Chapter 9 औक्षण (कविता)

Day
Night

Chapter 9 औक्षण (कविता)

Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तर: लिहा.
(अ) कष्टाचे सामर्थ्य अपुरे केव्हा वाटते?
उत्तरः

जेव्हा मुठीमध्ये द्रव्य नसते तसेच जेव्हा शिरेमध्ये रक्त नसते, तेव्हा कष्टाचे सामर्थ्य अपुरे वाटते.

(आ) सैनिकाचे पाऊल जिद्दीचे का वाटते?
उत्तरः

धडाडत्या तोफांतून, धुरांच्या कल्लोळातून, घोंघावणाऱ्या बंबाऱ्याचा सामना करून सैनिक पुढे जातो म्हणून त्याचे पाऊल जिद्दीचे वाटते.

(इ) डोळे भरून पाहावे असे दृश्य कोणते?
उत्तरः

जवानाची विजयाची दौड हे डोळे भरून पहावे असे दृश्य आहे.

प्रश्न 2.
योग्य पर्याय निवडा.

(अ) सैनिकाचे औक्षण केले जाते ……………………………
(१) भरलेल्या डोळ्यांनी/भरलेल्या अंत:करणाने
(२) डोळ्यांतील आसवांच्या ज्योतींनी
(३) तबकातील निरांजनाने
(४) भाकरीच्या तुकड्याने
उत्तरः
सैनिकाचे औक्षण कसे केले जाते डोळ्यातील आसवांच्या ज्योतींनी.

(आ) कवितेतील ‘दीनदबळे’ म्हणजे ……………………………
(१) कष्टाचे, पैसे नसलेले.
(२) सैनिकाबरोबर लढणारे.
(३) शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेले.
(४) सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय.
उत्तर:
कवितेतील ‘दीन दुबळे’ म्हणजे सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय.

प्रश्न 3.
काव्यसौंदर्य.
(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा. ‘अशा असंख्य ज्योतींची तुझ्यामागून राखण; दीनदुबळ्यांचे असें तुला एकच औक्षण.’
उत्तरः

‘औक्षण’ या कवितेत दीनदुबळे याचा मार्मिक अर्थ कवयित्री इंदिरा संत यांनी सांगितला आहे. आम्हा भारतीयांचे आपल्या भारत देशावर अत्यंत प्रेम आहे. आमच्यापैकी काहीजण असेही आहेत की, ज्यांच्याकडे पैसा – अडका, संपत्ती कदाचित नसेलही, तसेच त्यांच्या शिरेमध्ये सळसळणारे रक्तही नसेल, पण तरीही सीमेवर लढाईसाठी जाणाऱ्या जवानांबद्दल त्यांच्या प्रत्येकाच्या मनात अभिमान आहे. लढाईसाठी जाणाऱ्या सैनिकांचे आपल्या डोळ्यांतील ज्योतींनी ते औक्षण करत आहेत. आम्ही सारे दीनदुबळे भारतीय लोक तुझे असे औक्षण करत आहोत. येथे दीनदुबळे म्हणजे कमजोर किंवा पैसे नसलेले गरीब असा अर्थ नसून ‘दीनदुबळे’ म्हणजे ज्यांच्यामध्ये सैनिकांसारखे सामर्थ्य नाही. रक्तामध्ये उमेद नाही पण ‘सैनिकांच्या कार्याचा अभिमान आहे, अशी जनता’ असा अर्थ कवयित्रीला अभिप्रेत आहे.

(आ) ‘सैनिक सीमेवर तैनात असतो, म्हणून आपण सुरक्षित राहतो’, या विधानातील भाव स्पष्ट करा.
उत्तरः

देशाच्या सीमेचे रक्षण करणारा सैनिक नेहमीच देशासाठी भूषणास्पद असतो. त्याच्या देशरक्षणाच्या कर्तव्यामुळे देशातील नागरिक सुखाची झोप घेऊ शकतात. अन्यथा परकीय आक्रमण, लढाई या संकटांमुळे आपली सुरक्षितता धोक्यात आली असती. ऊन, पाऊस, थंडी याला सामोरे जाऊन ‘देशरक्षण’ हेच त्यांचे ध्येय असते. जीवावर उदार होऊन ते सीमेवर न डगमगता उभे असतात. त्यांचे कुटुंब, मुले-बाळे यांना ते महिनोंमहिने भेटत नाहीत. देशरक्षणाच्या कर्तव्यासाठी आप्त स्वकीयांनाही त्यांना भेटता येत नाही. खाजगी आयुष्याचा, सुखांचा संपूर्ण त्याग करुन केवळ सीमेवर हे जवान देशरक्षणासाठी सज्ज असतात.

