Chapter 8 सखू आजी

Chapter 8 सखू आजी

Chapter 8 सखू आजी

Textbook Questions and Answers

1. खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा.

प्रश्न 1.
खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा.


उत्तरः

2. ‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.

प्रश्न 2.
‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.
उत्तर:

1. ‘हाडं गेली वड्याला, बघा माज्या मड्याला.’
2. ‘मरण लोकाला, सरण दिक्काला/माजं कपाळ, भरलं आभाळ/ मरलं माणूस, झिजलं कानुस/म्हातारी नवसाची, भरून उरायची.’
3. ‘गाव गरतीला, सपान धरतीला/धरती दुवापली, माती हाराकली.’

3. गुणवैशिष्ट्ये लिहा.

प्रश्न ३.
गुणवैशिष्ट्ये लिहा.

उत्तर:

4. कंसातील सूचनेनुसार बदल करा.

प्रश्न (अ)
याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. (काळ ओळखा)
उत्तरः
वर्तमानकाळ

प्रश्न (आ)
आजी कुठं चाललीस? (अधोरेखित शब्दाची जात ओळखा)
उत्तरः
आजी – नाम

प्रश्न (इ)
आजी माझ्या जवळची होती. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)
उत्तरः
आजी माझ्या लांबची होती.

प्रश्न (ई)
डोंगराच्या कुशीत वसले होते ते गाव! (अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)
उत्तरः
पर्वताच्या कुशीत वसले होते ते गाव!

5. स्वमत:

प्रश्न (अ)
सखू आजीच्या व्यक्तिमत्त्व विशेषांपैकी तुम्हांला भावलेल्या कोणत्याही दोन विशेषांचे सकारण स्पष्टीकरण करा.
उत्तरः
सखू आजी सहज बोलायला लागली तरी एक कविताच बोलायची. तो तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक विशेष होता. तिला कुणी म्हटलं की, म्हातारी गप्प घरात बसायचं सोडून कुठं निघालीस मरायला’. तर ती लगेच म्हणायची, ‘मरण लोकाला, सरण दिक्काला। माजं कपाळ भरलं आभाळ। मरलं माणूस, झिजलं कानुस । म्हातारी नवसाची, भरून उरायची’ हे सगळं ती जुळवून बोलायची असं नाही, पण ती बोलायला लागली की आपोआप तिच्या तोंडातून ते बाहेर यायचं

सखू आजीच्या व्यक्तिमत्त्वाचा मला भावलेला दुसरा विशेष म्हणजे ‘नवीन बदल सहज स्वीकारणे’ हा होय. लेखक राहतो त्या विभागात प्रौढ साक्षरतेचे वर्ग जोरात होते. पण त्यांच्या गावात एकही चालत नव्हता. सखू आजीला हे माहिती झाले तेव्हा कॉलेजामध्ये शिकवणाऱ्या लेखकाच्या घरी सखू आजी आजुबाजूच्या आया-बाया घेऊन गेली. त्यानंतर सगळ्यांच्या समोर म्हणाली की, “आमचं पोरगं एवढं काय काय शिकलंय, आपल्याला दुसरा मास्तर कशाला पायजे. तूच शिकीव रंऽऽ आमाला” सखू आजी पंधरा दिवसात लिहाय वाचायला शिकली. शिवाय इतर बायकांनादेखील शिकवायला सुरुवात केली.

प्रश्न (आ)
खालील मुद्द्याला अनुसरून सखू आजींविषयी तुमचे मत लिहा.
1. करारीपणा
2. आजीचा गोतावळा
उत्तरः

सखू आजी एकदम करारी होती. तो तिच्या व्यक्तिमत्त्वाचा खास विशेष होता. एकदा गावनियमाविरुद्ध वागणाऱ्या सातबा घोरपड्याच्या मुलाला पंचांनी व गावकऱ्यांनी दंड करावा’ असे ठरवले. त्यावेळी सखूआजी आपल्या करारीस्वभावानुसार ठामपणे म्हणाली की, ‘पोरगं मांडीवर घाण करतंय म्हणून मांडी कापता व्हयगाऽऽ?’ तिच्या म्हणण्यानुसार लगेच शिक्षा करण्याऐवजी चूक करणाऱ्या व्यक्तीला सुधारण्याची संधी द्यायला हवी. तिच्या या स्वभावामुळे गावकऱ्यांच्या मनात तिच्याविषयी आदर होता. त्यामुळेच सातबाच्या मुलाला कोणीही काहीही बोलले नाही.

सखू आजीला गावातल्या सगळ्या लहान-थोरांमध्ये आपलं घर दिसायचं. गाव म्हणजे तिचा गोतावळा होता. सगळे गावकरी जणू तिचे नातेवाईकच होते. त्यामुळेच सगळ्या अडाणी आयाबायांना गोळा करून ती लेखकाकडे गेली आणि, “एवढा शिकला-सवरला आहेस तर दुसऱ्या कोणी शिकवण्यापेक्षा तूच आम्हांला लिहाय-वाचायला शिकव’, असे हक्काने म्हणाली. स्वत: पंधरा दिवसांत लिहिणे वाचणे शिकून तिने इतरांना शिकवायला सुरुवात केली. गावातला चोपडा यांचा मुलगा पहिल्यांदा पोलिस झाला. त्यावेळी आजीने गावच्या बाया गोळा करून त्याला ड्रेसवरच ओवाळलं. दही-साखरेनं तोंड गोड केलं अशा या सखू आजीचा गाव म्हणजे गोतावळाच होता. सगळ्यांच्या मनात तिच्याविषयी आदर होता. त्यामुळेच जेव्हा ती वारली तेव्हा सगळ्या गावकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले. आपलं माणूस गेल्याचं दु:ख सगळ्यांना झालं होतं.

