नाही. कष्टमय दैनंदिन जीवन त्याच्या वाट्याला येते. आरामदायी जीवन जवळजवळ नाही. दऱ्याखोऱ्यांतून, वाळवंटातून, जंगलांतून किंवा हिमालयासारख्या बर्फाच्छादित पर्वतातून हिंडावे लागते.

तासन्तास एकाच जागी उभे राहून पहारे करावे लागतात. आज्ञा आली की सांगितलेले काम निमूटपणे करावे लागते. हे असे का? ते तसे नको. हे मला जमणार नाही, ते मी नंतर करीन, मला आता कंटाळा आला आहे, असे काहीही बोलता येत नाही. सैनिकाला संचारस्वातंत्र्य नसते. कुठेही जावे, कोणालाही भेटावे, काहीही करावे किंवा काहीही करू नये, असले कोणतेही स्वातंत्र्य सैनिकाला नसते. खरे तर अत्यंत खडतर, कष्टमय जीवन सैनिक जगत असतो.

याउलट, नागरिकांना दैनंदिन जीवन जगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. नागरिक कुटुंबीयांसोबत राहतो. सुखदुःखाचे सगळे क्षण तो कुटुंबीयांसोबत अनुभवतो. त्याला कुटुंबीयांचा सहवास मिळतो. कुटुंबीयांना त्याचा सहवास मिळतो. नागरिकाला पूर्ण संचार स्वातंत्र्य असते. तो कुठेही, कधीही, कोणाहीकडे जाऊ शकतो. कोणालाही भेटू शकतो; हवे ते करू शकतो.

कोणत्याही प्रकारे तो मनोरंजन करून घेऊ शकतो. असे स्वातंत्र्य सैनिकाला नसते. त्याच्यासमोर एकच काम असते – देशाचे रक्षण करणे. त्यात तो हयगय करू शकत नाही. त्याच्या जीवावर आपण सुरक्षित आयुष्य जगतो. त्याच्या भरोवशावर आपण सण-उत्सव साजरे करू शकतो. आपण नेहमीच सैनिकाचे ऋणी राहिले पाहिजे.

प्रश्न आ.
कारगिलमधील पुलावर पहारा करणाऱ्या सैनिकाच्या, ‘सिर्फ दिमाग में डाल देना है।’ या उद्गारातील आशय तुमच्या जीवनात तुम्ही कसा अंमलात आणाल ते लिहा.
उत्तर :
सिर्फ दिमाग में डालना है!’ हा मंत्र मला खूप मोलाचा वाटतो. हा मंत्र मला खूप आवडला आहे. तो मी प्रत्यक्षात अमलात आणणारच आहे. मी काही वेळा असे केलेलेच आहे. फरक एवढाच की, त्या वेळी हा मंत्र मला ठाऊक नव्हता. मी धडाक्यात काही गोष्टी पार पाडल्या आहेत. मी दोन उदाहरणे सांगतो. त्यावरून मी काय करणार आहे, हे लक्षात येईलच.

गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे ही, मला निबंध लिहिणे अजिबात जमत नसे. लिहायला बसलो की सुरुवात कशी करू?, या प्रश्नावरच गाडी अडायची. एकदा मी झटक्यात ठरवले.. निबंध लिहायचाच. आता वाट बघत बसायचे नाही. मी लिहायला सुरुवात केली. पहिली दोन तीन वाक्ये लिहिल्यावर पुढे लिहिता येईना. विचार केला. तेव्हा लक्षात आले… माझा मुद्द्यांबाबत गोंधळ उडतोय. मग मुद्दे लिहायला घेतले.

सुचतील ते मुद्दे लिहून काढले. मग त्यांचा क्रम लावला. दोनतीन वेळा ते मुद्दे नवीन क्रमाने वाचले. प्रत्येक मुद्द्याबाबत मी काय विवेचन करीन, याचा मागोवा घेतला. … आणि सरळ लिहायला सुरुवात केली. न थांबता लिहितच गेलो. निबंध पूर्ण झाला. तो मी सरांना दाखवला. सरांनी ‘उत्तम’ असा शेरा देऊन शाबासकी दिली. मी खूश!

