Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!

Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कृती करा

प्रश्न 1.


उत्तर :

प्रश्न 2.


उत्तर :

प्रश्न 3.


उत्तर :

आ. परिणाम लिहा.

प्रश्न 1.
कुटुंबाचा आर्थिक हव्यास वाढला.
उत्तर :

परिणाम : आई-वडील यांच्या स्पर्शातून जाणवणारं वात्सल्याचं ऊबदार घर नष्ट झाले आणि खोट्या नात्याचा काचमहाल उभारला गेला. जिथे प्रेम नव्हते.

प्रश्न 2.
माणसा-माणसांतील संवाद हरवला.
उत्तरः

परिणाम : माणसं माणसासारखी वागत नाहीत. माणसांना अधिक अधिक हव्यासाचा, कुठ थांबायचा हे न कळण्याचा एकाकी पथच जीवनपथ म्हणून स्वीकारला गेला, माणूस एकाकी पडला. माणूसपणाचं पोषण होणे थांबले. स्वार्थीपणा वाढला. माणसे संवेदनाहीन झाली.

प्रश्न 3.
माणसं बिनचेहऱ्यानं बडबडत राहिली.
उत्तरः

परिणाम : माणसं अगतिक झाली. एकाकी आयुष्य जगू लागली. केवळ यंत्रसंवाद चालू राहिल्याने विनाश याच विकासाच्या मार्गाकडे वळली. केवळ भरकटत राहिली. मनोरुग्णता वाढली.

प्रश्न 4.
नव्या जगाची जीवनशैली नैसर्गिक विकासाच्या आड पदोपदी आली.
उत्तर :

परिणाम : पैशानेही न सोडवता येणारे मनाचे, मनाशी संबंधित प्रश्न निर्माण झाले. मनोरुग्णता वाढण्याची शक्यता निर्माण झाली,

इ. पाठाच्या आधारे कारणे लिहा.

प्रश्न 1.
सत्तरपंचाहत्तरीची मनं कातर झाली, कारण
उत्तर :

सभोवतालच्या परिस्थितीने त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहिले. काय घडत आहे? माणसं अशी का वागत आहेत? शिक्षणाचं काय होत आहे? वृत्तपत्र समाजाला कुठं नेत आहेत? अजून किती पडझड होणार आहे. या प्रश्नांनी त्यांना त्रस्त केले त्यामुळे मन कातर झाली.

प्रश्न 2.
‘यंत्रसंवाद करून चालणार नाही, कारण
उत्तर :

विज्ञानाचे कौतुक करताना अलौकिक आनंद देणाऱ्या मातीच्या वारशाचे तेज नष्ट होत आहे. खरं सुख कोणतं हे कळत नसल्याने विनाश हाच विकास हा नव्या जगाचा मंत्र होण्याची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे चिंतन करण्याची गरज आहे. आपण कुठे भरकटत निघालो आहोत हे . कळण्यासाठी, संवादशून्य एकाकीपण टाळण्यासाठी संवाद-चिंतनाची गरज आहे. त्यामुळे यंत्रसंवाद करून चालणर नाही.

2. पाठातील आलेल्या खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न 1.
अ. आंतरिक दारिद्रय
आ. वात्सल्याचं ऊबदार घर.
इ. धावणारी तरुण चाकं, थरथरणारे म्हातारे पाय.
ई. संवेदनांचे निरोप समारंभ.
उत्तर:
अ. मनाचे दारिद्रय.
आ. प्रेमभावनेने भरलेले घर.
इ. गतिशील जीवन जगणारी चैतन्यमय तरुण पिढी, वृद्धत्वामुळे हातापायांतील शक्ती गेलेले वृद्ध.
ई. एकमेकांना समजून घेण्यासाठी लागणारी संवेदनशीलता नष्ट होणे.

3. व्याकरण:

प्रश्न अ.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
उत्तरः

1. मन कातर होणे – मनात दुःखी भावना जागृत होणे.
वाक्यः आई-वडिलांच्या आठवणीमुळे शहरात एकाकी जीवन जगणाऱ्या सुहासचे मन अगदी कातर झाले.

