Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं
Textbook Questions and Answers
कृती
1. योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
प्रश्न अ.
शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे –
1. शुक्रताऱ्याच्या तेजस्वी प्रकाशात.
2. शुक्रताऱ्याच्या आकाशी आगमनात.
3. शुक्रताऱ्याप्रमाणे उजळणाऱ्या कविमनात.
4. शुक्रताऱ्याच्या अहंकारीपणात.
उत्तर :
शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे शुक्रताऱ्याप्रमाणे उजळणाऱ्या कविमनात.
प्रश्न आ.
हिरवे धागे म्हणजे –
1. हिरव्या रंगाचे सूत.
2. हिरव्या रंगाचे कापड.
3. हिरव्या रंगाचे गवत.
4. ताजा प्रेमभाव.
उत्तर :
हिरवे धागे म्हणजे ताजा प्रेमभाव.
प्रश्न इ.
सांग धरावा कैसा पारा! म्हणजे –
1. पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव.
2. हातातून निसटणारा पारा.
3. पाऱ्यासारखा चकाकणारा.
4. पाऱ्यासारखा पारदर्शक असलेला.
उत्तर :
सांग धरावा कैसा पारा! म्हणजे पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव.
प्रश्न ई.
अभ्राच्या शोभेत एकदा म्हणजे –
1. आकाशात अल्पकाळ शोभून दिसणाऱ्या ढगांप्रमाणे.
2. काळ्या मेघांप्रमाणे.
3. आकाशात गरजणाऱ्या ढगांप्रमाणे.
4. आकाशात धावणाऱ्या ढगांप्रमाणे.
उत्तर :
अभ्राच्या शोभेत एकदा म्हणजे आकाशात अल्पकाळ शोभून दिसणाऱ्या ढगांप्रमाणे.
2. अ. प्रेयसीच्या दृष्टिभेटीनंतर प्रेयसीविषयी कवींच्या मनात निर्माण झालेले प्रश्न निवडा.
प्रश्न 1.
1. प्रेयसीचे नाव काय?
2. ती वळून पाहणे का विसरली असावी?
3. भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी दयावी?
4. ती कुठे राहते?
5. तिचे लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे?
6. तिने सुंदर वस्त्र परिधान केले आहे का?
7. तिचे डोळे कोणता इशारा देतात?
8. तळहाताच्या नाजूक रेषांवरून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे?
उत्तर :
1. ती वळून पाहणे का विसरली असावी?
2. भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी दयावी?
3. तिचे लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे?
4. तिचे डोळे कोणता इशारा देतात?
5. तळहाताच्या नाजूक रेषांवरून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे?
आ. खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा.
प्रश्न 1.
वर्तमानातील ताज्या आठवणीच जर विरून चालल्या असतील तर अनोळखी झालेल्या गतकाळातील प्रेमाची आता ओळख तरी कशी दयावी?
उत्तर :
अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मींची दयावी सांग
कोमल ओल्या आठवणींची
एथल्याच जर बुजली रांग!
प्रश्न 2.
तळहातावरील नाजूक रेषा तरी कुठे वाचता येतात? मग त्यावरून भविष्याकाळातील भेटीचे भाकीत तरी कसे करता येईल?
उत्तर :
तळहाताच्या नाजुक रेषा
कुणिं वाचाव्या, कुणी पुसाव्या;
तांबुस निर्मल नखांवरी अन्
शुभ्र चांदण्या कुणि गोंदाव्या
प्रश्न 3.
विरल, सुंदर अभे अरुणोदयाच्या प्रतीक्षेत असताना अशीच एकदा तू आलीस आणि जवळून जाताना आपल्या आठवणींचा गंध मनात पेरीत गेलीस.
उत्तर :
दवांत आलिस भल्या पहार्टी
अभ्रांच्या शोभेत एकदा;
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
मंद पावलांमधल्या गंधा
3. अ. सूचनेप्रमाणे सोडवा.
