HSC Marathi Sample Paper 1
Questions
Time: 3 Hours विभाग १: गद्य Total Marks: 80
प्रश्न ९.
(अ) पुढील उताच्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. (८ गुण) आता माणूस घरातून दारात आला, की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो. कामे बरीच असतात. पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे. मुलांची शाव्या एका टोकाला, आपले कार्यालय दुसन्या टोकाला, मंडई एका बाजूला तर दवाखाना दूर, कुठल्या तरी दिशेला. जीवनाची ही टोके सांधणार कशी ? जोडणार कशी ? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत, एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. तो आत्मघाती ठरतो. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यांत निदान शंभर मैलांचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते. अंतरावरच्या गोष्ट्टींशी जवळ्ठीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसामाणसांत दुरावा निर्माण होतो. तो त्रासदायक आणि असहा होक नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहाशी असते.
(१) मानवी जीवन विभागणारे घटक
(२) अमेरिकेत माणसे वेगाने जीवन जगतात सकारण स्पष्ट करा. (२ गुण)
(३) वाहनाची अनावश्यक गती ही विकृती आहे असे लेखक का म्हणतात ? (१० ते १२ ओळीत)( गुण)
किंवा
‘मानवी जीवनात वाहन हे महत्त्वाचे! असते’ तुमचे मत लिहा.
(आ) पुढील उतारा वाचून सूचनेनुसार विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.(८ गुण)
दात दुखायला लागला, की तो मुळापासून दुखू लागतो. किंबहुना दाताला मूळ असते हे फक्त तो दुखायला लागला म्हणजेच कळते. माझा दात जेव्हा दुखायला लागला तेव्हा तर माझी खात्रीच झाली, की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यांत फार फरक असला पाहिजे. आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यांत सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत. नाहीतर सगळेच दात दुखत असल्याचा भास मला का व्हावा ? प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर ज्या दाताने शंख करायला लावला, तो दुखरा दात याची खात्री झाली. दुखन्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही ! बरे, हे दुखणे तरी साधे, सरळ असावे? तेही नाही. एखादया मुळ्ठाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो.
असे म्हणतात, की दिवसा सभ्य दिसणारी माणसे रात्री आपल्या खन्या रूपात फिरतात. दात हा अवयवही अशाच माणसांसारखा असावा. नाहीतरी दिवसा अधूनमधून पण सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसासारखा अक्राळविक्राळ का होतो ? दातांत आणि चोरांत साम्य असते ते याच बाबतीत. दोघेही रात्री गड़बड़ करतात.
दात दुखण्याने मी आध्यात्मिक तत्त्वचिंतनही करतो. दात दुखतो तेक्हा मला साक्षात्कार होतो, की दात हेच सत्य आहे. जग मिथ्या आहे. त्याक्षणी संसार असार वाटतो. नेहमी हवेहवेसे वाटणारे शेंगदाणे दगडासारखे बेचव लागतात. बायको व मुले हा केवळ भास आहे असे वाटते. समोरून येणारी एखादी सुंदरी डोळ्यांना जाणवतच नाही आणि दाताचा ठणका मला ब्रह्मांड दाखवू लागतो. रात्रभर माइया ब्रहांडाच्या दहा-वीस फेन्या तरी सहज होतात आणि पहाटे ब्रह्मांड मिथ्या असून दातच सत्य आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते.
(१) पुढील शब्दांच्या रूपावरून प्रत्येकी एक विधान तयार करा.(२ गुण)
१. फरक
२. साम्य
(२) लेखकाल्ग सगळेच दात दुखत असल्याचा भास होतो कारण.
(३) लेखकाच्या मनातील दातासंबंधीच्या कल्पना तुमच्या भाषेत लिहा.( गुण)
1. किंवा
लेखकाने दुखज्या दाताची तुलना अक्राळविक्राळ राक्षसाशी केली आहे. याबाबत तुमचे मत लिहा.
(इ) दिलेल्या उतान्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. (४ गुण)
(१) सत्यधर्माची वैशिष्ट्ये
(२ गुण)
(२) महात्मा फुले यांना अपेक्षित सत्यधर्म तुमच्या भाषेत लिहा.(२ गुण)
विभाग २: पद्य
प्रश्न २.
(अ) पुढील कविता वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा.(८ गुण) सहज आरशात पाहिले निडोळे भरून आले आरशातील स्त्रीने मला विचारले, ‘ तूच ना ग ती! माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली किती बदललीस ग तू अंतर्बाहय…..! तुला सांगू तुइन्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग ऐक हं….! तू कशी होतीस ते!
पावसाचे तरंग ओंजळ्ठीत भरणारी चैतन्यमयी बालिका अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा नि आज नखशिखांत तू… तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी !
आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगड्न ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे, इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात जळ्ठेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून
अंगणात थांबलेल्या तुइन्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आंत घेण्याचेही भान नाही ग तुला बागतेली ती अल्लड जाईही पेंगुक्तेय तुझी वाट पाहून पाहून पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरबलेली पुतळ्ठी
अनेकदा तुला मी अशी पाहते की काळ्ठीजच हंबरते रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिबत असतेत तुझे ठिकठिकाणी फाटलेले हदय
नि पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळ्य’ तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतः च हिंदकळतेय आणि अशातच, ती मला गोंजारीत, जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली-
‘रडूनकोस खुळे, उठ! आणि डोक्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात नि घेऊन से हालात नुकतीच उमललेली शुभ्र कमळ्ठाची प्रसन्न फुले’
(१) २. कवयित्री द्वारे आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्वीच्या स्थितीचे केलेले वर्णन(२ गुण)
२. आरशातील स्त्रीने आरशाबाहेच्या स्त्रीला अधिकारवाणीने…..केलेला उपदेश
(२) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला
(२ गुण)
(१) घनगर्द संसार-
(२) प्रेयस चांदणे-
(३) आरशातील स्त्रीला आरशाबाहेरील स्त्रीमधील जाणवलेले बदल( गुण)
(आ) पुढील काव्यपंक्तीचा अर्थ तुमच्या भाषेत लिहा.
(४ गुण) ‘सत्त्व उतारा देउन। अवघासारिला तमोगुण। किंचित राहिली फुणफुण। शांत केली जनार्दने। पुढील कवितेच्या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.(४ गुण)
समुद्र अस्वस्थ होऊन जातो
शहराच्या आयुष्याच्या विचाराने.
तेब्हा तो मनांतल्या मनांतच मुक्त होऊन फिरूं लागतो
शहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून.
उशिरापर्यत रात्रीं तो बसलेला असतो
स्टेशनवरच्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळ्यांवरील रहदारी
पाहत,
हातांवर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोक्यांनी.
किंवा
‘उन्हातान्हात, रोज मरते
बाई मरते
हिरवी होऊन, मागं उरते
बाई उरते
खोल विहिरीचं, पाणी शेंदते
बाई शेंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते
- वरील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
प्रश्न ३. (अ) दिलेल्या उताच्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा,(४ गुण)
(?)
२. कथानकाचे प्रयोजन
(२) कथाबीज म्हणजे काय ?
(१ गुण)
(१ गुण)
(२ गुण)
(आ) २.एका रुपयाच्या नोटेव्यतिरिक्त कथेतील आणखीकोणकोणते शोध तुम्हाला महत्त्वाचे वाढतात ? ते स्पष्ट करा. (३ गुण)
किंवा
बोर्डिगात शिकत असलेत्या व शिकून गेलेल्या विद्याथ्यांचे बापू गुरुजींबद्दल असलेले प्रेम तुमच्या भाषेत लिहा.
२. बोडिंगमधील ‘संपती’ नावाचा मुलगा गेल्यानंतरच्या गुरुजींच्या भावना तुमच्या भाषेत लिहा.(३ गुण)
2. किंवा
कथेतील ‘टैक्सी ड्रायव्हर’ हे पात्र तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण स्पष्ट करा.
3. विभाग ४: उपयोजित मराठी
प्रश्न ४.
(अ) पुठील कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहा. ( गुण)
(१) १. मुलाखतीचे कोणतेही चार हेतू लिहा.
२. माहितीपत्रकाचे स्वरूप लिहा.
३. अहवाललेखनाची कोणतीही दोन वैशिष्ट्ये लिहा.
४. उमेदवार ‘आतून’ जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते, सोदाहरण स्पष्ट करा.
(२) माहितीपत्रकाचे स्वरूप: विशिष्ट अशी माहिती देणारे परिचयात्मक पत्रक म्हणजे माहितीपत्रक.
(३) अहवाललेखनाची वैशिष्टये सांगा.
(आ) पुढीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहा. (९० गुण)
(१) १. मुलाखतीची पूर्वतयारी व समारोप या विषयीची तयारी करताना कोणत्या गोष्ट्टींचा विचार केला जातो ?
२. माहितीपत्रकाची वैशिष्ट्ये खालील मुद्यांना धरून स्पष्ट करा.
(अ) आकर्षक मांडणी (ब) भाषाशैली
३. अहवाल लेखनाचे स्वरूप व आवश्यकता तुमच्या भाषेत लिहा.
४. तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रमाचे अहवाल लेखन करा.
(२) माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक होय, उत्पादने, सेवा, संस्था लोकांपर्यन्त पोहोचविण्याचे साधन म्हणजे माहितीपत्रक असून माहितीपत्रकाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे.
१. माहितीला प्राधान्य
२. उपयुक्तता
३. वेगळेपण ४. आकर्षक मांडणी
५. भाषाशैली……इत्यादी पैकी काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे.
विभाग ५: व्याकरण व लेखन
प्रश्न ५.
(अ) कंसातील सूचनेनुसार कृती करा. (१० गुण)
(१) १. माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात? (विधानार्थी करा)
२ ‘तुझया अंगात लई हाडं हैत’ (उद्गारार्थी करा.)
(२) खालील तक्ता पूर्ण करा. सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
२. ………. अक्षर असा आनंद
२. ठायी ठायी
(३) पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा.
१. या चित्रांचे स्रोत मला सापडतात.
२. खिडकी हलकेच उघडतो.
(४) पुढील ओळीतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.
१. वीर मराठे गर्जत आले
पर्वत सगळे कंपित झाले
२. फूल गळे, फळ गोड जाहले
बीज नुरे, डौलात तरु डुले;
तेज जळे, बघ ज्योत पाजळे;
का मरणि अमरता ही न खरी ?
