Chapter 8.1 जाता अस्ताला (स्थूलवाचन)

Day
Night

Chapter 8.1 जाता अस्ताला (स्थूलवाचन)

प्रश्न 1.
तुम्हांला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.
उत्तरः

सूर्य उदयाला येतो त्याबरोबर संपूर्ण धरा तेजोमय होते. चैतन्याने भरून जाते, संपूर्ण चराचराचे जीवनचक्र फिरू लागते. म्हणून अस्ताला जातांना सूर्याच्या मनात विचार येतो, मी अस्ताला गेल्यानंतर ही संपूर्ण धरा/पृथ्वी अंधारात बुडून जाईल. माझ्या प्रकाशाचा एक साधा कवडसाही उरणार नाही. मग या पृथ्वीवरील जीवांचं काय होईल? हा मिट्ट अंधार विश्वाच्या चैतन्याला संपवून तर टाकणार नाही ना? या विश्वाच्या चराचरात/अणुरेणूत सामावलेले जीवन, चैतन्य हा अंधार गिळून तर टाकणार नाही ना? एक अनामिक भीती त्याला छळू लागते. पृथ्वीला अंधारापासून कोणीतरी वाचवलं पाहिजे. विश्वाचे कोणीतरी भले करावे. मी अस्ताला गेल्यानंतर कोणीतरी माझे कार्य करावे या सुंदर विश्वाला प्रकाशमान करावे असे त्याला वाटते.

कवितेतली आशयावरून सूर्य हा जणू पृथ्वीचा जनक आहे, असे वाटते. एखादया पित्याला आपल्या कन्येच्या भल्याची, तिच्या चांगल्या जीवनाबद्दल चिंता असते तसाच सूर्य देखील धरेची काळजी घेणारा तिला जपणारा पिता आहे असे प्रतीत होते.

प्रश्न 2.
पणतीच्या उदाहरणातून कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा.
उत्तरः

पणती म्हणजे अदम्य विश्वासाचे आणि साहसाचे प्रतिक आहे. वास्तविक पाहता सूर्य म्हणजे प्रकाशाचा लखलखता स्रोत, अनंत पसरलेल्या विश्वाला उजळून टाकण्याचे सामर्थ्य असलेला; म्हणून त्याच्या विनवणीला उत्तर देण्याचे धाडस कोणी करत नाही; पण साधी मातीची पणती पुढे येते आणि नम्रपणाने म्हणते, “हे स्वामी, तेजोमय भास्करा, तुझ्याएवढा धगधगता प्रकाश माझ्याकडे नाही, पण जमेल तसा या पृथ्वीवरील अंधार दूर करण्याचा मी प्रयत्न करीन.” आपल्याकडे जे काही चांगलं आहे. ते आपण दुसऱ्याला देऊ शकतो.

इतरांची मदत करू शकतो असा विचार करून प्रत्येकाने आपल्या जीवनात काहीतरी सकारात्मक कार्य करावे. पणतीच्या उदाहरणातून हाच विचार कवी रविंद्रनाथांनी व्यक्त केलेला आहे. पणतीच्या प्रकाशाने सगळा अंधार जरी दूर होणार नसला तरी दहा पावलांची वाट ती नक्कीच उजळू शकते, हा विश्वास पणतीच्या ठिकाणी दिसतो. म्हणजेच प्रत्येकाने आपली समता जाणून चांगले कार्य करावे. जे नाही त्याचा विचार न करता जे आपल्याजवळ आहे मग ते थोडं, थोडच का असेना त्याचाच उपयोग करून आपल्या जीवनात जास्तीत जास्त चांगले कार्य करण्याची प्रेरणा कवीने पणतीच्या प्रतिकातून व्यक्त केली आहे.

प्रश्न 3.
सूर्यास्ताच्या दर्शनाने मनात निर्माण होणाऱ्या भावभावना शब्दबद्ध करा,
उत्तर:

वेगवेगळ्या ठिकाणचा सूर्यास्त वेगवेगळे सौंदर्य, वेगळे भाव, वेगळे रंग निर्माण करत असतो. माणसाची मनोदशा जशी असेल तसे भावतरंग सूर्यास्ताच्या वेळी त्याच्या मनात निर्माण होत असतात.

