Chapter 8 ऐसीं अक्षरें रसिके

Day
Night

Chapter 8 ऐसीं अक्षरें रसिके

Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कृती करा:

प्रश्न 1.

आ. रसाळ बोलांचा विविध इंद्रियांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन तक्ता पूर्ण करा :

प्रश्न 1.

उत्तर :

इ. ‘रसाळ बोल’ आणि ‘सूर्य’ यांच्या कार्याच्या माध्यमातून खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.

उत्तर :

रसाळ बोलांचे कार्य

सूर्याचे कार्य

1. नादमाधुर्य

1. जगाला चेतना देणे

2. शब्दांचे आकर्षण

2. प्रकाश देणे

2. अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न अ.
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके ।
उत्तर :

संत ज्ञानेश्वरांचे मराठी भाषेवर प्रेम होते आणि त्यांना अभिमानही होता. अमृतापेक्षाही गोड असलेल्या मराठी भाषेविषयीची गौरवाची भावना आणि आपल्या शब्दासामर्थ्यावर असणार सार्थ विश्वास व्यक्त करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात माझ्या मराठी भाषेतून निर्माण होणाऱ्या शब्दात रसपूर्णता आहे. पण प्रत्यक्षात अमृताचा गुणधर्म ‘माधुर्य’ (गोडवा) आहे. “मी माझ्या भाषेतून अमृतापेक्षाही किंवा अमृताशीही पैज जिंकणारी रसाळ व गोडवा असणारी अक्षरे निर्माण करीन. ती इतकी रसयुक्त, माधुर्य अनुभवणारी, जीवनदायी असतील की त्यांच्यातील गोडवा अनुभवल्यानंतर प्रत्यक्ष अमृतालाही स्वत:चा कमीपणा जाणवेल इतकी रसाळ अक्षरे मी मराठी भाषेतून निर्माण करीन जेणेकरून श्रोत्यांना या अक्षरांचा आस्वाद घेताना माधुर्याची कमतरता कधीही जाणवणार नाही.”

प्रश्न आ.
वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ।।
उत्तर :

मराठी भाषेतून निर्माण केलेल्या शब्दांची ‘कोमल’ या गुणाशी तुलना केली आहे. कोमल म्हणजेच मृदुता. सा रे ग म प ध नी सा हे सप्तस्वर आहेत. सूर हे कोमल असतात पण माझे हे शब्द इतके कोमल आहेत की या सप्तसुरांची कोमलता त्यांच्या पुढे कमी ठरेल. सुगंधाचा गुणधर्म ‘मोहक’ आहे व मी निर्माण केलेले शब्द इतके मोहक आहेत की सुगंधाचा मोहकपणा शब्दांपुढे कमी ठरेल. इतके हे शब्द मनाला मृदुता आणि मोहकतेचा स्पर्श करणारे आहेत.

3. चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.
अ. रसाळ बोलाला या रचनेत दिलेली उपमा ………..
आ. रसाळ बोलांचा इंद्रियांवर होणारा परिणाम ……….
इ. सर्व जगाला जागवणारा ……….
उत्तर :

अ. अमृत
आ. कलह सुरू करणे
इ. सूर्य

4. काव्यसौंदर्य :

खालील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

प्रश्न अ.
ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा ।
बोलें इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ।।3।।
उत्तर :

मराठी भाषा ही अत्यंत रसपूर्ण भाषा आहे. तिच्या रसाळपणाची थोरवी अशी आहे की, मराठी भाषेचे शब्द जर कानावर पडले तर कानांनाही जिभा फुटतील म्हणजेच कानांचा गुणधर्म ‘श्रवण’ असा आहे. पण कान जेव्हा हे शब्द ऐकतील तेव्हा ते आपला मूळ गुणधर्म सोडून त्या प्रत्येक शब्दातील रस चाखण्यासाठी तयार होतील.

कानांनाच जिभा फुटतील, कानांना ही रसकला अनुभवायला मिळाली पण इतर इंद्रियांनादेखील ती रसपूर्णता अनुभवण्याची लालसा आहे. त्यामुळे या रसाळपणाचा उपभोग घेण्यासाठी प्रत्येक इंद्रिय पुढे सरसावेल आणि इंद्रिया-इंद्रियांमध्ये कलह माजून राहिल म्हणजेच प्रत्येक इंद्रिय त्या रसवत्तेसाठी आसुसलेले असेल. इतकी ही अत्यंत रसपूर्ण भाषा असून त्यातील शब्द रसाळ आहेत.