6. अभिव्यक्ती:

प्रश्न (अ)
‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
उत्तरः
पूर्वी गावांमध्ये ‘आजी’ नावाच्या व्यक्तिमत्त्वाला फार महत्त्व असे. शाळेतील मुलांना जाता-येता आजी गोळा करून बसायची. शेतातल्या देवाच्या गोष्टी सांगायची. आजी गावातल्या कुणाच्याही बारशाला, लग्नाला, मयताला हटकून पुढं असायचीच. सगळं तिच्या म्हणण्यानुसार चालायचं. गावाच्या दैनंदिन व्यवहारात आजी सारख्या म्हाताऱ्या आणि अनुभवी माणसांची मतं विचारात घेतली जायची. गाव म्हणजे म्हातारीचा गोतावळा असे. तिला गावातल्या लहान-थोरांमध्ये आपलं घर दिसायचं.

पण हल्ली परिस्थिती बदलली आहे. आजकालच्या ‘विभक्त कुटुंब’ योजनांमध्ये आजीसारख्या म्हाताऱ्या माणसांना जागाच उरली नाही. आजकाल लोक आजीच्या मतांना विनाकारण केलेला हस्तक्षेप समजतात. म्हणून आजीच्या मताला किंमतच उरली नाही. एकेकाळी आजीबाईंच्या औषधाच्या घरगुती बटव्यातील एखादी बुटी खाल्ली की आजार हमखास पळून जात असे, पण आज त्याची जागा महागड्या डॉक्टरांच्या औषधांनी घेतली. आज आजीसारख्या वडीलधाऱ्या माणसांची जागा फक्त वृद्धाश्रमात उरली आहे. पूर्वी आजीकडून एखादी गोष्ट ऐकल्याशिवाय न झोपणारी नातवंडे आज मोबाईलशिवाय झोपत नाही. ‘आता गावगाडा बदलला त्यामुळे आजीला जागाच उरली नाही’, हे खरे आहे.

प्रश्न (आ)
तुम्हांला समजलेल्या ‘सखू आजीचे’ व्यक्तिचित्र रेखाटा.
उत्तरः
लेखक ‘राजन गवस’ यांनी आपल्या पाठात रंगवलेली ‘सखू आजी’ मनाला भावते. साधारण एखादया म्हाताऱ्या बाई सारखीच ती होती. तिचे वय नव्वद वर्षे होते. कमरेत वाकलेली आणि आधारासाठी हातात नेहमी काठी असायची. सुरकुत्यांनी भरलेला चेहरा नेहमी प्रसन्न दिसायचा. गावातल्या प्रत्येकाशी तिने प्रेमाचं नातं जोडलेलं असे. जाता-येता ती प्रत्येकाशी बोलायची. तिच्याशी बोलताना प्रत्येकाला आनंद व्हायचा. ती नेहमी कवितेतूनच बोलायची. तिची कवितारूपी भाषा बोलणे सगळ्यांना समजायचेच असे नव्हते, पण प्रत्येकजण तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. लहान मुलांना जमवून त्यांना चित्रविचित्र गोष्टी सांगणे तिला खूप आवडायचे.

शब्द शब्द जोडून कोणतीही कहाणी ती सांगायची. अशी ही आजी प्रगतशील दृष्टीची होती. त्यामुळेच स्वत:सोबत गावातील अनेक अडाणी बायकांना घेऊन ती लेखकाकडे गेली आणि आम्हांला तूच लिहाय-वाचायला शिकव असे हक्काने म्हणाली. पुढच्या पंधरा दिवसात उत्साहाने लिहायला-वाचायला शिकून आजी दुसऱ्यांना पण शिकवू लागली. गावातला एक मुलगा पहिल्यांदा पोलिस झाला, तेव्हा गावातल्या बायका गोळा करून तिने ड्रेसवरच त्याला ओवाळले. दही-साखरेने तोंड गोड केले. सारे गावकरी तिच्यासाठी तिचे जवळचे नातेवाईकच होते. त्यामुळेच सगळ्यांना तिच्याविषयी मनात आदर होता. म्हणून जेव्हा सखू आजी मरण पावली तेव्हा लहान पोरांपासून म्हाताऱ्याकोताऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले होते.