(इ) कवितेच्या संदर्भात ‘दीनदुबळे’ याचा कवयित्रीला अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तरः

‘औक्षण’ या कवितेत दीनदुबळे याचा मार्मिक अर्थ कवयित्री इंदिरा संत यांनी सांगितला आहे. आम्हा भारतीयांचे आपल्या भारत देशावर अत्यंत प्रेम आहे. आमच्यापैकी काहीजण असेही आहेत की, ज्यांच्याकडे पैसा – अडका, संपत्ती कदाचित नसेलही, तसेच त्यांच्या शिरेमध्ये सळसळणारे रक्तही नसेल, पण तरीही सीमेवर लढाईसाठी जाणाऱ्या जवानांबद्दल त्यांच्या प्रत्येकाच्या मनात अभिमान आहे. लढाईसाठी जाणाऱ्या सैनिकांचे आपल्या डोळ्यांतील ज्योतींनी ते औक्षण करत आहेत. आम्ही सारे दीनदुबळे भारतीय लोक तुझे असे औक्षण करत आहोत. येथे दीनदुबळे म्हणजे कमजोर किंवा पैसे नसलेले गरीब असा अर्थ नसून ‘दीनदुबळे’ म्हणजे ज्यांच्यामध्ये सैनिकांसारखे सामर्थ्य नाही. रक्तामध्ये उमेद नाही पण ‘सैनिकांच्या कार्याचा अभिमान आहे, अशी जनता’ असा अर्थ कवयित्रीला अभिप्रेत आहे.

(ई) ‘देशसेवा हीच ईश्वरसेवा’ असे समजून कार्य करणाऱ्या सैनिकांसाठी तुम्हाला काय करावेसे वाटते ते लिहा.
उत्तरः

देश हाच देव समजून सैनिक देशाची सेवा करीत असतात. त्यांचे हे काम अतुलनीय आहे. अनेक महिने ते आपले घरदार, कुटुंब सोडून सीमेवर लढत असतात. ऊन, थंडी, पावसाची तमा न बाळगता देशासाठी प्राण अर्पण करायला तयार होतात. अशा वेळेस आम्ही त्यांच्या या गुणांचे कौतुक भेटकार्ड देऊन करु शकतो. १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी त्यांना शुभेच्छा कार्ड पाठवू शकतो. रक्षाबंधनच्या दिवशी त्यांना राखी पाठवू शकतो. मकर संक्रांतीला सीमेवरच्या जवानांसाठी तीळगुळ पाठवून स्नेह प्रदर्शित करू शकतो. त्यांच्या शहरातील वा गावातील कुटुंबाकडे स्थळभेट देऊन त्यांच्या कुटुंबाची ख्याली खुशाली विचारु शकतो, त्यांच्याशी प्रेमाचे अतुट नाते जोडू शकतो.

प्रश्न १. खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 औक्षण 1

प्रश्न 2.
खालील प्रश्नांची उत्तर एका वाक्यात लिहा.

(i) कवयित्रीकडे कोणते सामर्थ्य नाही?
उत्तर:

कवयित्रीकडे कष्टाचे सामर्थ्य नाही.

(ii) कशापुढे जीवही लहान आहे?
उत्तर:

जवानाच्या शौर्यगाथेपुढे जीवही लहान आहे.

(iii) पुढे कशाचे कल्लोळ आहेत?
उत्तरः

पुढे धुराचे कल्लोळ आहेत.

(iv) धडाडत्या तोफांतून काय पुढे पडत आहे?
उत्तरः

धडाडत्या तोफांतून जिद्दीचे पाऊल पुढे पडत आहे.

(v) जवानांचे रक्षण कसे होणार आहे?
उत्तर:

जवानांचे रक्षण असंख्य ज्योतींनी होणार आहे.

प्रश्न 3.
‘दीनदुबळयांचे’ उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरः

जवानाला कोणाचे औक्षण’ आहे, असे कवयित्री सांगते?

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
समान अर्थाच्या काव्यपंक्ती शोधून लिहा.

(i) हातात द्रव्यसंपत्ती, रक्त वा बल नाही.
(ii) कष्टाचे सामर्थ्यही अंगी नाही, म्हणून काय करावे सुचत नाही.
उत्तर:

(i) नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त.
(ii) काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य.