2. काळजात क्रंदन होणे – दुःख होणे, दु:खाने रडणे
वाक्यः

  • स्वाभिमानी माणसं काळजात क्रंदन झाले तरी आपल्या गरीबीचा बाजार कधी मांडत नाहीत.
  • भावाभावांमध्ये होणारी भांडणे पाहून आईच्या काळजात क्रंदन होते परंतु ती गप्प राहते.

प्रश्न आ.
‘संवेदनशून्य’ शब्दासारखे नकारार्थी भावदर्शक शब्द लिहा.
उत्तरः

संवेदनाहीन, निर्विकार, अबोल, अजाण, भावनाहीन, (अमानुष, निर्दोष) भावनाशून्य, पाषाणहृदयी

इ. अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ बदल न करता वाक्ये पुन्हा लिहा.

प्रश्न 1.
नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही.
उत्तरः

परंपरागत जीवन जगणाऱ्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधते. किंवा जुन्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधते.

प्रश्न 2.
माणसा-माणसांत संवाद हवा.
उत्तर :

माणसा-माणसांत विसंवाद नको.

प्रश्न 3.
मनुष्य हा प्रेमाच्या आधारावर जगू शकतो.
उत्तरः

मनुष्य तिरस्कार भावनेच्या आधारे जगू शकत नाही. किंवा मनुष्य हा द्वेषाच्या आधारावर जगू शकत नाही.

4. स्वमत:

प्रश्न अ.
‘पैसा हे साधन आहे. साध्य नव्हे,’ हे विधान पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :

‘पैसा मिळवला की माणूस सुखी होतो’ अशी आज प्रत्येकाची विचारसरणी झालेली दिसून येते. त्यासाठी जो तो पैसा त्वरित कसा कमवायचा याचाच विचार करताना दिसतो. मग भौतिक सुखासाठी पैशाच्या मागे पळणारा माणूस गैरमार्गाचाही वापर करतो. परंतु हे खरे नाही कारण सुख हे केवळ पैसा कमविण्यात नसते, पैशाने वस्तू विकत घेता येतील. कारण पैसा हे साधन आहे परंतु विकत घेतलेल्या सर्वच वस्तू सुख देतील असे नाही. वस्तूंमधून भौतिक सुख मिळेल.

परंतु मानसिक समाधान, सुख हे पैशाने विकत घेता येत नाही. पैशाने घर विकत घेता येते. परंतु घराला घरपण येण्यासाठी माणसा-माणसांत आवश्यक असणारा संवाद, प्रेम, माया, वात्सल्य हे विकत घेता येत नाही. त्यासाठी सर्वांना एकमेकांविषयी आपुलकी, एकमेकांना समजून घेणे आवश्यक असते. मुलांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आई… वडील काम करतात. पैसा कमावतात, त्यांच्या अवास्तव गरजा पूर्ण करतात. परंतु जर मुलांशी संवाद साधण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसेल तर त्या पैशाने सुख प्राप्त होत नाही त्यांमुळे सर्वजण एकाकी होतात.

त्यासाठी एकमेकांशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. माणूस पैशासाठी नसून पैसा माणसासाठी आहे. पैसा हेच जीवन नव्हे. हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. रात्रंदिवस कष्ट करून पैसा मिळवता येतो परंतु सुख मिळवण्यासाठी एकमेकांसोबत राहणे, वेळ देणे आवश्यक असते. त्यामुळे पैसा हे साधन आहे, साध्य नाही. म्हणूनच सर्वात श्रीमंत देश अमेरिका असला तरी ‘जगारील सर्वाधिक आनंदी लोकांचा देश’ हा मान भूतानसारख्या छोट्या राष्ट्राला मिळाला आहे.

प्रश्न आ.
मानवी जीवनात संवादाचे महत्त्व याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर :

मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजात राहताना त्याला सगळ्यांशी संवाद साधावाच लागतो. कारण आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक अशा कोणत्याही क्षेत्रात वावरताना त्याचा इतरांशी संपर्क येत असतो. अशा वेळी सुसंवाद साधल्यास कार्याला गती मिळते. अन्यथा एकाकीपणाला सामोरे जावे लागते. कुटुंबात राहूनही जर तो दुसऱ्याशी संवाद साधू शकला नाही. तर तो एकाकीपणाच्या वाटेवर चालू लागल्याचे दिसून येते. कामामध्ये व्यस्त असणारे आई-वडील मुलांसाठी संपत्तीचा साठा करतात. परंतु प्रत्यक्षात मुलांच्या मनापर्यंत पोहचू शकत नाहीत. त्यामुळे मूल आपल्या भावना व्यक्त करू न शकल्याने वाईट सवयींना बळी पडते. तर आपल्या मुलांशी, नातवंडांशी संवाद साधू न शकल्याने वृद्ध मंडळी निराश होतात. त्यामुळे दोन पिढ्यांमध्ये दरी निर्माण होते.