प्रश्न (इ)
सखू आजी व तुमची आजी यांच्या स्वभावातील साम्यस्थळे शोधा.
उत्तरः
सखूआजीप्रमाणे माझी आजीसुद्धा खूप प्रेमळ आहे. माझ्या आजीचे नाव जानकी आहे. माझी जानकी आजी साऱ्या गावाची सुद्धा आजीच आहे. सारे गावकरी तिच्यासाठी जणू तिचे नातेवाईकच आहेत. गावातून फिरताना ती प्रत्येकाशी प्रेमाने बोलते. तिच्याविषयी साऱ्यांच्या मनात आदर आहे. कोणतेही संकट आले, अडचण आली तर सल्ला मागायला गावकरी येतात. आजीच्या विचारांना सगळे मान देतात. गावातल्या लहान-लहान मुलांना जमवून त्यांना छान गोष्टी सांगणे तिला आवडते. पण कोणी शाळेला दांडी मारली तर तिला आवडत नाही. ‘शिकून सवरून मोठे व्हा’ असे तिचे नेहमी सांगणे असते. गावामध्ये कोणी मरण पावले, कोणाकडे बारसे असेल, कुणाकडे लग्न असेल तर माझी ‘जानकी आजी’ तिथे मुद्दाम असणारच. तिच्या सूचनेनुसार सगळे वागतात. तिचा शब्द कोणी मोडत नाही.

Additional Important Questions and Answers

1. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1: आंकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:

योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

प्रश्न 1.
सखू आजी मरण पावली याला ……………..

(अ) विशेष महत्त्व नाही.
(ब) विशेष काहीच नाही.
(क) विशेष महत्त्व काय.
(ड) विशेष काय आहे.

प्रश्न 2.
तिच्याइतकं प्रचंड भाषिक ज्ञान ……………….
(अ) मला कोणाकडंच दिसलं नाही.
(ब) मला मिळालच नाही.
(क) मला सगळ्यांकडे दिसलं.
(ड) मला दिसलंच नाही.
उत्तर:

1. सखू आजी मरण पावली याला विशेष महत्त्व काय.
2. तिच्याइतकं प्रचंड भाषिक ज्ञान मला कोणाकडंच दिसलं नाही.

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.

प्रश्न 4.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

  1. सखू आजी नेहमीच एक कविता वाटते.
  2. प्रत्येक जण तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो.
  3. ती कवितेत बोलते. कवितेत जगते.
  4. म्हातारी प्रत्येकाशी बोलते.

उत्तरः

  1. प्रत्येक जण तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो.
  2. म्हातारी प्रत्येकाशी बोलते.
  3. मला सखू आजी नेहमीच एक कविता वाटते.
  4. ती कवितेत बोलते. कवितेत जगते.

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
सखू आजी परवा वारली, ही गोष्ट लेखकाला सांगण्याइतपत महत्त्वाची का वाटत नाही ?
उत्तरः

सखू आजी परवा वारली, ही गोष्ट लेखकाला सांगण्याइतपत महत्त्वाची वाटत नाही; कारण आपण कितीतरी मृत्यू रोज अनुभवत असतो.

प्रश्न 2.
लेखकाला सखू आजी कविता वाटण्याचे कारण काय आहे?
उत्तर:
लेखकाला सखू आजी नेहमीच एक कविता वाटते, कारण ती कवितेत बोलते, कवितेत जगते.

कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 6.

  1. सखू आजीचा मृत्यू मला ……….. करून गेला. (वरवर जखम, खूप मोठी जखम, थोडीशी जखम, खोलवर जखम)
  2. सखू आजी ………… जाताना कोणी सहज म्हटलं, ‘आजी, कुठं चाललीस?’ (घरातून, गल्लीतून, बाजारातून, देवळातून)
  3. मला सखू आजी नेहमीच एक ………..” वाटते. (धडा, गाणं, कविता, पाठ)

उत्तर:

  1. खोलवर जखम
  2. गल्लीतून
  3. कविता

प्रश्न 7.
सहसंबंध लिहा.

  1. तरुण : म्हातारं :: जन्म : ……………..
  2. काव्य : कविता :: कर : ……………..
  3. खोलवर : जखम :: प्रचंड : ………..

उत्तर:

  1. मृत्यू
  2. हात
  3. भाषिक ज्ञान

प्रश्न 8.
शब्दसमूहासाठी एक शब्द चौकटीत लिहा.

  1. वयस्कर स्त्री – [ ]
  2. भाषाविषयक ज्ञान – [ ]
  3. जवळच्या नात्यातील माणस – [ ]

उत्तरः

  1. म्हातारी
  2. भाषिक ज्ञान
  3. रक्ताची माणसं

कृती 2. आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
मला सखू आजी नेहमीच एक कविता वाटते; कारण ……………..
(अ) ती कविता करते.
(ब) ती कवितेत बोलते. कवितेत जगते.
(क) ती म्हातारी झाली होती.
(ड) तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या.
उत्तरः

मला सखू आजी नेहमीच एक कविता वाटते; कारण ती कवितेत बोलते. कवितेत जगते.

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
1. हाडं गेली वड्याला, बघा माज्या मड्याला’ असे बोलणारी – [ ]
2. प्रचंड भाषिक ज्ञान असलेली व्यक्ती – [ ]
उत्तर:
1. सखू आजी
2. सखू आजी

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:

प्रश्न 4.
चूक की बरोबर ते लिहा.

  1. मला सखू आजी नेहमीच एक कोडं वाटते.
  2. म्हातारी कोणाशीही बोलत नाही.
  3. सर्वात अधिक भाषिक ज्ञान आजीकडंच दिसलं.

उत्तर:

  1. चूक
  2. चूक
  3. बरोबर

प्रश्न 5.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर:

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
1. सखु आजी परवा वारलि.
2. सखू आजिचं वय वरषे नव्वद.
उत्तर:
1. सखू आजी परवा वारली.
2. सखू आजीचं वय वर्षे नव्वद.

