Chapter 7 गवताचे पाते

Day
Night

Chapter 7 गवताचे पाते

Textbook Questions and Answers

कृति

कृतिपत्रिकेतील प्रश्न १ (अ) आणि (आ) यांसाठी…

प्रश्न 1.
आकृत्या पूर्ण करा.

(i) Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 7 गवताचे पाते 1


उत्तर:

(ii) Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 7 गवताचे पाते 2
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 7 गवताचे पाते 20

(iii) Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 7 गवताचे पाते 3
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 7 गवताचे पाते 7

(iv) Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 7 गवताचे पाते 4
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 7 गवताचे पाते 8

प्रश्न 2.
कारणे लिहा.
(अ) झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्यानं गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली, कारण …………………………
(आ) ‘अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही’ असे गळून पडणारे पान म्हणाले, कारण …………………………
(इ) वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पात्यात झाले, कारण …………………………
उत्तर:

  • झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्याने गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली; कारण त्याची झोपमोड होऊन त्याच्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला होता.
  • ‘अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही,’ असे गळून पडणारे पान म्हणाले; कारण त्याने आयुष्यात गाणे म्हणण्यासाठी कधी ‘आ’सुद्धा केला नव्हता.
  • वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पात्यात झाले; कारण त्या संजीवक स्पर्शामध्ये विलक्षण जादू होती.

प्रश्न 3.
खालील शब्दांतील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
(अ) बेजबाबदारपणा
(आ) धरणीमाता
(इ) बालपण
उत्तर:

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 7 गवताचे पाते 14

प्रश्न 4.
खालील परिच्छेद वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा.
कुंभकोणम् येथील शाळेत गणिताचा सिद्धांत शिक्षक समजावून सांगत होते एखादया संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार नेहमी एक येतो तेवढ्यात एक लहानसा मुलगा ताडकन उभा राहिला आणि म्हणाला गुरुजी तुमचा हा सिद्धांत थोडासा चुकीचा आहे ते म्हणाले तुझे म्हणणे स्पष्ट करून सांग पाह यावर तो मुलगा धीटपणे म्हणाला सर शून्याला शून्याने भागले तर त्या चिमुरड्या मुलाचा हा प्रश्न ऐकताच त्या शिक्षकांना त्याच्या बुद्धिमत्तेचे विलक्षण आश्चर्य वाटले हा मुलगा म्हणजे पुढे श्रेष्ठ गणिती म्हणून प्रसिद्ध झालेले श्रीनिवास रामानुजन होय
उत्तर :

कुंभकोणम् येथील शाळेत गणिताचा सिद्धांत शिक्षक समजावून सांगत होते. एखादया संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार नेहमी एक येतो. तेवढ्यात एक लहानसा मुलगा ताडकन उभा राहिला आणि म्हणाला, “गुरुजी, तुमचा हा सिद्धांत थोडासा चुकीचा आहे. ते म्हणाले, “तुझे म्हणणे स्पष्ट करून | सांग पाहू!” यावर तो मुलगा धीटपणे म्हणाला, “सर, शून्याल शून्याने भागले तर?” त्या चिमुरड्या मुलाचा हा प्रश्न ऐकताच त्या शिक्षकांना त्याच्या बुद्धिमत्तेचे विलक्षण आश्चर्य वाटले. हा मुलगा म्हणजे पुढे श्रेष्ठ गणिती म्हणून प्रसिद्ध झालेले ‘श्रीनिवास रामानुजन’ होय.

प्रश्न 5.
खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही?
(अ) ज्ञानी x सुज्ञ
(आ) निरर्थक x अर्थपूर्ण
(इ) ऐच्छिक x अनिवार्य
(ई) दुर्बोध x सुबोध
उत्तर:

ज्ञानी x सुज्ञ.

प्रश्न 6.
स्वमत.