प्रश्न 2.
कंसातील योग्य शब्द वापरुन रिकाम्या जागा भरा.
(i) नाही कष्टाचे ………………………. (मोल, सामर्थ्य, द्रव्य)
(ii) तुझ्या शौर्यगाथेपुढे, त्याची केवढीशी ………………………. (मान, किंमत, शान)
(iii) ………………………. किती हा लहान. (जीव, मुठ, शान)
(iv) नाही ………………………. द्रव्य. (हातात, मुठीमध्ये, पेटीत)
उत्तर:

(i) सामर्थ्य
(ii) शान
(iii) जीव
(iv) मुठीमध्ये

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 औक्षण 2
उत्तर:
(i – ड),
(ii – क),
(iii – अ),
(iv – ब)

प्रश्न 4.
सहसंबंध लिहा.
(6) घोंघावे : बंबारा : : धडाडत्या : ……………………….
(ii) मुठीमधे : द्रव्य : : शिरेमध्ये : ……………………….
(iii) ज्योत : आसवांची : : दौड : ……………………….
उत्तर:

(i) तोफा
(ii) रक्त
(iii) विजयाची

प्रश्न 5.
विशेषण विशेष्य जोड्या जुळवा.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 औक्षण 3
उत्तर:
(i- ब),
(ii – अ),
(iii – ड),
(iv – क)

कृती ३: कवितेतील शब्दांचा अर्थ

प्रश्न 1.
खालील कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा.
(i) द्रव्य
(ii) शिर
(iii) कष्ट
(iv) सामर्थ्य
उत्तर:

(i) पैसा, धन
(ii) नस
(iii) मेहनत
(iv) बळ, ताकद

कृती ४ : काव्यसौंदर्य

खालील काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.

प्रश्न 1.
जीव ओवाळावा तरी
जीव किती हा लहान;
तुझ्या शौर्यगाथेपुढे
त्याची केवढीशी शान;
उत्तरः

कवयित्रीला जवानाबद्दल नितांत आदर, प्रेम, जिव्हाळा आहे. त्याचे औक्षण करत असताना कवयित्री म्हणतात, या जवानांचे कार्य इतके मोठे आहे की, माझा जीव जरी ओवाळून टाकला तरी तो जवानांच्या शौर्यगाथेपुढे, त्यांच्या पराक्रमापुढे, त्यांच्या धैर्यापुढे, त्यांच्या कर्तव्यापुढे लहान आहे. तिचे आयुष्य त्याच्या शौर्यापुढे अगदी कवडीमोल (लहान) आहे. जवानाची शौर्यगाथा इतकी महान आहे की त्या शौर्यगाथेपुढे आपल्या सामान्य जीवाची काय शान असणार? असे कवयित्रीला वाटते.

प्रश्न 2.
वर घोंघावे बंबारा,
पुढे कल्लोळ धुराचे
धडाडत्या तोफांतून
तुझें पाऊल जिद्दीचे;
उत्तरः

सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला त्याच्या देशवासीयांकडून औक्षण केले जात आहे. याचे इंदिरा संत यांनी अत्यंत ह्रदयद्रावक वर्णन केले आहे.

युद्धभूमीत शस्त्रांचा, तोफांचा भडिमार आहे. अशा वेळेस जवानाच्या मागेपुढे,खाली-वर सर्वत्र बंदुकीच्या गोळ्या झाडल्या जात ओहत. तोफा डागल्या जात आहेत. त्याचे कर्कश आवाज आहेत. दारूगोळ्यांचा स्फोट व धुराचे कल्लोळ आकाशात दिसत आहेत. सर्वत्र भीतीचे, युद्धाचे, आक्रमकतेचे सावट आहे. डोक्यावर मृत्यूची तलवारच आहे. या परिस्थितीतही न डगमगता हा जवान धैर्याने पुढे जात आहे. देशासाठी लढण्याची त्याची जिद्द प्रशंसनीय आहे.

प्रश्न 3.
तुझी विजयाची दौड
डोळेभरून पहावी;
डोळ्यांतील आसवांची
ज्योत ज्योत पाजळावी.
उत्तरः

प्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांनी ‘औक्षण’ या कवितेत सीमेवर लढण्यासाठी सज्ज झालेल्या जवानास ‘औक्षण’ करण्याची वेगळीच पद्धत सुचवली आहे.

युद्धभूमीतील बंदूकांना, तोफांना धैर्याने सामोरा जाणारा जवान पराक्रमी व जिद्दीचे पाऊल टाकणारा आहे. प्राणपणाने लढून तो विजयी होणार यात शंका नाही. ती विजयाची दौड कवयित्रीला आपल्या डोळ्यांनी पहायची आहे. डोळ्यातील आसवांनी अनेक ज्योती लावाव्या व त्याचे औक्षण करावे असे कवयित्रिला वाटते.

प्रश्न २. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृतीसोडवा.