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन सर्वनामे शोधून लिहा.
उत्तर:
1. ती
2. माझ्या
3. मला

प्रश्न 3.
अचूक शब्द लिहा.

  1. महातारी, म्हातारि, म्हातारी, महातारि
  2. सुरकुतया, सुरकूत्या, सुरकुत्या, सूरकूत्या –
  3. भाषिक, भाशिक, भासिक, भाषीक

उत्तर:

  1. म्हातारी
  2. सुरकुत्या
  3. भाषिक

प्रश्न 4.
लिंग बदला.
आजोबा – [ ]
उत्तर:

आजी

प्रश्न 5.
अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा.
असा प्रश्न कोणीही उपस्थित करू शकेल.
उत्तर:
असा सवाल कोणीही उपस्थित करू शकेल.

प्रश्न 6.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. जीवन ×
  2. निंदा ×
  3. अनुपस्थित ×
  4. लांबची ×

उत्तर:

  1. मृत्यु
  2. स्तुती
  3. उपस्थित
  4. जवळची

प्रश्न 7.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर:

1. जाती
2. माणसं

प्रश्न 8.
उताऱ्यात आलेली म्हण पूर्ण करा.
‘हाडं गेली वड्याला, ………………….
उत्तर:
‘हाडं गेली वड्याला, बघा माज्या मड्याला.’

प्रश्न 9.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

प्रश्न 10.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

प्रश्न 11.
वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा.
पोकळी वाढणे
उत्तर:
अर्थ: रिकामेपणा निर्माण होणे.
वाक्य: आईच्या जाण्याने शकूच्या आयुष्यातील पोकळी वाढत गेली.

प्रश्न 12.
काळ बदला. (भूतकाळ करा)
मला सखू आजी नेहमीच एक कविता वाटते.
उत्तर:
मला सखू आजी नेहमीच एक कविता वाटायची.

प्रश्न 13.
काळ ओळखा.
पण प्रत्येक जण तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो.
उत्तरः
वर्तमानकाळ

प्रश्न 14.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तरः

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
तुमची आजी व सखू आजी यांच्या स्वभावातील साम्यस्थळ सांगा.
उत्तरः
माझी आजी व सखू आजी यांच्यात फारच साम्य आहे. दोघीही वृद्ध आहेत. माझ्या आजीचाही चेहरा सुरकुत्यांनी भरलेला आहे. माझ्या आजीचेही शरीर वाकून कमान झालेले आहे. माझ्या आजीचेही भाषिक ज्ञान प्रचंड आहे. बोलताना जुन्या म्हणींचा ती उपयोग करते. जसे की : ‘माझं नाव ममती, अन् मला काय कमती’ सखू आजी प्रमाणेच माझी आजी काय बोलते हे लोकांना अनेक वेळा कळतच नाही; कारण तिच्या जवळ परंपरागत असलेल्या म्हणींशी आधुनिक काळातील लोक तितके परिचित नाहीत. सखू आजीप्रमाणे काठी टेकत टेकत ती सगळीकडे हिंडते आणि रस्त्यास जो भेटेल त्याच्याशी संवाद साधते.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 सखू आजी 10
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 सखू आजी 11

प्रश्न 2.
जोड्या जुळवा.

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

  1. कैक वर्षांत असं कधी घडलं नाही. ही कथा कधी अचानक स्वप्नात येतेच.
  2. तिथून पुढं झोपच लागायची नाही.
  3. कधी तरी आपल्या स्वप्नातला साप नागीण घेऊन जाईल आणि आपल्याला हे स्वप्न पडायचं बंद होईल, असं वाटायचं.
  4. बैल आंघोळ करायला लागला, की डोळे टक्क उघडे पडायचे.

उत्तर:

  1. बैल आंघोळ करायला लागला, की डोळे टक्क उघडे पडायचे.
  2. तिथून पुढं झोपच लागायची नाही.
  3. कधी तरी आपल्या स्वप्नातला साप नागीण घेऊन जाईल आणि आपल्याला हे स्वप्न पडायचं बंद होईल, असं वाटायचं.
  4. कैक वर्षांत असं कधी घडलं नाही. ही कथा कधी अचानक स्वप्नात येतेच.

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
आजी शेतातल्या कोणाची गोष्ट सांगायची?
उत्तरः

आजी शेतातल्या देवाची गोष्ट सांगायची.

प्रश्न 2.
लेखकाचा कोणता प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे?
उत्तरः
आजीनं सांगितलेल्या कैक गोष्टींपैकी एकच गोष्ट मेंदूत कशी रुतून बसली, हा लेखकाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.

कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.