प्रश्न आ.
“तैसें शब्दांचे व्यापकपण। देखिजे असाधारण।
पाहातयां भावाज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ॥ 2 ॥
उत्तर :

माझ्या मराठी भाषेतील शब्दांचे स्वरूप अतिशय व्यापक आहे. म्हणजे त्यातील शब्दांचे जे अर्थ अतिशय सविस्तर स्वरूपात मी दिले आहेत. त्यामुळे या मराठी भाषेतून मी निर्माण केलेला प्रत्येक शब्द अलौकिक आहे. म्हणजेच या शब्दांसारखे दुसरे शब्द सापडणार नाहीत. प्रत्येक शब्द हा स्वतःचे वेगळे अस्तित्व दर्शविणारा आहे आणि अशा अलौकिक, स्वतःचे सामर्थ्य दर्शविणाऱ्या शब्दांचा अर्थ जो जाणणारा आहे. तोच खरा चिंतामणी ठरेल म्हणजेच तोच खरा तत्त्वज्ञ आहे की त्याला या मराठी भाषेत निर्माण झालेल्या शब्दांचा विस्तृतपणा जाणवेल किंवा ज्या व्यक्तीला या शब्दांचे ज्ञान होईल त्याच्याकडे चिंतामणीसारखे म्हणजेच एखादया तत्त्ववेत्यासारखे गुण आढळतील.

5. अभिव्यक्ती :

प्रश्न 1.
‘मराठी भाषेची थोरवी’ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :

भारतवर्षाचे खास वैशिष्ट्य म्हणजे भारतात बोलल्या जाणाऱ्या विविध भाषा, भाषा आपापल्या ठिकाणी समदध आहेत. प्रत्येक भाषा स्वयंपूर्ण पावे, वाढवावे याच उदात्त हेतूने स्वातंत्र्योत्तर काळात भाषावार प्रांतरचना स्वीकारण्यात आली. पूर्वी ईग्रज, पोर्तुगीज अशा अनेक सत्ता आपल्या देशावर राज्य करत होत्या, त्यांचे अनेक शब्द आपल्या भाषेत आले.

काळानुसार भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही असते त्याच प्रमाणे मराठीने संस्कृत, हिंदी, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधील शब्द आपले मानले ओहत. अनेक शब्दांना आपलेसे करून घेतल्याने मराठीची मधुरता, समृद्धता वाढली आहे. मराठीतले अनेक शब्दही इतर भाषांमध्ये वापरले जातात. मराठी भाषेत समृद्ध शब्दसंपत्ती आहे. मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही मराठी भाषेची श्रीमंती आहे.

एकच क्रियापद, शब्द, वाक्प्रचार वेगवेगळ्या प्रकारे वापरले जातात उदा. गप्पा, थापा, माशा, उड्या, टिचक्या, टोमणा, पाकीट, शिट्टी इत्यादी शब्दांना ‘मारणे’ हे एकच क्रियापद लागते आणि प्रत्येक ठिकाणी त्याचा अर्थ बदलतो. मराठी भाषेत साहित्य, नाट्य, काव्य यांची संपन्नता आहे. मराठी भाषा अप्रतिम सौंदर्याने नटलेली आहे. काळाबरोबर, नवीन सुधारणांबरोबर अनेक नवीन शब्द मराठीत निर्माण झाले आहेत. अनेक वैशिष्ट्ये, सौंदर्यस्थळे, शक्तिस्थळे या भाषेत आहेत. मराठीला कोकणी, मालवणी, अहिराणी इ. मधुर बोलीभाषा आहेत.