(१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री:
इंदिरा संत

(२) प्रस्तुत कवितेचा विषयः
सीमेवर लढायला जाण्यासाठी सज्ज झालेल्या जवानाचे औक्षण करताना मनात येणाऱ्या भावनांचे वर्णन केले आहे.

(३) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ:
नाही मुठीमध्ये द्रव्य
नाही शिरेमध्ये रक्त,
काय करावे कळेना
नाही कष्टाचे सामर्थ्य

कवयित्रिला खंत आहे की तिच्याकडे धनदौलत नाही. देशाला समर्पित करण्याचे बळ नाही. अंगात, शिरेत रक्त नाही. शारीरिक, आर्थिक सामर्थ्य नाही, पण हा जवान शारीरिक आणि मानसिक सामर्थ्यासह देशाच्या सेवेस जात आहे, याचा तिला सार्थ अभिमान आहे.

(४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेशः
देशाच्या सीमेचे रक्षण करणारे सैनिक नेहमीच देशासाठी भूषण असतात. जीवावर उदार होऊन ते सीमेवर न डगमगता उभे असतात. त्यांचे कुटुंब, मुले-बाळे यांना ते महिनोंमहिने भेटतही नाहीत. त्यांच्या देशरक्षणाच्या कर्तव्यामुळे देशातील नागरिक सुखाची झोप घेऊ शकतात. सण, उत्सव साजरे करू शकतात. अशा या सैनिकांच्या पाठिशी आपण भक्कपणे उभे राहिले पाहिजे. तसेच त्यांचा आदर, कौतुक करून त्यांच्या कार्याचा आपण नेहमीच अभिमान बाळगला पाहिजे, असा संदेश आपल्याला मिळतो.

(५) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणः
‘औक्षण’ ही ‘इंदिरा संत’ यांची कविता मला खूप आवडली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे कवयित्रीचे चित्रदर्शी वर्णन. त्यांच्या शब्दांमधून युद्धभूमीवरचे चित्र हुबेहूब डोळ्यांसमोर उभे राहते. युद्धभूमीवर शत्रूशी लढायला जाण्यासाठी सज्ज झालेल्या आपल्या जवानाचे औक्षण करताना कवयित्रीच्या मनात आलेल्या भावना या केवळ तिच्या भावना नाहीत तर त्या प्रत्येक भारतीयाच्या भावना आहेत. ‘डोळ्यातील आसवे’, ‘असंख्य ज्योती’ अशा प्रतिमा वापरून अपेक्षीत परिणाम त्यांनी साधला आहे.

(६) प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ:
(i) जीव – प्राण
(ii) विजय – जीत, यश
(iii) दौड – धाव
(iv) डोळे – नयन

स्वाध्याय कृती

काव्यसौंदर्य

(i) सैनिक सीमेवर तैनात असतो, म्हणून आपण सुरक्षित राहतो, या विधानातील भाव स्पष्ट करा.
उत्तरः

देशाच्या सीमेचे रक्षण करणारा सैनिक नेहमीच देशासाठी भूषणास्पद असतो. त्याच्या देशरक्षणाच्या कर्तव्यामुळे देशातील नागरिक सुखाची झोप घेऊ शकतात. अन्यथा परकीय आक्रमण, लढाई या संकटांमुळे आपली सुरक्षितता धोक्यात आली असती. ऊन, पाऊस, थंडी याला सामोरे जाऊन ‘देशरक्षण’ हेच त्यांचे ध्येय असते. जीवावर उदार होऊन ते सीमेवर न डगमगता उभे असतात. त्यांचे कुटुंब, मुले-बाळे यांना ते महिनोंमहिने भेटत नाहीत. देशरक्षणाच्या कर्तव्यासाठी आप्त स्वकीयांनाही त्यांना भेटता येत नाही. खाजगी आयुष्याचा, सुखांचा संपूर्ण त्याग करुन केवळ सीमेवर हे जवान देशरक्षणासाठी सज्ज असतात.

(ii) कवितेच्या संदर्भात ‘दीनदुबळे’ याचा कवयित्रीला अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तरः