(अ) ‘माणसातील ठरावीक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते’, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर :

माणसाच्या स्वभावाची एक गंमतच आहे. आपल्या मुलाने सकाळी लवकर उठावे, व्यायाम करावा, नियमित अभ्यास करावा. त्याने चांगल्या मुलांचीच संगत धरावीः परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवावेत… वगैरे वगैरे, असे प्रत्येक आईबाबांना वाटते. पण या आईबाबांनी त्यांच्या तरुणपणी असे काहीही केलेले नसते. त्या काळात त्यांच्या आईबाबांनी घरलेले असले आग्रह यांनी उधळून लावले होते. मात्र हे आजच, आधुनिक काळातच, घडते असे नाही. जगभर सर्व मानवी समाजांत हेच घडत आलेले आहे. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य आणि नंतर मृत्यू हे चक्र अव्याहत पृथ्वीच्या निर्मितीपासूनच चालू आहे. प्रत्येकजण स्वतःच्या जागेवरून जगाकडे बघत असतो. तिथून जग जसे दिसते, तसे आणि तेवढेच खरे आहे, असे तो मानतो. म्हणून प्रत्येक पिढीत ते आणि तसेच घडत राहते.

(आ) गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता, तर तुम्ही पानाला काय उत्तर दिले असते?
उत्तर :

मी गवतपाते असतो, तर गळून पडणाऱ्या पानाला पुढीलप्रमाणे माझे म्हणणे सांगितले असते :

“आजोबा, आपण दोघेही अकारण भांडत आहोत. काय झाले ते पाहा. तुम्ही गिरक्या घेत घेत खाली आलात. त्या वेळी खूप आवाज झाला आणि माझी झोपमोड झाली. मला राग आला आणि तुम्हांला मी रागाने लागेल असे काहीतरी बोललो. तुम्हीसुद्धा मला चिडखोर बिब्बा म्हणालात, मला अरसिक म्हणालात. पण मी थोडा अंतर्मुख झालो. विचार केला. माझ्या लक्षात आले की आपण चुकीच्या कारणाने भांडत आहोत. आपल्या दोघांचेही दृष्टिकोन भिन्न आहेत. त्यामुळे आपले विचार भिन्न आहेत, आपणा प्रत्येकाला स्वत:चेच बरोबर आहे, असे वाटते. समोरचा चुकीचा आहे असे वाटते.

आता हेच पाहा ना. तुम्ही जमिनीपासून उंचावर राहता. तुम्हांला दूरदूरचा परिसर उंचावरून दिसतो. भोवतालच्या परिसराच्या दर्शनाचा आनंद घेता येतो. त्यामुळे तुम्हाला तुम्ही श्रेष्ठ आहात असे वाटते. आम्ही मातीत लोळत राहतो. म्हणून आम्ही कमी दर्जाचे आहोत, असे तुम्हाला वाटते. पण आजोबा, आम्ही आत्ता, या क्षणी मनसोक्त जगतो. तुम्ही उदयाचा विचार करीत राहता आणि आजचा आनंद गमावता. आपण दोघेही जण आपापल्या जागी बरोबर आहोत, आपण दुसऱ्याची स्थिती लक्षात घेतली पाहिजे. मग आपल्याला दोघांच्याही भूमिका कळतील आणि आपण भांडत बसणार नाही.

आता हे सगळे राहू दया. तुम्ही सांभाळून सांभाळून चाला. स्वत:च्या प्रकृतीला जपा.

(इ) गवताचे पाते व पान यांच्या स्वभाववैशिष्ट्यांत बदल झाला आहे, अशी कल्पना करून कथेचे पुनर्लेखन करा.
उत्तर :

हिवाळा नुकताच सुरू झाला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली.
पट… पटः.. पट…
त्यांचा तो पट… पट… पट… असा कर्णकटू आवाज …

तो आवाज ऐकून धरणीमातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, “अहो आजोबा, आजोबा, केवढ्याने पडलात! लागलंबिगलं तर नाही ना?”

पानाला बरे वाटले. प्रेमळपणे म्हणाले, “काय रे बाळा ? तुला त्रास झाला का रे?”

“छे, छे, आजोबा. तुम्ही ठीक आहात ना?”