  1. कधी तरी आपल्या स्वप्नातला ………… नागीण घेऊन जाईल आणि आपल्याला हे स्वप्न पडायचं बंद होईल. (बैल, माणूस, साप, रेडा)
  2. गाव गरतीला, सपान धरतीला/धरती …….”माती हाराकली’. (फाटली, दुवापली, दुभंगली, दुमडली)
  3. आजीची ……….. कधी कधी आठवडा आठवडा चालायची. (गंमत, गाणी, करामत, गोष्ट)

उत्तर:

  1. साप
  2. दुवापली
  3. गोष्ट

प्रश्न 2.
सहसंबंध लिहा.
1. मरण : लोकाला :: सरण : ……………
2. गाव : गरतीला :: सपान : …………..
उत्तर:

1. दिक्काला
2. धरतीला

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. डोळे टक्क उघडे पडायचे; ………….
(अ) साप आंघोळ करायला लागला की,
(ब) बैल आंघोळ करायला लागली की.
(क) त्याचा साप झाला की,
(ड) सापाला पंख फुटले की,
उत्तर:

डोळे टक्क उघडे पडायचे; बैल आंघोळ करायला लागला की.

प्रश्न 2.
कोण ते लिहा.

  1. मनात दीर्घकाळ रेंगाळली – [ ]
  2. फाळाला डसली – [ ]
  3. चेहऱ्यावरचे बदलणारे भाव – [ ]

उत्तर:

  1. आजीची गोष्ट
  2. नागीण
  3. आजीचे

प्रश्न 3.
चूक की बरोबर ते लिहा.

  1. सखू आजी सहज बोलायला लागली तरी एक गोष्टच बोलायची.
  2. ‘मरण लोकाला, भरण दिक्काला’
  3. नांगराची नदी झाली.
  4. फाळाला नागीण डसली.

उत्तर:

  1. चूक
  2. चूक
  3. बरोबर
  4. बरोबर

प्रश्न 4.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर:

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
लेखननियमांनुसार वाक्य शुद्ध करून लिहा.
नंतर म्हातारिला काहिच विचारलं नाही.
उत्तरः

नंतर म्हातारीला काहीच विचारलं नाही.

प्रश्न 2.
अचूक शब्द लिहा.
1. अवर्णनीय, अवर्णनीय, अर्वणनीय, अवनणीय – [ ]
2. तपश्चर्या, तर्पश्चया, तापश्चर्या, तर्पश्र्चया – [ ]
उत्तर:
1. अवर्णनीय
2. तपश्चर्या

प्रश्न 3.
समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा.

प्रश्न 4.
विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा.

  1. जीवन × [ ]
  2. दु:ख × [ ]
  3. अल्पकाळ × [ ]
  4. बंद × [ ]

उत्तर:

  1. मरण
  2. आनंद
  3. दीर्घकाळ
  4. उघडे

प्रश्न 5.
उताऱ्यातील दोन विशेषणे शोधून लिहा.
उत्तर:

  1. भरलं
  2. झिजलं
  3. एक
  4. चार
  5. कैक

प्रश्न 6.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

प्रश्न 8.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा.
1. अंगावर शहारे येणे
2. मेंदूत रुतून बसणे
उत्तर:
1. अर्थ : खूप भिती वाटणे. वाक्य : समोरचे अपघाताचे दृश्य पाहून माझ्या अंगावर शहारा आला.
2. अर्थ : कायमस्वरूपी लक्षात राहणे. वाक्य : लहानपणी आजीने सांगितलेल्या गोष्टी अजूनही
माझ्या मेंदूत रुतून बसल्या आहेत.

काळ बदला. (भविष्यकाळ करा.)

प्रश्न 1.
तिच्याशी बोलताना एक अवर्णनीय आनंद मिळायचा.
उत्तरः
तिच्याशी बोलताना एक अवर्णनीय आनंद मिळेल.

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
तुम्हांला समजलेल्या सखू आजीचे व्यक्तिचित्र रेखाटा.
उत्तरः
सखू आजी म्हणजे एक जिवंत कविताच होती. तिचे बोलणेच काव्यमय होते. तिचे भाषिक ज्ञान प्रचंड होते. गावातील लहान मुलांना एकत्र करून त्यांना शेतातल्या देवाच्या गोष्टी सांगणे आजीला फार आवडायचे. आजीजवळ काल्पनिक व रहस्यकथांचे भांडारच होते. कथेचे निवेदन करताना तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव व हाताच्या हालचाली पाहण्यासारख्या असायच्या. लहान मुलांना कथा सांगतांना त्यांना कल्पनेच्या विश्वात नेण्याची जादू आजीजवळ होती. कथेतील एखादा भाग व्यवस्थित कळला नाही वा कथेतील एखादया भागाचा अर्थ आजीला कधी विचारला तर ती थातुरमातुर असे काही बोलायची की, ज्याचा अर्थच कोणाला कळायचा नाही.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 सखू आजी 15

प्रश्न 2.
जोड्या जुळवा.

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

  1. अशात सातबा घोरपड्याचा पोरगा वावगं वागला.
  2. सगळ्यांनी माना डोलावल्या.
  3. एकदा गावच्या लक्ष्मीची जत्रा ठरली.
  4. गाव बैठक बसली.

उत्तर:

  1. एकदा गावच्या लक्ष्मीची जत्रा ठरली.
  2. अशात सातबा घोरपड्याचा पोरगा वावगं वागला.
  3. गाव बैठक बसली.
  4. सगळ्यांनी माना डोलावल्या.

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
गावात एकदा कोणत्या देवीची जत्रा ठरली?
उत्तर:

गावात एकदा लक्ष्मी देवीची जत्रा ठरली.