वाळवंटाच्या ठिकाणचा सूर्यास्त. वाळूच्या विस्तीर्ण पसरलेल्या अथांग भूप्रदेशावर सोनेरी मऊसार किरणे पसरवत असतो. मन अगदी तृप्त करून तो अस्ताला जातो. तेथील वाळूचा सागर हळूहळू थंड होत जातो. शितल वाऱ्याच्या झुळका वाहू लागतात. मानव, पशू, पक्षी सुखावून जातात. वाळूचा थंड स्पर्श, वाऱ्याची थंड झुळूक यामुळे मानवी मन सुखावून जाते. त्या सुवर्णमयी वातावरणात नव्या संकल्पना, जुन्या संवेदना जाग्या होतात. कवी, लेखक, चित्रकार यांना नवीन कल्पना सुचतात.

समुद्राच्या ठिकाणी अस्ताला जाणाऱ्या सूर्यास्ताचे दर्शन मोठे विलोभनीय असते. हळू हळू सागराच्या कुशीत सामावणाऱ्या सूर्याला बघून वाटते की, हा सागरात मिसळून जातो. म्हणूनच चमकदार मोती निर्माण होतात. सुंदर रंगीत प्रवाळ आणि अनंत असे जीव निर्माण होतात. समुद्राच्या लाटांसोबत हेलकावे खात हा तेजोगोल जेव्हा सागरात सामावतो तेव्हा आपोआप त्या सृष्टीका पुढे आपण नतमस्तक होतो.

प्रश्न 4.
कवितेतील सूर्य आणि पणती या प्रतीकांचा तुम्हाला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.
उत्तर:

सूर्य म्हणजे पृथ्वीचा कर्ता तिच्यावरच जीवनचक्र चालवणारा, फुलवणारा, चराचराचा निर्माता, प्रचंड शक्तीचे प्रतिक. आपण निर्मिलेल्या या पृथ्वीवरच्या जीवनाचे आपल्या अनुपस्थितीत कोणीतरी रक्षण करावे यासाठी मनापासून, कळवळून साद घालणारा तो व्याकूळ जनक किंवा निर्माता आहे असे वाटते. एखादयाच्या भल्यासाठी, कल्याणासाठी जर विनवणी करायची असेल तर आपण कितीही शक्तीशाली व ताकदवान असू तरी आपल्याला विनम्रता धारण करावी लागते. सामर्थ्याचा अहंकार बाजूला ठेवून दयाभाव व करूणा हृदयात निर्माण करावी लागते.

सहृदयता ठेवून काही काम करू लागल्यावर काहीतरी चांगले, श्रेयस आपल्या हाती नक्कीच लागते हे सूर्याच्या प्रतिकातून दिसून येते. त्या उलट, पणती म्हणजे सूर्यासमोर प्रकाशाचा एक छोटाशा कवडसा. पण सूर्याच्या विनवणीला उत्तर देण्याचे धाडस ती करते. तिच्यातला आत्मविश्वास तिला बोलण्याची हिम्मत देतो. जर इच्छा प्रबळ असली आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कामाला सुरुवात केली तर काहीही अशक्य नाही हे पणतीच्या प्रतिकातून जाणवते. त्याचबरोबर अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची. जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सुद्धा पणतीच्या प्रतिकातून जाणवते.

सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.

उत्तरः
सूर्य : पणती, तू खरचं खूप चांगली आहेस. तुझ्याजवळ माझ्याइतका झगझगीत प्रकाश नाही. तरी पण माझ्या अनुपस्थितीत पृथ्वीला प्रकाश देण्याचं काम स्विकारलयं याबद्दल खरचं तुझं खूप कौतुक वाटतं मला! 

पणती : हे भास्करा, या पृथ्वीवरील जीवांसाठी, सृष्टीसाठी तू सतत कार्यरत असतोस. तू नसतास तर ही सृष्टी, तिचे अस्तित्व राहिलेच नसते. धरेसाठीची तुझी व्याकूळता मला समजू शकते म्हणूनच माझ्याजवळ जेवढा प्रकाश आहे त्याने मला जे काही करणे शक्य होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करीन.