(५) पुढील शब्दांसाठी पारिभाषिक शब्द लिहा.
(आ) पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
(२० गुण)
१. गर्दीचा भस्मासूर
२. कुष्ठरोग्यांचा आधार : बाबा आमटे
३. बेकार तरुणाचे मनोगत:
४. ग्रंथ हेच गुरू
५. मोबाईल शाप की वरदान ?
4. Answer Key
विभाग १: गद्य
उत्तर ९.
(अ)
(१) मानवी जीवन विभागणारे घटक
(२) अमेरिकेसारख्या विकसित देशात घरोघरी आणि दरडोई वाहने उपलब्ध असतात. तेथील रस्ते रंद, सरळ, एकमार्गी आणि निर्विघ्न असे असतात. शिवाय घरे, कार्यालय, बाजारपेठा यात शंभरमैल इतके अंतर असल्याने त्यांना अंतरावरच्या गोष्ष्टींशी जवळ्ठीक साधण्यासाठी दूरवर जावे लागत असल्याने अमेरिकेत माणसे वेगाने जीवन जगतात.
(३) ‘वेगवशता’ या वैचारिक पाठात लेखकाने अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसांच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. वेळ व श्रम वाचविण्यासाठी वाहनाची गरज असते मात्र काही माणसेही कर्म काढून वाहन खरेदी करतात. कारण जीवन हे दशदिशांना विभागले असून मुलांची शाळा एक टोकाला, कार्यालय दुसन्या टोकाला, मंडई आणि दवाखानाही दूर कुठेतरी असतो. दूरवर असलेली ठिकाणं आणि कामे मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे ही कामे पायी चालता चालता उरकत नाहीत. त्यामुले माणसाला गती ही घ्यावीच लागते. आवश्यक अशी गती ही माणसाची गरज असते परंतु या गतीचे अवास्तव वा अतिप्रमाण झाले तर ती विकृती ठरते. माणसाची कामे यथासांग पार पडावीत एवढा जीवनाला वेग असावा परंतु दूरवर असणान्या गोष्ट्रींशी जवळ्ठीक साधावीच लागते अन्यथा माणसामाणसांत दुरावा निर्माण होतो. हा दुरावा त्रासदायक वा असह्म होक नये यासाठी वेगाचा आश्रय घेतला जातो आणि वेगामुळे माणसे ही बेभान होतात आणि अनावश्यक गती घेतली जाते. कालांतराने अशा अनावश्यक गतीचे विकृतीत रूपांतर होते. त्यामुळे वाहनाची अनावश्यक गती ही विकृती आहे असे लेखक म्हणतात.
5. किंवा
‘वेगवशता’ या वैचारिक पाठाचे लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले असून त्यांनी या पाठात मानवी जीवनातील वाहनाचे महत्त्व पटवून देत असण अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसांच्या विकृतीवर बोट ठेवले आहे. वाहनाकडे पाहण्याचा मानवी दृष्टिकोन येथे स्पष्ट केला आहे. मुंबई सारख्या महानगरात माणसांची गर्दी प्रचंड प्रमाणात असून हे जीवन दशदिशांना विभागलेले आहे. आज माणूस हा घरातून दारात येताच तो वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा आणि कामे
जास्त असल्याने पायी चालत ती उरकता येत नाहीत. शाळा, कार्यालय, दवाखाना, मंडई या ठिकाणांमध्ये अंतर असते. या ठिकाणची कामे वाहनांशिवाय होऊच शकत नाहीत. वेळ व श्रम वाचविण्यासाठी वाहनाची नितांत आवश्यकता असते.
अमेरिकेसारख्या विकसित देशानंतर माणसे वेगाने जीवन जगतात. तिथे प्रत्येक माणसाच्या हाती वाहन असते. तिथले रस्तेही रुंद एकमार्गी, सरळ, निर्विघ्न असतात तसेच घरे, कार्यालये, बाजारपेठा यामध्ये शंभर मैला इनके अंतर असते. तिथे कमी अंतरावर अशी कोणतीच गोष्ट नसते: त्यामुले दूर अंतरावरच्या गोष्ट्टींशी जवळ्ठीक साधण्यासाठी,माणसामाणसात दुरावा निर्माण होऊ नये यासाठी वाहनाचा आश्रय घ्यावा लागतो. आणि म्हणूनच आजच्या गतिमान युगात मानवी जीवनात वाहन हे महत्त्वाचे साधन असते.
१. फरक: आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यात फरक असला पाहिजे.
२. साम्य: रात्री गडबड करण्यासाठीच्या बाबतीत दात आणि चोर या दोघांमध्ये साम्य असते.
(२) दाताला मूळ असते हे तो दुखायला लागल्यानंतर कळते आणि आपल्या दाताला तर मूळ नसून झाडासारख्या मुक्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यात सर्वत्र पसरल्या असल्याने लेखकास सगळेच दात दुखत असल्याचा भास होतो.
(३) ‘दंतकथा’ या विनोदी ललित लेखाचे लेखक वसंत सबनीस असून दाताचे दुखणे त्रासदायक असल्याने माणसाची अवस्था केविलवाणी होते. ही केविलवाणी स्थिती देखील लेखकाने अतिशय नर्मविनोदी शैलीत रेखाटली आहे. दातदुखीमुळे होणारी असध्यता, माणसाची होणारी दयनीय अवस्थांतून लेखकाच्या मनात दातासंबंधी विविध कल्पना येतात त्या पुढीलप्रमाणे.
(i) दात दुखायला लागला की तो मुळ्ठपासून दुखतो.
(ii) दात दुखायला लागल्यावरच दाताला मूळ आहेत हे समजते.
(iii) आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दाताचे चित्र व प्रत्यक्ष दात यामध्ये फरक आहे.
(iv) दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत व त्या संपूर्ण हिरड्यांत सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत.
(v) कवी मनातील जिप्सीसारखा एखादा लाकूडतोडन्या लेखकाच्या दाताच्या मुळ्ठाशी बसलेला असतो आणि तो एकामागून एक धाव घालत असतो.
(vi) दिवसा सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसासारखा अक्राळविक्राळ होतो.
(vii) दात आणि चोर यात साम्य असते जे रात्री दोघेही गडबड करतात.
(viii) दातदुखीमुले लेखकास साक्षात्कार होतो की दात हेच सत्य आहे. जग मिध्या आहे.
(ix) दाताचा ठणका ब्रह्मांड दाखवितो…….इत्यादी.
6. किंवा
वसंत सबनीस लिखित ‘ दंतकथा’ हा विनोदी ललितलेख असून तो त्यांच्या ‘सबनीशी’ या ललितलेख संग्रहातून घेतला आहे. माणसाच्या जीवनात दातदुखीमुले अनंत वेदना होत असल्या तरी या गंभीर विषयाकडे विनोदी दृष्टीने पाहत आपल्या खुमासदार विनोदी शैलीतून प्रसंगनिष्ठ विनोद निर्मिती केली आहे. त्यासाठी लेखकाने अतिशयोक्ती, विसंगती म्हणी, वाक्प्रचार आणि शाब्दिक कोट्यांचाही वापर केला आहे.
मानवी शरीरातील दात या इंद्रियाचे कार्य म्हणजे दुखणे हेच असून ज्याचे दात दुखत नाहीत तो माणूस कमनशिबी कारण त्यास ब्रहांड पाहण्याचा योगच आलेला नाही. तसेच दुखत असलेल्या दाताल्ग जरासुद्धा स्पर्श सहन होत नाही. चुकून स्पर्श झालाच तर तो शंख करायला लावतो. त्याचे दुखणेही साधे, सरळ सोपे नसते. तो दिवसा सभ्यपणे म्हणजे कधीतरी दुखेल मात्र रात्री तो आपले खरे दुखणे दाखवतो. एखाद्या राक्षसाआरखा अक्राळविक्राळ रूप तो धारण करतो व माणसाची झोपही हराम करतो. असह्य वेदना होत असल्याने निश्चितच त्या माणसाला ब्रह्मांड आठवते. हे दुखणे थांबबिण्यासाठी शेकही घेता येत नाही. तसा प्रयत्न केलाच तर फक्त माणसाच्या वाट्याला असह्य वेदना व दयनीय स्थिती येते. थोडक्यात दातदुखीच्या वेदना या अक्राव्कविक्राळ राक्षसासारख्या असतात. त्यामुळे लेखकाने दुखन्या दाताची तुलना अक्राळविक्राळ राक्षसाशी केली आहे.
(इ) ९. सत्यधर्माची वैशिष्ट्ये:
सत्यधर्माच्या अनुयायांनी जन्मजात श्रेष्ठत्व वा कनिष्ठत्व मानू नये.
सर्व स्त्री-पुरुषांनी बंधुत्वाच्या नात्याने वागावे
सर्वांसाठी समान न्याय असावा
श्रमाला प्रतिष्ठा असली पाहिजे.
‘सत्यधर्माच्या अनुयायांनी जन्मजात श्रेष्ठत्व वा कनिष्ठत्व मानता कामा नये. सर्व स्त्री-पुरुषांनी बंधुत्वाच्या नात्याने वागावे, सर्वासाठी समान न्याय असला पाहिजे. श्रमाला प्रतिष्ठा असली पाहिजे. सत्यधर्मांची ही वैशिष्ट्ये आहेत. माणूस योग्य रीतीने, न्यायाने, सत्याने जगला तर त्याल्र आपले सुख साधता येते. हा जोतीरावांचा सिद्धान्त आहे. जोतीरावांना मूर्तीपूजा अमान्य होती. दगडाच्या मूर्तीवर फुले वाहून नामस्मरण करण्याने काही फायदा नसून अमूल्य अशा वेळेचा अपव्यय आहे. असे त्यांना वाटते. उदाहरणादाखल त्यांनी दाखला दिला आहे, की मातापित्यांच्या पालनपोषणाची खटपट न करता केवळ ‘ माझी माता, माझे पिता’ असे पोकळ नामस्मरण करीत राहिल्यास माता-पित्यांना व घरातील सर्वांना उपवासाने मरावे लागेल. त्याऐवजी केवळ नामस्मरण न करता अतिमेहनत करून, स्वकष्टाने माता पिता व भावंडांचे पालनपोषण करणारा मुलगा अधिक प्रिय होईल. हाच सत्यधर्म आहे. निर्मिकाचे निरर्थक
नामस्मरण करणारे निश्चये करून विचारवान पुरुषांच्या उपहासास पात्र होतात मात्र कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न करता एकूणच मानवापैकी जो कोणी आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करून जगाच्या कल्याणासाठी रात्रंदिवस झटतो तो कोणीही असला तरी तो अन्नदान घेण्यास पात्र आहे.