कार्यालये विविध संस्था, क्षेत्रे या सर्वच ठिकाणी संवाद साधता न आल्यास व्यक्ती कार्यरत होऊ शकत नाही. एकमेकांच्या समस्या समजू शकत नाही. प्रत्येकाला आपल्या भावना, विचार, व्यक्त करण्यासाठी एक दुसन्याशी संवाद साधणे आवश्यक असते. जर आपली सुख दुःखे समजून घेणारे कोणी नसेल तर जीवन जगण्याला अर्थच राहणार नाही. त्यासाठी संवाद आवश्यक आहे. संवादशून्य एकाकीपणामुळे माणूस
मनोरुग्ण होण्याची शक्यता वाढते.

5. अभिव्यक्ती:

प्रश्न अ.
‘नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही’ लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत ते सकारण स्पष्ट करा.
उत्तर :

विज्ञानाने जग जवळ आले असे म्हटले जाते. परंतु प्रत्यक्षात असे झाले आहे का असा प्रश्न पडतो. कारण नवीन नवीन शोध लागून लोकांचे जीवन सुखकर झाले असले तरी एकमेकांसाठी त्यांच्याकडे वेळ असलेला दिसून येत नाही. यंत्रयुगात माणूस इतका यांत्रिक झाला आहे की त्याला एकमेकांना प्रत्यक्ष भेटायला वेळ नाही. केवळ फोनवरच तो एकमेकांची खुशाली समजून घेतो. विचारपूस करतो. आजच्या गतिमान जीवनात माणूस इतका गुंतला आहे की पैसा हेच जीवन समजून रस्त्यात कुठे अपघात वैगरे झालेला असला तरी त्याच्याकडे तिथे थांबायलाही वेळ नसतो.

अडलेल्या व्यक्तीला मदत करण्याऐवजी तो आपली कामाची वेळ चुकेल, आपण पोलीस कारवाईत अडकू म्हणून घटना स्थळापासून दूर पळतो, माणुसकीशी त्याचा संबंधच नसल्यासारखे तो वागतो. त्यामुळेच एखादया संकटात सापडलेल्या, पूर, भूकंपामध्ये बळी गेलेल्या माणसाबद्दल दु:ख वाटून न घेता तो तेथेही स्वतःचा फायदा कसा होईल ते पाहतो. दुसऱ्याचे दुःख, जाणीव याबद्दल त्याला काहीही वाटत नाही.

पैसा कमावण्याच्या नादात स्वतःच्या वृद्ध माता-पित्याला वृद्धाश्रमात ठेवणारा, मुलांच्या एकाकीपणाकडे दुर्लक्ष करणारा, समाजापासून तुटल्यासारखा वागणारा नव्या जगातील हा माणूस माणूसपणालाच विसरून गेला आहे असे वाटते. त्यामुळे नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही या लेखकाच्या मताशी मी सहमत आहे परंतु त्याचवेळी याला काही अपवाद म्हणून काही संस्था, माणसे आपतकालीन स्थितीत, भूकंप, पूर इ. परिस्थितीत मदतीचा हात देताना दिसतात. परंतु त्यांची संख्या खूप कमी आहे.

प्रश्न आ.
‘इथे माणूस दिसत होता, पण जाणवत नव्हता. ओठ हालत होते, पण साद पोहोचत नव्हती, या विधानांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा.
उत्तर :

प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगळी असते. आधुनिक जगात मात्र पैसा’ हेच सुख मानले जात आहे. त्यामुळे पैशानेच जगता येतं. पैशासाठीच जगायचं असतं हाच जगण्याचा उद्देश झाल्याने सर्व काही पैशातच गणलं जात आहे. जग व्यवहारी बनलं आहे. शिक्षण ज्ञान मिळविण्यासाठी नव्हे तर पैशासाठी होत गेले आहे. प्रेम, भक्ती या भावनांची मोजणीही पैशानेच होऊ लागली आहे आणि प्रेम, नाते यांच्याऐवजी खरेदीविक्रीचा व्यवहार सुरू झाला आहे.