प्रश्न 1.
‘पहाटी’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर :
कवीची प्रेयसी केव्हा आली?
2. एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न अ.
कवीची प्रेयसी केव्हा आली?
उत्तर :
कवीची प्रेयसी भल्या पहाटे आली.
प्रश्न आ.
डोळ्यांना कवीने दिलेली उपमा कोणती?
उत्तर :
डोळ्यांना कवीने डाळिंबांची उपमा दिली आहे.
प्रश्न इ.
कवीला प्रेयसीची जाणवलेली पावलं कशी आहेत?
उत्तर :
कवीला प्रेयसीची जाणवलेली पावलं तरल व मंद आहेत.
प्रश्न ई.
प्रेयसीच्या आठवणीसाठी कवितेत आलेली दोन विशेषणे कोणती?
उत्तर :
प्रेयसीच्या आठवणीसाठी कवितेत ‘कोमल’ आणि ‘ओल्या’ अशी दोन विशेषणे आली आहेत.
प्रश्न उ.
‘अनोळख्याने’ हा शब्द कोणासाठी वापरला आहे?
उत्तर :
‘अनोळख्याने’ हा शब्द प्रियकर / कवीसाठी वापरला आहे.
आ. खालील चौकटी पूर्ण करा.
प्रश्न 1.
उत्तर:
कवितेचा विषय | कवितेची मध्यवर्ती कल्पना | कवितेतील तुम्हाला आवडलेले शब्दसमूह | कवितेतील छंद |
प्रेम कविता | प्रेयसीच्या आगमनाच्या भावरम्य आठवणी | शुक्राच्या तोऱ्यांत, हिरवे धागे, शुभ्र चांदण्या, अभ्रांची शोभा, तळहाताच्या नाजूक रेषा | मुक्त छंद |
4. काव्यसौंदर्य :
प्रश्न अ.
‘डोळ्यांमधल्या डाळिंबांचा सांग धरावा कैसा पारा! ‘ या काव्यपंक्तीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा,
उत्तर :
प्रेयसीच्या मनातील स्नेहाची, प्रेमाची भावना कवीला आपल्या नजरेतून टिपता येतेय. तिच्या मनातील प्रेमसुलभ गुलाबी डाळिवी भावना तिच्या नजरेतूनही स्पष्ट दिसत आहेत. पण त्या भावना व्यक्त होत नाहीत, त्या केवळ डोळ्यातूनच जाणता येत आहेत. डाळिंबाचे दाणे जसे पारदर्शी असतात तसंच तिच्या मनातील भावनाही पारदर्शीपणे व्यक्त झाल्या आहेत, त्या प्रियकराला (कवीला) तिच्या डोळ्यांच्या पायाला पकडताही येत नाहीत. पारा जसा अस्थिर असतो तसंच तिच्या डोळ्यातील त्या प्रेमभावना कवीला पकडता येत नाही आहेत.
प्रश्न आ.
‘जवळुनि गेलिस पेरित अपुल्या मंद पावलांमधल्या गंधा,’ या ओळीमधील भावसौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
प्रेयसी पहाटेच्या प्रहराला कवीच्या मनात प्रकट झाली. तिचे लावण्य शुक्राच्या ताऱ्यासारखे होते. ती लावण्यवती असल्यामुळे तिच्याकडे साहजिकच कवीचे लक्ष गेले, तिच्यावर खिळून राहिले. तिच्या सौंदर्याचा वेध घेत घेत तिच्या डोळ्यांमधील भावही कवी जाणून घेतो. त्या डोळ्यांमधील उत्सुकता, अधीर भाव, ओढ कवी मनातच ठेवतो. ती येते ओळख घेऊन आणि जाताना अनोळखी असल्यासारखं भासवते. पण जाताना ती त्या दोघांच्या आत्मीयतेमध्ये एक मंद गंध पेरून जाते. तो गंध प्रेमाचा असावा.