(युगपुरुष महात्मा जोतीराव फुले: लेखक: बा. ग. पवार)
२. माणूस न्यायाने व सत्याने जगला तर त्यास सुख साधता येते. मूर्तीपूजा म्हणजे केवळ अपव्यय असून मातापित्यांच्या पालनपोषणाची खटपट न करता केवळ मातापित्यांचे नामस्मरण करीत राहिल्यास मातापित्यांना व घरातील सर्वांना उपवासाने मरावे लागेल. त्याऐवजी केवळ नामस्मरण न करता अतिमेहनतीने, स्वकष्टाने मातापिता व भावंडांचे पालनपोषण करणारा मुलगा अधिक प्रिय होईल हा सत्यधर्म असून कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न करता एकणच मानवापैकी जो कोणी आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो तो कोणीही अन्नदान घेण्यास पात्र असतो. अशाप्रकारचा सत्यधर्म महात्मा फुले यांना अपेक्षित आहे.
7. विभाग २: पद्य
उत्तर २.
(अ) (१) २.
(१) पावसाचे तरंग ओंजळ्ठीत भरणारी चैतन्यमयी बालिका.
(२) सर्वच बहर लावणारी नवयौवना
(३) स्वप्न पंखांनी आभाळ झुल्यावर झुलणारी ध्येयगंधा २.
8.
(१) डोळयांतले अश्रू रोजारच्या तळ्यात सोड
(२) नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले हातात घेऊन ये.
(२) २. संसाराचा पसारा-संसारात कंठ बुडून जाणे.
२. चांदण्यासारख्या मुलायम, लोभस, अति प्रियतम तारुण्यसुलभ गोष्टी
(३) ती नखशिखान्त अबोल राहणारी स्थितप्रज्ञ राणी झाली आहे. ती मन मोकळे करून बोलत नाही. ओठ घट्ट मिटून संसारात तिने स्वतः ला बुडवून घेतले आहे. ती पारंपरिक स्त्रीत्वाला वरदान समजते. ती पूर्वीच्या प्रियतम गोष्टी आठवत नाही. ती अस्तित्वहीन प्राण नसलेली कठोर पुतळी झाली आहे. गळयातला हुंदका दाबून फाटलेले हृदय शिवत बसली आहे. तिने मनातल्या असह्य वेदना पदराखाली झाकून घेतल्या आहेत.
(आ) ‘विंचू चावला’ हे सुप्रसिद्ध भारूड संत एकनाथांनी लिहिले असून हे भारूड त्यांच्याच ‘श्री सकलसंतगाथा भाग-२’ मधून घेतले आहे. या भारूडामध्ये काम-क्रोधरूपी विंचू (काम म्हणजे अनिर्बंध इच्छा आणि क्रोध म्हणजे संताप, राग) माणसाला चावतो म्हणजे अशा कामक्रोधामुळे मानवी मन
दुषित होते. त्यास विकाराची बाधा होते. त्याचे मन बेभान होते. अशावेळ्ठी त्याचे मन आवरणे कठीण होते. त्याच्यावर अंकुरा ठेवणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी संत एकनाथ प्रयल करत आहेतच. मानवी मनातील अविचार, दुर्गुण घालविण्यासाठी दुर्गुणाच्या जागी सद्युणांची, सद्वर्तनाची जोपासना केली पाहिजे. त्यासाठी अशा विकारी माणसाने सद्युणांचा अंगारा लावला पाहिजे. सत्वगुणांच्या अंगान्यातेच (उतान्याने) मानवी मनातील दुर्गुण नाहिसे होतील. त्यातूनही थोडे बहुत दुर्गुण राहिले वा दुर्गुणाची जखम, चूरचूर थोडी जरी राहिली असली तरी त्याचे निर्दालन आपले गुरू जनार्दन स्वामी करतील असा दृढ विश्वास आपल्या गुरुबद्दल संत एकनाथांना वाटतो.
मानवी मनातील, जनसामान्यातील, समाजामधील दुर्गुण, विकार नष्ट करण्याचा प्रयत्न संत एकनाथ करतच आहेत परंतु हे कार्य करण्यासाठी त्यांचे गुरू त्यांच्या पाठीशी आहेत. आणि म्हणूनच आपल्या हातून काही उणिवा राहिल्या तर त्या दूर करण्याचे कार्य आपले गुरू करतील हा आशावाद येथे स्पष्ट होतो. त्यामुळे वाच्यार्थाच्या पलीकडे जाऊन भावार्थातील सामर्थ्य येथे पाहावयास मिळ्खे. ‘भारूड’ हा लोकसंगीताच्या जवळ जाणारा काव्यप्रकार असून सामाजिक जागृतीसाठी हा काव्यप्रकार संत एकनाथांनी हाती घेतला व हा हेतू साध्य करण्यासाठी नाट्यात्म रूपकातून है भारूढ त्यांनी जनसामान्यापर्यन्त पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य संत एकनाथांनी केले आहे.
(इ) ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके लिखित ‘समुद्र कोंडून पडलाय’ या कवितेतील ओळ्ठी असून ही कविता ‘शुभवर्तमान’ या काव्य संग्रहातून घेतली आहे.
समुद्र म्हणजे अथांग पाणी व पाणी म्हणजे जीवन असल्याने हा समुद्र जीवनाचे प्रतीक असून या समुद्रासारखेच अथांग जीवन (लहान मुलांचे बालविश्व) या शहराच्या, महानगराच्या मर्यादांमध्ये कोडून पडते त्यामुळे कविमन अस्वस्थ होते आहे. कारण शहरातील लहान मुले ही या शहराचे भविष्य आहे. या विचारामुळे कविमन अस्वस्थ होऊन मनातल्या मनात मुक्त होऊन फिरू लागते. ते शहरातील रस्ते, वस्त्यांमधून शेवटी मनाशीच विचार करत करत रात्री उशिरापर्यन्त स्टेशनवरच्या बाकावर एकटेच बसते आणि या शहरातील लहान मुलांच्या बालविश्वाबद्दल विचार करते तेक्हा त्यास समोरच रूळ्यंवरून माणसांची रेल्वेची रहदारी असलेली दिसते. कविमन हातावर डोके ठेवून अर्थ मिटल्या डोळ्यांनी सभोवतालचे दृश्य पाहत आहे. कामासाठी दिवसभर घराबाहेर असलेली माणसे संध्याकाळी घरी परतव्यासाठी स्टेशनवर गर्दी करताना दिसतात. रेल्वेगाड्याही त्यांना त्यांच्या मुक्कामी पोहोचविण्यासाठी धावते आहे. अशाप्रकारे शहर, महानगरातील गतिमान जीवन आणि या गतिमान जीवनशैलीमध्ये कोमेजून जाणारे बालविश्व येथे कवीने चित्रात्मक रूपात रेखाटले आहे. महानगराच्या मर्यादामध्ये कोंडून पडलेल्या बालविश्वामुळे एकंदरीत महानगराचे भविष्यच धोक्यात आलयाचा चिंतनात्मक विचार कवीने मांडला आहे.
किंवा
‘रोज मातीत’ या कवितेच्या कवितेच्या कवयित्री कल्पना दुधाळ असून ही कविता त्यांच्याच ‘सीझर कर म्हणतेय माती’ या
काव्यसंग्रहातून घेतली आहे. दररोज मातीत राबणाज्या शेतकरी महिलेचे मनोगत कवयित्रीने येथे रेखाटले आहे.
कवियत्री कवितेमध्ये शेतकरी स्त्रीच्या मनातील इच्छा ओळखते कारण ही स्त्री उन्हातान्हात स्वतः चा विचार न करता सतत कष्ट करत असते, ती कुठेतरी सुखाचे दिवस पाहायला मिळावेत या आशावादासाठी मात्र ती पुढे म्हणते ‘हिरवी होवून मागे उरते’ म्हणजेच आपला जीव या मातीत रुजावा अशी तिची मनोइच्छा असल्याने मोठ्या आत्मियतेने ती कामे करत असते. कांद्याची लावणी, झेंडूच्या फुलाची तोडणी वा उसाच्या बेण्याची लावणी करताना ती स्वतः चा विचार न करता ती आपल्या संपूर्ण शेतकरी कुटंबाची काळजी करते, त्याच्या सुखसमृद्धीसाठी अखंडितपणे कष्टत असते. ती उन्हातान्हाचा विचार न करता शेतात अखंडित राबते आहे. जणू काही तिने शेतकामासाठी स्वतःला अर्पण केले आहे.
खोल विहीरीतून पाणी शेंदते आहे. ओढग्रस्त अशा संसाराची ओळ्क आपणास ‘खोलविहीर’ या प्रतिमेतून होते. पाणी हे जीवन असून तेसुद्धा आशादायी चित्र स्पष्ट होते. शेतकरी स्त्रीही रोज उन्हातान्हात मरमर करून राबते असते, तिचे हे राबते वा तिच्या कर्तृत्वाची निशाणी म्हणून संपूर्ण शेतात हिरवाई दिसत आहे. शेतातील ही हिरवाई दिसणे, भरघोस पीक येणे यासाठी मागे या शेतकरी स्त्रीचे श्रम असून हे श्रम तिची पाठ सोडत नाहीत. असे असले तरी ही स्त्री उदयाच्या भविष्याकडे आशावादी दृष्टिकोनातून पाहते. आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणे तिचे हे कर्तृत्व प्रत्येकाच्या मनामनात घर करून बसलेय. काळ्या मातीत रोजचेरोज राबणे हे भारतीय कृषी समृद्धीला योगदान देण्याचे सामर्ध्य या शेतकरी कुटुंबातील कष्टकरी स्त्रीमध्ये असल्याचे दिसून येते.