या नोकरीमुळे घराबाहेर राहणारे पालक मुलांना प्रेम देण्यास कमी पडत आहेत त्यामुळे घराऐवजी केवळ चमकणारा महाल बांधला गेला, जेथे आई-वडिलांच्या वात्सल्याला, प्रेमाला काहीच किंमत उरली नाही. त्यांचे सुख दुःख मुलांना कळले नाही. एकमेकांच्या जाणीवा, भावना समजायला व्यक्त करायला कोणालाच वेळ मिळत नाही आहे. त्यामळे महालात चकाकी येते परंतु माणसकीच्या नात्याला मात्र हे घर पारखे होते. त्यामुळे माणूस त्या घरात रहातो शरीराने परंतु तो जाणवत नाही. त्याची सुख दःख समजत नाहीत आणि पादच होत नसल्याने फक्त ओठ हलत रहातात. परंतु हृदयाची साद दसऱ्या हृदयापर्यंत पोहोचत नाहीत असे लेखक म्हणतात आणि हीच आजच्या जीवनाची खंत आहे.

प्रश्न इ.
संवादाचा अभाव असलेल्या मानवी जीवनाचे भाकीत तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
उत्तर :

विज्ञानाने जग जवळ आणले असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र मोबाईल फोन, कॉम्प्युटर इ. केवळ यंत्रे ठरली कारण गतिशील जीवनशैली स्वीकारणारा माणूस या यंत्रांचा वापर करू लागला परंतु मनाने मात्र एकमेकांपासून दूर झाला, प्रत्यक्ष भेटून किंवा पत्र पाठवून मिळणारे मानसिक सख, चेहऱ्यावरचा आनंद सर्वाना पारखे झाले. वेळेचे, कामात व्यस्त असण्याचे कारण दाखवून संवाद टाळला जाताना दिसून येते. यामुळे मानवी जीवन धोक्यात येईल असे वाटते.

कारण संवाद न साधल्याने, एकमेकांपासून दूर गेल्याने मानव एकाकी होईल. एकटेपणा वाट्याला आल्याने निराश, चिंताग्रस्त होईल. एकमेकांच्या भावना समजू न शकल्याने, सुख, दुःख जाणून न घेतल्यामुळे एकटेपणाची जाणीव माणसाला मनोरुग्ण बनवेल, स्वत:चे विचार, भावना व्यक्त न करता आल्याने दुःखी जीवनाला सामोरा जाईल. नैराश्यग्रस्त झाल्याने कदाचित व्यसनांच्या आहारी जाईल, यामुळे स्वतःबरोबरच समाजाचा, पर्यायाने राष्ट्राचा विकासही होणार नाही. उलट अधोगतीकडे मार्गक्रमण करू लागेल आणि संवेदनाहीन बनलेला माणूस संपूर्ण माणूसजातच नष्ट करण्यास कारणीभूत ठरेल अशी भीती वाटते.

शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
गटात न बसणारा शब्द शोधा.

अ. तो, मी, पी, हा …………..
आ. खाणे, पिणे, शहाणे, जाणे ………….
इ. तापी, कृष्णा, नदी, यमुना ………….
ई. त्याला, तुला, मला, माणसाला ………..
उ. आनंदी, दुःखी, सौंदर्य, आळशी ………….
उत्तर :
अ. पी
आ. शहाणे
इ. नदी
ई. माणसाला
उ. सौंदर्य

Additional Important Questions and Answers

आकलन कृती

प्रश्न 1.
खालील पठित गदा उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
चौकटी पूर्ण करा.

1. आजच्या समाजात बिंबवलेले तत्त्वज्ञान – [ ]
2. मार्केटिंग करताना न घेतलेली दक्षता – [ ]
उत्तर :
1. ‘माणूस मिथ्या सोनं सत्य’
2. एक गरीबी दूर करताना दुसरे आंतरिक दारिद्र्य निर्माण होईल याची दक्षता घेतली नाही.