“काय सांगू बाळा! इतका झकास तरंगत येताना सारखे वाटत होते की असेच खूप वेळ सुखाने तरंगत राहावे. पण आता वय झाले ना! काय करणार?”

“असं का बोलता? वय झालं म्हणता, पण तरुणांपेक्षाही तुमचे मन – तरुण आहे. किती आनंदात आहात तुम्ही!”

हे ऐकत ऐकत ते पान आनंदाने मातीत मिसळले.

ते पन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने! त्या स्पर्शात E विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. पाते थंडीने कुडकुडत होते. ते धरणीमातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडेतिकडे झाडांवर पाने सळसळत होती… पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती!

ते गवताचे पाते लगबगीने उठले. स्वतःशीच पुटपुटले. आज दुसरे आजोबा खाली आले वाटतं. चला, चला. पटापट जायला हवं. एखादया आजोबांना मदतीची गरज असेल कदाचित!

प्रश्न 7.
खाली दिलेल्या रूपक कथेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.

“…एक विचारू?”
उगवून नुकतेच काही दिवस झालेलं रोप लगतच्या महावृक्षाला म्हणाले.
“हं.
“मलाही तुमच्यासारखं मोठं व्हायचंय… पण..”
“पण माझ्या सावलीखाली आता ते शक्य नाही, हो ना?”
“…हो.” “अरे! कितीतरी लहान लहान झाडंही खूप सुंदर असतात, आणि इतक्या..”
“पण वाढणं देखील सुंदरच असेल ना?”
“हो!
आणि इतक्या उंचीवर आता खरं तर ही लहान झाडंच जास्त सुंदर दिसतात…”
…आणि महावृक्षाला दूरवर जंगलातून वाट काढीत येणारा एक लाकूडतोड्या दिसला!

– (गुलमोहर)

(टीप – रूपक कथेचा भावार्थ परीक्षेकरिता समाविष्ट केलेला असल्याने तोही पाठाचा भाग म्हणून अभ्यासावा.)
उत्तर :
रोप-वृक्षाची ही कथा प्रत्यक्ष जीवनात वेगवेगळ्या रूपांत अवतरताना दिसते. लहान मुलांना मोठे व्हावेसे वाटते. मोठ्या माणसांना काहीही करण्याचे, कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य असते. मुलांवर बंधने असतात. थोडे बारकाईने पाहिले तर मोठ्यांना लाभणारे स्वातंत्र्य प्रामक असते. मोठ्यांना पोट भरण्यासाठी कामधंदा करावा लागतो. या काळात स्वातंत्र्य बाजूला ठेवावे लागते. मोठ्या माणसांना कायदेकानून, नीती-नियम पाळावे लागतात. पैसा खूप मिळाल्यावर सर्व सुखे उपभोगता येतील, असे सर्वांना वाटत असते. प्रत्यक्षात मात्र स्थिती उलटी असते. खूप पैसे मिळाल्यावर ते पैसे सुरक्षित ठेवण्याच्या चिंतेने माणूस घेरला जातो. रस्त्याच्या फुटपाथवर झोपणाऱ्या माणसाला कोणी चोर येऊन चोरी करील, अशी भीती नसते. पण बंगला बांधलेला माणूस सभोवती भक्कम भिंत बांधून घेतो. दारावर पहारेकरी ठेवतो. याचा अर्थ खूप पैसे मिळाल्यावर सुख मिळते हे खरे नाही.

Additional Important Questions and Answers

प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती १ : (आकलन)

प्रश्न 1.
नावे लिहा :
(i) झाडावरून गळून पडणारी –
(ii) कर्णकटू आवाजाने जागे होणारे –
(iii) पानाने गवतपात्याला दिलेली उपमा –
(iv) संजीवक स्पर्शाने गवतपात्याला जागे करणारा
(v) नव्या गवतपात्याचा जीव खाऊन टाकणारी –
उत्तर:

(i) झाडावरून गळून पडणारी – पिकलेली पाने
(ii) कर्णकटू आवाजाने जागे होणारे – गवतपातो
(iii) पानाने गवतपात्याला दिलेली उपमा – चिडखोर बिब्बा
(iv) संजीवक स्पर्शाने गवतपात्याला जागे करणारा – वसंतऋतू
(v) नव्या गवतपात्याचा जीव खाऊन टाकणारी – गळणारी पाने