‘औक्षण’ या कवितेत दीनदुबळे याचा मार्मिक अर्थ कवयित्री इंदिरा संत यांनी सांगितला आहे. आम्हा भारतीयांचे आपल्या भारत देशावर अत्यंत प्रेम आहे. आमच्यापैकी काहीजण असेही आहेत की, ज्यांच्याकडे पैसा – अडका, संपत्ती कदाचित नसेलही, तसेच त्यांच्या शिरेमध्ये सळसळणारे रक्तही नसेल, पण तरीही सीमेवर लढाईसाठी जाणाऱ्या जवानांबद्दल त्यांच्या प्रत्येकाच्या मनात अभिमान आहे. लढाईसाठी जाणाऱ्या सैनिकांचे आपल्या डोळ्यांतील ज्योतींनी ते औक्षण करत आहेत. आम्ही सारे दीनदुबळे भारतीय लोक तुझे असे औक्षण करत आहोत. येथे दीनदुबळे म्हणजे कमजोर किंवा पैसे नसलेले गरीब असा अर्थ नसून ‘दीनदुबळे’ म्हणजे ज्यांच्यामध्ये सैनिकांसारखे सामर्थ्य नाही. रक्तामध्ये उमेद नाही पण ‘सैनिकांच्या कार्याचा अभिमान आहे, अशी जनता’ असा अर्थ कवयित्रीला अभिप्रेत आहे.

(iii) देशसेवा हीच ईश्वरसेवा असे समजून कार्य करणाऱ्या सैनिकासाठी तुम्ही काय करू शकता ते लिहा.
उत्तरः

देश हाच देव समजून सैनिक देशाची सेवा करीत असतात. त्यांचे हे काम अतुलनीय आहे. अनेक महिने ते आपले घरदार, कुटुंब सोडून सीमेवर लढत असतात. ऊन, थंडी, पावसाची तमा न बाळगता देशासाठी प्राण अर्पण करायला तयार होतात. अशा वेळेस आम्ही त्यांच्या या गुणांचे कौतुक भेटकार्ड देऊन करु शकतो. १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी त्यांना शुभेच्छा कार्ड पाठवू शकतो. रक्षाबंधनच्या दिवशी त्यांना राखी पाठवू शकतो. मकर संक्रांतीला सीमेवरच्या जवानांसाठी तीळगुळ पाठवून स्नेह प्रदर्शित करू शकतो. त्यांच्या शहरातील वा गावातील कुटुंबाकडे स्थळभेट देऊन त्यांच्या कुटुंबाची ख्याली खुशाली विचारु शकतो, त्यांच्याशी प्रेमाचे अतुट नाते जोडू शकतो.

औक्षण Summary in Marathi

औक्षण काव्यपरिचय‌‌
‘औक्षण’‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌कवयित्री‌ ‌’इंदिरा‌ ‌संत’‌ ‌यांनी‌ ‌सीमेवर‌ ‌लढायला‌ ‌जाण्यासाठी‌ ‌सुसज्ज‌ ‌झालेल्या‌ ‌जवानाला‌ ‌औक्षण‌ ‌करताना‌ ‌मनात‌ ‌येणाऱ्या‌ ‌विविध‌ ‌भावनांचे‌ ‌वर्णन‌ ‌केले‌ ‌आहे.‌‌

औक्षण Summary in English

In‌ ‌this‌ ‌poem,‌ ‌the‌ ‌poetess‌ ‌wishes‌ ‌to‌ ‌bless‌ ‌a‌ ‌soldier‌ ‌who‌ ‌is‌ ‌ready‌ ‌for‌ ‌battle.‌ ‌In‌ ‌the‌ ‌act‌ ‌of‌ ‌blessing,‌ ‌she‌ ‌goes‌ ‌through‌ ‌a‌ ‌lot‌ ‌of‌ ‌emotions‌ ‌that‌ ‌are‌ ‌beautifully‌ ‌captured‌ ‌in‌ ‌this‌ ‌poem‌ ‌by‌ ‌Indira‌ ‌Sant.‌‌

औक्षण भावार्थ‌‌

नाही‌ ‌मुठीमध्ये‌ ‌द्रव्य‌‌
नाही‌ ‌शिरेमध्ये‌ ‌रक्त,‌
‌काय‌ ‌करावे‌ ‌कळेना‌‌
नाही‌ ‌कष्टाचे‌ ‌सामर्थ्य

