Chapter 7.3 आम्ही जाहिरात वाचतो
Textbook Questions and Answers
1. वरील जाहिरातीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
ही जाहिरात कशासंदर्भात आहे?
उत्तर:
ही जाहिरात पुस्तकांच्या भव्य प्रदर्शनाबाबत आहे.
प्रश्न 2.
कोणत्या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे?
उत्तरः
15 ते 20 ऑक्टोबर 2017 या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
प्रश्न 3.
पुस्तक प्रदर्शनाची ठळक वैशिष्टे सांगा?
उत्तरः
पुस्तक प्रदर्शनाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे:
- छोट्यांसाठी व मोठ्यांसाठी स्वतंत्र दालन
- नामवंत साहित्यिकांची पुस्तके
- विविध विषयांवरील पुस्तके
- मुलांसाठी आवडत्या गोष्टींची, प्रयोगांची, कोड्यांची आणि कृतींची पुस्तके.
- सायंकाळी 7 ते 8 या वेळेत नामवंत साहित्यिक आपल्या भेटीला व प्रत्यक्ष वार्तालाप करण्याची संधी
प्रश्न 4.
प्रदर्शन कोठे भरणार आहे?
उत्तर:
प्रदर्शन शारदा विदयालयाच्या सभागृहात भरणार आहे.
प्रश्न 5.
खरेदीवर किती रुपयांची सवलत मिळणार आहे?
उत्तरः
पुस्तक खरेदीवर 20% सवलत मिळणार आहे.
प्रश्न 6.
पुस्तक प्रदर्शनात तुम्ही कोणत्या प्रकारची पुस्तके खरेदी कराल ते लिहा?
उत्तर:
पुस्तक प्रदर्शनात गोष्टींची पुस्तके, प्रयोगांची, कोड्यांची आणि कृतींची पुस्तके खरेदी करू शकतील.
2. ओळखा पाहू!
प्रश्न 1.
- हात आहेत; पण हालवत नाही. [ ]
- पाय आहेत; पण चालत नाही. [ ]
- दात आहेत; पण चावत नाही. [ ]
- नाक आहे; पण श्वास घेत नाही. [ ]
- केस आहेत; पण कधी विंचरत नाही. [ ]
उत्तरः
- खुर्ची
- टेबल
- कंगवा
- सुई
- ब्रश
Important Additional Questions and Answers
वरील जाहिरातीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
ही जाहिरात कशा संदर्भात आहे?
उत्तर:
ही जाहिरात ‘गुडविल व्यायामशाळेच्या’ संदर्भात आहे.
प्रश्न 2.
या व्यायामशाळेसाठी केव्हापासून प्रवेश सुरू होणार आहेत?
उत्तर :
या व्यायामशाळेसाठी 10 मे पासून प्रवेश सुरू होणार आहेत.
प्रश्न 3.
या व्यायामशाळेची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
उत्तर:
या व्यायाम शाळेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
- तज्ज्ञ प्रशिक्षक
- माफक फी
- लहान मुले व वृद्धांना विशेष सवलत
- मोफत पार्किंगची सोय
- अत्याधुनिक व्यायामाची साधने
प्रश्न 4.
पहिल्या शंभर सभासदांना किती टक्के विशेष सवलत मिळणार आहे?
उत्तरः
पहिल्या शंभर सभासदांना 10 टक्के विशेष सवलत मिळणार आहे.
प्रश्न 5.
या व्यायामशाळेची वेळ काय आहे?
उत्तर:
या व्यायामशाळेची वेळ सकाळी 6 ते 10 व संध्याकाळी 6 ते 10 ही आहे.
प्रश्न 6.
‘गुडविल’ व्यायाम शाळेत येऊन कशावर नियंत्रण आणायचे आहे?
उत्तर :
‘गुडविल’ व्यायाम शाळेत येऊन चरबीवर नियंत्रण आणायचे आहे.
शब्दार्थ :
- दालन – मोठी खोली, सदनिका (apartment)
- नामवंत – नावाजलेले (famous by name)
- वार्तालाप – संवाद (conversation)
- नियंत्रण – संयमन, ताब्यात ठेवणे (control)
- सुडौल – बांधेसुद (shapely)
- तज्ज्ञ – निष्णात (expert)