प्रश्न 2.


उपयोजित कृती

प्रश्न 1.
गटात न बसणारा शब्द ओळखा.

  1. धन, संपत्ती, पैसा कार्य
  2. प्रेम, माया, वात्सल्य, वस्तू
  3. इमारत, पथ, मार्ग, रस्ता
  4. भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमानकाळ, नेहमी

उत्तर :

  1. कार्य
  2. वस्तू
  3. इमारत
  4. नेहमी

खालील शब्दासाठी परिच्छेदात वापरलेले पर्यायी शब्द लिहा.

प्रश्न 1.
भावनाशून्य मन – ………………….

अ. आशा
ब. ऑतिरक दारिद्रय
क. मुकं मन
ड. सुसंवाद
उत्तरः
मुकं मन

अभिव्यक्ती:

प्रश्न 1.
आजच्या जगाचे ‘माणूस मिध्या’ सोनं सत्य’ या तत्त्वज्ञानाचा भावार्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा.
उत्तर :

आजचे जग म्हणजे विज्ञानाचे जग, विज्ञानाने संपूर्ण जगावर एक प्रकारची जादू केली आहे. विज्ञानाच्या साहाय्याने प्रगती पथावर वाटचाल करताना माणसाने सुखी जीवनाची स्वप्न बघितली. पण हे सुख शोधताना मानव हळहळ पैशाच्या आहारी जाऊ लागला आणि पैशाच्या मागे मागे धावताना मानवाचे जीवन यंत्रवत बनले. निष्क्रिय झाले, एकमेकांपासून माणूस दूर गेला, केवळ पैसा कमावणे एवढेच जीवन बनले. एकमेकांशी संवाद साधणे कठीण झाले, कारण तो पैशातच सुख मानू लागला. पैसा कमावण्याच्या स्पर्धेत तो सतत पळतच राहिला. इतके की पळता पळता तो इतरांपासून कधी दूर गेला हे त्याचे त्यालाच कळले नाही. त्यामुळे दुसऱ्याची सुख-दुःखे, भाव भावना त्याला कळेनाशा झाल्या.

असा हा माणूस एकमेकांपासून दूर जाताना कुटुंबापासूनही दूर झाला. कारण पैसा, हे जीवनाचे अंतिम सत्य बनले तर माणूस माणसाच्याच जगात खोटा ठरला आणि पैसा हेच सर्वस्व बनले. संवादामुळे वाढणारा जिव्हाळा, आपुलकी संवाद तुटल्याने नाहीशी झाली आणि धन, संपत्ती, पैसा यालाच सर्वश्रेष्ठ ठरवताना माणूसच खोटा ठरला आणि हळूहळू विनाश म्हणजेच विकास या दिशेने माणसाची वाटचाल होऊ लागली. यासाठीच मानवाने संवाद साधून माणसांतील माणूसपण जपावे असे वाटते.

खालील पठित गदव उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

आकृतिबंध पूर्ण करा.

प्रश्न 1.

प्रश्न 2.

उपयोजित कृती

खालील शब्दांसाठी उताऱ्यात आलेले विरुद्धार्थी शब्द

प्रश्न 1.
विसंवाद × ……….
उत्तर :

विसंवाद × संवाद

प्रश्न 2.
नैसर्गिक × ………..
उत्तर :

नैसर्गिक × कृत्रिम

खालील वाक्प्रचाराच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा.

प्रश्न 1.
साद घालणे –
पर्याय :

अ. संभ्रमात पडणे.
ब. आठवण काढणे
क. गुंग होणे.
ड. बोलावणे
उत्तर :
बोलावणे

प्रश्न 2.
अगतिक होणे –
पर्याय :

अ. असहाय होणे.
ब. आनंदी होणे
क. मरण येणे
ड. सावध होणे
उत्तर :
असहाय होणे.