सूर्य : तू इतकी छोटी असूनही इतका मोठा विचार करतेस खरेच तुझे खूप आभार. पृथ्वीवरचा सगळ्यात प्रगत जीव म्हणजे मानव हा मात्र पृथ्वीच्या अस्तित्वाचा, पर्यावरणाचा अजिबात विचार करत नाही. विकासाच्या नावाखाली त्याने माझ्या सुंदर धरेचा नाश करायला सुरुवात केली आहे. तिला विदृप केले आहे. म्हणून मला खूप कळजी वाटते.

पणती : तुझी काळजी अगदीच योग्य आहे सूर्यदेवा. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ अशाप्रकारे मानव वागतो आहे. आपल्या स्वार्थासाठी निसर्गाला तो अक्षरश: ओरबाडतो आहे.

सूर्य : हो ना! याच गोष्टीचा मला खूप त्रास होतो. रोज सकाळी जेव्हा पृथ्वीला उजळून टाकण्यासाठी मी येतो आणि तो पक्ष्यांचा किलबिलाट, खळाळून वाहणारे झरे, दया; डोंगर, शेते, वाळवंट, दलदली, वृक्ष, वन हे सारं जेव्हा मी बघतो, त्यावेळी मन हेलावतं हे सगळं खरंच एक दिवस नष्ट पावणार का?

पणती : हे रविराजा, इतकं चिंतीत होण्याची गरज नाही कारण आता मानवालाही या गोष्टीची जाणीव झाली आहे. तू निर्माण केलेलं हे पृथ्वीरत्न तो सांभाळण्यासाठी आता धडपडतो आहे. 

सूर्य : खरचं किती आशावादी आहेस तू. मानव वेळीच जागरूक झाला आहे, हे ऐकून मला खूप बरं वाटलं. अशा आशावादी विचारांची, सहृदय माणसे जर एकत्र आली तर तो दिवस नक्कीच दूर नाही. ज्या दिवशी ही वसुंधरा पूर्वीसारखी सुजलाम् सुफलाम् व रमणीय होईल.

पणती : नक्कीच होईल, कारण आता बरीच माणसे आपापल्या परीने पर्यावरणाबद्दल काम करीत आहेत. पर्यावरणाची चळवळ सर्वत्र जोर धरत आहे. सकारात्मक विचारांची माणसे एकत्र येऊन काम करत आहेत.

सूर्य : अरे व्वा! असं होत असेल तर फारच उत्तम. जे सुंदर आहे ते सुंदरच कसे राहील यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. शिवाय प्रत्येकाने ‘जगा आणि जगू क्या’, हा निसर्गाचा नियम पाळला, तर ज्याच्या त्याच्या क्रमाने जीवनक्रम सुरू राहील आणि मग ही सृष्टी निर्मळतेने भरून जाईल.

Summary in Marathi

पाठपरिचय‌‌

‘जाता‌ ‌अस्ताला’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌’गुरूदेव‌ ‌रविंद्रनाथ‌ ‌टागोर’‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌मुळात‌ ‌बंगाली‌ ‌कवितेचे‌ ‌मराठीत‌ ‌स्वैर‌ ‌रूपांतर‌ ‌श्यामला‌ ‌कुलकर्णी‌ ‌यांनी‌ ‌केले‌ ‌आहे‌ ‌.‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌टागोर‌ ‌यांनी‌ ‌सूर्य‌ ‌आणि‌ ‌पणतीच्या‌ ‌प्रतीकांद्वारे‌ ‌अगदी‌ ‌छोट्या‌ ‌जीवातही‌ ‌जगाला‌ ‌काहीतरी‌ ‌देण्याची,‌ ‌जग‌ ‌सुंदर‌ ‌करण्याची‌ ‌क्षमता‌ ‌असते‌ ‌हे‌ ‌सांगितले‌ ‌आहे.‌‌

