Chapter 9.2 आम्ही बातमी वाचतो

Day
Night

Chapter 9.2 आम्ही बातमी वाचतो

Textbook Questions and Answers

1. वरील बातमीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
कोणाचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो?
उत्तरः
ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो.

प्रश्न 2.
वरील बातमी कोणत्या तारखेची आहे?
उत्तरः
वरील बातमी 15 ऑक्टोबरची असून 16 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली आहे.

प्रश्न 3.
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने कोणकोणत्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले?
उत्तरः
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने ग्रंथदिंडी, पथनाट्ये, वाचन स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

प्रश्न 4.
कोणत्या विदयार्थ्यास ‘उत्कृष्ट वाधक’ म्हणून बक्षीस देण्यात आले.
उत्तर:
इयत्ता सातवीतील शेखर काजळे या विदयार्थ्यास ‘उत्कृष्ट वाचक’ म्हणून बक्षीस देण्यात आले.

प्रश्न 5.
विदयार्थ्यांमध्ये वाचनकौशल्य वाडावे, यासाठी कोणकोणते उपक्रम आयोजित करता येतील, याची बादी करा.
उत्तर:

  1. वाचन स्पर्धा
  2. कमी दरा त पुस्तक विक्री
  3. वाचनालयात सवलत
  4. लेखक, कवी यांची व्याख्याने.

आपण समजून घेऊया.

प्रश्न 1.
खालील वाक्ये वाचा.
(अ) असे स्थळ-जे निसर्गरम्य आहे.
(आ) आभाळ भरून आले, पण –
वरील वाक्यांमध्ये ‘_’ हे चिन्ह आले आहे. वाक्यांमध्ये ‘_’ हे चिन्ह दोन कारणांनी वापरतात.
1. स्पष्टीकरण द्यायचे असल्यास.
2. बोलताबोलता विचारमालिका तुटल्यास.
‘-‘ या चिन्हास अपसरणचिन्ह म्हणतात.
लक्षात ठेवा: अपसरणचिन्हाची लांबी संयोगचिन्हापेक्षा जास्त असते.

शिक्षकांसाठी:

विदयार्थ्यांना विविध प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे श्रवण/वाचन करण्यास सांगावे. विदयार्थ्यांना एखादा विषय देऊन संबंधित बातम्यांचे संकलन करण्यास सांगावे. उदा., क्रीडा.

Summary in Marathi

वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा …

आदर्शनगर, ता. 16 : दि. 15 ऑक्टोबर रोजी साधना विद्यालय, आदर्शनगर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयात अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. आदर्शनगर परिसरातील महत्त्वाच्या चौकांत ‘वाचनसंस्कृती वाचवा’ या विषयावर मुलांनी पथनाट्ये सादर केली. त्याचबरोबर विदयालयात ‘उत्कृष्ट वाचन’ ही स्पर्धा घेण्यात आली. यात मुलांनी त्यांच्या आवडत्या कथा, कवितांचे वाचन केले. या स्पर्धेत इयत्ता सातवीतील शेखर काजळे या विदयार्थ्यास ‘उत्कृष्ट वाचक’ म्हणून बक्षीस देण्यात आले. पुढील काळामध्ये वाचनसंस्कृती विकसित व्हावी, या दृष्टीने विदयालयात विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे मुख्याध्यापकांनी या प्रसंगी घोषित केले. विदयालयातील सर्व विदयार्थ्यांनी अतिशय उत्साहाने वाचन प्रेरणा दिन साजरा केला.

शब्दार्थ:

  1. निंदा – ठपका, वाईट प्रसिद्धि (reprimand)
  2. पथनाट्य – रस्त्यावर सादर होणारे नाट्य (streetplay)