प्रश्न 2.
वैशिष्ट्ये लिहा : (सराव कृतिपत्रिका-३)


उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 7 गवताचे पाते 9

प्रश्न 3.
पुढील वाक्यांच्या साहाय्याने गवताचे पाते आणि पिकलेले पान यांच्या वृत्तीतील फरक स्पष्ट करा व तक्ता पूर्ण करा : (सराव कृतिपत्रिका-३)
(i) गोड स्वप्न बघणारे
(ii) स्वत:ला रसिक समजणारे
(iii) कर्णकटू आवाज सहन न होणारे
(iv) स्वत:ला उच्चपदस्थ समजणारे
गवताचे पाते – पिकलेले पान
(i) …………………… – ……………………
(ii) …………………… – ……………………
उत्तर:

गवताचे पाते – पिकलेले पान
(i) गोड स्वप्न बघणारे – (i) स्वत:ला रसिक समजणारे
(ii) कर्णकूट आवाज सहन न होणारे – (ii) स्वत:ला उच्चपदस्थ समजणारे

कृती २ : (आकलन)

प्रश्न 1.
रिकाम्या चौकटी भरा :

(i) गवतपात्याने उराशी बाळगलेली भावना –
(i) सुंदर स्वप्नांमध्ये दंग असणारे
(iii) तरुण पिढी बेजबाबदार आहे, असे मानणारी
(iv) वडील पिढी कटकटी असते, असे मानणारी –
उत्तर:

(i) गवतपात्याने उराशी बाळगलेली भावना – उच्च पदाचा खोटा अभिमान
(ii) सुंदर स्वप्नांमध्ये दंग असणारे – गवतपाते
(iii) तरुण पिढी बेजबाबदार आहे, असे मानणारी – वडील पिढी
(iv) वडील पिढी कटकटी असते, असे मानणारी – तरुण पिढी

प्रश्न 2.
आकृत्या पूर्ण करा :

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 7 गवताचे पाते 10
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 7 गवताचे पाते 11
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 7 गवताचे पाते 12

कृती ३ : (व्याकरण)

प्रश्न 1.
पुढील शब्दांच्या अर्थछटा व्यक्त करणारे शब्द लिहा : (प्रत्येकी ४)
(i) कर्णकटू
(ii) कटकट
(iii) चिडखोर
(iv) चिमुकला
(v) क्षुद्र.
उत्तर:
(i) कर्णकटू : कर्कश, भसाडा, कर्णकठोर, बेसूर.
(ii) कटकट : किटकिट, पिटपिट, किरकिर, भुणभुण.
(iii) चिडखोर : चिडका, चिडचिडा, चिरचिरा, रागीट.
(iv) चिमुकला : चिमणा, चिटुकला, सानुला, चिमुरडा.
(v) क्षुद्र . : क्षुल्लक, क:पदार्थ, कस्पटासमान, हीन.

प्रश्न 2.
मोठा आवाज व्यक्त करणारे चार शब्द लिहा.
उत्तर:

(i) घडामधुडुम
(ii) दणदणाट
(iii) खणखणाट
(iv) घणघणाट.

प्रश्न 3.
मंजूळ आवाज व्यक्त करणारे चार शब्द लिहा.
उत्तर:

(i) रुणझुण
(ii) छुमछुम
(iii) कुहुकुहु
(iv) किलबिल.

प्रश्न 4.
पुढील शब्दांसाठी तुमच्या मते, योग्य अशी प्रत्येकी दोन विशेषणे लिहा :
(i) थंडी
(ii) ऊन
(iii) पाऊस
उत्तर:

(i) थंडी : गुलाबी, झोंबरी.
(ii) ऊन : रणरणणारे, दाहक.
(iii) पाऊस : मुसळधार, रिमझिम.