‌देशाच्या‌ ‌रक्षणासाठी‌ ‌सीमेवर‌ ‌अहोरात्र‌ ‌आपले‌ ‌जवान‌ ‌शत्रूशी‌ ‌दोन‌ ‌हात‌ ‌करत‌ ‌असतात.‌ ‌आपल्या‌ ‌भारतमातेचे‌ ‌रक्षण‌ ‌करतात.‌ ‌त्यामुळेच‌ ‌आपण‌ ‌सर्व‌ ‌आनंदाने,‌ ‌सुखाने‌ ‌जगत‌ ‌असतो.‌ ‌सण,‌ ‌उत्सव‌ ‌साजरे‌ ‌करत‌ ‌असतो,‌ ‌आपणांस‌ ‌त्यांचा‌ ‌नेहमीच‌ ‌अभिमान‌ ‌वाटत‌ ‌असतो.‌ ‌त्याचप्रमाणे‌ ‌कवयित्री‌ ‌इंदिरा‌ ‌संत‌ ‌या‌ ‌सुद्धा‌ ‌जवानांवर‌ ‌खूप‌ ‌प्रेम‌ ‌करतात.‌ ‌जवानांप्रती‌ ‌त्यांच्या‌ ‌मनात‌ ‌जिव्हाळा,‌ ‌प्रेम,‌ ‌आदर‌ ‌आहे.‌ ‌घरातून‌ ‌सीमेवर‌ ‌लढण्यासाठी‌ ‌जायला‌ ‌निघालेल्या‌ ‌जवानाला‌ ‌त्या‌ ‌ओवाळत‌ ‌आहेत.‌ ‌त्याला‌ ‌ओवाळणी‌ ‌करत‌ ‌असताना‌ ‌कवयित्रिच्या‌ ‌मनात‌ ‌विविध‌ ‌भावना‌ ‌निर्माण‌ ‌होतात.‌ ‌त्या‌ ‌म्हणतात,‌ ‌मी‌ ‌ओवाळणी‌ ‌करत‌ ‌आहे;‌ ‌पण‌ ‌माझ्याकडे‌ ‌संपत्ती,‌ ‌पैसे‌ ‌नाहीत,‌ ‌मी‌ ‌श्रीमंत‌ ‌नाही.माझ्या‌ ‌शरीरात‌ ‌लढण्यासाठी‌ ‌शिरेमध्ये‌ ‌सळसळणारे‌ ‌रक्तही‌ ‌नाही.‌ ‌त्यामुळे‌ ‌ओवाळणी‌ ‌कशाप्रकारे‌ ‌करावी‌ ‌हे‌ ‌कवयित्रीला‌ ‌कळेनासे‌ ‌झाले‌ ‌आहे.‌

‌जीव‌ ‌ओवाळावा‌ ‌तरी‌‌
जीव‌ ‌किती‌ ‌हा‌ ‌लहान‌ ‌
तुझ्या‌ ‌शौर्यगाथेपुढे‌
त्याची‌ ‌केवढीशी‌ ‌शान;‌‌

कवयित्रीला‌ ‌जवानाबद्दल‌ ‌नितांत‌ ‌आदर,‌ ‌प्रेम,‌ ‌जिव्हाळा‌ ‌आहे.‌ ‌त्याचे‌ ‌औक्षण‌ ‌करत‌ ‌असताना‌ ‌कवयित्री‌ ‌म्हणतात,‌ ‌या‌ ‌जवानांचे‌ ‌कार्य‌ ‌इतके‌ ‌मोठे‌ ‌आहे‌ ‌की,‌ ‌माझा‌ ‌जीव‌ ‌जरी‌ ‌ओवाळून‌ ‌टाकला‌ ‌तरी‌ ‌तो‌ ‌जवानांच्या‌ ‌शौर्यगाथेपुढे,‌ ‌त्यांच्या‌ ‌पराक्रमापुढे‌ ‌त्यांच्या‌ ‌धैर्यापुढे,‌ ‌त्यांच्या‌ ‌कर्तृत्वापुढे‌ ‌लहान‌ ‌आहे.‌ ‌तिचे‌ ‌आयुष्य‌ ‌त्याच्या‌ ‌शौर्यापुढे‌ ‌अगदी‌ ‌कवडीमोल‌ ‌(लहान)‌ ‌आहे.‌ ‌त्या‌ ‌जवानाची‌ ‌शौर्यगाथा‌ ‌इतकी‌ ‌महान‌ ‌आहे‌ ‌की‌ ‌त्या‌ ‌शौर्यगाथेपुढे‌ ‌आपल्या‌ ‌सामान्य‌ ‌जीवाची‌ ‌काय‌ ‌शान‌ ‌असणार?‌ ‌असे‌ ‌कवयित्रीला‌ ‌वाटते.‌‌

वर‌ ‌घोंघावे‌ ‌बंबारा,‌‌
पुढे‌ ‌कल्लोळ‌ ‌धुराचे,‌ ‌
धडाडत्या‌ ‌तोफांतून‌‌
तुझें‌ ‌पाऊल‌ ‌जिद्दीचें;‌ ‌