जाता अस्ताला Summary in English

This‌ ‌is‌ ‌a‌ ‌translation‌ ‌of‌ ‌a‌ ‌poem‌ ‌(originally‌ ‌written‌ ‌by‌ ‌Rabindranath‌ ‌Tagore‌ ‌in‌ ‌Bengali)‌ ‌by‌ ‌Shyamala‌ ‌Kulkarni.‌ ‌The‌ ‌poem‌ ‌is‌ ‌a‌ ‌comparison‌ ‌between‌ ‌the‌ ‌sun‌ ‌and‌ ‌a‌ ‌small‌ ‌lamp‌ ‌both‌ ‌of‌ ‌which‌ ‌give‌ ‌light‌ ‌to‌ ‌the‌ ‌world.‌ ‌In‌ ‌this‌ ‌own‌ ‌way,‌ ‌the‌ ‌lamp‌ ‌is‌ ‌small‌ ‌yet‌ ‌spreads‌ ‌light‌ ‌to‌ ‌the‌ ‌world.‌ ‌Its‌ ‌is‌ ‌beautifully‌ ‌shown‌ ‌how‌ ‌small‌ ‌creatures‌ ‌or‌ ‌things‌ ‌have‌ ‌the‌ ‌capacity‌ ‌to‌ ‌make‌ ‌a‌ ‌world‌ ‌beautiful.‌‌

जाता अस्ताला भावार्थ‌ ‌

जाता‌ ‌अस्ताला‌ ‌सूर्याचे‌ ‌
डोळे‌ ‌पाणावले‌ ‌
जाईन‌ ‌मी‌ ‌जर‌ ‌या‌ ‌विश्वाचे‌ ‌
होईल‌ ‌कैसे‌ ‌भले‌ ‌

‌सूर्य‌ ‌आपल्या‌ ‌प्रखर‌ ‌उष्णतेने‌ ‌संपूर्ण‌ ‌पृथ्वी‌ ‌प्रकाशित‌ ‌करून‌ ‌टाकतो.‌ ‌सूर्योदयापासून‌ ‌ते‌ ‌सूर्यास्तापर्यंत‌ ‌न‌ ‌थकता‌ ‌न‌ ‌दमता‌ ‌तो‌ ‌आपले‌ ‌कार्य‌ ‌करत‌ ‌असतो.‌ ‌म्हणजेच‌ ‌संपूर्ण‌ ‌पृथ्वीला‌ ‌प्रकाशमय‌ ‌करण्याची‌ ‌जबाबदारी‌ ‌सूर्याने‌ ‌उचललेली‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌सूर्याला‌ ‌पृथ्वीवरील‌ ‌प्रत्येक‌ ‌गोष्टीची‌ ‌काळजी‌ ‌आहे.‌ ‌तो‌ ‌कुटुंबाचा‌ ‌प्रमुख‌ ‌या‌ ‌नात्याने‌ ‌चिंतातुर‌ ‌आहे.‌ ‌