प्रश्न 5.
पुढील नामांसाठी पाठातील विशेषणे शोधा :
(i) फळे :
(ii) संगीत :
(iii) आंबा :
(iv) मंत्र :
उत्तर:

(i) फळे : पिकलेली
(ii) संगीत : कर्णकटू
(iii) आंबा : गोड
(iv) मंत्र : संजीवक

प्रश्न 6.
पुढील गटांमधील कोणती जोडी विरुद्धार्थी नाही?
(i) (१) आरंभ – अखेर
(२) उदय x अस्त
(३) सुरुवात x सांगता
(४) समाप्ती x शेवट
उत्तर:

(i) समाप्ती x शेवट

(ii) (१) राग x प्रेम
(२) संताप x माया
(३) कोप x ममता
(४) तिडीक x रोष.
उत्तर:

(ii) तिडीक x रोष

(iii) (१) असत्य x सत्य
(२) लबाडी x प्रामाणिकपणा
(३) फसवेगिरी x प्रतारणा
(४) खरेपणा x खोटेपणा.
उत्तर:

(iii) फसवेगिरी x प्रतारणा,

कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
तरुण पिढी व वडील पिढी यांची स्वभाववैशिष्ट्ये पाठाच्या आधारे लिहा.
उत्तर :

तरुण पिढीचे नेहमी असेच असते. आत्ता या क्षणी. जे दिसते, वाटते, तेच खरे. वर्तमानकाळ हाच खरा. उदया-परवा काय होईल ते महत्त्वाचे नाही. जे जे वाटते ते ते उत्स्फूर्तपणे करावे. वडील पिढीला हे असे वागणे पटत नाही. आणि म्हणून तरुणांना वडील पिढीचा अडथळाच वाटतो. त्यांची कटकट वाटते.

वडील पिढीला वाटते की, तरुण पिढी फक्त मौजमजा करण्यात, सुखविलासात लोळण्यात धन्यता मानते. आयुष्याचा खरा अर्थ या तरुणांना कळलेला नसतो. मात्र, आपण तरुण असताना काय करीत होतो, हे प्रौढांना आठवत नाही. किंबहुना ते लक्षात घ्यायची त्यांची तयारीच नसते. नेमके हेच आता तरुण असलेल्यांच्या बाबतीतही घडते. वडील पिढीविरुद्ध तक्रार करणारे तरुण जेव्हा आईबाबा होतात, तेव्हा ते स्वतःच्या मुलांशी वडील पिढीप्रमाणेच वागतात. म्हणजे ‘येरे माझ्या मागल्या!’ असे असूनही कोणीही वास्तव शोधण्याचा प्रयत्न करीत नाही.

व्याकरण व भाषाभ्यास

कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) यांसाठी…
व्याकरण घटकांवर आधारित कृती :

१. समास :
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा :
(i) प्रतिक्षण
(ii) बिनधोक
(iii) लोकप्रिय
(iv) नेआण
(v) रंगीबेरंगी
(vi) बारभाई.
उत्तर: :

(i) प्रतिक्षण – प्रत्येक क्षणी – अव्ययीभाव
(ii) बिनधोक – धोक्याशिवाय – अव्ययीभाव
(iii) लोकप्रिय – लोकांना प्रिय – विभक्ती तत्पुरुष
(iv) नेआण – ने आणि आण – इतरेतर द्वंद्व
(v) रंगीबेरंगी – रंगी, बेरंगी वगैरे – समाहार वंद्व
(vi) बारभाई – बारा भाईंचा समूह – द्विगू

२. अलंकार :

प्रश्न 1.
पुढील कृती करा :
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
उपमेय –
उपमान –
अलंकार –
अलंकाराचे वैशिष्ट्य –
उत्तर:

उपमेय – देवाचे नाव
उपमान – अमृत
अलंकार – व्यतिरेक
अलंकाराचे वैशिष्ट्य – उपमानापेक्षा उपमेय श्रेष्ठ आहे.