सैनिक‌ ‌सीमेवर‌ ‌शत्रूशी‌ ‌लढत‌ ‌असतात,‌ ‌त्यावेळची‌ ‌परिस्थिती‌ ‌अतिशय‌ ‌हृदयद्रावक,‌ ‌हृदयाला‌ ‌हेलावून‌ ‌टाकणारी‌ ‌असते.‌ ‌युद्धभूमीवर‌ ‌शत्रू‌ ‌आक्रमण‌ ‌करत‌ ‌असतो.‌ ‌त्याचा‌ ‌परतवार‌ ‌करत‌ ‌असताना‌ ‌अनेक‌ ‌सैनिक‌ ‌घायाळ‌ ‌होतात.‌ ‌तोफांचा‌ ‌आवाज‌ ‌होत‌ ‌असतो,‌ ‌बंदुकीतून‌ ‌सुटणाऱ्या‌ ‌असंख्य‌ ‌गोळया‌ ‌अनेकांची‌ ‌छाताडे‌ ‌उडवत‌ ‌असतात.‌ ‌धुराचा‌ ‌लोळ‌ ‌उठत‌ ‌असतो.‌ ‌कवयित्री‌ ‌म्हणतात;‌ ‌हे‌ ‌सारे‌ ‌चालू‌ ‌असताना‌ ‌आपला‌ ‌हा‌ ‌जवान‌ ‌मागे‌ ‌हटत‌ ‌नाही‌ ‌तर‌ ‌दोन‌ ‌पावले‌ ‌नेहमी‌ ‌पुढेच‌ ‌टाकत‌ ‌असतो.‌ ‌न‌ ‌घाबरता,‌ ‌डगमगता,‌ ‌शत्रूशी‌ ‌दोन‌ ‌हात‌ ‌करून‌ ‌जिद्दीने‌ ‌लढत‌ ‌असतो.‌‌

तुझी‌ ‌विजयाची‌ ‌दौड‌
डोळे‌ ‌भरून‌ ‌पहावी;‌
‌डोळ्यांतील‌ ‌आसवांची‌‌
ज्योत‌ ‌ज्योत‌ ‌पाजळावी‌ ‌

सीमेवर‌ ‌चालू‌ ‌असलेल्या‌ ‌रणसंग्रामामध्ये‌ ‌आपल्या‌ ‌जवानाचा‌ ‌विजय‌ ‌निश्चित‌ ‌आहे.‌ ‌कवयित्री‌ ‌म्हणतात,‌ ‌या‌ ‌जवानांचा‌ ‌पराक्रम‌ ‌मला‌ ‌डोळे‌ ‌भरून‌ ‌पाहायचा‌ ‌आहे.‌ ‌तसेच‌ ‌आपल्या‌ ‌जवानाकडून‌ ‌भारतीयांची‌ ‌असलेली‌ ‌अपेक्षा‌ ‌व्यक्त‌ ‌करताना‌ ‌त्या‌ ‌म्हणतात,‌ ‌शत्रूला‌ ‌पराजित‌ ‌करून‌ ‌प्रत्येक‌ ‌युद्धात‌ ‌तुझाच‌ ‌विजय‌ ‌झाला‌ ‌पाहिजे.‌ ‌तुझ्या‌ ‌विजयाची‌ ‌दौड‌ ‌अशीच‌ ‌राहिली‌ ‌पाहिजे.‌ ‌तुझ्या‌ ‌विजयाने‌ ‌माझ्या‌ ‌डोळयांमध्ये‌ ‌आनंदाश्रू‌ ‌दाटून‌ ‌येतील.‌ ‌ज्याप्रमाणे‌ ‌दिव्याची‌ ‌ज्योत‌ ‌नेहमी‌ ‌तेवत‌ ‌असते‌ ‌तशीच‌ ‌माझ्या‌ ‌डोळ्यांतील‌ ‌अणूंची‌ ‌ज्योत‌ ‌नेहमीच‌ ‌पाजळत‌ ‌राहिली‌ ‌पाहिजे.‌ ‌

अशा‌ ‌असंख्य‌ ‌ज्योतींची‌‌
तुझ्यामागून‌ ‌राखण;‌
‌दीनदुबळ्यांचे‌ ‌असें‌‌
तुला‌ ‌एकच‌ ‌औक्षण.