दुसरा प्रसंग. मी सकाळी सकाळी टीव्हीवर मॅच बघत होतो. सहज माझे लक्ष गेले. आईने बादलीत गरम पाणी काढले होते. त्यात साबणपूड मिसळली आणि बरेच कपडे जमा करून त्या पाण्यात तिने ते कपडे भिजवले. बादली उचलून बाजूला ठेवतानाही तिला खूप कष्ट पडलेले मी पाहिले. मला कसेसेच वाटले.

मी इथे आरामात टीव्ही पाहणार आणि जेवढे तिला उचलायलाही झेपत नाहीत, तेवढे कपडे ती धुणार! मनात आले… आपणच का धुवू नयेत? पण शंका आली… आपल्याला झेपेल? किती वेळ लागेल? हात दुखतील? पण तत्क्षणी विचार आला… आईला हे प्रश्न पडतात? ती कशी धुणार? ते काही नाही. मी ठरवून टाकले… आपणच धुवायचे. मी न्हाणीघरात गेलो. एकेक कपडा नीट पाहून, मळलेला भाग लक्षात घेऊन कपडे ब्रशने व्यवस्थित घासले. एकेक कपडा घेऊन हासळून घुसळून सर्व कपडे धुवून टाकले. माझे मलाच आश्चर्य वाटले.

हे मला कसे जमले? आता माझ्या लक्षात आले. हाच तो मंत्र ‘सिर्फ दिमाग में डालना है!’ आता मी ठरवून टाकले आहे… मी माझ्या कामांचे नियोजन करणार आणि हे असेच नियोजनानुसार पार पाडणार… असे… दिमाग में डाल दे दूँगा! मला खात्री आहे मी यशस्वी होणारच.

उपक्रम :

अ. रजा घेऊन गावाकडे आलेल्या एखादया सैनिकाची किंवा माजी सैनिकाची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
आ. पाठात आलेले ‘आर्मी’शी संबंधित शब्द शोधा व त्यांचे अर्थ जाणून घेऊन ते गटासमोर सांगा.

तोंडी परीक्षा.

अ. ‘विजयस्तंभासमोर लेखिकेने घेतलेली शपथ’ हा प्रसंग तुमच्या शब्दांत थोडक्यात सांगा.
आ. ‘मी सैनिक होणार’ या विषयावर पाच मिनिटांचे भाषण दया.

कृती करा.

प्रश्न 1.

उत्तर :

प्रश्न 2.

उत्तर :

प्रश्न 3.

उत्तर :

प्रश्न 4.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 14

उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 16 

चौकटींत उत्तरे लिहा :

प्रश्न 1.

 1. कारगील युद्धाचे वर्ष [ ]
 2. कारगील युद्धाच्या स्मारकाचे नाव [ ]
 3. 14 कोअरच्या कर्नलांचे नाव [ ]
 4. ‘मिशन लडाख ‘चा चमू आणि सैनिक यांना बांधणारा [ ]
 5. ‘मिशन लडाख ‘चा शेवटचा टप्पा [ ]

उत्तर :

 1. 1999
 2. ऑपरेशन विजय
 3. कर्नल झा
 4. राखीचा धागा
 5. द्रास-कारगील

प्रश्न 2.

 1. कधीही पाऊस न पडणारा प्रदेश [ ]
 2. लेहमधील लष्करी अधिकारी [ ]
 3. खल्सेचा पूल कोसळल्यामुळे प्रवाशांना आसरा मिळालेले ठिकाण [ ]
 4. कार्यतत्परतेमुळे लेखिकांनी सैनिकांना दिलेली उपमा [ ]
 5. वेगवेगळ्या रेजिमेंटला जाण्याची परवानगी देणारा विभाग [ ]
 6. समाजातील बदलांमुळे व्यथित झालेले [ ]
 7. “या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे,” असे म्हणणारी [ ]
 8. रक्षाबंधनासाठी लडाखला नियमितपणे ग्रुप घेऊन येणाऱ्या [ ]
 9. ‘शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांची आम्हांला गरज आहे,’ असे म्हणणारे [ ]

उत्तर :

 1. लडाख
 2. कर्नल राणा
 3. ट्रॅफिक चेक पोस्ट
 4. कामकरी मुंग्या
 5. 14 कोअर
 6. कर्नल राणा
 7. भाग्यश्री
 8. लेखिका अनुराधा प्रभुदेसाई
 9. ब्रिगेडियर ठाकूर

वर्णन करा :

प्रश्न 1.
1. शपथेनंतरची अवस्था : ……………………
2. मिशन लडाखचा हेतू : …………………….
उत्तर :

1. शपथेनंतरची अवस्था : शपथेनंतर भावनिक आवेग ओसरल्यावर मनात शंका आली की, आपल्याला हे जमेल का? मन अस्वस्थ झाले. पण काही क्षणातच लेखिकांनी निर्धार केला.
2. मिशन लडाखचा हेतू : सर्वस्वाचा त्याग करून आपले सैनिक देशाचे रक्षण करतात म्हणून बहीण या नात्याने त्यांना राखी बांधून त्यांच्या असीम त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, हा मिशन लडाखचा हेतू होता.