प्रश्न 2.
सखू आजी गावातल्या आयाबाया गोळा करून कोणाच्या घरात आली?
उत्तरः

सखू आजी गावातल्या आयाबाया गोळा करून लेखकाच्या घरात आली

प्रश्न 3.
गावचा सरपंच कसा होता?
उत्तर:

गावचा सरपंच अंगठेवाला होता.

प्रश्न 4.
म्हातारीचा गोतावळा म्हणजे काय?
उत्तरः

गाव म्हणजे म्हातारीचा गोतावळा.

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकामी जागा भरा.

  1. अशात सातबा …………. पोरगा वावगं वागला. (देशमुखांचा, कुलकर्त्यांचा, पाटलांचा, घोरपड्यांचा)
  2. ………… गावाला भीती होती. (आजीची, म्हातारीची, देवीची, मास्तरांची)
  3. आमच्या भागात तेव्हा ………वर्ग जोरात होते. (स्वच्छता अभियानाचे, बाल साक्षरतेचे, आरोग्य, प्रौढ साक्षरतेचे)

उत्तर:

  1. घोरपड्यांचा
  2. म्हातारीची
  3. प्रौढ साक्षरतेचे

प्रश्न 6.
सहसंबंध लिहा.
सातबा घोरपड्याचा मुलगा : वावगं वागला :: चोपडा यांचा पोरगा : ……………………..
उत्तर:

पोलीस झाला.

कृती 2 : आकलन कृती

योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

प्रश्न 1.
म्हातारीनं गावच्या बायका गोळा करून, त्याला ड्रेसवर ओवाळलं; कारण ………………….
(अ) आमच्या गावातल्या चोपडा यांचा पोरगा पहिल्यांदा पोलीस झाला.
(ब) आमच्या गावातल्या घोरपडे यांचा मुलगा पहिल्यांदा पोलीस झाला.
(क) आमच्या गावातल्या चोपडा यांचा पोरगा वावगं वागला.
(ड) आमच्या गावातल्या घोरपडे यांचा मुलगा वावगं वागला.
उत्तर:
म्हातारीनं गावच्या बायका गोळा करून, त्याला ड्रेसवरओवाळलं; कारण आमच्या गावातल्या चोपडा यांचा पोरगा पहिल्यांदा पोलीस झाला.

प्रश्न 2.
सातबाच्या पोराला कोणीच काही बोललं नाही; कारण
(अ) सातबाची गावाला भीती होती.
(ब) सातबाच्या पोराची गावाला भीती होती.
(क) तो वावगं वागला होता.
(ड) म्हातारीची गावाला भीती होती.
उत्तर:
सातबाच्या पोराला कोणीच काही बोललं नाही; कारण म्हातारीची गावाला भीती होती.

आकृतिबंध पूर्ण करा.

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:

प्रश्न 3.
कोण ते लिहा.

  1. वावगं वागणारा – [ ]
  2. गावाला भीती वाटायची – [ ]
  3. सहीपुरता साक्षर झाला – [ ]

उत्तर:

  1. सातबा घोरपड्याचा पोरगा
  2. सखू आजीची
  3. सरपंच

प्रश्न 4.
चूक की बरोबर ते लिहा.
1. सखूआजी गावातल्या कुणाच्याही बारशाला, लग्नाला, मयताला जायची नाही.
2. अशात सातबा घोरपड्याचा पोरगा वावगं वागला.
उत्तर:

1. चूक
2. बरोबर

प्रश्न 5.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर:

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
1. म्हतारिची गावाला भिती होती.
2. आमच्या भागात तेव्हा प्रौढ सक्षरतेचे वरग जोरात होते.
उत्तर:

1. म्हातारीची गावाला भीती होती.
2. आमच्या भागात तेव्हा प्रौढ साक्षरतेचे वर्ग जोरात होते.

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन नामे शोधून लिहा.
उत्तर:

  1. सखू
  2. लक्ष्मी
  3. सातबा
  4. पंच
  5. म्हातारी
  6. बायका
  7. सरपंच
  8. दही
  9. आजी
  10. घोरपडे
  11. साखर

प्रश्न 3.
अचूक शब्द लिहा.
1. रीवाजानुसार, रिवाजानुसार, रिवाजनुसार, रिवाजानूसार – [ ]
2. गोतवळा, गोतावेळा, गोतावळा, गातोवळा – [ ]
उत्तर:

1. रिवाजानुसार
2. गोतावळा

प्रश्न 4.
अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.
1. आपल्याला दुसरा शिक्षक कशाला पाहिजे.
उत्तरः
आपल्याला दुसरा मास्तर कशाला पाहिजे.

प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
1. मोठा × [ ]
2. आत × [ ]
उत्तर:

1. लहान
2. बाहेर

प्रश्न 6.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तरः

1. सगळे
2. वर्ग

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तरः

प्रश्न 8.
तक्ता पूर्ण करा.
उत्तरः

प्रश्न 9.
वाक्यातील काळ ओळखा.
तेव्हा मी कॉलेजात होतो.
उत्तरः
भूतकाळ

प्रश्न 10.
काळ बदला. (भविष्यकाळ करा)
अशात सातबा घोरपड्याचा पोरगा वावगं वागला.
उत्तर:
अशात सातबा घोरपड्याचा पोरगा वावगं वागेल.