कवयित्री‌ ‌सीमेवर‌ ‌लढण्यासाठी‌ ‌जाणाऱ्या‌ ‌जवानाला‌ ‌म्हणतात‌ ‌की,‌ ‌सर्व‌ ‌जनमानसांच्या‌ ‌असंख्य‌ ‌ज्योती‌ ‌तुझ्या‌ ‌रक्षणासाठी‌ ‌सदैव‌ ‌तुझ्याच‌ ‌पाठीशी‌ ‌आहेत.‌ ‌म्हणजेच‌ ‌असंख्य‌ ‌लोकांचा‌ ‌आशीर्वाद‌ ‌तुझ्या‌ ‌पाठीशी‌ ‌आहे.‌ ‌आम्ही‌ ‌सर्वजण‌ ‌दीनदुबळे‌ ‌आहोत.‌ ‌आमच्यामध्ये‌ ‌तुझ्यासारखे‌ ‌सामर्थ्य‌ ‌नाही.‌ ‌रक्तामध्ये‌ ‌ती‌ ‌उमेद‌ ‌नाही.‌ ‌तुझ्याकडे‌ ‌हे‌ ‌सर्व‌ ‌आहे.‌ ‌तुझ्यामध्ये‌ ‌आणखी‌ ‌उर्जा‌ ‌निर्माण‌ ‌होण्यासाठी‌ ‌आशीर्वाद‌ ‌स्वरूपात‌ ‌तुझे‌ ‌औक्षण‌ ‌आम्ही‌ ‌सर्व‌ ‌भारतीय‌ ‌करत‌ ‌आहोत.‌‌

औक्षण शब्दार्द्ध

 • मुठ‌ ‌–‌ ‌हाताची‌ ‌बोटे‌ ‌मिटून‌‌ होणारी‌ ‌हाताच्या‌ ‌पंजाची‌ ‌रचना‌‌ – (fist)
 • द्रव्य –‌ ‌पैसा,‌ ‌धन‌ ‌–‌ ‌(money,‌ ‌wealth)‌
 • शिर‌ ‌–‌ ‌नस‌ ‌‌–‌ ‌(vein)‌
 • रक्त‌ ‌– रुधिर‌ ‌‌–‌ ‌(blood)‌ ‌
 • कष्ट‌ ‌–‌ ‌परिश्रम‌ ‌–‌ ‌(hard‌ ‌work)‌ ‌
 • सामर्थ्य‌ ‌–‌ ‌क्षमता,‌ ‌कुवत‌ ‌–‌ ‌(capacity)‌ ‌
 • जीव‌ ‌–‌ ‌प्राण‌ ‌–‌ ‌(life,‌ ‌virility)‌ ‌
 • ओवाळणे‌ ‌–‌ ‌औक्षण,‌‌ आरती‌ ‌करणे‌‌ –‌ ‌(to‌ ‌move‌ ‌a‌ ‌lamp‌ ‌in‌ ‌a‌‌ circular‌ ‌motion‌ ‌before god‌ ‌or‌ ‌man)‌
 • शौर्यगाथा‌ ‌–‌ ‌पराक्रम‌‌ –‌ ‌(valour,‌ ‌heroism)‌ ‌
 • शान‌ ‌–‌ ‌थाट‌‌ –‌ ‌(great‌ ‌pomp)‌ ‌
 • बंबारा‌ ‌–‌ ‌गोळीबार‌ ‌–‌ ‌(firing)‌ ‌
 • धुराचा‌ ‌–‌ ‌धुराचा‌ ‌लोळ‌ ‌कल्लोळ‌ ‌–‌ ‌(rolling‌ ‌smoke‌ ‌of‌ ‌fire)‌ ‌
 • घोंघावणे‌ ‌–‌ ‌मोठा‌ ‌आवाज‌‌ –‌ ‌(to‌ ‌roar,‌ ‌to‌ ‌growl)‌ ‌
 • धडाडते‌ ‌–‌ ‌गडगडाट‌ ‌–‌ ‌(thunderous‌ ‌sound)‌ ‌
 • तोफ‌ ‌–‌ ‌तोफ,‌ ‌बंदुक‌‌ –‌ ‌(cannon)‌ ‌
 • जिद्द‌ ‌–‌ ‌निश्चय‌‌ –‌ ‌(determination)‌ ‌
 • विजय‌ ‌–‌ ‌जय‌‌ –‌ ‌(victory,‌ ‌triumph)‌ ‌
 • दौड‌ ‌–‌ ‌धाव‌‌ –‌ ‌(to‌ ‌run)‌ ‌
 • आसवे‌ ‌–‌ ‌अश्रू‌‌ –‌ ‌(tears)‌ ‌
 • ज्योत‌ ‌–‌ ‌दिव्याची‌ ‌ज्वाला‌ ‌–‌ ‌(flame,‌ ‌light)‌ ‌
 • पाजळणे‌ ‌–‌ ‌प्रकटवणे‌‌ –‌ ‌(to‌ ‌kindle)‌ ‌
 • असंख्य‌ ‌–‌ ‌अगणित‌‌ –‌ ‌(innumerable)‌ ‌
 • राखण‌ ‌–‌ ‌रक्षण‌‌ –‌ ‌(toguard)‌ ‌
 • दीनदुबळे‌ ‌–‌ ‌कमकुवत‌ ‌–‌ ‌(weak)