5. अभिव्यक्ती:
प्रश्न 1.
प्रस्तुत प्रेमकवितेचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण स्पष्ट करा.
उत्तर :
बा.सी, मकर लिखित ‘दवांत आलिस भल्या पहार्टी’ या कवितेत प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणीचे स्वप्नरंजक वर्णन आहे. पहाटेच्या प्रहराला अभ्रांच्या कोषातून जशी शुक्राची चांदणी बाहेर पडते. त्याप्रमाणे कवीच्याही मनी असलेली ती शुक्राची चांदणी आहे. या कवितेतील प्रेयसी प्रत्यक्षात साकार झालेली असेल वा नसेल पण तिची ओढ मात्र कवीला आहे. परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का? या गीतासारखाच भाव या कवितेत आवळतो. तिची आणि त्याची भेट काल्पनिक असावी. ही काल्पनिक भेटही मात्र कवीच्या मनावर राहण्याजोगी आहे.
तिचे सौंदर्य न्याहाळताना कवी तिच्या नजरेतील भाव शोधतो पण तिने ओळख असूनही अनोळखी असल्यासारखे भासवले आहे. ही मनात साकार केलेल्या प्रेयसीबद्दलची भावना कवी प्रत्यक्षात कवितेतून प्रकट करतो. त्या शुक्राच्या चांदणीचे अस्तित्वच नाही पण ती स्वप्नपातळीवर दिसते. तिचे सौंदर्य लोभसवाणे आहे. तिच्या डोळ्यांमधील छटा पाऱ्यासारख्या आहेत. मुळातच न भेटलेल्या प्रेयसीबद्दलचे कल्पनामय चित्रण अनुभव आल्यासारखे कवीने दृश्य चित्रण उभे केले आहे. हेच या कवितेचे अनोखेपण आहे.
6. रसग्रहण.
प्रश्न 1.
‘दवांत आलिस भल्या पहाटी’ या कवितेचे रसग्रहण करा.
उत्तर :
‘दवांत आलिस भल्या पहाटी’ ही बा.सी. मर्डेकर यांची प्रेमाची भावना प्रकट करणारी कविता. पण हे प्रेम भासआभासाच्या रेषेवर असणारे आहे. बा.सी.मर्डेकर यांनी कवितेत नवीनता आणताना अनेक प्रयोग केले. कवितेचे शीर्षकच पाहता ते समजून येते. ‘पहाटे’ असं न म्हणता ‘पहाटी’ असा शब्द उपयोजून एक नवीन शब्द साहित्यात रूढ केला असे म्हणावे लागेल.
‘दवांत आलिस भल्या पहाटी’ या कवितेत एक स्नेहपूर्ण प्रेमभाव आला आहे. त्यातून पुरुषाच्या हळव्या मनातील तरल भावना प्रकट झाल्या आहेत. स्त्रीचे सौंदर्य घायाळ करणारे असते. त्या सौंदर्यावर अनेकांनी काव्ये लिहिलेली आहेत. बा.सी.मर्वेकर यांनी या कवितेत मांडलेली प्रेयसी ही दृश्यमान स्वरूपात वा अदृश्य स्वरूपातील असेल. तिची भेट हा त्याच्यासाठीचा अनमोल क्षण आहे. पण ही भेट प्रत्यक्षातील आहे असं नाही. ती आली तेव्हा अगदी पहाटेच्या प्रहरातील वेळ होती. आकाशात तारकांचे राज्य असलेले दिसत होते.