प्रश्न 2.
डोकी अलगद घरे उचलती
काळोखाच्या उशीवरूनी (मार्च ‘१९)
अचेतन घटक –
मानवी क्रिया –
अलंकार –
उत्तर:

अचेतन घटक – घरे
मानवी क्रिया – डोके वर उचलणे
अलंकार – चेतनागुणोंक्ती

३. वृत्त :
पुढील ओळींचे गण पाडून वृत्त ओळखा :
द्रव्यास हे गमनमार्ग यथावकाश
की दान भोग अथवा तिसरा विनाश.
उत्तर:

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 7 गवताचे पाते 13

वृत्त : हे वसंततिलका वृत्त आहे.

४. शब्दसिद्धी :
(१) ‘अ’ हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा :
जसे-अरसिक
(i) [ ]
(ii) [ ]
(iii) [ ]
(iv) [ ]
उत्तर :

(i) अविवेक
(ii) अविचार
(iii) अप्रगत
(iv) अवर्णनीय

(२) सं’ हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा :
जसे-संजीवक
उत्तर :

(i) संशोधन
(ii) संपूर्ण
(iii) संभाषण
(iv) संघटना

(३) ‘इकडेतिकडे सारखे चार अभ्यस्त शब्द लिहा :
उत्तर :

(i) काहीबाही
(ii) इथेतिथे
(ii) वेळकाळ
(iv) भलीबुरी

५. सामान्यरूप:
‘तक्ता भरा:
शब्द – प्रत्यय – सामान्यरूप
(१) गवताचे – चे – ……………..
(२) कपाळाला – …………….. – ……………..
(३) पानाने – …………….. – ……………..
(४) झाडात – …………….. – ……………..
उत्तर:

शब्द – प्रत्यय – सामान्यरूप
(१) गवताचे – चे – गवता
(२) कपाळाला – ला – कपाळा
(३) पानाने – ने – पाना
(४) झाडात – त – झाडा

६. वाक्प्रचार :
पुढील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ निवडा :

(i) झोपमोड होणे – ……………………..
(अ) मध्ये मध्ये जाग येणे
(आ) गाढ झोप लागणे,

(ii) चेंदामेंदा करणे – ……………………..
(अ) कुटून टाकणे
(आ) घर्षण करणे.

(ii) कित्ता गिरवणे – ……………………..
(अ) सराव करणे
(आ) वाचन करणे.

(iv) तोंडसुख घेणे – ……………………..
(अ) कुशीत घेणे
(आ) खूप बडबडणे.
उत्तर:
(i) मध्ये मध्ये जाग येणे
(ii) कुटून टाकणे
(i) सराव करणे
(iv) खूप बडबडणे.

भाषिक घटकांवर आधारित कृती:

प्रश्न 1.
समानार्थी शब्द लिहा :
(i) माता = ……………………………
(ii) गोड = ……………………………
(iii) पृथ्वी = ……………………………
(iv) तोंड = ……………………………
(v) मालक = ……………………………
(vi) प्रवृत्ती = ……………………………
उत्तर:

(i) माता = आई
(ii) गोड = मधुर
(iii) पृथ्वी = अवनी
(iv) तोंड = मुख
(v) मालक = धनी
(vi) प्रवृत्ती = स्वभाव

प्रश्न 2.
जोडशब्द पूर्ण करा

(i) सुख”
(ii) अदला…
(iii) चेंदा…..
उत्तर:

(i) सुखदुःख
(ii) अदलाबदल
(ii) चेंदामेंदा.

प्रश्न 3.
पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा: (सराव कृतिपत्रिका-१)
(i) वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे →
(ii) दुसऱ्यावर अवलंबून असलेला →
उत्तर:

(i) वार्षिक
(ii) परावलंबी

२. लेखननियम :

प्रश्न 1.
अचूक शब्द निवडा :
(i) पुनारावृत्ती/पुनरावृती/पूनरावृत्ती/पुनरावृत्ती.
(ii) नीर्णय/निर्णय/निणर्य/नीणर्य,
(iii) सर्वांगीण/सर्वांगिण/सर्वागीण/सवांर्गीण.
(iv) हुरहुर/हुरहूर/हूरहुर/हूरहूर.
उत्तर:

(i) पुनरावृत्ती
(ii) निर्णय
(iii) सर्वांगीण
(iv) हुरहुर.