जागतिकीकरण, स्मार्ट फोनमुळे जगाच्या पाठीवर सर्वत्र मराठी बोलले, ऐकले जाते. मराठी साहित्य, चित्रपट, नाटक या माध्यमांतून या भाषेला सातासमुद्रापलीकडे जाण्याचा बहुमान मिळाला आहे. 27 फेब्रुवारी जागतिक मराठी भाषादिन म्हणून साजरा केला जातो. अलंकाराने सजलेली, चैतन्यमय मराठी भाषा श्रीमंत आहे आणि काळाच्या ओघातही ती टिकून राहिली आहे. शब्दांची मांदियाळी असलेली मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. म्हणूनच महणावेसे वाटते की ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी….’

6. ऐसीं अक्षरें रसिकें’ या रचनेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.

प्रश्न 1.
ऐसीं अक्षरें रसिकें’ या रचनेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :

‘ऐसी अक्षरे रसिकें’ या ओव्यांतून मराठी भाषेविषयीचा अभिमान व्यक्त झाला आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात माझे शब्द इतके रसपूर्ण आणि मधुर आहेत की ते सहज अमृतालाही जिंकतील, गोड शब्दांनी मी सांगेन. या मराठी भाषेतील शब्दांची कोमल गुणांशी तुलना केली असता, सुरांची कोमलता कमी ठरेल व यांच्या मोहक गुणापुढे सुगंधाची महतीही फिकी पडेल.

शब्दांच्या रसाळपणाचे महत्त्व असे आहे की, त्या शब्दांच्या गोडीच्या आशेने कानांना जिभा फुटतील व इंद्रिये एकमेकांमध्ये भांडण करू लागतील. आश्चर्याची गोष्ट ही की उच्चारलेल्या ओवीची धाटणी पाहून डोळे तृप्त होतील आणि त्यांना वाटेल हे केवळ शब्द नसून ही तर रूपाची खाण आहे. जेव्हा सर्व शब्द जुळून संपूर्ण वाक्य बाहेर पडेल तेव्हा इंद्रियांना मागे टाकून मन बाहेर येऊन आपले बाहू पसरून आलिंगन घेण्यासाठी धावेल याप्रमाणे सर्व इंद्रिये आपापल्या गुणधर्माप्रमाणे त्या बोलाला (शब्दाला) झोंबतील आणि शब्दही सर्व इंद्रियांना सारखेपणाने शांत करतील, जसा एकटा सूर्य आपल्या हजार हातांनी सर्व जगाला चेतना देतो आणि निसर्गातील सर्व व्यवहार सुरू होतात.

त्याचप्रमाणे शब्दांची व्यापकता अफाट आहे. या शब्दांचा भाव जे जाणून घेतील त्यांना हे शब्दच नव्हेत तर चिंतामणीच आपल्याला आज लाभले असे वाटेल. मराठी बोलाची मोठी ताटे बनवून त्यात मोक्षरस वाढून निष्काम साधुजनांना ग्रंथरूपी मेजवानी घालत आहे. ज्यांनी कधीही मंद न होणारी जी आत्मज्ञानाची ज्योत तेवत ठेवली आहे व जे इंद्रियांना समजू न देताच जेवू शकतात त्यांनाच या भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे. येथे श्रोत्यांनी श्रवणेंद्रियांचाही (कानांचा) आश्रय सोडून मनानेच उपभोग घ्यावा.

Additional Important Questions and Answers

आकलन कृती :

खालील पठित पदय पंक्तींच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

प्रश्न 1.
‘डोळे तृप्त होतील’ स्पष्ट करणारी ओळ खालील चौकटीत लिहा.
उत्तरः

‘डोळे तृप्त होतील’ या अर्थाची ओळ खालील चौकटीत लिहा.
देखता डोळ्यांही पुरों लागे धणी

प्रश्न 2.
खालील शब्दांना ओव्यांमध्ये आलेले समानार्थी शब्द लिहा.
1. बळ –
2. वास –
उत्तरः

1. बळ – बीक
2. वास – परिमळ

स्वमतः

प्रश्न 1.
‘जैसा एकला जग चेववी। सहस्त्रकरु’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य लिहा.
उत्तर :

जसा सूर्य आपल्या सहस्त्र हातांनी (किरणांनी) पहाटे समयी सर्व जगाला जागे करतो. सूर्याच्या या कृतीमुळे सर्व जग जागे होऊन आपल्या कामाला प्रवृत्त होते. पहाट झाल्यानंतरच सर्वजण कामाला लागतात. हा एकटा संपूर्ण जगाला चेतना देतो. त्याच्या येण्याने सगळीकडे प्रकाश पसरतो आणि चेतनामयी वातावरण तयार होते. सूर्य हा आपल्या अस्तित्वाने संपूर्ण जागाला प्रेरणा देतो. सूर्याची उपासना ही प्रकाश आणि ऊर्जा मिळविण्यासाठी केली जाते. हा पृथ्वीच्या वातावरणामध्येही बदल घडवून आणतो.