कवयित्रीने अतिशय अंतर्मुख होऊन कष्टकरी स्त्रीमनातील व्यथा, वेदना तिच्या मनाची दडपणूक संवेदनशील अशा शब्दांतून स्पष्ट केली आहे. उन्हातान्हात, मरते, उरते, शेंदते, नांदते अशा शब्दयोजनेतून कवितेला ‘गेयं’ रूप प्राप्त झाले आहे तर खोल विहीर, पाणी, माती, हिरवी अशा प्रतीकांतून संवेदनशीलतेचे मनोज्ञ दर्शन घडते. योजलेल्या दृष्टान्तामुळे कवितेला जिवंतपणा प्राप्त होऊन कष्टकरी स्त्रीच्या कार्याची सहजतेने प्रचिती येते.
(२) मानवी जीवन विभागणारे घटक
विभाग ३: साहित्यप्रकार-कथा
उत्तर ३.
(अ) (१)
१. कथाबीज: कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने एखादया घटनेत वास्तवाचे वा कल्पनेचे रंग भरतो. हे करताना तो निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांचे साहाय्य घेतो. या सर्व घटकांच्या मदतीने घटनामालिकेचे कथात्म
साहित्यात रूपांतर होते; म्हणून कथेत ‘घटना’ हा महत्त्वाचा भाग ठरतो. कथेत या मूळ घटनेलाच -‘कथाबीज’ असे म्हणतात.
२. कथानक: कथानकात घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाववैशिष्ट्ये, वातावरण इत्यार्दीचे तपशील हलुवारपणे उलगडत जातात. कथेत कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते. या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकाराला येते. हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाहीपणाही जपले जाते. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यत पोहोचवण्यासाठी कथन करणे है कथानकाचे प्रयोजन असते.
३. पात्रचित्रणः पात्रचित्रण हा कथेचा महत्त्वपूर्ण घटक आहे. पात्रचित्रणातून कथेचा आशय पुढे पुढे जात राहतो. कथाकार एखादया पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवनपद्धती इत्यादींच्या चित्रणातून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. या शब्दरूप प्रतिमेला ‘पात्र’ असे म्हणतात. कथेतील पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणे रेखाटले जाते, म्हणून वाचकांची त्या पात्रांशी जवळ्रीक साधली जाते. जी पात्रे कथाकाराची ‘स्व’ निर्मिती असते.
४. वातावरण निर्मिती: कथेला स्थळ-काळ्यबरोबरच सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादीनी युक्त वातावरण असते. या वातावरणाचा वाचकांवर परिणाम होऊन तो कथानकाशी एकरूप होतो. वातावरणाचा पट जितका सघन तितकी कथा सकस होते.
२. कथानकाचे प्रयोजन: कथाकराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेल्र भावाशय वाचकांपर्यन्त पोहोचविण्यासाठी कथन करणे.
(२) कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने एखादया घटनेत वास्तवाचे वा कल्पनेचे रंग भरण्यासाठी तो निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांचे साहाय्य होतो. या सर्व घटकांच्या मदतीने घटनामालिकेचे कथात्मक साहित्यात रूपांतर होताना कथेत ‘घटना’ हा भाग महत्त्वाचा ठरतो. या मूळ घटनेलाच कथेत कथाबीज असे म्हणतात.
(आ) ३. व. पु. काळे लिखित ‘शोध’ या कथेतील महत्त्वाचा प्रसंग म्हणजे एक रुपयाच्या नोटेचा शोध असून या प्रसंगाभोवती संपूर्ण कथानक फिरताना दिसते. असे जरी असले तरी या एक रुपयाच्या नोटेव्यतिरिक्तही आणखी काही शोध महत्त्वाचे वाटतात ते पुढीलप्रमाणे:
(i) ‘जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा’ है विधान अनु इनामदारच्या तोंडचे असून ती असे का म्हणते ? वास्तविक पाहता अनु इनामदारी स्वतंत्र विचाराची, बंधनमुक्त जणूपाहणारी लग्नापूर्वी किमान पाच वर्षे तरी स्वतंत्रपणे राहण्यासाठी आबासाहेबांकड्डन बाहेर राहण्यासाठी परवानगी घेते व स्वतंत्र विचारांनी, स्वतंत्र मनाने, स्वतंत्रपणे राहते. त्याच दृष्टिकोनातून जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा असे ती का म्हणते हाही शोध महत्त्वाचा उरतो. (ii) टैक्सील अपघात झाल्यानंतर भिडे दांपत्य त्या टैक्सी ड्रायव्हरला वाचवू पाहतो आहे पण त्याचे पुढे काय झाले तो एक मनात राहिलेला अनुत्तरित प्रश्न आहे. त्याचे उत्तर शोधणे महत्त्वाचे करते.
(iii) टैक्सीच्या मीटर प्रमाणे माणसाची वृत्ती हवी म्हणजे कशी याचाही शोध घेता येईल.
(iv) माणूस भूतकाळ्यत अडकला की त्याचा भविष्यकाळही खराब होतो. या विधानातील गर्भितार्थाचा शोध घेणे महत्त्वाचे ठरते.
9. किंवा
डॉ. प्रतिभा इंगोले लिखित ‘गढी’ या कथेत बापू गुरुजी या समाजसेवकाच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. गावगाड्यासमोरील प्रश्न सोडविण्यासाठी बापू गुरुजी गावातच आपले कार्य सुरू करतात, गावातील मुलांना शिक्षणासाठी तालुक्याला जावे लागते. त्यासाठी त्यांनी गावातच शाळा सुरू केली. सरकारने त्यांचा आदर्श शिक्षक म्हणून सन्मान केला तेव्हा त्यांना मिळ्ठालेल्या रकमेतून त्यांनी गावात वाचनालय सुरू केले. आजूबाजूच्या खेड्यातून मुले शिक्षणासाठी येतात, त्यासाठी त्यांनी बोर्डिंग बांधले. रात्रंदिवस ते मुलांमध्ये रमत. कंदिलाच्या उजेडात त्यांना शिकवत आणि बोर्डिंगमध्ये शिकत असलेली मुलेही ते म्हणत त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत. गुरुजींच्या सुखात तसेच दु:खातही सामील होत असत. गुरुजींच्या शिकवण्याचे ते चीज करत असत. शाळेच्या नावलौकिकात भर घालत असत. शाळेला ढाली, कप जिंकून देण्यासाठी कृतिशील असत. गुरुजीही सर्व मुलांवर मायेची पाखर घालत असत.
जी मुले सातवी पास होऊन बोडिंग सोडून जात होती त्यांना गुरुजींनी आजूबाजूच्या गावात शिक्षकाची नोकरी लावली त्यामुळे त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न मिटला. ती मुलं गुरुजींना विसरली नाहीत, गुरुपौर्णिमेला येऊन ते गुरुजींना थेट पाया पडत. गुरुजीही त्यांची मनापासून चौकशी करत असत त्यामुळे ती मुले नव्या उत्साहाने परत जाताना गुरुजींनाही गावी येण्याचा आग्रह करत. गुरुशिष्याचे नाते हे अतिशय संवेदनशील मनाने लेखिकेने टिपले आहे. बोर्डिंगमध्ये शिकत असलेले व शिकून बाहेर पडलेल्या प्रत्येक मुलांच्या मनात गुरुजींविषयी आदर, स्नेह, प्रेम, आपलेपणा, जिक्हाळ्व असून माणूस म्हणून ते गुरुजींशी नाते अधिक घट्ट करतात. अशाप्रकारे बोर्डिगात शिकत असलेल्या व शिकून गेलेल्या विद्याध्यांचे बापू गुरुजींबद्दलचे प्रेम दिसून येते.
२. डॉ. प्रतिभा इंगोले लिखित ‘गढ़’ या कथेत बापू गुरुजी या समाजसेवकाच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. गावगाड्यासमोरील महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी बापू गुरुजींनी अनेक महत्त्वाची कार्य सुरू केले. त्यापैकीच एक त्यांनी बोर्डिंग सुरू केले होते. गुरुजीनाही आज राहून राहून बोर्डिंगची व बोर्डिंगमध्ये राहणाज्या संपतची आठवण येत होती. संपनला वडील नसल्याने गुरुजींनी त्यास पितृत्रेम दिले होते. त्यामुळे त्यांच्यातील बापलेकाचे नाते घट्ट झाले होते. एक दिवस गुरुजींना शिक्षण समितीच्या बैठकीसाठी अकोल्याला जायचे होते आणि संपत त्यांना न जाण्याविषयी आग्रह धरत होता. कारण ते तिकडे गेले की दोन-चार दिवस येतच नाहीत अशी त्याची तक्रार
होती. मात्र गुरुजींना शिक्षण समितीच्या बैठकीला जावेच लागते. ते अकोल्याला गेले आणि इकडे पटकीच्या आजाराने ‘संपत’ चा मृत्यू झाला. गुरुजी आल्यानंतर त्यांना संपतच्या मृत्यूने खूप दुःख झाले. ते धाय धाय रडले. ‘संपत्या, तुले मी दवापानी नायी दिवू शकलो रे’ म्हणून पुन: पुन्हा रडले आणि मनाशी निश्चय केला की गावात दवाखाना झालाच पाहिजे. त्यांना संपतच्या आठवणीने राहून राहून गलबलून येत होतं. वाननदीला पूर येत होता. तो गढीपर्यन्त जात होता. तशातही गढी तशीच तग धरून उभी असलेली पाहून वाननदीनेच पुन्हा माघार घेतली. गुरुज्जींसमोरही अनेक संकटे, अडचणी येत होत्या परंतु गुरुजी सर्व विसरून पुन्हा गावाच्या सुधारणांसाठी प्रयलशील झाले.
10. कर्वी
सुप्रसिद्ध कथालेखक व.पु. काळे लिखित ‘रोध’ या कथेतील ‘टैक्सी ड्रायक्हर’ हे महत्त्वाचे पात्र असून त्यांची ही कथा ‘मी माणूस शोधतोय’ या त्यांच्याच कथा संग्रहातून घेतली आहे. ‘ शोध’ या कथेलाच आकस्मिकपणे कलाटणी देणारी ही व्यक्तिरेखा, जीवनातील वास्तवाचा शोध घेणारी आणि वाचकांनाही वास्तवाचे भान आणून देणारी जीवनातील सत्याचा शोध घेऊन जगायला शिकवणारी तितकीच भावस्पर्शी असल्याने ती मनापासून आवडते. या कथेत ही व्यक्तिरेखा येते ती भिडे दांपत्यांना घरी पोहोचविण्याच्या निमित्ताने.