‌आपण‌ ‌अस्ताला‌ ‌जाणार‌ ‌तेव्हा‌ ‌ही‌ ‌पृथ्वी‌ ‌अंधारमय‌ ‌होईल,‌ ‌ही‌ ‌भीती‌ ‌या‌ ‌सूर्याला‌ ‌वाटत‌ ‌आहे.‌ ‌याच‌ ‌भीतीने‌ ‌व‌ ‌पृथ्वीच्या‌ ‌काळजीपोटी‌ ‌सूर्याचे‌ ‌डोळे‌ ‌पाणावले‌ ‌आहेत.‌ ‌सूर्याला‌ ‌वाईट‌ ‌वाटत‌ ‌आहे.‌ ‌माझ्यानंतर‌ ‌या‌ ‌विश्वाचे‌ ‌काय‌ ‌होईल?‌ ‌ही‌ ‌चिंता‌ ‌या‌ ‌सूर्याला‌ ‌लागलेली‌ ‌आहे.‌ ‌अंधारामध्ये‌ ‌बुडून‌ ‌जाईल‌ ‌लगेच‌ ‌सारी‌ ‌धरा‌ ‌कुणी‌ ‌वाचवा‌ ‌या‌ ‌पृथ्वीला‌ ‌करा‌ ‌करा‌ ‌हो‌ ‌त्वरा‌‌ मावळतीला‌ ‌चाललेल्या‌ ‌सूर्याला‌ ‌आपल्यानंतर‌ ‌या‌ ‌पृथ्वीचे‌ ‌काय‌ ‌होईल‌ ‌ही‌ ‌चिंता‌ ‌लागली‌ ‌आहे.‌ ‌आपण‌ ‌अस्ताला‌ ‌गेल्यानंतर‌ ‌लगेचच‌ ‌संपूर्ण‌ ‌पृथ्वी‌ ‌अंधारामध्ये‌ ‌बुडून‌ ‌जाईल‌ ‌असे‌ ‌सूर्याला‌ ‌वाटते.‌ ‌पृथ्वीची‌ ‌काळजी‌ ‌करणारे‌ ‌कोणीतरी‌ ‌असायला‌ ‌हवे,‌ ‌तिला‌ ‌कोणीतरी‌ ‌वाचवायला‌ ‌हवे‌ ‌असे‌ ‌सूर्याला‌ ‌वाटते.‌ ‌त्यासाठी‌ ‌कोणीतरी‌ ‌पुढाकार‌ ‌घ्यावा,‌ ‌त्वरेने‌ ‌यावे‌ ‌असे‌ ‌सूर्याला‌ ‌वाटते.‌ ‌आपला‌ ‌कोणीतरी‌ ‌उत्तराधिकारी‌ ‌असावा,‌ ‌आपले‌ ‌कार्य‌ ‌कोणीतरी‌ ‌थोड्याफार‌ ‌प्रमाणात‌ ‌उचलावे‌ ‌अशी‌ ‌सूर्याची‌ ‌आंतरिक‌ ‌इच्छा‌ ‌आहे.‌‌

कुणी‌ ‌न‌ ‌उठती‌
‌ये‌ ‌ना‌ ‌पुढती‌
‌कुणास‌ ‌ना‌ ‌शाश्वती‌ ‌
इकडे‌ ‌तिकडे‌ ‌बघत‌ ‌हळूचि‌
‌पणती‌ ‌ये‌ ‌पुढती‌‌

सूर्याच्या‌ ‌प्रचंड‌ ‌तेजाला‌ ‌दुसरा‌ ‌पर्यायच‌ ‌नाही.‌ ‌त्याच्यासारखा‌ ‌तोच!‌ ‌त्याची‌ ‌जागा‌ ‌कोण‌ ‌चालवील?‌ ‌त्याच्यासारखे‌ ‌प्रचंड‌ ‌कार्य‌ ‌कोणालाही‌ ‌जमणार‌ ‌नाही.‌ ‌या‌ ‌पृथ्वीतलावरील‌ ‌कोणीही‌ ‌सूर्याची‌ ‌जागा‌ ‌घेऊ‌ ‌शकत‌ ‌नाही.‌ ‌त्यामुळे‌ ‌कोणीही‌ ‌पुढे‌ ‌यायला‌ ‌तयार‌ ‌नाही‌ ‌कारण‌ ‌पृथ्वीवरील‌ ‌अंधार‌ ‌दूर‌ ‌करण्याची‌ ‌कोणाकडेच‌ ‌ताकद‌ ‌नाही.‌‌

तेवढ्यात‌ ‌हळू‌ ‌हळू‌ ‌मनाचे‌ ‌धाडस‌ ‌करत,‌ ‌इकडे‌ ‌तिकडे‌ ‌बघत‌ ‌एक‌ ‌पणती‌ ‌पुढे‌ ‌येते.‌ ‌खरे‌ ‌तर‌ ‌पणतीचा‌ ‌केवढा‌ ‌तो‌ ‌प्रकाश,‌ ‌पण‌ ‌ती‌ ‌पुढाकर‌ ‌घेते.‌ ‌अंधारल्या‌ ‌रात्री‌ ‌पृथ्वीवर‌ ‌थोडाफार‌ ‌प्रकाश‌ ‌देण्याची‌ ‌जबाबदारी‌ ‌ती‌ ‌स्विकारते.‌ ‌ती‌ ‌तेवढे‌ ‌धाडस‌ ‌दाखवते.‌