ती आली तेव्हा अगदी शुक्राच्या चांदणीसारखे तिचे रूप होते. इतर चांदण्यांपेक्षा तिचे रूप निश्चितच लक्षात राहण्याजोगे होते. तिला पाहताच त्याचे मन तिच्या लख्ख प्रकाशाने, सौंदर्याने उजळून गेले. तिच्या चालण्यातील दमदारपणा, तिची नजर यांमुळे कवीचे मन भारावन गेले. चालता चालता तिच्या पावलांच्या खणा कविमनावर अस्पष्टपणे उमलत गेल्या, त्या पेरता पेरता त्या पावलांमधील शोभा त्याच्या मनाने टिपली. तिच्या मनातील तरलता नजरेतूनही दिसत होती.
प्रेयसीच्या चालण्यातच तोरा असं म्हटल्यामुळे ती सौंदर्यवती असल्याचं स्पष्ट होतं, तिच्या मनातील प्रेमभाव कवीच्या मनात पेरताना त्याला जाणवलेली तरलता तो ‘पेरत गेलीस तरल पावलांमधली शोभा’ असे म्हणतो. जाता जाता पुढे जाऊन ती अडली आहे. जराशी हसली, तिने मागे वळून पाहिले पण तिनं नंतर त्याच्याकडे पाहिलेच नाही त्यामुळे कवीला प्रश्न पडला की ती त्याच्याकडे मागे वळून पहायला विसरली की काय? तिच्या आणि आपल्या नजरेतून प्रेमाचे जे हिरवे धागे गुंफिले होते. ते ती विसरून गेली का? अशा प्रश्नांनी त्याचे मन व्याकूळ झाले होते. या कडव्यात कवीने दोन ओळी नंतर एकाच शब्दाची एक ओळ घेऊन त्याच्या मनातील ओढ व्यक्त करण्याचा यत्न केला आहे. तसंच हिरवे धागे या शब्दातून नात्यातील हिरवेपणा स्पष्ट केला आहे. हिरवे हे विशेषण वापरून त्या नात्यातील कोवळीकता, ताजेपणा स्पष्ट केला आहे.
तिच्याकडे पाहताना तिच्यावरून दृष्टी हलत नव्हती. त्या दृष्टीची पिपासाच मनात वाढली. तिच्या नजरेतून मिळालेल्या इशाऱ्यावरून तिच्याजवळ ओळख वाढवण्याची उत्सुकता निर्माण झाली. तिच्या डोळ्यांमधील पारदर्शकता स्पष्ट खुणावत होती. तिच्या बुबुळांपर्यंत त्याची नजर थेट भिडली त्यामधून स्नेहाचा पारा हदयापर्यंत पोहोचत होता. या कडव्यात कवी प्रेयसीच्या डोळ्यातील प्रेमभावना खट्याळपणा दाखवताना त्याला डाळिंबाच्या दाण्यांची उपमा देतो. डाळिंबाचा रंग जसा बी असतो.
हा गुलाबी रंग तिच्या डोळ्यातही दिसतो. तिच्या नजरेतील प्रेमसूचकता पाऱ्यासारखी असल्यामुळे ती त्याला टिपता येत नाही आहे. तिच्याकडे पाहताना एकीकडे ती त्याच्याशी ओळख दाखवून न दाखवल्यासारखी वागते. कवीला वाटते की तिचं आणि आपलं नातं तर गतजन्मीचे आहे. त्या गतजन्मीचं नातं आता कसं बरं सांगू शकतो? कारण त्या नजरेतच ओळख अनोळखीचे भाव आहेत. तिच्याविषयी असलेल्या कोमल आठवणी-भावना याच बुजल्यासारख्या झाल्या आहेत.