एज्युकेटेड, नवशिका असून मुंबईमध्ये नुकतीच टैक्सी-चालक म्हणून व्यवसायाला सुरुवात केलेली परंतु अचानक भिडे दांपत्यास घरी पोहोचवत असता रात्रीच्या वेळ्ठी टैक्सीखाली म्हातारा आला. मात्र त्यात टैक्सी ड्रायव्हरची चूक नव्हती त्यामुले त्याच्या या चांगुलपणामुळे भिडे दांपत्याने त्यास मदत करायचे ठरवले. त्यासाठी ते त्याच्याबरोबर लमिंग्टन रोडवरील पोलीस स्टेशनलाही गेले ते टैक्सी ड्रायव्हरच्या बाजूने जबाब देण्यासाठी. अनु इनामदारच्या एक रुपयाच्या नोटेचा शोध घेण्यासाठी तो तत्परतेने मदत करतो. ती नोट तो अनुला मिळ्बून देतो. त्यासाठी तो हॉटिल मालकाला मोठ्या युक्तीने सुटे पैसे मागतो. येथे त्याचे युद्धिधातुर्य लक्षात आल्यावाचून राहात नाही. नोटेचा इतिहास जाणून घेतल्यानंतर टैक्सी ड्रायव्हर मानवी जीवनातील वास्तवदर्शी चित्र तिच्यासमोर उभे करतो व तिला पेशंटमध्ये न गुंतण्याचा सल्ला देतो. कारण प्रत्येक माणूस जर भूतकाळ्ठात रमायला लागला तर त्याचे भविष्य काय ? त्याचा भविष्यकाळही खराब होणार. त्यासाठी माणसाची नजर ड्रायक्हरसारखी समोर पाहणारी असली पाहिजे.
पेशंट दगावला की कॉटवरचे बेड बदलायचे. कॉटचा नंबर तेवढा लक्षात ठेवायचा व येणान्या नव्या पेशंटचे स्वागत करायचे इतके तटस्थ राहून जीवनव्यवहार हाताळले पाहिजेत त्यासाठी काही गोष्टी हेतुपुरस्सर विसरायला पाहिजेत तरच मानवी जीवन सुन्दर होईल. आणि महत्त्वाचे म्हणजे ज्या गोष्टी मिळ्ठतात त्यासाठी जरूर प्रयल करावेत परंतु एखादी गोष्ट मिळणारच नसेल तर….’ माझी मुलगी मला सोडून कायमची गेली तेब्हा मी काय करायचे हा हृदयस्पर्शी तितकाच अनुत्तरित प्रश्न सर्वांसमोर तो उभा करतो आणि जीवनातील वास्तव सत्य स्वीकारायलाही तो शिकवतो. खज्या अर्थने माणूस जोपर्यन्त जिवंत आहे तोपर्यन्तच त्याचे मूल्य.
एकदा का ते हातातून गेले की कितीही प्रयत्न केले तरी त्याचा उपयोग होत नाही. त्याचा कितीही शोध घेतला तरीते हाती येत नाही जे भाग्यात असते तीच गोष्ट परत मिळते. मानवी जीवनाचे हे तत्त्वज्ञान मांडणारी टैक्सी ड्रायव्हर ही व्यक्तिरेखा म्हणूनच मनापासून सर्वाना आवडते.
विभाग ४: उपयोजित मराठी
उत्तर ४.
(१) १. मुलाखतीचे हेतू पुढीलप्रमाणे:
(i) मुलाखत देणान्याच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समजून घेण्यासाठी मुलाखत महत्त्वाची ठरते.
(ii) व्यक्तीच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी मुलाखत घेतली जाते.
(iii) असामान्य व्यक्तीच्या संघर्षगाथा ह्मा जनसामान्यांच्या जाणून घेण्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी.
(iv) व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाबरोबरच त्यातील माणसूपण जाणुन घेण्यासाठी.
२. एखाद्या घटनेविषयीची सखोल माहिती समजून घेण्यासाठी.
३. समाजप्रबोधन करण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी.
४. आधुनिक काळ्ठात दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे स्पर्धा जशी तंत्रज्ञानाची आहे. तशीच ती दोन व्यक्तींमध्येसुद्धा आहे आज नोकरीसाठी तसेच विशिष्ट अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुलाखत हा महत्त्वाचा घटक मानला जातो. बदलत्या काळ्यात मुलाखतीचे स्वरूप बदलू लागले आहे. उमेदवाराची पदवी. विषयज्ञान भाषिक कौशल्ये यासोबतच उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व आज केंद्रस्थानी आले आहे. उमेदवार बोलतो कसा. पोशाख कसा आहे यापेक्षा स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आवश्यक कौशल्ये उमेदवाराजवळ आहेत का याची चाचपणी केली जाते. विविध कंपन्यांमध्ये मुलाखतीदरम्यान उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू जाणून घेण्याचा प्रयत्न प्रथमतः केला जातो. कंपनीचे अपेक्षित उद्दिष्ट. कामाचे तास. सहकान्यांशी असणारे मैत्रीपूर्ण संबंध गटप्रमुख वा गटकार्यांची क्षमता, कामाची विभागणी, वेळेचे बंधन, नियोजित बैठका, समूह सदस्यांचे प्रश्न प्रसंगी करावे लागणारे समुपदेशन इत्यादी अनेक बाबी नजरेसमोर ठेवून उमेदवाराची मुलाखत घेतली जाते. सहकान्यांच्या भावना, विचार सूचना, समस्या याबद्दल उमेदवाराकडे असलेली स्वीकारार्हता आणि मार्ग काढण्याची तत्परता, विवेकबुद्धी प्रसंगावधान अशा गोष्टींना मुलाखतीत महत्त्व दिले जाते. मुलाखतीला आलेला उमेदवार दिसतो कसां. बोलतो कसा यापेक्षा विचार कसा करतो याकडे अधिक लक्ष दिले जाते. उमेदवार भावनिक, वैचारिक, मानसिक पातळ्ठीवर जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. उमेदवाराच्या ‘बाह्यरंगा’ ‘ पेक्षा’ ‘अंतरंग’ जाणून घेणे आवश्यक असते.
(२) माहितीपत्रकाचे स्वरूपः विशिष्ट अशी माहिती देणारे परिचयात्मक पत्रक म्हणजे माहितीपत्रक. माहितीपत्रक
सर्वसाधारणपणे उत्पादने, सेवा, संस्था लोकापर्यन्त पोहोचविण्याचे साधन असून नवनव्या योजनांकडे, उत्पादनांकडे, संस्थांकडे लोकांनी डोकावून पाहावे यासाठीची ती एक खिडकी आहे. थोडक्यात माहितीपत्रक हे लिखित स्वरूपाचे जाहीर आवाहन असते जे जनमत आकर्षित करते. माहिती घेणारा व माहिती देणारा यांच्यात नाते निर्माण होण्यास माहितीपत्रकाची मदत होते. नवीन ग्राहक मिळविणे, नवीन बाजारपेठ काबीज करणे हे माहितीपत्रकामुळेच सहज शक्य होते. ग्राहकाला हवी असलेली माहिती माहितीपत्रकामुळे ग्राहकाकडे सतत उपलब्ध राहू शकते. महत्त्वाचे म्हणजे माहितीपत्रक कमी वेळात, कमी खर्चात ग्राहकांपर्यन्त घरबसल्या पोहोचवता येते आणि म्हणूनच माहितीपत्रक हे अप्रत्यक्षपणे जाहिरातीचे कार्य करते. माहितीपत्रक वाचताक्षणीच लोकांच्या मनात उत्साह, कुतूहल, उत्कंठा निर्माण होताच माहितीपत्रकाचा हेतू साध्य झाला आहे असे समजले जाते.
(३) अहवाललेखनाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील.
(i) वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टताः अहवाललेखन करत असता महत्त्वाच्या बार्बींचा निर्देश सुस्पष्टतेने व वस्तुनिष्ठ स्वरूपात करावा लागतो. उदा. तारीख, वार, वेळ, ठिकाण, सहभाग घेणान्याची नावे, पदे, घटना, हेतू, संख्यात्मक माहिती, निष्कर्ष…..इत्यादी.
(ii) विश्वसनीयता: अहवाललेखनातील विश्वासाहं माहिती व तथ्य यांच्या नोंदीमुळे अहवालाला विश्वसनीयता प्राप्त होते. या विश्वसनीयतेमुळेच अनेकदा गुंतागुंतीच्या समस्यांमध्ये अशाप्रकारचे अहवाल पुरावा म्हणून वापरले जातात, हे त्या अहवालाचे खास वैशिष्ट्य होय.
(iii) सोपेपणा: अहवाललेखन करत असताना सर्वसाधारणपणे सर्वसामान्य व्यक्तीलाही अशा अहवालाचा आशय समजावा अशी अपेक्षा असते. त्यामुळे त्याची भाषाही सोपी असते. गरज नसल्यास त्यात बोजड शब्द, तांत्रिक शब्द वापरले जात नाहीत. अलंकारिक वर्णनशैली, नट्यपूर्णता, अतिशयोक्ती अशा गोष्टी टाळल्या जातात, मात्र अहवाललेखन करत असताना त्या त्या क्षेत्राशी संबंधित संज्ञा, प्रक्रिया याविषयी पारिभाषिक शब्द वापरले जातात.