‌विनम्र‌ ‌भावे‌ ‌लवून‌ ‌म्हणे‌ ‌ती‌ ‌
तेजोमय‌ ‌भास्करा‌ ‌
मम‌ ‌तेजाने‌ ‌जमेल‌ ‌तैसी‌
‌उजळून‌ ‌टाकीन‌ ‌धरा‌

‌सूर्यापुढे‌ ‌आकाराने‌ ‌अगदीच‌ ‌लहान‌ ‌असणारी‌ ‌पणती‌ ‌सूर्याचे‌ ‌प्रचंड‌ ‌तेज‌ ‌जाणते‌ ‌आहे.‌ ‌त्याचा‌ ‌तेजोमय‌ ‌प्रकाश‌ ‌तिला‌ ‌माहीत‌ ‌आहे.‌ ‌त्याच्यापुढे‌ ‌आपण‌ ‌क्षुल्लक‌ ‌आहोत‌ ‌हेही‌ ‌तिला‌ ‌माहीत‌ ‌आहे.‌ ‌तरीही‌ ‌ती‌ ‌धाडस‌ ‌करते‌ ‌आणि‌ ‌अतिशय‌ ‌विनम्रपणे‌ ‌सूर्यदेवाला‌ ‌नमस्कार‌ ‌करून‌ ‌म्हणते,‌ ‌”हे‌ ‌तेजोमय‌ ‌भास्करा,‌ ‌तुझ्याकडे‌ ‌प्रचंड‌ ‌तेज‌ ‌आहे.‌ ‌मी‌ ‌बापडी‌ ‌लहानशी.‌ ‌माझ्याकडेही‌ ‌प्रकाश‌ ‌आहे‌ ‌पण‌ ‌त्याची‌ ‌तुझ्याशी‌ ‌तुलना‌ ‌होऊच‌ ‌शकत‌ ‌नाही.‌ ‌मी‌ ‌माझ्याकडे‌ ‌असणाऱ्या‌ ‌थोड्याशा‌ ‌प्रकाशाने‌ ‌जेवढी‌ ‌जमेल‌ ‌तेवढी‌ ‌पृथ्वी‌ ‌उजळून‌ ‌टाकू‌ ‌शकते.‌ ‌माझा‌ ‌तेवढाच‌ ‌’खारीचा‌ ‌वाटा’.‌ ‌माझ्यामुळे‌ ‌खूप‌ ‌मोठी‌ ‌प्रखरता‌ ‌निर्माण‌ ‌होणार‌ ‌नाही,‌ ‌परंतु‌ ‌अंधाराला‌‌ छिद्र‌ ‌पाडण्याची‌ ‌ताकत‌ ‌माझ्यात‌ ‌आहे.‌ ‌तुझ्या‌ ‌जाण्याने‌ ‌तयार‌ ‌झालेला‌ ‌अंधार‌ ‌मी‌ ‌थोडाफार‌ ‌तरी‌ ‌भेदू‌ ‌शकते.‌ ‌पृथ्वी‌ ‌प्रकाशमय‌ ‌करण्याचे‌ ‌कार्य‌ ‌थोड्याफार‌ ‌प्रमाणात‌ ‌का‌ ‌होईना‌ ‌मी‌ ‌करू‌ ‌शकते”,‌ ‌तसे‌ ‌आश्वासन‌ ‌ती‌ ‌सूर्याला‌ ‌देते.‌ ‌

वच‌ ‌हे‌ ‌ऐकुनि‌ ‌त्या‌ ‌तेजाचे‌ ‌
डोळे‌ ‌ओलावले‌
‌तृप्त‌ ‌मनाने‌ ‌आणि‌ ‌रवि‌ ‌तो‌
‌झुकला‌ ‌अस्ताकडे‌‌