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
स्त्री शिक्षणात सावित्रीबाई फुले यांचा वाटा स्पष्ट करा.
उत्तरः
मुलींना देखील समान शिक्षणाचा अधिकार असावा यासाठी समाजातील अनेक स्त्रियांनी काम केले, जसे सावित्रीबाई फुले. त्यांनी समाजाचा विरोध पत्करून देखील मुलींना शिक्षण देण्याचा आग्रह सोडला नाही. स्वत: शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी जोतिबा फुले म्हणजेच त्यांच्या पतीसोबत 1848 मध्ये पुण्याला शाळा सुरू केली. कालांतराने त्यांच्या शाळेत मुलींची संख्या वाढत गेली आणि त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. त्यांच्या शिक्षणातील योगदानाबद्दल ब्रिटिश सरकारतर्फे त्यांना गौरविण्यात आले. समाजाला साक्षर करणाऱ्या अनेक स्त्रियांपैकी सावित्रीबाई फुले यांचाही महत्त्वाचा वाटा होता.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
1. प्रत्येक गावचा गोतावळा सांभाळून गेलेलीच असते. – [ ]
2. उदयाच्या मुलांची होणारी अडचण – [ ]
उत्तर:

1. एक आजी
2. आजीची आठवण न सांगता येणे.

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.
उत्तरः

प्रश्न 4.
खालील प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात लिहा.
1. आजी नसल्याने आता कोणाची अडचण होणार आहे?
उत्तरः
आजी नसल्याने आता उदयाच्या मुलांची अडचण होणार आहे.

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
1. आता फक्त आजीच्या ……….. घडलेल्या न घडलेल्या (लोककथा, भाकडकथा, लघुकथा, दंतकथा)
2. सखू आजी शिकली सवरली असती, …………. जन्मली असती, तर कुठल्या कुठं पोहोचली असती. (खेड्यात, गावात, शहरात, परदेशात)
उत्तर:
1. दंतकथा
2. शहरात

प्रश्न 6.
सहसंबंध लिहा.
मरण पावली : सखू आजी :: पोरकं झालं : ………
उत्तर:

गाव

प्रश्न 7.
शब्दसमूहासाठी एक शब्द चौकटीत लिहा.
पूर्वीपासून चालत आलेल्या कल्पित कथा – [ ]
उत्तर:
दंतकथा

कृती 2 : आकलन कृती

योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

प्रश्न 1.
आजीला जागाच उरली नाही; कारण ……………
(अ) घरे लहान झाली.
(ब) लोक सुशिक्षित झाले.
(क) गावगाडा बदलला.
(ड) आजी म्हातारी झाली.
उत्तर:
आजीला जागाच उरली नाही; कारण गावगाडा बंदलला.

प्रश्न 2.
गाव पोरकं झालं; कारण ………………….
(अ) सखू आजी दुसऱ्या गावी गेली.
(ब) सखू आजी मरण पावली.
(क) सरपंच मरण पावले.
(ड) लेखक गावाबाहेर गेले.
उत्तर:

गाव पोरकं झालं; कारण सखू आजी मरण पावली.

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
आजीविना पोरका झालेला – [ ]
उत्तर:

गाव

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:

प्रश्न 4.
चूक की बरोबर ते लिहा.
1. आजी गाव सोडून गेल्याने गाव पोरकं झालं.
2. अडचण फक्त उदयाच्या मुलांची
उत्तर:
1. चूक
2. बरोबर

कृती 3 : व्याकरण कृती

खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.

प्रश्न 1.
1. आता फक्त आजिच्या दतंकथा
2. पन ते तिच्या नशीबात नव्हतं.
उत्तर:

1. आता फक्त आजीच्या दंतकथा
2. पण ते तिच्या नशिबात नव्हतं.

प्रश्न 2.
अचूक शब्द लिहा.
1. दतंकथा, दंतकथा, दतकंथा, दतकथा – [ ]
2. प्रत्येकाच्या, परतेकाच्या, परत्येकाच्या, प्रतेकाच्या – [ ]
उत्तर:

1. दंतकथा
2. प्रत्येकाच्या

प्रश्न 3.
समानार्थी शब्द लिहा.

  1. मृत्यू – [ ]
  2. स्मरण – [ ]
  3. नयन – [ ]
  4. जल – [ ]

उत्तर:

  1. मरण
  2. आठवण
  3. डोळे
  4. पाणी

प्रश्न 4.
अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.
सखू आजी शिकली सवरली असती, शहरात जन्मली असती, तर कुठल्या कुठं पोहोचली असती.
उत्तरः

सखू आजी शिकली सवरली असती, गावात जन्मली असती, तर कुठल्या कुठं पोहोचली असती.

प्रश्न 5.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर:
1. दंतकथा
2. पोरं

प्रश्न 6.
उताऱ्यातील दोन विशेषणे शोधून लिहा.
उत्तरः

1. प्रचंड
2. उदयाच्या
3. एक

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तरः

प्रश्न 8.
तक्ता पूर्ण करा.
उत्तरः

प्रश्न 9.
वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा.
काबीज करणे
उत्तर:
अर्थ : मिळवणे.
वाक्य : दोन प्रहर संपेपर्यंत मावळ्यांनी किल्ला काबीज केला.

प्रश्न 10.
काळ बदला.
पण ते तिच्या नशिबात नव्हतं. (वर्तमानकाळ करा)
उत्तरः
पण ते तिच्या नशिबात नाही.