प्रश्न 2.
पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(i) मानवि जीवनातले कितितरी वीसंवाद प्रतीबिंबीत झाले आहेत.
(ii) दुरवर जंगलातुन येणारा एक लाकुडतोड्या दीसला.
उत्तर:

(i) मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद प्रतिबिंबित झाले आहेत.
(ii) दूरवर जंगलातून येणारा एक लाकूडतोड्या दिसला.

प्रश्न 3.
पारिभाषिक शब्द :
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा :
(i) General Meeting
(ii) Part Time
(iii) Lift
(iv) Synopsis
(v) Absence (सराव कृतिपत्रिका-१)
(vi) Dismiss, (सराव कृतिपत्रिका-१)
उत्तर: :

(i) General Meeting – सर्वसाधारण सभा
(ii) Part time – अंशकालीन/अर्धवेळ
(iii) Lift – उद्वाहन यंत्र/उद्वाहक
(iv) Synopsis – प्रबंध रूपरेषा/सारांश
(v) Absence – गैरहजेरी
(vi) Dismiss – बडतर्फ.

प्रश्न 4.
अकारविल्हे/भाषिक खेळ :
(१) पुढील शब्द अकारविल्हेनुसार लिहा :
रूपांतर → स्वप्ने → अंतर → मजूर
उत्तर :

अंतर → मजूर → रूपांतर → स्वप्ने.

प्रश्न 5.
कृती करा :


उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 7 गवताचे पाते 16

(ii) बाजूच्या चौकटीत कोणता पर्याय लिहिल्यास चारही अर्थपूर्ण शब्द तयार होतील, तो पर्याय निवडा : (सराव कृतिपत्रिका-१)

पर्याय :
(i) लपट
(ii) टपाट
(iii) टपट
(iv) हपट.
उत्तर:

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 7 गवताचे पाते 18

Summary in Marathi

पाठाचा आशय एका गवताच्या पात्याची ही कथा आहे. गवताच्या चिमुकल्या पात्यासारखीच कथा ही चिमुकलीच आहे.

हिवाळ्याचे दिवस होते. गवताचे पाते धरणीमातेच्या कुशीत गाढ निद्रा घेत होते. ते गोड गोड स्वप्नांच्या सुखद लहरींवर निवांत तरंगत होते. तेवढ्यात झाडावरून पिकलेली पाने पटापटा पडू लागली. जमिनीवर आपटताना सर्व पानांचा पट-पट-पट असा एकत्रित होणारा आवाज आसमंत व्यापून टाकत होता. तो संपूर्ण आवाज इतका कर्णकटू होता की त्या अप्रसन्न आवाजाने चिमुकल्या गवतपात्याची झोपमोड झाली. शिवाय, ज्या सुखस्वप्नांत ते पार ‘डुंबत होते, त्या सुखस्वप्नांचा चुराडा झाला. या गोष्टीचा त्या गवतपात्याला खूप संताप आला, त्या पात्याने संतापाच्या भरात गळणाऱ्या पानांना भरपूर सुनावले. त्याच्या मते, गळणारी पाने कटकट करतात. त्यांच्या आवाजाच्या दंग्याने माझा आनंद नष्ट होतो.

त्यावर गळणाऱ्या पानाने त्या पात्याला क्षुद्र ठरवले. जमिनीवर लोळणाऱ्या पात्याला उंच झाडावर सळसळण्यातला उच्च दर्जाचा आनंद कधीच कळणार नाही. पाते क्षुद्र पातळीवरच जगत राहणार, असा गळणाऱ्या पानाचा दावा होता.

गळणारे पान थोड्याच अवधीत मातीत मिसळून गेले. त्याच्या कणांमधून एका नवीन गवताच्या पात्याने जन्म घेतला, ते आनंदाने डोलत राहिले. थोड्याच दिवसांत हिवाळा आला. ते नवीन जन्मलेले पाते थंडीने कुडकुडू लागले. ऊब मिळवण्यासाठी ते धरणीमातेच्या कुशीत शिरले आणि हळूहळू झोपी गेले. झोपेत ते सुखस्वप्नांच्या लहरींवर आनंदाने तरंगू लागले. पण पडणाऱ्या पानांच्या गदारोळामुळे त्याची झोपमोड झाली. त्याची सुखस्वप्ने भंग पावली. आता ते पाते गळणाऱ्या पानांना संतापाने दूषणे देऊ लागले.