स्वमत:

प्रश्न 1.
संवाद नसल्याने माणूस माणसापासून दूर गेला आहे याविषयीचे तुमचे मत लिहा.
उत्तरः

आज-चंगळवादी दृष्टिकोन सगळीकडे दिसून येतो. त्यामुळे प्रत्येकजण आपल्याच विश्वात धुंद असल्याचे लक्षात येते. त्यामुळे एकाच घरात राहूनही एकमेकांना भेटेनासे होतात. संवाद साधला जात नाही. त्यामुळे सुखदुःखात्मक अनुभवांची देवाण-घेवाण होत नाही. आपले कोणीतरी आहे हीच भावना नष्ट झाल्याचे दिसून येते. कारण संवादच नसतो.

संवादच नसल्याने वृद्ध आई, वडील मुलासाठी तळमळत राहतात. एका घरात राहूनही कोणी मलिका पाहण्यात व्यस्त, तर कोणी हॉटेलात फिरण्यात मग्न यामुळे हळूहळू माणूस कुटुंबापासून तुटू लागतो व एकटे राहतो. कार्यालय, नोकरी, याठिकाणी संवाद साधला न गेल्याने कार्य फलश्रुती मिळत नाही. माणसा-माणसांतील अंतर वाढत जाते आणि एकमेकांना कायमचे दुरावले जातो.

आकलन कृती

खालील पठित गदय उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

प्रश्न 1.
आधुनिक काळातील घराचे उरलेले स्थान : …………
उत्तर :

चार घटकांचा निवारा.

आकृतिबंध पूर्ण करा.

उपयोजित कृती

खालील शब्दांसाठी उताऱ्यात वापरलेले शब्द

प्रश्न 1.

  1. संपत्ती
  2. उर्जेचे मूळ
  3. प्रगती

उत्तर:

  1. धन
  2. प्रेरणा
  3. विकास

प्रश्न 2.
योग्य विरामचिन्हांचा पर्याय ओळखा.
संवादाची इतकी गरज माणसाला का आहे याचा शोध या निमित्तानं घ्यायला हवा.
पर्याय :

अ. प्रश्नचिन्ह, पूर्णविराम
ब. उदगारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह
क. उदगारवाचक चिन्ह, पूर्णविराम
ड. स्वल्पविराम, पूर्णविराम
उत्तर :
स्वल्पविराम, पूर्णविराम.

अभिव्यक्ती:

प्रश्न 1.
चला ‘माणूस’ बांधूया!
अंतरीच्या उमाळ्याने
संवादातील जिव्हाळ्याने।
यातील भावार्थ स्पष्ट करा.
उत्तर :

आज मानव प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. परंतु ही प्रगती करताना कुठेतरी तो दुसन्यांपासून दुरावला गेल्याचे जावणते कारण पैसा म्हणजेच जीवन असे त्याला वाटत असल्याने पैशासाठी तो सतत धावत असतो. परंतु त्याचवेळी कोणालातरी त्याच्या सहवासाची, सोबतीची गरज आहे हेच तो विसरला आहे. केवळ पैसा-पैसा केल्याने आपल्याच माणसांपासून तो दूर गेला आणि पैशाच्या चक्रव्यूहात अडकला गेला.

पैशासाठीच जगायचं हा त्याचा उद्देश बनला त्यामुळे आई-वडिलांच्या प्रेमाच्या-वात्सल्याच्या स्पर्शापासून दूर गेला. आई-वडील, मुले यांच्याशी संवाद साधायलाही त्याला वेळ मिळत नाही. घरातील प्रत्येक जण आपल्याच विश्वात मग्न राहिल्याने एकाच घरात राहूनही कितीतरी काळ त्यांचे एकमेकांशी भेटणे होत नाही आणि यातूनच तो एकाकीपणाच्या दिशेने चालला जातो. परिणामी विविध आजारांनाही बळी पडतो. शारीरिक, मानसिक, कौटुंबिक स्वास्थ्य बिघडते.

यासाठीच लेखकाच्या मते एकमेकांना समजून घेणे, सुख-दुःखांची देवाणघेवाण होणे- म्हणजेच जीवन असते असे असताना माणसाने एकमेकांशी संवादच साधला नाही तर या जगात प्रत्येकजण एकटा पडेल. गर्दीतही एकटा होईल आणि म्हणूनच एकमेकांशी प्रेमाने जिव्हाळ्याने संवाद साधणे आवश्यक आहे. जर माणसे एकत्र आली, विचारांची देवाण-घेवाण झाली तरच संवाद साधला जाईल आणि माणूस घडत जाईल, त्यामुळे माणसांना माणसांशी जोडणे आवश्यक आहे. केवळ मोठ्या इमारती बांधून उपयोगाचे नाही तर माणुसकीची इमारत उभारणे आवश्यक आहे. यासाठी प्रेमाने, जिव्हाळ्याने संवाद साधून माणूस घडवूया असे लेखक म्हणतात.