पुढील वाक्यांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा :

प्रश्न 1.
मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी बावीस-तेवीस वर्षांची तेजोमय स्फुल्लिग होती ती!
उत्तर :
कारगील युद्धात हुतात्मा झालेले सैनिक २२-२३ वर्षांचे कोवळे तरुण होते. पण त्यांची देशनिष्ठा देदीप्यमान होती. शिखरावरून येणारे तोफगोळे कोणत्याही क्षणी आपला घास घेतील, हे उघड दिसत होते; पण त्याला ते घाबरले नाहीत. त्यांची निष्ठा ढळली नाही. ते मृत्यूला आव्हान देत पुढे सरकत होते. त्या वेळी त्यांची मने म्हणजे तेजस्वी ठिणग्याच वाटत होत्या.

प्रश्न 2.
ज्यांना आशीवाद दयायचे, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे, याची जाणीव झाली.
उत्तर :
कारगील युद्धात हुतात्मा झालेले सैनिक २२-२३ वर्षांचे कोवळे तरुण होते. हे त्यांचे वय त्यांना आशीर्वाद प्यावे, असे होते. त्यांचे संपूर्ण आयुष्य अजून घडायचे होते. त्या वयात त्यांना मृत्यू आला होता, ही जाणीवच वेदनादायक होती.

प्रश्न 3.
सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये जायचं, सैनिकांना भेटायचं; म्हणजे जणू सिंहाच्या गुहेत प्रवेश मिळवायचा होता.
उत्तर :

सैनिक म्हणजे भावभावना बाजूला सारून कर्तव्य कठोरतेने कृती करणारी माणसे. ही माणसे भेटल्यावर प्रतिसाद कसा देतील, आपल्याला समजून घेतील का, अशा अनेक शंका लेखिकांच्या मनात होत्या. त्यामुळे सिंहाची भीती वाटावी, तशी त्यांना सैनिकांची भीती वाटत होती.

प्रश्न 4.
सिर्फ दिमाग में डाल देना है।
उत्तर :
सैनिक दिलेली आज्ञा पाळतात. सांगितलेली कृती जमेल का, त्रास होईल का, काही नुकसान होईल का, यश मिळेल का, वगैरे कोणतेही प्रश्न विचारण्याची, मनात आणण्याचीही त्यांना सवय नसते. फक्त ‘हे हे करायचे आहे’ एवढेच ते मनाला बजावतात.

गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे ही. मला निबंध लिहिणे अजिबात जमत नसे. लिहायला बसलो की सुरुवात कशी करू?, या प्रश्नावरच गाडी अडायची. एकदा मी झटक्यात ठरवले… निबंध लिहायचाच, आता वाट बघत बसायचे नाही. मी लिहायला सुरुवात केली. पहिली दोनतीन वाक्ये लिहिल्यावर पुढे लिहिता येईना. विचार केला. तेव्हा लक्षात आले… माझा मुद्द्यांबाबत गोंधळ उडतोय.

मग मुद्दे लिहायला घेतले. सुचतील ते मुद्दे लिहून काढले. मग त्यांचा क्रम लावला. दोनतीन वेळा ते मुद्दे नवीन क्रमाने वाचले, प्रत्येक मुद्दयाबाबत मी काय विवेचन करीन, याचा मागोवा घेतला. … आणि सरळ लिहायला सुरुवात केली. न थांबता लिहितच गेलो, निबंध पूर्ण झाला. तो मी सरांना दाखवला, सरांनी ‘उत्तम’ असा शेरा देऊन शाबासकी दिली. मी खूश!

दुसरा प्रसंग. मी सकाळी सकाळी टीव्हीवर मॅच बघत होतो. सहज माझे लक्ष गेले. आईने बादलीत गरम पाणी काढले होते. त्यात साबणपूड मिसळली आणि बरेच कपडे जमा करून त्या पाण्यात तिने ते कपडे भिजवले. बादली उचलून बाजूला ठेवतानाही तिला खूप कष्ट पडलेले मी पाहिले. मला कसेसेच वाटले.