(आ) (१) मुलाखतीची पूर्वतयारी ही मुलाखत उत्तम होण्यासाठी करावी लागते. पूर्वतयारीचा गृहपाठ हा यशस्वी मुलाखतीचा पाया असून मुलाखतीसाठीची महत्त्वाची पूर्वतयारी म्हणजे ज्यांची मुलाखत घ्यायची आहे त्यांच्याबद्दलची आवश्यक ती मुलाखत घेणान्याकडे अगोदरपासूनच उपलब्ध असणे आवश्यक असते. उदा. ज्यांची मुलाखत घ्यायची आहे त्यांचे पूर्ण नाव, असल्यास टोपणनाव, वय, जन्मदिनांक, जन्मस्थळ, पत्ता, शिक्षण, कौटुंबिक माहिती, कर्तृत्व, सध्याचा हुद्दा, मिळ्ठलेले मानसन्मान, पुरस्कार, लेखनकार्य, वैचारिक पार्र्वभूमी इत्यादी माहिती मुलाखत घेण्यापूर्वीच उपलब्ध असार्वी लागते. मुलाखत घेणान्याने मुलाखतीच्या विषयासंबंधी सखोल वाचन केलेले
असावे मुलाखतीचे उद्दिष्ट समजून घेतले पाहिजे. मुलाखत घेण्यासाठी मुलाखतीचा विषय आणि उद्दिष्ट लक्षात घेऊन प्रश्न तयार केले पाहिजेत. महत्त्वाचे म्हणजे मुलाखतीची वेळ लक्षात घेवून त्यानुसार प्रश्नसंख्या निश्चित करावी लागते. प्रश्नांचा क्रमही योग्य पद्धतीने लावणे गरजेचे ठरते. मुलाखतीचे स्वरूप नेमके कसे आहे ती प्रकट असणार की लिखित स्वरूपाची, श्रोता/वाचक नेमका कोणता असणार ? मुलाखत प्रत्यक्ष श्रोत्यासमोर आहे की रेडिओसाठी की टी.क्ही. साठी हेही माहित असले पाहिजे. मुलाखतीसाठी बैठक व्यवस्था, ध्वनिक्षेपक व्यवस्था, वातावरण निर्मिती, गरजेनुसारचे संदर्भ ग्रंथ, चित्रे, वाद्य, वस्तू इत्यादी गोष्टीही अगोदरच पाहून ठेवणे चांगले आवश्यकता वाटल्यास मुलाखत देणान्यांना अगोदर भेटून घ्यावे, चर्चा करावी असे केल्यास मुलाखत प्रत्यक्ष घेताना सोपे जाते. आकाशवाणी वा दूरदर्शनवरील मुलाखती ऐकल्यास मुलाखतीच्या पूर्वतयारीची दिशा मिळते. मुलाखतीचा समारोप.
मुलाखत घेत असता ती अतिशय रंगात येते आणि वेळ संपत आल्याने थांबणेही आवश्यक ठरते. त्यामुळे मुलाखतकाराने आपले भाषिक कौशल्यपणाला लावणे आवश्यक असते. श्रोत्यांनाही मुलाखत अजून असायला हवी होती असे वाटले पाहिजे असा मुलाखतीचा समारोप महत्त्वाचा असतो. हा समारोप करत असताना मुलाखतकाराने या टप्प्यावर स्वतःसाठी वेळ जास्त घेतला तरी चालते. प्रश्नांऐवजी परिणामकारक व प्रभावी निवेदन महत्त्वाचे ठरते.
मुलाखत योग्य वेळी, योग्य ठिकाणी संपवावी, त्यासाठीची वेळ कोणती ? इथे वेळ अशी असावी की श्रोत्यांना जराही अंदाज यायला नको. अनपेक्षितपणे ती संपविता यावी. श्रोत्यांना हवीहवीशी वाटत असतानाच मुलाखत संपवली पाहिजे. मात्र मुलाखत अर्धवट राहणार नाही याचीही दक्षता घेणे गरजेचे असते. त्या मुलाखतीतून खूप से काही मिळाले आहे असे समाधान श्रोत्यांना वाटले पाहिजे. मुलाखत संपल्यानंतरही त्यातील काही अविस्मरणीय संवाद मनात आठवत श्रोत्यांनी राहिले तरच मुलाखत यशस्वी झाली असे म्हणता येते.
(२) माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक होय. उत्पादने, सेवा, संस्था लोकपर्यन्त पोहोचविण्याचे साधन म्हणजे माहितीपत्रक असून माहितीपत्रकाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
१. माहितीला प्राधान्य
३. वेगळेपण
२. उपयुक्तता
४. आकर्षक मांडणी
५. भाषाशैली…..इत्यादीयैकी काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे.
९. आकर्षक मांडणी: माहितीपत्रक तयार करत असताना त्यातील मांडणी आकर्षक असली पाहिजे. सर्वसाधारण माहिती नसावी तर माहितीपत्रक पाहताक्षणी ते वाचलेच पाहिजे असे वाटणे आवश्यक असते. कागद दर्जेदार असावा,
रंगीत छपाई, मुखपृष्ठ चित्ताकर्षक असावे. आकारही योग्य असावा. शीर्षक बोधवाक्य उसठशीत असावे. थोडक्यात माहितीपत्रकाची मांडणी वेधक आकर्षक करण्यासाठी गरजेनुसार त्या त्या क्षेत्रातील कुशल कलाकार, चित्रकार, संगणक तण्जांची मदत घ्यावी जेणे करून माहितीपत्रक आकर्षक होईल.
२. भाषाशैली: माहितीपत्रक केवळ पाहिले जात नाहीतर ते वाचले सुद्धा जाते. आणि ते वाचता यावे. वाचावेसे वाटण्याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी भाषारैली आकर्षक असावी उदा. आमच्या ‘हिरवाई’ या फार्म हाऊसवर राहायला आलात तर तुम्ही इतके आनंदी असाल की इथे तुम्ही निसर्गसौदर्यांत रंगून जाल, तुम्हाला दु:खाचा विसर कायम पडेल. एवढे सर्व म्हणण्यापेक्षा ‘तणावाला अजिबात वेळ नाही’ एवढ्या चार शब्दांत माहिती देणे म्हणजे अशाप्रकारची मनाला भिडणारी शब्दयोजना करणे गरजेचे उरते. मोजक्या पण प्रभावी व परिणामकारक शब्दांतून माहितीपत्रकाची मांडणी असावी.
(३) अहवाल्लेखनाचे स्वरूप व आवश्यकता: शाळ्य अथवा कनिष्ठ-वरिष्ठ महाविद्यालयात विविध प्रकारचे कार्यक्रम होतात. उदा. वर्क्तृत्वस्पर्धा, स्नेहसंमेलन…..इत्यादी, शासकीय, सामाजिक आणि आर्थिक, संस्थांमध्येही कार्यक्रम केले जातात. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर त्या कार्यक्रमाविषयी अहवाललेखन केले जाते. अहवाललेखन केल्यामुळे त्या त्या कार्यक्रमाचा तपशील वाचकांना के क्हाही प्राप्त होतो. त्यादृष्टीने अहवाललेखन महत्वाचा असतो.
अहवाललेखनाचे स्वरूपः कार्यालय, संस्था वा महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमाची, समारंभाची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणे म्हणजे अहवाललेखन होय. ही नॉद्द करताना कार्यक्रमाची तारीख, वेळ सहभागी व्यक्ती, समारोप इत्यादी मुद्यांचा अहवाललेखनात समावेश केला जातो. कार्यक्रम वा समारंभ प्रत्यक्षात सुरू झाल्यापासून ते थेट तो समारंभ वा कार्यक्रम संपेपर्यन्त क्रमाक्रमाने तो कशाप्रकारे पूर्ण झाला याची आवश्यक त्या तपशीलासह नोदद केली जाते. जी भविष्यकाव्यच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त उरते. एखाद्या विषयाच्या अनुषंगाने, त्यातील समस्येबाबत माहिती संकलनाचे, सर्वेक्षणाचे, विशिष्ट विषयासंबंधित नेमलेल्या आयोगाचे अहवाल असतात, याव्यतिरिक्त प्रगती अहवाल, तपासणी अहवाल, चौकशी अहवाल, आढावा अहवाल, मासिक आणि वार्षिक अहवालही असतात. अहवाललेखनाची आवश्यकता.
कार्यक्रम वा समारंभाच्या नोंदी ठेवल्या नसतील तर भविष्यकाळ्यत संस्थेचा विकास, परंपरा इत्यादी माहिती मिळ्खण्यात अडचणी निर्माण होतात या अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी अहवाललेखन लिहिणे अत्यावश्यक असते. भविष्यकालीन नियोजनासाठीही अहवाललेखन महत्त्वाचे असतात. विविध संस्था, लघु उद्योग तसेच मोठे उद्योगधंदे तसेच ग्रामपंचायत ते महानगरपालिका
अशाठिकाणी होणान्या घड़ामोडींना अधिकृतता प्राप्त होण्यासाठी अहवाललेखन महत्त्वाचे ठरते एखादया समस्येसंबंधी निर्णय घ्यायचा असेल, सार्वजनिक क्षेत्रात एखादा महत्वाकांक्षी उद्योग वा उपक्रम सुरू करण्यासाठी अगोदर योग्य ती माहिती घेऊन, जी पूर्वी अहवाललेखनात नोंद करून टेवली आहे. त्यानुसार अहवाललेखन करणे महत्त्वाचे ठरते.
( नालंदा शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबा साहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय आणि कला, विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय नांदेड जागतिक पर्यावरण दिन: वृक्षारोपण कार्यक्रम अहवाल
दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘जागतिक पर्यावरण दिन बुधवार दि. जून २०२० रोजी सकाळी आठ वाजता महाविद्यालयात साजरा करण्यात आला. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कनिष्ठ महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या पटांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
वृक्षारोपण कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शीतल साने यांनी अध्यक्षस्थान भूषविले. शहरातील पर्यावरण प्रेमी आणि निवृत्त प्रशासकीय अधिकारी मा. श्री अर्जुन नवलेकर प्रमुख पाहुणे उपस्थित होते. कनिष्ठ महाविदयालयातील अध्यापक, शहरातील निमंत्रित नागरिक आणि विद्यार्थी मोठ्य संख्येने उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या ‘गुलाब’फुलाच्या रोपाला पाणी देऊन कार्यक्रमाला आरंभ करण्यात आला. महाविद्यालयाचे जीवशास्त्र विभागचे प्रा डॉ. अनिल राऊते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व प्रास्ताविकात नमूद केले. महाविद्यालयाचे आचार्य डॉ. आकाश परांजपे यांनी प्रमुख पाहुण्यांना शाल आणि तुळसीचे रोप देऊन स्वागत केले. बारावी कला शाखेची विद्यार्थी मृण्मयी डेकर हीने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
यानंतर प्रमुख पाहुणे मा. श्री अर्जुन नवलेकर यांनी विदयाध्थ्यांशी संवाद साधला. सर्वप्रथम त्यांनी उपस्थितांना पर्यावरण दिनाची माहिती दिली वेगवेगळया वृक्षांची नावेव उपयोग सांगितले. वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व ऐकताना उपस्थित श्रोते भारावून गेले होते. अर्जुन नवलेकर यांनी गोष्टीच्या माध्यमातून वृक्षांची उपयुक्तता अधोरेखित केली. औषधी वनस्पतींची महत्त्वाची माहिती त्यांनी भाषणातून सांगितली.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शीतल साने यांनी अध्यक्षीय भाषणात पर्यावरणाविषयी तज्ञ व्यक्तींचे विचार सांगितले.