Summary in Marathi

प्रस्तावना:

प्रविण दवणे यांनी कविता, ललित लेख, वैचारिक लेख अशा मराठी साहित्य विश्वातील अनेकविध साहित्यप्रकारांत लेखन केले आहे. लेखक, कवी, गीतकार, पटकथा लेखक व प्रभावी वक्ते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. पाच वेळा ‘महाराष्ट्र राज्य पुरस्कार’, ‘चैत्रबन’ पुरस्कार, ‘शांता शेळके सरस्वती पुरस्कार’ असे विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

‘रंगमेध’ ‘गंधखुणा’ ‘आर्ताचे लेणे’ ‘ध्यानस्थ’ ‘भूमीचे मार्दव’ हे काव्य संग्रह ‘दिलखुलास’ ‘थेंबातलं आभाळ’ ‘अत्तराचे दिवस’ ‘सावर रे’ ‘गाणारे क्षण’ ‘मनातल्या घरात’ ‘रे जीवना’ हे ललित लेख संग्रह, ‘प्रश्नपर्व’ हा वैचारिक लेखसंग्रह इ. साहित्य प्रसिद्ध आहे. तसेच ‘दिलखुलास’ ‘थेंबातलं आभाळ’ ‘लेखनाची आनंद यात्रा’ ‘वय वादळ विजांचं’ हे त्यांचे कार्यक्रम विशेष गाजलेले आहेत.

पाठ परिचय:

प्रस्तुत पाठ हा प्रवीण दवणे यांच्या प्रश्नपर्व’ या वैचारिक लेखसंग्रहातून घेण्यात आला आहे. आजचे युग हे विज्ञानयुग समजले जाते. मानव प्रगती पथावर वाटचाल करीत चंद्रावर जाऊन पोहोचला पण त्याचवेळी तो दुसऱ्या मानवी मनापर्यंत पोहोचला आहे का? हीच लेखकाची खंत आहे. इंटरनेट, व्हॉट्स अँपने जग जवळ आले असे आपण म्हणतो परंतु हृदय हृदयाशी जोडले गेले का? असा प्रश्न लेखकाला त्रस्त करतो आणि म्हणूनच केवळ यंत्रवत जीवन जगण्यापेक्षा हृदयाने हृदय बांधले जाणे आवश्यक असल्याचे लेखकाला वाटते. यासाठी मनाचा मनाशी संवाद होऊन माणूस माणसाशी बांधला जाणे, जोडला जाणे महत्त्वाचे आहे हेच लेखक पाठाद्वारे सांगू इच्छितात.

आधुनिक काळात पैशाला अवास्तव महत्त्व देऊन त्यातूनच सुखाची प्राप्ती होते असे मानले गेले, प्रेम, वात्सल्य बाजूला करून पैसाच बोलू लागला. यांतूनच जग व्यवहारी बनले. पैशाच्या मोहात अडकलेला माणूस माणूसपण हरवून बसला आणि स्वत:च्याच घरात राहणाऱ्या माणसांसाठी अनोळखी ठरला. माणसा-माणसांतील अंतर वयाने नाहीतर पैशामुळे वाढत गेले व प्रत्येक जण एकमेकांना कधीतरी भेटू याच आशेवर जगू लागला. आत्म्याची आत्म्याला दिलेली साद म्हणजे संवाद हेच माणूस विसरला. एकमेकांसाठी वेळच कोणाकडे शिल्लक राहिला नाही. आजी-आजोबा, आई-वडील मुले ही नाती दुरावली गेली . प्रत्येकजण आपल्या जगात मग्न झाला. मौज-मजा, चंगळ यातच ‘जगणे’ आहे, अशी वृत्ती बळावली आणि माणसं एकमेकांपासून दूर गेली.