हिंदू धर्मामध्ये सूर्याला विशेष महत्त्व आहे. सूर्य हा तेजस्वी अंधाराचा शत्रू आणि पापनाशक आहे. पृथ्वीवरील सर्व जीवांचा हा एकमेव आधार आहे. सर्वांनीच सूर्याचा आदर्श घेण्यासारखा आहे. सूर्य हा सर्वांत तेजस्वी, सामर्थ्यवान, बुद्धिवान, सर्वज्ञ, सृष्टीचा जगत्सचालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे. त्याच्या उगवण्याने संपूर्ण सृष्टी आपोआपच जागृत होऊन पिवळ्या चैतन्याने न्हाऊन निघते.

पृथ्वीवरील हवा, पाणी, अग्नी, तेज, उष्णता, शुद्धता, स्वच्छता आणि पवित्रता यांचा उगमस्रोत सूर्यच आहे. हा आत्मशक्तीचा प्रेरक आहे. तो शरीराला अंतर्यामी प्रेरणा देत असल्याने सर्वांनाच जागे होण्याचा संदेश देतो. सूर्यापासून प्राणिमात्रांची निर्मिती म्हणजेच त्याच्या कृपेमुळेच सर्वांचे पालनपोषण होते. हा सर्व चराचरांत सामावलेला व व्यापक आहे. तोच व्यापकपणा, तेवढीच शक्ती माझ्या मराठी भाषेतून निर्माण झालेल्या शब्दांमध्ये आहे.

स्वाध्यायासाठी कृती

1. ‘संत ज्ञानेश्वर – एक असामान्य व्यक्तिमत्त्व’ याविषयी 12 ते 15 ओळीत माहिती लिहा.
2. ‘महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय’ याविषयी 12 ते 15 ओळीत माहिती लिहा.

Summary in Marathi

प्रस्तावना :

संत ज्ञानेश्वर हे एक श्रेष्ठ संतपुरुष, संत कवी, तत्त्वज्ञानी, प्रतिभावंत. तत्त्वज्ञान, कल्पनावैभव, साक्षात्कार, रसतत्व यांच्या दृष्टीने लिहिलेला मौल्यवान ग्रंथ म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’, ‘अमृतानुभव’, ‘चांगदेवपासष्टी’, ‘अभंगगाथा’ या त्यांच्या इतर रचना सुप्रसिद्ध आहेत. तत्त्वज्ञान, भक्ती आणि काव्य यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या रचनांमध्ये झाला आहे. विनयशीलता, सद्गुरुभक्ती, अमर्याद करुणा इत्यादी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू त्यांच्या रचनांमध्ये आढळतात.

या ओव्यांतून मराठी भाषेविषयीचा अभिमान व्यक्त झाला आहे. गीतेचे तत्त्वज्ञान मराठी भाषेत आणताना संत ज्ञानेश्वरांनी आपल्या स्वतंत्र प्रतिभेच्या बळावर त्याला नवे रूप दिले. मराठी भाषेची प्रतिष्ठा, शक्ती आणि सुंदरता यांचे दर्शन त्यांनी आत्मविश्वासाने घडविले आहे.

कवितेचा / ओव्यांचा परिचय :

माझे बोल (शब्द) शुद्ध प्राकृत आहेत खरे पण त्यांची अशी रसपूर्ण योजना करीन ते सहज अमृतालाही जिंकतील. गोड शब्दांनी मी सांगेन, या शब्दांची कोमल गुणांशी तुलना केली असता सप्तसुरांतील सुरांची कोमलता कमी भासेल आणि या शब्दांच्या मोहक गुणांपुढे सुगंधाची महतीही फिकी पडेल.