कृती 4. स्वमत

प्रश्न 1.
बदलत्या गाववाड्यात आजीला जागाच उरली नाही’ या विधानाबद्दल तुमचे मत सविस्तर सांगा.
उत्तरः

आता गावांचे शहरीकरण होत चाललेले आहे. जुन्या मूल्यांच्या जागी नवीन मूल्ये प्रस्थापित होत आहेत. प्रेम, आपुलकी व जिव्हाळा यांचे महत्त्व कमी होत चाललेले आहे. उदारमतवादी दृष्टिकोन लयास जाऊन संकुचित वृत्ती वाढत चालली आहे. आज मुलांना आपल्या आई-बाबांनाच सांभाळणे कठीण झाले आहे, तेथे आजीला कोण व कसे सांभाळणार? असा प्रश्नच निर्माण झालेला आहे. आजच्या काळातील तरुण पिढी इतकी स्वार्थी झालेली आहे की त्यांना स्वत:शिवाय इतर कोणीच दिसत नाही. आजच्या मुलांना आजीजवळ बसून जुन्या गोष्टी ऐकाव्या वाटत नाहीत. कारण त्यांच्या हृदयात आजीबद्दल प्रेमच नाही. आजी म्हणजे घरातील एक अडगळ होय. ती एक अडचणच होय. तिचे दुखणे, सवरणे व तिची सेवा करायला आज कुणालाच आवडत नाही, म्हणून बदलत्या गाववाड्यात आजीला जागाच उरली नाही.

Summary in Marathi

लेखकाचा परिचय:

नाव: राजन गवस
कालावधी: 1959
प्रसिद्ध कथा, कादंबरीकार, कवी, समीक्षक, संशोधक. ‘भंडारभोग’, ‘धिंगाणा’, ‘कळप’, ‘तणकट’ इत्यादी कादंबऱ्या; ‘हुंदका’ काव्यसंग्रह; ‘काचकवड्या’ हा ललितगदयसंग्रह प्रसिद्ध आहे.

प्रस्तावना:

‘सखू आजी’ हा पाठ लेखक ‘राजन गवस’ यांनी लिहिला आहे. या पाठात सखू आजीच्या मनातील जुन्या-नव्या जीवनमूल्यांविषयीचे भान, तिची प्रगतिशील दृष्टी, निर्णयक्षमता, माणसांवरचे प्रेम अतिशय सहज व सोप्या भाषेत मांडले आहे.

Write – up ‘Sakhu Aaji’ is written by writer ‘Rajan Gavas’. Sakhu Aaji was the aaji of the whole village. The author writes in an easy and simple narrative about her love for the villagers, her bold progressive outlook, her decisiveness and her awareness of values in life.

शब्दार्थ:

  1. भान – जाणीव (awareness, consciousness)
  2. उपस्थित करणे – येथे अर्थ, व्यक्त करणे (to raise)
  3. जखम – घाव, इजा, दुखापत (a wound)
  4. निरभ्र – स्वच्छ (cloudless, fair)
  5. सुरकुत्या – त्वचेची चुणी (wrinkle)
  6. सरण – चिता (funeral pire)
  7. कपाळ – भाळ (forhead)
  8. अवर्णनीय – वर्णन करण्यास कठीण (indescribable)
  9. दीर्घकाळ – मोठ्या काळाचा अवधी (a long period)
  10. रेंगाळणे – घुटमळणे (to linger)
  11. तपश्चर्या – तपस्या (penance, devotion)
  12. खांदा – shoulder
  13. फाळ – नांगराच्या टोकाला लावण्याचे लोखंडी पाते (the blade of a plough)
  14. शहारा – रोमांच (goose bumps)
  15. कैक – पुष्कळ, कित्येक (many, several)
  16. सपान – स्वप्न (a dream)
  17. बापय – पुरुष
  18. इडं – विडा
  19. वावगं – वाईट
  20. प्रौढ – वयात आलेला (adult, matured)
  21. गोतावळा – नात्याची, आप्त संबंधी माणसे (kith and kin, relatives)
  22. हयात – जिवंत (living)
  23. काबीज – हस्तगत (captured)
  24. पोरकं – निराधार(parentless, orphan)
  25. दंतकथा – काल्पनिक गोष्ट (myth, legend)
  26. गावगाडा – गावाचे स्वरूप

टिपा:

1. गावबैठक – ग्रामस्थांनी एकत्र येऊन सार्वजनिक व वैयक्तिक
प्रश्न सोडवून कारभार करण्याची एक पद्धत.
2. सरपंच – ग्रामपंचायतीचा प्रमुख. गावपातळीवर गावाच्या
विकासासाठी कामे करणारा व निर्णय घेणारा व्यक्ती.
3. दंतकथा – अशा गोष्टी ज्या लिखित स्वरूपात नसून परंपरागत
पद्धतीने सांगितल्या व ऐकल्या जातात.

वाक्प्रचार:

  1. खोलवर जखम होणे – तीव्र दुःख होणे
  2. दातकुडी बसणे – दातखिळी बसणे
  3. अंगावर शहारे येणे – रोमांचित होणे
  4. काबीज करणे – मिळवणे
  5. पोरकं होणे- निराधार होणे