दैदिप्यमान‌ ‌असणाऱ्या‌ ‌सूर्यापुढे‌ ‌एवढीशी‌ ‌पणती‌ ‌बोलत‌ ‌होती. तिच्या‌ ‌बोलण्यात‌ ‌तेज‌ ‌होते.‌ ‌धाडस‌ ‌होते.‌ ‌आपण‌ ‌अस्ताला‌ ‌गेल्यानंतर‌ ‌आपले‌ ‌कार्य‌ ‌थोड्याफार‌ ‌प्रमाणात‌ ‌का‌ ‌होईना‌ ‌चालू‌ ‌राहील‌ ‌याची‌ ‌शाश्वती‌ ‌सूर्याला‌ ‌मिळाली.‌ ‌छोट्याशा‌ ‌पणतीचे‌ ‌हे‌ ‌धाडस‌ ‌पाहून‌ ‌सूर्याचे‌ ‌डोळे‌ ‌ओलावले,‌ ‌त्याच्या‌ ‌डोळ्यांत‌ ‌आनंदाश्रू‌ ‌आले.‌ ‌आपल्यानंतर‌ ‌या‌ ‌पृथ्वीची‌ ‌काळजी‌ ‌घेणारे‌ ‌कोणीतरी‌ ‌आहे,‌ ‌या‌ ‌विचाराने‌ ‌तो‌ ‌तृप्त‌ ‌झाला.‌ ‌पृथ्वीमातेची‌ ‌काळजी‌ ‌घेण्याची‌ ‌जबाबदारी‌ ‌पणतीने‌ ‌उचलली‌ ‌आहे,‌ ‌या‌ ‌मनाला‌ ‌आनंद‌ ‌देणाऱ्या‌ ‌विचारातच‌ ‌सूर्य‌ ‌अस्ताकडे‌ ‌झुकला.‌ ‌सूर्य‌ ‌मावळला‌ ‌पण‌ ‌त्याचे‌ ‌कार्य‌ ‌सुरू‌ ‌राहिले.‌ ‌त्याचे‌ ‌प्रकाश‌ ‌देण्याचे‌ ‌कार्य‌ ‌थोड्याफार‌ ‌प्रमाणात‌ ‌का‌ ‌होईना‌ ‌पण‌ ‌पणती‌ ‌करत‌ ‌राहिली.‌‌

जाता अस्ताला शब्दार्थ‌ ‌

  • जाईन‌ –‌ ‌जाणे‌
  • ‌कैसे‌ – ‌कसे‌‌
  • भले‌ –‌ ‌चांगले‌ ‌
  • धरा‌ –‌ ‌पृथ्वी‌‌ –‌ ‌(earth)‌ ‌
  • त्वरा‌ –‌ ‌घाई,‌ ‌लवकर‌ –‌ ‌(to‌ ‌be‌ ‌hurry)‌ ‌
  • शाश्वती‌ ‌–‌ ‌विश्वास,‌ ‌खात्री,‌ ‌भरवसा‌ –‌ ‌(surety)‌ ‌
  • पुढती‌ –‌ ‌समोर‌‌ –‌ ‌(in‌ ‌front‌ ‌of)‌ ‌
  • विनम्र‌ –‌ ‌नम,‌ ‌विनयशील‌ –‌ ‌(humble)‌ ‌
  • लवून‌ –‌ ‌वाकून,‌ ‌नम्र‌ ‌होऊन‌ –‌ ‌(to‌ ‌bend)‌‌
  • भाव‌ –‌ ‌भावना‌‌ –‌ ‌(emotions)‌ ‌
  • ‌भास्कर‌‌ –‌ ‌सूर्य‌ –‌ ‌(sun)‌ ‌
  • मम‌‌ –‌ ‌माझ्या,‌ ‌माझे –‌ ‌(mine)‌ ‌
  • तेजाने‌ –‌ ‌प्रकाशाने –‌ ‌(lustre)‌ ‌
  • ‌वच‌‌‌‌ –‌ ‌बोलणे‌‌ –‌ ‌(saying)‌ ‌
  • तृप्त‌‌ –‌ ‌समाधानी,‌ ‌संतोष‌ –‌ ‌(satisfied)‌ ‌
  • ‌झुकणे –‌ ‌कलणे‌‌ –‌ ‌(to‌ ‌incline)‌‌