शब्दांच्या रसाळपणाची थोरवी अशी आहे की, त्या शब्दांच्या गोडीच्या आशेने कानांना जिव्हा फुटतील व इंद्रिये एकमेकांमध्ये भांडण करु लागतील. भांडण का करतील ….. तर …… श्रवण हा स्वभावतः कानाचा विषय आहे. जीभ म्हणेल ‘रस’ हा विषय माझा आहे. गंध हा विषय नाकाचा आहे. प्रत्येक शब्द हा ज्ञानेंद्रसंवेदध आहे.

आणखी एक नवलाची गोष्ट ही की उच्चारलेल्या ओवीची धाटणी पाहून डोळे तृप्त होतील आणि त्यांना वाटेल हे केवळ बोल नसून ही प्रत्यक्ष रूपाची खाण आहे. जेव्हा सर्व शब्द जुळून संपूर्ण वाक्य बाहेर पडेल तेव्हा इंद्रियांना मागे टाकून मन बाहेर निघेल आणि आपले वाहू पसरून आलिंगन घ्यायला धावेल याप्रमाणे सर्व इंद्रिये आपापल्या धर्माप्रमाणे त्या बोलाला (शब्दाला) झोंबतील आणि शब्दही सर्व इंद्रियांना सारखेपणाने शांत करतील.

जसा एकटा सूर्य आपल्या सहस्त्र हातांनी सर्व जगाला चेतना देतो आणि सर्व चराचरातील व्यवहारांना सुरुवात होते. त्याचप्रमाणे शब्दांचे व्यापकपणही विलक्षण आहे. या शब्दांचा भाव जे जाणतील किंवा त्या भावांचा विचार करतील त्यांना हे शब्दच नव्हेत तर चिंतामणीच आपल्याला आज लाभले असे वाटेल.

पण असो, मराठी बोलाची मोठाली (मोठी) ताटे बनवून त्यात मोक्षरस वाढून निष्काम साधुजनांना ग्रंथरूपी मेजवानी घालत आहे.
ज्यांनी कधीही मंद न होणारी जी आत्मज्ञानाची ज्योत तेवत ठेवली आहे व जे इंद्रियांना नकळत किंवा त्यांना समजू न देताच जेवू शकतात | त्यांनाच या भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे.

येथे श्रोत्यांनी श्रवणेंद्रियांचाही (कानांचा) आश्रय सोडून मनानेच उपभोग घ्यावा. भाषा, शब्दरचना, नाद आणि लय यांचे सौंदर्य, ओबीरचनेतला सहजपणा, प्रसन्नता यांमधून संत ज्ञानेश्वरांनी अपूर्व असा अनुभव वाचकांना, श्रोत्यांना दिला आहे.

समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :

  1. कोवळिक – कोमलता.
  2. पाडे – तुलनेने.
  3. परिमळ – मोहकतेने – (with fragrance).
  4. बीक – बळ – (strongth, power).
  5. कळंभा – कलह – (a quarrel, conflict).
  6. विषो – विषय.
  7. सरिसेपणे – समता.
  8. सारखेपणा – (equal).
  9. अविष्करें – पसरून.
  10. भावजां – (भाव) जाणणाऱ्यांना.
  11. फावती – सापडती – (found).
  12. प्रतिपत्ति – ग्रंथरूपी भोजनसमारंभ, मेजवानी – (a feast, banquet).
  13. नीच – नित्य, नित्यनूतन – (always new).
  14. ठाणदिवी – दिव्याचे स्थिरासन – (wooden lampstand).
  15. फावे – लाभणे – (to obtain, to get).
  16. पांगे – आश्रयावाचून – (unsheltered, helpless).
  17. निजांगे – अंतरंग – (the heart, mind).
  18. निष्काम – विरक्त, फळाची इच्छा न धरणारे – (free from any expectations)
  19. सहस्त्रकरु – सूर्य – (the sun).
  20. धणी – तृप्ती – (satisfaction, content).
  21. इंद्रिये – अवयव (an organ of sense).
  22. रसना – जीभ (tongue).
  23. बुझावी – समाधान करतो – (satisfaction).
  24. वोगरिलीं – वाढलेली आहेत.
  25. आत्मप्रभा – आत्मप्रकाश – (one’s own light).