यानंतर उपस्थित सर्वजण वृक्षारोपणान सहभागी झाले. प्रथमत: प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आंबा आणि चिंच यांचे रोपण करण्यात आले. प्राचार्याच्या हस्ते निलगिरीच्या रोपाचे
रोपण करण्यात आले. याववर्षीच्या वृक्षारोपण सोहळयात कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग प्रतिनिधींनी देखील वृक्षारोपण केले. गुलाब, मोगरा तुव्स, जास्वंदी अशा फुलांच्या रोपांचे रोपण चार वर्ग प्रतिनिधीनी अनुक्रमे केले. वृक्षारोपण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल गोखले या बारावीतील विद्याध्यनिे केले होते. भूगोल विभागातील प्रा गीता देशमुख यांनी उपस्थित सर्वांचे ऋण व्यक्त केले.
दोन तास सुरू असणान्या कार्यक्रमाची सांगता वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ‘ या संत तुकाराम महाराजांच्या अभंग गायनाने करण्यात आली.
11. विभाग ५: व्याकरण लेखन
उत्तर ५.
१. माणसं स्वतःचा छंद नेहमी विसरतात
२. लई हाड हैत तुझया अंगात!
(२) सामासिक शब्द विग्रह
१. अक्षरानंद
२.
प्रत्येक ठिकाणी कर्मधारय समास अव्ययीभाव समास
(३) २. कर्तरी प्रयोग २. कर्तरी प्रयोग
(४) २. अतिशयोक्ती अलंकार
२. अर्थान्तरन्यास
(4) १. Decoding
२. Civil defence
१. गर्दीचा भस्मासुर
मागे एकदा एक सिनेमा पाहिला होता. त्यात नायक जगाला कंटाळून आत्महत्या करण्याचे ठरवितो आणि डोंगरावरून उडी मारण्यासाठी जातो. तेथे जाऊन पाहतो तो काय ? जीव देणान्या लोकांची भलीमोठी रांग लागलेली दिसते. त्याचा नंबर येईपर्यत बराच वेळ जातो. तोपर्यंत त्याच्या मनातले विचार बदलतात. यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी जेथे जाऊ तेथे बेसुमार गर्दी हे आजचे वास्तव आहे.
दुकाने, शाळा, दवाखाने, हॉटिल्स, चित्रपटगृहे, बस-रेल्वे स्थानके सगळ्ठीकडे तुडुंब गर्दी आणि रांगा लागलेल्या दिसतात. माणसांना निवांतपणा हवा असतो आणि त्यासाठी ती नवनवीन ठिकाणे शोधत असतात. पण अल्पावधीतच त्या ठिकाणाचा पत्ता इतरांना लागतो आणि तेथे गर्दी ओसंड् लागते. देवाच्या देवळ्यात तर शांतता औषधालाही उरलेली नाही. मनासारखे देवदर्शन आणि हदयसंवाद देवळात करावा, अशी स्थिती राहिलेली नाही. आजकल भक्तीला जणू महापूर आला आहे. दर्शनासाठी मैलोन्मैल रांगा लागत आहेत आणि देवव्यतील गर्दीची बंदोबस्त करण्यासाठी पोलीस आणि सुरक्षाव्यवस्था तैनात करावी लागत आहे. पूर्वी गर्दीची काही मोजकी ठिकाणे होती. आता पाहावे तर गर्दी कुठेही आहे. सगळ्ठीकडे गर्दी झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढून स्मशानात अग्निसंस्कारासाठीही गर्दी वाढली आहे. ही माणसांची अनिवार गर्दी पाहून मर्ठेकरांसारखा कवी वारुळ्ठतून बाहेर पडणान्या मुंग्यांचा अनुभव घेतो. लोकलमधून बाहेर पडणारा माणसांचा लोंढा बघून ‘मी एक मुंगी, हा एक मुंगी! पाच येथल्या पाच फिरंगी’ असे उद्गार कवी काढतो.
गर्दी करायला माणसांना कोणतेही कारण पुरते. धार्मिक कारण तर फारच संवदेनशील प्रकरण! तिथे कुणाला अडवता येतच नाही. त्यातूनच मांढरदेवी यात्रेतील अपघात, नाशिक कुंभमेळ्यात झालेली चेंगराचेंगरी अशा घटना घडतात, हजयात्रा किंवा कुंभमेळा चेंगराचेंगरी झाल्याशिवाय पूर्ण होतच नाहीत.
कुठे कपड्यांचा सेल लागला आहे, काही फुकट मिळ्ते आहे असे कळ्टले की, माणसे कशाचीही शहानिशा न करता तिकडे धावत सुटतात. फसवणूक करून घेतात, पण गर्दी करतात.
दहावी-बारावीचे निकाल लागले की, पुढच्या प्रवेशासाठी फॉर्म घ्यायला प्रचंड रांगा. पाठस पडायला लागला की, तो पाहायला लोणावळा, महाबळेश्वर, ताम्हिणी घाट इथे गर्दी. थंडीचा मौसम आला की, पर्यटन स्थळ्वांवर गर्दी! त्यामुळे होते काय की, निवांतपणाच्या अपेक्षेने माणूस बाहेर पडतो तो त्याला मिळत नाही आणि शेवटी घर बरे, असे त्याला वाटू लागते.
कधीतरी एखादा ढोंगी साधुबाबा तीर्थाने, भस्माने रोग बरे करतो असे प्रसिद्ध होते. त्या वेळ्ठी तर गर्दीचा महापूर लोटतो. लोकांच्या अंधश्रद्धेची कीव येते आणि आपल्या देशात किती पीडित लोक आहेत, या जाणिवेने मन अस्वस्थ होते.
गर्दी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे लोकसंख्येत झालेली प्रचंड वाढ. आज आपले राष्ट्र लोकसंख्येच्या दृष्टीने दुसन्या क्रमांकावर जाणे निश्चितच भूषणावह नाही. यातून अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या अधिक उग्र होत जाणार आहेत. अन्नधान्याचा तुटवडा, बेकारी, रोगराई, विषमता, कुपोषण, भ्रष्टाचार व प्रदूषण ही सगळी या ‘गर्दी’ नावाच्या विषवृक्षाची फळे आहेत. खाणारी तोंडे जास्त-अन्नधान्य कमी, काम करु शकणारे हात जास्त-कामे कमी. त्यामुळे बेकारी, सगळीकडे तीव्र जीवनकलह आणि जीवघेणी स्पर्धा असा सगळा असमतोल गर्दीमुळे झाला आहे.
12. “अशा येथल्या संसारात जगण्याचाही चुकला पाढा आणि शेवटी परिस्थितीचा गक्याखालती उतरे काढा”
हा अनुभव सर्वानाच येत आहे. तो कड् काढा पिताना तोंड जसे कडवट होते तसे आंबट चेहरे करून ‘जगण्याची सक्ती’ सारे सहन करीत आहेत.
ही गर्दी कमी करायची असेल तर लोकसंख्या नियंत्रण आणि शिक्षण या दोन उपायांचा अवलंब केला पाहिजे. आज संख्यानियंत्रणाचे महत्त्व पट् लागले आहे. पण ते सुशिक्षित आणि विचारी लोकांना ! झोपडपट्टीत आणि बकाल वस्तीत लोकसंख्या वाढतच आहे. कारण तेथे शिक्षणाचा अभाव आहे. त्या लोकांच्या प्रबोधनाची फार मोठी गरज आहे. तिथले आरोग्याचे आणि प्रदूषणाचे प्रश्न सोडविले पाहिजेत. नाही तर हीच गर्दी कधी उग्र रूप धारण करेल, सांगता येत नाही, गर्दीच्या असंतोषाचे रूपांतर क्रांतीत होते, हे आजवर इतिहासाने अनेक वेळा सांगितले आहे. गर्दीच्या शक्तीला विधायक वळण लावणारा कोणी चतुर योजक नसेल तर गर्दीचा भस्मासुर निर्दयपणे गर्दीला चिरडून टाकील.
13. २. कुष्ठरोग्यांचा आधार : बाबा आमटे
हाता-पायांची बोटे झडलेली, शरीरावरच्या जखमा लक्तरात कोबलेले, भीक मागणारे, असहाय महारोगी पाहिले की, आपण चटकन त्यांच्यापासून चार हात दूर जातो. त्यांचा स्पर्श होक नये म्हणून आपण फार काळजी घेतो. परंतु या महाराष्ट्राच्या भूमीत असा एक महामानव होऊन गेला ज्याने या महारोग्यांना हदयाशी धरले, त्यांना प्रेम दिले, व्याधीतून मुक्त केले आणि भीक न मागता कष्ट करून, स्वावलंबनाने आणि आत्मसन्मानाने जगायला शिकविले.
इ.स. १९९४ मध्ये नागपूर येथे त्यांचा जन्म झाला. त्या महामानवाचे नाव होते मुरलीधर देविदास आमटे. म. गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. म. गांधी त्यांना ‘अभय साधक’ म्हणत. एकदा वरो च्याहून सफाई कार्यक्रम आटोपून येत असताना रस्त्याच्या कडेला मनुष्यत्वाच्या सर्व खुणा लुप्त झालेला, ज्याच्या सर्वांगात अळ्या वळ्वळ्ठत आहेत, असा माणूस त्यांनी पाहिला, त्याला पाहून ते शहारले. एक तरट त्यांच्या अंगावर टाकून ते घरी आले. आपल्या पत्नीला साधनाताईना त्यांनी ही हकीकत सांगितली आणि स्वतःला दूषणं दिली. हिंस्त्र श्वापदं, नामांकित मल्ल यांच्यासमोर शड्ड ठोकून उभे राहणारे आपले मन एका ओंगळ मांसाच्या गोळ्याला पाहून कचरले, याचे त्यांना मनोमन वैषम्य वाटले. त्याच रात्री त्यांनी पत्नीच्या साक्षीने कुष्ठरोग्यांच्या सेवेला जीवन वाहण्याचा संकल्प केला.