आपल्या मनातील भावभावना स्पष्ट करताना कवी त्या आठवणींना कोमल ओल्या आठवणी म्हणतो. त्यातील ओलाया, जिव्हाळा हा कोमल ओल्या या शब्दातन प्रकट होतो. एथल्याच हा बोलीभाषेचा शब्द वापरून कवी आणखी एक नवा प्रयोग करू पाहतोय…कवीला वाटतं की तिचं आपल्यासोबत असणं, नसणं हे अगदी तळहातावरच्या नाजूक रेषेसारखं आहे, त्या ज्यांना वाचता आल्या ते ते आपल्या सोबत राहतात. ज्यांना वाचता आल्या नाहीत त्यांना ते समजणारच नाहीत. तिच्या नखांवर असलेला लाल, गुलाबी रंग हा तिच्या लज्जेमुळे आलेला असावा, प्रीतीच्या शुभ्र चांदण्या हातावर गोंदल्या गेल्या आहेत, ज्या पुसल्या जाणाऱ्या नाहीत.
प्रेयसीच्या मनातील नाजूक भाव अधोरेखित करताना तिच्या नखांवरही ते गुलाबी भाव उमटल्याचे स्पष्ट करतो. आकाशात तर चांदण्या असतातच पण तिच्या हातावरही त्या चांदण्यांचा स्पर्श झालेला आहे. असा भाव व्यक्त करताना शुभ्र चांदण्या (स्नेहाच्या) कुणी गोंदाव्या असे म्हणतो. त्यातून प्रियकराची तरल संवेदना प्रकट होते.
पहाटेच्या दांत भल्या पहाटे ती आली, ज्यामध्ये अभ्रांची शोभा पसरली होती. येताना तिने प्रीतीची दृष्टी आणली होती पण जाताना ती त्यांच्या दोघांमधील प्रीतीचा गंध ठेऊन गेली. प्रीतीची भाषा केवळ दोघांमधील असते. तिथे व्यवहाराची भाषा लागू पडत नाही. असा हा प्रेमभाव दोघांच्या मनातील ज्याची प्रत्यक्षानुभूती घेताच आली नाही.
जो अनुभव घेता आला नाही पण त्याची अनुभूती अप्रत्यक्ष स्वरूपात मिळाली ते प्रकट करताना कवी ती पहाटे आल्याचं म्हणतो. अभ्रांची शोभा ही सुद्धा नवीन कल्पना कवीने मांडलेली आहे. प्रेमाचा रंग, गंध असतो तो तरल संवेदनांच्या लोकांनाच जाणवतो. कवीला तो जाणवतो.’ ते व्यक्त करण्यासाठी कवी ‘मंद पावलांमधल्या गंधा’ असं म्हणतोय. त्या पावलांनांही गंध प्राप्त झाला, त्या वाटेला आणि मनातील प्रीतीलाही ‘गंध’ या शब्दाचे गंधा हे सामान्य रूप वापरून ‘एकदा’ या शब्दाशी लय साधण्याचा यत्न केलेला आढळतो.
विविध भाषिक प्रयोग करण्याचा कवी बा.सी.मर्डेकर यांचा हातखंडा या कवितेतही दिसून येतो.
Important Questions and Answers
आकलन कृती
खालील पठित पदव पंक्तीच्या आधारे सूचनेनुसार कृती करा
आकृती पूर्ण करा.
प्रश्न 1.
कवयित्री पेरित गेली. → [ ]
उत्तर :
कवयित्री पेरित गेली. → तरल पावलांमधील शोभा
खाली दिलेल्या शब्दाला कवितेत आलेले विशेषण लिहा.
प्रश्न 1.
धागे : [ ]
उत्तर :
हिरवे
उपयोजित कृती
खालील अर्थांसाठी कवितेते वापरलेले शब्दः
प्रश्न 1.
1. ध्येय –
2. तहान –
उत्तर :
1. लक्ष्य
2. पिपासा
प्रश्न 2.
सुंदरतेचा’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर :
प्रेयसीने कसला इशारा दिला?
अभिव्यक्ती:
प्रश्न 1.
“वळुनि पाहणे विसरलीस का?
विसरलीस का हिरवे धागे ?” या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य शब्दबद्ध करा.
