Chapter 6 रंग माझा वेगळा
Chapter 6 रंग माझा वेगळा
Textbook Questions and Answers
कृती
1. अ. खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा.
प्रश्न 1.
उत्तर :
आ. कृती करा.
प्रश्न 1.
उत्तर :
इ. योग्य जोड्या लावा.
प्रश्न 1.
उत्तर :
ई. एका शब्दांत उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
- कवीची सदैव सोबत करणारी ……………….
- कवीचा विश्वासघात करणार ……………….
- खोट्या दिशा सांगतात त ……………….
- माणसांच्या अंधकारमय जीवनात साथ देणारा ……………….
उत्तर :
- कवीची सदैव सोबत करणारी – आसवे
- कवीचा विश्वासघात करणारे – आयुष्य
- खोट्या दिशा सांगतात ते – तात्पर्य
- माणसांच्या अंधकारमय जीवनात साथ देणारा – सूर्य
2. खालील शब्दांचे अर्थलिहा.
प्रश्न 1.
- तात्पर्य –
- लळा –
- गुंता –
- सोहळा –
उत्तर :
- तात्पर्य – सार, सारांश
- लळा – माया, ममता, प्रेम
- गुंता – गुंतागुंत
- सोहळा – उत्सव, समारंभ.
3. खालील ओळींचा अर्थलिहा.
प्रश्न अ.
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!
उत्तर :
अर्थ : स्वत:च्या कलंदर वृत्तीचे वर्णन करताना कवी म्हणतात – साऱ्या रंगात रंगूनही माझा रंग वेगळाच आहे. सर्व गुंत्यात गुंतूनही माझा पाय मोकळा आहे. मी पायात बंधने घालून घेणारा नाही. माझे व्यक्तिमत्त्व अनोखे आहे.
प्रश्न आ.
कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!
उत्तर :
अर्थ : कवी म्हणतात – कोणत्या क्षणी मला जीवनाचे भान आले, ते मला कळले नाही. मी आयुष्य जगायला लागलो. पण या आयुष्याने माझा विश्वासघात केला.
4. काव्यसौंदर्य.
प्रश्न 1.
माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!
या ओळींमधील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
‘रंग माझा वेगळा’ या गझलमध्ये सुरेश भट यांनी स्वत:च्या कलंदर व मुक्त व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून दाखवले आहेत.
कवी म्हणतात – मी कुठल्याही बंधनात स्वत:ला कोंडून ठेवले नाही. मी बेधडक माझे स्वतंत्र विचार मांडले. माणुसकीला काळिमा फासणारा अन्याय मी सहन केला नाही व करू दिला नाही. समाजात नैराश्येचा अंधार असला नि माणुसकीची भयाण मध्यरात्र जरी झाली असली, तरीही मी तेजस्वी विचारांचा सूर्य आहे. मी इतरांच्या अन्यायाला वाचा फोडतो. मी माझ्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही हापापलेला नाही. मी दुःखाचा सोहळा साजरा करीत नाही.
तडफदार व ओजस्वी शब्दांत कवींनी स्वयंभू विचार प्रतिपादन केले आहेत. या ओळींतून समता व स्वातंत्र्याचे ठोस विचार प्रकट झाले आहेत.
5. रसग्रहण.
खालील ओळींचे रसग्रहण करा.
प्रश्न 1.
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
राहती माझ्यासवें हीं आसवें गीतांपरी;
हें कशाचें दु:ख ज्याला लागला माझा लळा!
कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!
उत्तर :
आशयसौंदर्य : समाजातील अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला मी कलंदर माणूस आहे, हे विचार ‘रंग माझा वेगळा’ या गझलमध्ये सुरेश भट यांनी मांडले आहेत. आयुष्यात झालेली फसवणूक न जुमानता माणुसकीची बांधिलकी पत्करलेला मी एक सृजनात्मा आहे, असे कवींनी म्हणायचे आहे.