ई-मेल, चेंटिंग, हे मार्ग संवाद साधण्यासाठी निवडले गेले. यंत्राच्या मदतीने हदये मात्र जोडता आली नाहीत. दिवसभर पैशासाठी जीवन प्रवास करणारी माणसं, मानवी सहवासाच्या खया सुखापासून वंचित राहिली. एकाकीपण वाढत गेले. परंतु जसजसे एकाकीपण वाढत गेले. निराशा येत गेली तसतशी परत एकदा संवादाची आवश्यकता भासू लागली. कारण मानवाला नवनिर्मितीची प्रेरणा देणारे मन पैशाच्या मागे धावू लागले. नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी नातं जोडू शकली नाही. अशावेळी लेखकाच्या मते केशवसुतांच्या काव्य रचनेने सत्वाचा केलेला जयजयकार लक्षात घेतला पाहिजे. केवळ माती-विटांच्या इमारती बांधण्यापेक्षा अंत:करणातील प्रेमाने माणूस माणसांशी बांधला जावा हेच लेखक यातून सांगू इच्छितात.

समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :

  1. मिथ्या – खोटे, अवास्तविक (unreal, false).
  2. तत्त्वज्ञान – तत्त्वासंबंधी तत्त्वांना अनुसरून असणारे ज्ञान – (philosophy).
  3. निष्कर्ष – सार, ताप्तयं, सारांश – (conclusion)
  4. दक्षता – खबरदारी – (carefulness, attention)
  5. सूत्रधार – कळसूत्री बाहुल्यांच्या खेळात ज्याच्या हातात बाहुल्यांच्या दोन्या असतात तो मुख्य चालक, ज्याच्या हातात कार्यक्रमाची सर्व
  6. सूत्रे असतात तो – (anchor, program conductor)
  7. उद्देश – हेतू (intention, purpose).
  8. अबोल – न बोलणारी – (talking little, tactiturn).
  9. लागण – रोगाची बाधा होणे (infection).
  10. हव्यास – तीव्र इच्छा, लोभ (a great desire).
  11. दुथडी – नदीचे दोन किनारे (on both the banks).
  12. खिन्न – दुःखी, निराश (sad, distressed).
  13. क्रंदन-रडणे, आक्रंदन – (to cry).
  14. पडझड-जीर्णावस्थेतील, पडायला आलेले – (downfall).
  15. मूल्य-किंमत – (cost, price)
  16. निवारा – आश्रय – (shelter).
  17. अगतिक – असहाय – (helpless)
  18. लौकिक – लोकप्रसिद्ध लोकांमध्ये रूढ असलेले, या लोकांतील.
  19. अलौकिक – चमत्कारिक, लोकोत्तर.
  20. चिंरतन – जना, सतत, प्राचीन (eternal).
  21. तेज – प्रकाश, त्रिवार तीन वेळा – (three times).
  22. कंपन – कापरे. थरथरणे – (shivering).
  23. पायाभूत – मूलभूत, मूळ – (basic).
  24. मनोरुग्ण – मानसिक आजार असलेला – (psychic).
  25. झडझडून – जलदीने.
  26. त्वरेने झिडकारून, सुवर्णमध्य – दोन परस्परविरुद्ध गोष्टींतून काढलेला मध्यम मार्ग – (golden medium).
  27. तडजोड, आवाहन – कळकळीची विनवणी, विनंती – (call, roquest).
  28. उमाळा – हुंदका, आवेग – (can outburst).
  29. जिव्हाळा – प्रेम – (affection).
  30. गोंगाट – आवाज – (great noise).

वाक्प्रचार:

  • साद घालणे – बोलावणे, हाक होणे.
  • मनं कातर करणे – दुःख होणे, अडचणीची स्थिती.
  • जीवाचा आटापिटा करणे – खूप प्रयत्न करणे, खूप कष्ट करणे.
  • काळजात क्रंदन होणे – खूप दुःख होणे, आक्रंदत खूप रडणे.
  • अगतिक होणे – असहाय होणे.
  • पाय पाठीला लावणे – खूप कष्ट करणे.
  • झडाडून जागे होणे – त्वरेने जागृत होणे, परिस्थितीची जाणीव होणे.
  • उदयोस्तु करणे – जयजयकार करणे.
  • माणूस बांधणे – एकमेकांशी नाते जोडणे.
  • लोप पावणे- नाहिसे होणे.