उत्तर :
कवी बा.सी मेढेकर यांच्या ‘दवांत आलिस भल्या पहाटी’ ही कविता प्रेमानुभव व्यक्त करणारी कविता आहे. प्रियकराच्या मनात रेखलेली एखादी सुंदर स्त्री त्याने कवितेच्या माध्यमातून साकार केली आहे. चित्रकार जसं एखादया सुंदर स्त्रीचे चित्र रेखाटतो तसं कवीने शब्दांच्या माध्यमातून त्याची प्रेयसी रेखाटली आहे. ती आहे-नाही च्या सीमारेषेवर आहे. शुक्राच्या ताऱ्यासारखं तिचं लखलखीत सौंदर्य आहे. ती जाताना तिच्या तोऱ्यांनी प्रियकराचे काळीज वेधून घेते. जाता जाता ती हसते.
त्या हसण्यातूनच तिलाही प्रियकराला साद दयायचीय असा अर्थ सूचित होतो. पण पुन्हा तिचा नखरा, हावभाव बदलतात, ती त्याला दुर्लक्षून पुढेच जाते. तिच्या या वागणुकीवरून त्याचा गोंधळ होतो. त्यामुळे तो गोंधळून विचारतो की तू मागे वळून पहायचे विसरलीस की काय ? आपले एकमेकांशी जे सुंदर नात्याचे धागे जुळलेले आहेत ते कसे काय विसरून गेलीस. त्या धाग्यांना कवी हिरवे धागे म्हणतो. हिरवा रंग उत्तेजित करणारा, प्रेरित करणारा, सुंदरता जपणारा आनंद देणारा तसंच तुझ्या माझ्यातील हिरवं नातं आहे. या नात्याला सुंदर करण्यासाठी कवी आतुर आहे.
Summary in Marathi
प्रस्तावना:
विसाव्या शतकातील भारतीय साहित्यविश्वातील एक सिद्धहस्त कवी म्हणून बा.सी. मर्डेकर प्रसिद्ध आहेत. कवी, कादंबरीकार, समीक्षक, सौंदर्य मीमांसक, असलेल्या मर्नेकरांची कविता भावोत्कट तरीही चिंतनशील, मानवी जीवनातील अंतर्विरोधाच्या जाणिवेने निर्माण झालेली अस्वस्थता व्यक्त करणारी तसेच प्रयोगशील होती, त्यांचे ‘शिशिरागम’ ‘कांही कविता’, ‘आणखी काही कविता’ हे कवितासंग्रह ‘रात्रीचा दिवस’, ‘तांबडी माती’ व ‘पाणी’ या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत, काव्यविषयक त्यांच्या प्रगल्भ जाणिवेने मराठी कवितेचे स्वरूप पूर्णतः पालटून टाकले, काव्यक्षेत्रात केशवसुतांनंतर मेढेकरांनी महत्त्वाचे परिवर्तन घडवून आणले.
कवितेचा आशय :
‘दवांत आलिस भल्या पहाटी’ या कवितेत एक स्नेहपूर्ण प्रेमभाव आला आहे. त्यातून पुरुषाच्या हळव्या मनातील तरल भावना प्रकट झाल्या आहेत. स्त्रीचे सौंदर्य घायाळ करणारे असते. त्या सौंदर्यावर अनेकांनी काव्ये लिहिलेली आहेत.
बा.सी.मर्वेकर यांनी या कवितेत मांडलेली प्रेयसी ही दृश्यमान स्वरूपात वा अदृश्य स्वरूपातील असेल, तिची भेट हा त्याच्यासाठीचा अनमोल क्षण आहे. पण ही भेट ही प्रत्यक्षातील आहे असं नाही. ती आली तेव्हा अगदी पहाटेच्या प्रहरातील वेळ होती. आकाशात तारकांचे राज्य असलेले दिसत होते. ती आली तेव्हा अगदी शुक्राच्या चांदणीसारखे तिचे रूप होते. इतर चांदण्यांपेक्षा तिचे रूप निश्चितच लक्षात राहण्याजोगे होते. तिला पाहताच त्याचे मन तिच्या लख्ख प्रकाशाने, सौंदयनि उजळून गेले. तिच्या चालण्यातील दमदारपणा, तिची नजर यांमुळे कवीचे मन भारावून गेले.