काव्यसौंदर्य : उपरोक्त ओळींमध्ये कवी असा भाव मांडतात की साऱ्या रंगात रंगून मी वेगळा आहे. गुंत्यात अडकून न पडता मी बंधनमुक्त आहे. माझे व्यक्तिमत्त्व अनोखे आहे. कशा, कुठून सुखाच्या सावल्या आल्या, पण या सुखाच्याही झळा लागणारा मी संवेदनशील माणूस आहे. माझ्या सोबतीला माझे अश्रू आहेत म्हणून सामाजिक दुःखाची मला माया लागली. जगण्याचे भान मला कधीतरी आले; पण आयुष्यात फसवणूक खूप झाली. विश्वासघात झाला; पण मी प्रेरक व माणुसकींचे विचार घेऊन उगवणारा सूर्य आहे.
भाषिक वैशिष्ट्ये : या कवितेत ‘गझल’ हे मात्रावृत्त आहे. अंत्य यमकाचा रदिफ या रचनेत ठळकपणे वापरला आहे. ‘मतला’ धरून यामध्ये सहा शेरांची (रेखो) मांडणी केली आहे. त्यामुळे आशय गोळीबंदपणे साकार होतो. ‘सावल्याच्या झळा, दुःखाचा लळा, मध्यरात्रीचा सूर्य’ इत्यादी यातील प्रतिमा वेगळ्या व नवीन आहेत. ओजस्वी शब्दकळा व शब्दांची ठोस पक्कड यांमुळे ही गझल रसिकांना आवाहक वाटते.
6. अभिव्यक्ती.
प्रश्न अ.
‘समाजात स्वत:चे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात’, सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
जीवनाचे सार्थक होण्यासाठी आयुष्यासमोर ध्येय हवे आणि त्या ध्येयाची पूर्तता निष्ठेने व व्रतस्थ वृत्तीने करायची असेल, तर स्वत:चे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, अत्यंत गरजेचे आहे.
स्वत:च्या कर्तृत्वाची शक्ती आधी माणसाने जाणली पाहिजे, म्हणजे समाजात त्याचे वेगळेपण प्रकर्षाने ठसते. कर्तृत्व ही माणसाची ‘माणूस’ असण्याची निशाणी आहे. सामाजिक बांधिलकी मनापासून असायला हवी. आदरणीय बाबा आमटे यांनी वकिली सोडून कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेऊन ‘आनंदवन’ उभारले. समाजात त्यांचे वेगळेपण उठून दिसते. गाडगे महाराजांनी घरादाराचा त्याग करून समाजातील स्वच्छता नि मनाचा विवेक जागवण्यासाठी ‘स्वच्छता अभियान’ एकहाती पार पाडले. कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली. गाडगेमहाराज आज आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून आपणास वंदनीय आहेत.
प्रश्न आ.
कवीच्या आयुष्याने केलेली त्याची फसवणूक तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
‘रंग माझा वेगळा’ या गझलमध्ये कवींनी स्वत:च्या बेधडक व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य सांगताना त्यांच्या वाट्याला आलेल्या फसवणुकीचाही मागोवा घेतला आहे.
ते म्हणतात – मी कोणत्याही गुंत्यात अडकलो नाही, ना कुठल्या रंगात रंगलो, मी स्वत:चे व्यक्तित्व वेगळे राखले. पण मला कळले नाही सुखाची सावली कधी लाभली; पण या क्षणिक सुखाच्या झळा मी सोसल्या. माझ्या कवितेच्या सोबतीला माझे अश्रू होते. त्यामुळे समाजाच्या दुःखाचा लळा मला लागला. ‘तात्पर्य’ सांगणारे महाभाग भेटले.
वस्तुस्थिती विपरीत दर्शवणारे लोक भेटले. चालतोय त्याला पांगळा’ नि पाहणाऱ्याला ‘आंधळा’ संबोधणारे फसवे लोक मला मिळाले. कोणत्या बेसावध क्षणी माझा आयुष्याने विश्वासघात केला ते कळलेच नाही. पण मी या फसवणुकीला पुरून उरलो. मी स्वार्थासाठी जगलो नाही. सामाजिक दुःख दूर करणारा मी नैराश्येतील सूर्य झालो.
प्रश्न इ.
‘मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे’, असे कवी स्वत:बाबत का म्हणतो ते लिहा.
उत्तर :
समाजात पसरलेल्या दुःखदैन्याचा अंधकार नष्ट करण्याची बेधडक व खंबीर वृत्ती बाळगणारा मी माणूस आहे, असे स्वत:चे व्यक्तिमत्त्व कवीनी ‘रंग माझा वेगळा’ या कवितेत साकारले आहे.