मी इथे आरामात टीव्ही पाहणार आणि जेवढे तिला उचलायलाही झेपत नाहीत, तेवढे कपडे ती धुणार! मनात आले… आपणच का धुवू नयेत? पण शंका आली… आपल्याला झेपेल ? किती वेळ लागेल? हात दुखत्तील? पण तत्क्षणी विचार आला… आईला हे प्रश्न पडतात? ती कशी धुणार? ते काही नाही. मी ठरवून टाकले… आपणच धुवायचे. मी न्हाणीघरात गेलो. एकेक कपडा नीट पाहून, मळलेला भाग लक्षात घेऊन कपडे ब्रशने व्यवस्थित घासले. एकेक कपडा घेऊन हासळून घुसळून सर्व कपडे धुवून टाकले. माझे मलाच आश्चर्य वाटले.

हे मला कसे जमले? आता माझ्या लक्षात आले. हाच तो मंत्र – ‘सिर्फ दिमाग में डालना है!’ आता मी ठरवून टाकले आहे… मी माझ्या कामांचे नियोजन करणार आणि हे असेच नियोजनानुसार पार पाडणार… असे… दिमाग में डाल दे दूंगा! मला खात्री आहे मी यशस्वी होणारच.

लेखिकांना जाणवलेले कर्नल झा यांचे व्यक्तित्व गुण :

प्रश्न 1.

 1. ………………………….
 2. ………………………….
 3. ………………………….

उत्तर :

 1. प्रसन्न व्यक्तिमत्त्व.
 2. लेखिकांच्या कार्याचे मोल जाणणे.
 3. लेखिका आणि त्यांचे कार्य यांची आठवण वर्षानुवर्षे जपणे.

एका तरुण सैनिकाला लेखिकांमध्ये त्याची मावशी दिसली, तेव्हाची लेखिकांची प्रतिक्रिया :

प्रश्न 1.

 1. ………………..
 2. ……………….
 3. ……………….

उत्तर :

 1. “खरं की काय? बरं ती मंगल मावशी, तर मी अनु मावशी!” असे उद्गार लेखिकांनी काढले.
 2. त्याला गळाभेटीची अनुमती दिली. .
 3. अन्य सोबत्यांचीही गळाभेट घडवून आणली.

कारणे लिहा :

प्रश्न 1.
कर्नल झा यांना भेटायला जाताना मन धास्तावले होते; कारण –
उत्तर :

कर्नल झा यांना भेटायला जाताना मन धास्तावले होते; कारण सेनाधिकाऱ्याला भेटण्याचे खूप दडपण मनावर होते.

प्रश्न 2.
एक तरुण सैनिक सगळ्यांची गळाभेट घेत होता; कारण –
उत्तर :
एक तरुण सैनिक सगळ्यांची गळाभेट घेत होता; कारण त्याच्या मंगल मावशीच्या मुलीच्या म्हणजेच मावस बहिणीच्या लग्नाला त्याला हजर राहता आले नव्हते. लेखिका व त्यांच्या सोबत्यांमध्ये तो मंगल मावशी व नातेवाईक यांना शोधीत होता.

प्रश्न 3.
लडाखी मुलांना हे सगळं अप्रूपच होतं; कारण –
उत्तर :

लडाखी मुलांना हे सगळं अप्रूपच होतं; कारण तेथे कधीच पाऊस पडत नाही.

प्रश्न 4.
थंडीमुळे चेहरे झाकलेले तीन जण टॉर्चच्या प्रकाशात, भयाण वातावरणाला अधिक गडद करीत आम्हाला परत जायला सांगत होते; कारण
उत्तर :
थंडीमुळे चेहेरे झाकलेले तीन जण टॉर्चच्या प्रकाशात, भयाण वातावरणाला अधिक गडद करीत आम्हाला परत जायला सांगत होते; कारण पुढे खल्सेचा पूल कोसळला होता.

पाठाच्या आधारे पुढील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा :

प्रश्न 1.
या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे.
उत्तर :

कारगील परिसराच्या वातावरणात भारतीयत्वाची भावना भरून राहिलेली आहे. जात-पात, धर्म-पंथ, भाषा-प्रांत असल्या कोणत्याही भेदभावाचे दर्शन घडत नाही.