खुणा कविमनावर अस्पष्टपणे उमलत गेल्या. त्या पेरता पेरता त्या पावलांमधील शोभा त्याच्या मनाने टिपली. तिच्या मनातील तरलता नजरेतूनही दिसत होती. जाता जाता पुढे जाऊन ती अडली आहे. जराशी हसली, तिने मागे वळून पाहिले पण तिनं नंतर त्याच्याकडे पाहिलेच नाही त्यामुळे कवीला प्रश्न पडला की ती त्याच्याकडे मागे वळून पहायला विसरली की काय? तिच्या आणि आपल्या नजरेतून प्रेमाचे जे हिरवे धागे गुंफिले होते. ते ती विसरून गेली का? अशा प्रश्नांनी त्याचे मन व्याकूळ झाले होते.
तिच्याकडे पाहताना तिच्यावरून दृष्टी हलत नव्हती. त्या दृष्टीची पिपासाच मनात वाढली. तिच्या नजरेतून मिळालेल्या इशाऱ्यावरून तिच्याजवळ ओळख वाचवण्याची उत्सुकता निर्माण झाली. तिच्या डोळ्यांमधील पारदर्शकता स्पष्ट खुणावत होती. तिच्या बुबुळांपर्यंत त्याची नजर घेट भिडली त्यामधून स्नेहाचा पारा हृदयापर्यंत पोहोचत होता.
तिच्याकडे पाहताना एकीकडे ती त्याच्याशी ओळख दाखवून न दाखवल्यासारखी वागते. कवीला वाटते की तिचं आणि आपलं नातं तर | गतजन्मीचे आहे. त्या गतजन्मीचं नातं आता कसं वरं सांगू शकतो? कारण त्या नजरेतच ओळख अनोळखीचे भाव आहेत. तिच्याविषयी असलेल्या कोमल आठवणी-भावनाच बुजल्यासारख्या झाल्या आहेत.
कवीला वाटतं की तिचं आपल्यासोबत असणं, नसणं हे अगदी तळहातावरच्या नाजूक रेषेसारखं आहे. त्या ज्यांना वाचता आल्या ते ते आपल्या सोबत राहतात. ज्यांना वाचता आल्या नाहीत त्यांना ते समजणारच नाहीत. तिच्या नखांवर असलेला लाल, गुलाबी रंग हा तिच्या लग्नेमुळे आलेला असावा. प्रीतीच्या शुभ्र चांदण्या हातावर गोंदल्या गेल्या आहेत. ज्या पुसल्या जाणाऱ्या नाहीत.
पहाटेच्या दवांत भल्या पहाटे ती आली, ज्यामध्ये अभ्रांची शोभा पसरली होती. येताना तिने प्रीतीची दृष्टी आणली होती पण जाताना ती त्यांच्या दोघांमधील प्रीतीचा गंध ठेऊन गेली, प्रीतीची भाषा केवळ दोघांमधील असते. तिथे व्यवहाराची भाषा लागू पडत नाही. असा हा प्रेमभाव दोघांच्या मनातील ज्याची प्रत्यक्षानुभूती घेताच आली नाही.
समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :
- पहाट – सकाळ, प्रभात – (morning, dawn).
- लक्ष्य – ध्येय – (target, aim).
- पिपासा – तहान – (thirst).
- तरल – चंचल – (tremulous, quivering).
- निर्मल – स्वच्छ – (clean, pure).
- अभ्र – आभाळ, मेघपटल – (cloud, cloudy sky).
- पारा – एक पातळ खनिज पदार्थ – (mercury).
- शुभ्र – सफेद – (white, clean).
- धागा – दोरा – (thread)