ते म्हणतात – ‘तात्पर्य’ सांगणारी फसवी माणसे व दुसऱ्याची वंचना करणारी माणसे खोटेपणाचा आव आणून समाजात वावरत आहेत. हे महाभाग समाजाची फसवणूक करण्यासाठी टपलेले आहेत. त्यामुळे समाजात नैराश्येची मध्यरात्र झाली आहे. मध्यरात्री जसा सूर्य झाकोळून अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. अशा या माणुसकीहीन मध्यरात्री मी तळपणारा सूर्य आहे. माझ्या तेजस्वी विचारांनी मी समाजातील नैराश्येचा अंधकार दूर करीन, हा विचार शेरातून मांडताना कवी ‘मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे’ असे स्वत:बद्दल सार्थ उद्गार काढतात.
उपक्रम :
अ. मराठी गझलकारांच्या गझला मिळवून वाचा.
आ. यू-ट्यूबरील विविध मराठी गझल ऐकून आनंद मिळवा.
तोंडी परीक्षा.
‘रंग माझा वेगळा’ ही गझल सादर करा.
कवितेतील यमक साधणारे शब्द लिहा :
प्रश्न 1.
- ………….
- ………….
- ………….
- ………….
- ………….
- ………….
- ………….
उत्तर :
- वेगळा
- मोकळा
- झळा
- लळा
- गळा
- आंधळा
- सोहळा.
कृती : (रसग्रहण)
प्रश्न 1.
पुढील ओळींचे रसग्रहण करा : रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा! कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे; मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा! राहती माझ्यासवें ही आसवें गीतांपरी; हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा! कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलों अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा!
उत्तर:
आशयसौंदर्य : समाजातील अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला मी कलंदर माणूस आहे, हे विचार ‘रंग माझा वेगळा’ या गझलमध्ये सुरेश भट यांनी मांडले आहेत. आयुष्यात झालेली फसवणूक न जुमानता माणुसकीची बांधिलकी पत्करलेला मी एक सृजनात्मा आहे, असे कवींनी म्हणायचे आहे.
काव्यसौंदर्य : उपरोक्त ओळींमध्ये कवी असा भाव मांडतात की साऱ्या रंगात रंगून मी वेगळा आहे. गुंत्यात अडकून न पडता मी बंधनमुक्त आहे. माझे व्यक्तिमत्त्व अनोखे आहे. कशा, कुठून सुखाच्या सावल्या आल्या, पण या सुखाच्याही झळा लागणारा मी संवेदनशील माणूस आहे. माझ्या सोबतीला माझे अश्रू आहेत म्हणून सामाजिक दुःखाची मला माया लागली, जगण्याचे भान मला कधीतरी आले; पण आयुष्यात फसवणूक खूप झाली, विश्वासघात झाला; पण मी प्रेरक व माणुसकींचे विचार घेऊन उगवणारा सूर्य आहे.
भाषिक वैशिष्ट्ये : या कवितेत ‘गझल’ हे मात्रावृत्त आहे. अंत्य यमकाचा रदिफ या रचनेत ठळकपणे वापरला आहे. ‘मतला’ धरून यामध्ये सहा शेरांची (रेखो) मांडणी केली आहे. त्यामुळे आशय गोळीबंदपणे साकार होतो. ‘सावल्याच्या झळा, दुःखाचा लळा, मध्यरात्रीचा सूर्य’ इत्यादी यातील प्रतिमा वेगळ्या व नवीन आहेत. ओजस्वी शब्दकळा व शब्दांची ठोस पक्कड यांमुळे ही गझल रसिकांना। आवाहक वाटते.
व्याकरण
वाक्यप्रकार :
वाक्यांच्या आशयानुसार पुढील वाक्यांचा प्रकार लिहा :
प्रश्न 1.
- किती अफाट पाऊस पडला काल!
- हे फूल खूप छान आहे.
- तुझी शाळा कोठे आहे?
उत्तर :
- उद्गारार्थी वाक्य
- विधानार्थी वाक्य
- प्रश्नार्थी वाक्य
वाक्यरूपांतर :
कंसातील सूचनांप्रमाणे वाक्यरूपांतर करा :
प्रश्न 1.
- ज्ञान मिळवण्यासाठी भरपूर वाचन करा. (विधानार्थी करा.)