प्रश्न 2.
‘आपली माणसं’ भेटल्याचा गहिवर दाटून येतो.
उत्तर :

दऱ्याखोऱ्यात भन्नाट एकाकी, रौद्र आणि जरासुद्धा हिरवळ नसलेल्या प्रदेशात आपले सैनिक राहतात. तरीही ममत्व, बंधुभाव जपतात, नाती जोडतात. म्हणून सैनिक ‘आपलीच माणसे’ वाटतात.

वीरांना सलामी Summary in Marathi

पाठ परिचय :

लेखिका 2004 साली पर्यटक म्हणून लेह-लडाखला गेल्या होत्या. त्या पर्यटनात त्यांना सैनिकांचे खडतर जीवन व सर्वस्वाचे समर्पण करण्याची वृत्ती यांचे दर्शन घडले. लेखिका भारावून गेल्या, सैनिकांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक भाग म्हणून सैनिक व सामान्य नागरिक यांच्यात प्रेमाचा पूल बांधण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. आपला तो सर्व अनुभव या पाठात त्यांनी मांडला आहे.

एक वेगळी सहल म्हणून द्रास-कारगीलचा प्रवास सुरू झाला. लेह ते कारगील प्रवास, सोबतचा ड्रायव्हर कारगील युद्धाची थरारक हकिगत सांगत होता. ती हकिगत ऐकत ऐकत मुक्काम गाठला.

प्रत्यक्ष रणभूमी पाहिल्यावर 1999 सालच्या कारगील युद्धाची भीषणता लक्षात आली. उभ्या चढणीच्या पहाडावरून शत्रूच्या तोफा धडाडत होत्या. त्याच स्थितीत आपले जवान उभी चढण अथक चढत होते. स्वत:हून मृत्यूच्या तोंडात शिरण्यासारखा प्रकार होता तो! बावीस-तेवीस वर्षांचे कोवळे जीव स्फुल्लिंगाप्रमाणे चमकत होते. त्यांच्या स्मारकाला वंदन करताना या आठवणी मनाला वेदना देत होत्या.

दृक्श्राव्य केंद्रात कारगील युद्धाची फिल्म दाखवण्यात आली. सैनिकांच्या त्यागाची कल्पना लेखिकांना आली. संपूर्ण जीवनच देशासाठी अर्पण करणाऱ्या सैनिकांच्या त्यागाचा परिचय देशवासीयांना घडवण्यासाठी त्यांना इथे आणण्याची प्रतिज्ञा लेखिकांनी केली.

जवानांना राखी बांधण्याचा उपक्रम अनेक वर्षे सलग केला. या प्रसंगी अनेक सैनिकांच्या व्यक्तिगत जीवनातील हकिगती ऐकायला मिळाल्या.

लेह-लडाखच्या भेर्टीमुळे लेखिकांच्या स्वत:च्या मनातील अहंकार, बडेजाव, प्रतिष्ठितपणाच्या कल्पना गळून पडल्या. सैनिकांच्या उदात्त भावनांचे दर्शन घडले. ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांनी सेनादलाशी निर्माण झालेली जवळिकता कमी होऊ देऊ नका, अशी लेखिकांना विनंती केली. तसेच, निदान पाच वर्षे तरी कमिशन्ड ऑफिसर म्हणून सेनादलात दाखल व्हावे, असा निरोप तरुणांपर्यंत पोहोचवण्याची विनंती त्यांनी लेखिकांना केली, ती विनंती परिपूर्ण करण्याचा निश्चय करून लेखिका परतल्या.

शब्दार्थ :

 1. उत्पात – ज्यात फार मोठा नाश आहे असे संकट.
 2. स्फुल्लिग – ठिणगी.
 3. विव्हळ – यातना, पिडा यांनी व्याकूळ.
 4. सपक – बेचव, निसत्त्व.
 5. भाट – स्तुती करण्यासाठी नेमलेला पगारी नोकर.
 6. भेंडोळी – लांबलचक कागदाच्या गुंडाळया.
 7. कॉम्बॅट वर्दी – वंद्व युद्धाचा गणवेश.
 8. पुनरागमनायच – पुन्हा येण्यासाठीच.
 9. नीरव – आवाजविरहित.
 10. समर्पण – संपूर्णपणे अर्पण.
 11. याच्यापरता – याच्यापेक्षा.