रूपककथेतून सुचवलेला अर्थ या रूपककथेतून माणसांचा स्वभाव अत्यंत सुंदर रितीने व्यक्त केला गेला आहे. या कथेत काय घडते पाहा. झाडावरून गळून पडणाऱ्या पानाला आपण उच्च स्थानावर राहतो आणि पाते क्षुद्र पातळीवर राहते. आपण उच्च दर्जाचे आहोत आणि गवतपाते मात्र अत्यंत खालच्या दर्जाचे आहे, असे वाटते. याउलट गवतपात्याच्या बाबतीत घडते. आपण खूप सुखी समाधानी जीवन जगत आहोत, आपण भाग्यवान आहोत आणि म्हणून उच्च दर्जाचे आहोत. जीवनातल्या सुखाची गोडी त्या कटकट्या, किरकिऱ्या पानाला. कधीच कळू शकणार नाही, असे त्या गवतपात्याला वाटते.

गळून पडलेले पान मातीत मिसळते आणि त्या पानातूनच नवीन गवतपाते निर्माण होते. आता या गवतपात्याला (म्हणजेच पूर्वीच्या पानाला) गळणाऱ्या पानांचा राग येतो. त्याला गळणारी पाने कटकटी, किरकिरी आणि म्हणून जगण्यातला आनंद न कळणारी आहेत, असे वाटते.

सर्व माणसे केवळ स्वतःच्या नजरेतूनच सर्व जगाचे मूल्यमापन करतात. मुलांना आपले आईवडील कटकटी वाटतात. तर, मुलांनी ताळतंत्र सोडला आहे, असे आईवडिलांना वाटते. आपण तरुणपणी कसे वागलो, हे आईवडील विसरतात. आता तरुण असलेली मुले मोठेपणी स्वतःच्या आईवडिलांसारखे वागतात. एकंदरीत, सर्व मानवी समाजात हे असेच घडते.

गवताचे पाते शब्दार्थ

  • संदेशपरता – संदेश देण्याचा गण.
  • कर्णकटू – कर्कश, कठोर.
  • चिमणे- लहान, कोमल, सुकुमार.
  • संजीवक – चैतन्य देणारे, नवीन जीवन देणारे,
  • चेंदामेंदा – ठेचून ठेचून केलेला चुराडा, चक्काचूर.
  • पैलू – बाजू.
  • स्वच्छंदी – मनाच्या लहरीनुसार वागणारा.
  • कित्ता – चांगले अक्षर काढता यावे म्हणून सराव करण्यासाठी केलेला आदर्श अक्षरांचा नमुना. (हे अक्षरांचे नमुने पुन्हा पुन्हा गिरवल्यामुळे अक्षरलेखन योग्य त-हेने करता येते. यावरून, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करण्याला ‘कित्ता गिरवणे’ असे म्हणतात.)

गवताचे पाते वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

  • गिरक्या खाणे : स्वतःभोवती गोल गोल फिरणे.
  • मातीत लोळणे : क्षुद्र पातळीवर जगत राहणे.
  • जीव खाणे : खूप त्रास देणे.
  • कपाळाला आठी घालणे : त्रासिक भाव व्यक्त करणे. (एखादया गोष्टीचा)
  • चेंदामेंदा करणे : (एखादया गोष्टीचा) चिरडून चिरडून चक्काचूर करणे,
  • मातीत मिसळणे : जीवनाचा अंत होणे.
  • तोंडसुख घेणे : टीका करून, टोचून बोलून आनंद घेणे.
  • कित्ता गिरवणे : आधीच्या प्रमाणेच पुन्हा पुन्हा वागणे. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे.
  • अंतर कायम असणे : पूर्वीसारखाच फरक राहणे.