- जगात सर्व सुखी असा कोणी नाही. (प्रश्नार्थी करा.)
- रांगेत चालावे. (आज्ञार्थी करा.)
उत्तर :
- ज्ञान मिळवण्यासाठी भरपूर वाचन करावे.
- जगात सर्व सुखी असा कोण आहे?
- रांगेत चाला.
समास :
तक्ता पूर्ण करा :
प्रश्न 1.
उत्तर :
प्रयोग :
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा :
प्रश्न 1.
- सुरेश भटांनी गझल लिहिली.
- रूपाने गाय झाडाला बांधली.
- अमर अभ्यास पहाटे करतो.
- माहुताने हत्तीस बांधले.
उत्तर :
- कर्मणी प्रयोग
- कर्मणी प्रयोग
- कर्तरी प्रयोग
- भावे प्रयोग
पुढील ओळींमधील अलंकार ओळखा :
प्रश्न 1.
- त्याच्या एका गर्जनेने पर्वत डळमळतात. → [ ]
- आहे ताजमहाल एक जगती तो त्याच त्याच्यापरी. → [ ]
- प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. → [ ]
- एक फळ नासके असेल, तर सर्व फळांवर परिणाम होतो; तसा एक दुर्जन माणूस सारा समाज दूषित करतो. → [ ]
उत्तर :
- अतिशयोक्ती अलंकार
- अनन्वय अलंकार
- अतिशयोक्ती अलंकार
- अर्थान्तरन्यास अलंकार
रंग माझा वेगळा Summary in Marathi
कवितेचा (गझलचा) भावार्थ :
स्वत:च्या कलंदर वृत्तीचे वर्णन करताना कवी म्हणतात – सर्व रंगात रंगले, तरी माझा रंग वेगळा व अनोखा आहे. माझे व्यक्तिमत्त्व साऱ्यांहून वेगळे आहे, कुठल्याही गुंत्यात मी अडकलो, तरी त्या बंधनातून मी मुक्त होतो.
मला कळले नाही कुठून आणि कशा सुखाच्या सावल्या माझ्याकडे आल्या; पण मी असा संवेदनशील आहे की, या सुखछायेच्याही माझ्या मनाला झळा लागतात. सुखातही मला मानसिक वेदना होतात.
माझ्या डोळ्यांतले दुःखाश्रू गाण्याप्रमाणे माझ्यासोबत सदैव राहतात, अश्रूच माझे गाणे होते, हे असे कशाचे दु:ख मला होते की या दुःखालाही माझा लळा लागला. दुःखावरही मी माया करतो.
कोणत्या वेळी मला जीवनाचे भान आले, जाणीव झाली हे मला 5 कळले नाही. पण मी आयुष्य जगायला लागलो. तथापि, माझ्या प्रामाणिक जगण्याचा या आयुष्याने विश्वासघात केला. माझ्या इमानाची किंमत जगाने विश्वासघाताने चुकवली.
चारीबाजूंनी या दिशा, ही माणसे मला जीवनाचे सार सांगतात नि माझी दिशाभूल करतात. कारण जो नीट चालतो, त्याला जग पांगळा म्हणते नि जो नीट पाहतो, त्याला जग आंधळा म्हणते. ढोंगी लोकांनी निर्मळ जीवनाची फसवणूक केली आहे.
जिथे जिथे अंधार आहे, दारिद्र्याचा काळोख आहे, अशा नैराश्येच्या काळ्या मध्यरात्री मी सर्वत्र तळपणारा सूर्य आहे. माझ्या विचारांना . दिव्य तेज आहे, इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची माझी वृत्ती आहे. मी स्वत:साठी किंवा माझ्या स्वार्थासाठी कधी पेटून उठत नाही. स्वार्थाचा उत्सव मी साजरा करीत नाही.
शब्दार्थ :
- गुंता – गुंतागुंत.
- झळा – (गरम हवेचा) झोत.
- आसवे – अश्रू.
- गीत – गाणे.
- तात्पर्य – सार, सारांश, निष्कर्ष.
- पांगळा – दिव्यांग.
- सोहळा – उत्सव, समारंभ.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :
1. पाय मोकळा होणे – बंधनातून मुक्त असणे.
2. गळा कापणे – विश्वासघात करणे.