१९४९ साली काही मित्रांच्या साहाय्याने त्यांनी ‘महारोगी सेवा समिती’ या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर सहा कुष्ठरोग्यांना बरोबर घेऊन आनंदवनाची निर्मिती केली. अपंगांसाठी, वृद्धांसाठी आश्रम असे एकापाठोपाठ एक भव्य प्रकल्प उभे केले. याच सुमारास त्यांनी श्रमाश्रमाचा अभिनव प्रयोग सुरू केला. सगळ्या जातीच्या लोकांनी एका ठिकाणी राहून खायचं. तो साम्यवादाचाच एक प्रयोग होता. महार, मांग, मेहेतर, चांभार, आणि बुरुड अशा अठरापगड जार्तींना बरोबर घेऊन हा अभिनव प्रयोग त्यांनी केला. सकाळी उठून प्रत्येक जगण आपल्या कामाला जाई. सर्वांची कमाई एकत्र करून त्यातून धान्य, मीठ-मिरची आणून एकत्र जेवण होते असे. अनाथ मुलासांठी त्यांनी गोकुळ हा प्रकल्प सुरू केला. आपल्या सर्व प्रकल्पांची सुरुवात उघड्या आणि बरड माळ्रानावर केली. गोम, विंचू, इंगळ्या आणि साप यांची मालकी त्या जागेवर होती. कार्यकर्तें आणि हे प्राणी यांना एकमेकांविषयी वाटणारी भीती हव्बूह्ूू कमी झाली. मग तिथे रानडुक्करं आणि वाघ यांनाही प्रवेश मिळाला. या सर्व कामात त्यांना पत्नी साधनाताईंची मनापासून साथ मिव्यली. माळ्रानावरचा संसार त्यांनी फुलविला. माळरानाचं रूपांतर ‘ आनंदवनात’ झालं. बाबांना प्रत्येक प्रकल्पात कष्टाची साथ मिळ्यली. अनाथ आणि पंगू मुलींच्या त्या माता बनल्या. खरोखर ‘हे विश्वची माझे घर’ अशा वृत्तीने त्या जगल्या. एकप्रकारे हे सतीचं वाणच होतं.
१९८५ साली बाबांनी शांतता आणि पर्यावरण रक्षणासाठी काश्मीर ते कन्याकुमारी ‘भारत जोडो’ आंदोलन छेडलं. या आंदोलनाचा दुसरा अध्याय १९८८ साली अरुणाचल ते ओखा असा पार पडला.
१९९० साली आनंदवनाचा कारभार आपला मुलगा विकास याच्या हाती सोपवून ते नर्मदेकाठी वास्तव्याला आले. तिथे त्यांच जवळजवळ एक तप वास्तव्य होतं. पंजाबमध्ये खलिस्तावाद्यांची चळवळ जोरात होती, तेव्हा सलोखा निर्माण क्हावा, शांतता निर्माण कावी म्हणून ते पंजाबमध्येही गेले होते.
त्यांच्या या कार्यासाठी त्यांना रैमन मॅगसेसे पुरस्कार, कुष्ठरोग्यांच्या क्षेत्रातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार, ‘डेमियन डटन’, सी. क्ही, रामन पुरस्कार, पद्मश्री, म. गांधी पुरस्कार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे पुरस्कार मिळाले. परंतु या पुरस्कारमुळे त्यांचा मोठेपणा वाढला नाही तर या पुरस्कारांची अधिक प्रसिद्धी झाली असे म्हणावे लागेल.
बाबा आमटे यांचे संवेदनशील मन कविता न करते तरच नवल होते. ‘ज्वाला आणि फुले’ हा त्यांचा काव्यसंग्रह खूप गाजला. रचनात्मक कार्याची आणि नवनिर्मितीची त्यांना इतकी ओढ होती की, दुःख करायला आपल्याकडे वेळ नाही असं ते सांगतात. माणसांप्रती असलेली त्यांची संवेदना प्राण्यांबाबतही तितकीच हलुवार होती.
धाडस हा त्यांचा गुण केवळ व्यवहारातच दिसत नाही तर मनसुद्धा नवनवीन क्रांतिकारी, धाडसी विचारांनी भरलेले होते. कुष्ठरोगावर निर्माण केलेली नवीन लस, तिचा परिणाम पाहण्यासाठी त्यांनी आपल्या शरीरात टोचून घेतली. कुष्ठरोग्यांविषयीची तळमळ जशी यातून दिसते, तसंच असामान्य धैर्यही दिसून येतं.
आज आमटे यांची तिसरी पिढी आनंदवनात कार्यरत आहे. त्यांचा नातू दिगंत हा प्रकाश आमटे यांचा मुलगा. त्यानेही हेमलकशाच्या कार्यालया वाहून नेण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे आनंदवनाचं स्वरूपच पालटलं आहे. ते आता महारोग्यांच वसतिस्थान राहिलेलं नाही, तर एक प्रेरणास्थळ झालं आहे. देश-विदेशातून ते पाहायला हजारो लोक येतात. लंगड्या आणि थोट्या माणसांनी केलेली निर्मिती, एकमेकांना मिळविलेले बळ, एकमेकांचे पुसलेले अश्रू पाहून थक्क होतात. त्यांनी निर्माण केलेल्या वस्तू निर्यात केल्या जातात. या सगळ्याचं श्रेय बाबा आमटे या महामानवाकडे जातं. त्यांना सावलीसारखी साथ देणान्या साधनाताईकडे जातं. त्या दोघांनाही विनम्र अभिवादन।
14. ३. बेकार तरुणाचे मनोगत!
‘एवढा मोठा घोडा झाला तरी चार पैसे मिळवायची अक्कल नाही. नुसता खायला कहार आणि धरणीला भार!’ परवापर्यंत माइया भुकेच्या वेळा काटेकोर सांभाळणारी माझी आई! माझं शिक्षण संपून वर्ष संपलं तरी मला नोकरी मिळेना, हे पाहून असं बोलू लागली आणि वडिलांनी बोलणंच बंद केलं, घरात आलो की, घुसमटल्यासारखं होतं मला कोणी मोकळेपणाने बोलत नाही की मला काही सांगितलं जात नाही. घरातलं दिसेल काम करतो आणि पानात पडेल ते खातो!
या बेकारीमुळे अशी भयंकर उपेक्षा मी सध्या अनुभवत आहे. मला तरी बेकार राहण्याची हौस आहे का ? नोकरीसाठी मीही रोज वणवण फिरतो आहेच. रोज वर्तमानपत्र आलं की, आधी जाहिराती पाहतो. मला योग्य असेल अशा ठिकाणी अर्ज करतो, दहा जाणांना भेटून येतो. त्याची गरज आहे ते शिकत राहतो. परंतु आधी जाहिरातीच कमी येतात. कुठे संगणकातले विशिष्ट
ज्ञान आवश्यक असते तर कुठे फाडफाड इंग्रजी बोलण्याची गरज असते. कुठे लाख-दोन लाखांची छुपी मागणी असते. काही ठिकाणी सही दहा हजारांवर आणि हातावर तीन हजारच ठेवणार असं सांगितले जाते. इतकी शरम वाटते. अशा वेळी वाटतं की, हटंटिलात कपबशा विसळणारा मुलगाही आपल्यापेक्षा जास्त कमवत असेल तर आपण इतकं शिकलोच कशाला ? गवंड्याच्या हाताखाली काम करणाराही रोज २००/- बिगारी घेतो. त्याच्यापेक्षाही आपली किंमत कमी असावी? मन संताप आणि निराशेने नुसतं भरून जातं.
नोकरी मागायला गेलो की, पहिला प्रश्न अनुभव किती आहे? तुम्ही नोकरी दिल्याशिवाय अनुभव येणार असा? कोणीतरी एकदातरी विश्वास नको का ठेवायला ? एवढीशी तरी संधी नको का द्यायला ?
माइया बरोबरीच्या बन्याच मित्रांना नोकच्या मिळ्यल्या. कुणी आपल्या घरच्या घंद्यात कक्ष घातलं. नोकरी न मिळालेला असा मी एकटाच उरलो. त्यामुळे मित्रांकडेही जावंसं वाटत नाही. त्यांच्या बोलण्याचे विषय आता वेगळे झाले आहेत. घरातल्याही कुठल्या लग्न अथवा अन्य समारंभात मला जावंसं वाटत नाही. कारण कोणी भेटलं की, ‘हल्ली काय करतो ?’ हा पहिला प्रश्न ठरलेला. मग नोकरी नाही म्हटलं की, कुणाची कुत्सित नजर, कुणाची कोरडी सहानुभूती, कुणाचे अनाहूत सल्ले यामुले हैराण होणे मी! त्यापेक्षा घुबडासारखं तोंडल पवून घ्यावं असं मला वाटतं. पैसाच माणसाची किंमत ठरवितो हे सत्य मी सध्या पचवितो आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना पितामह भीष्म दुःशासनाला अडवू शकले नाहीत. त्याचं स्पष्टीकरण त्यांनी ‘अर्थस्य पुरुषो दास:’ अस दिलं होतें. त्या प्रसंगातलं गांभीर्य, वास्तव आज कला कळ्लतं आहे.
आजूबाजूच्या परिस्थितीने, घरात मिळणान्या वागणुकीने मी दुखावलो गेलो आहे निराश झालो आहे, हे खरंच! मलासुद्धा आता पदवीचं भेडोळं घेऊन नोकरीची भीक मागायचा कंटाळ्ठा आला आहे. आपली शिक्षणपद्धती कूचकामी आहे, हेही आता समजतं आहे. शिक्षणाने माणसाला आत्मज्ञान आलं पाहिजे, माणूस स्वावलंबी झाला पाहिजे असं राधाकृष्णन सांगून गेले. शिक्षणाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे असं शिक्षणतज्ञ म्हणतात. यातली एक तरी गोष्ट साध्य होतीय का ? का नाही आम्हाला पुस्तकी सिद्धान्ताबरोबर थोडं-थोडं व्यवसाय शिक्षण दिलं ? का नाही सोपी-सोपी व्यावसायिक कौशल्यं/विचार शिकविली? व्यवसायाशी सांगड घालणारं शिक्षण आम्हाला का नाही मिळत? करून-करून डोकं भणाणून जातं.
हे असंच आणखी काही दिवस चाललं ना, तर माझा आत्मविश्वास कमी होईल. अशी भीती मला वाटते. म्हणून आता मिळेल ते पहिलं काम स्वीकारून मी माझा स्वत: वा व्यवसाय सुरू करणार आहे. त्याबद्दल माइया डोक्यात अनेक कल्पना आहेत. मला स्पर्धेला तोंड दयावं लागेल, खूप कष्ट करावे लागतील. पहिल्यांदा पैसे कमी मिळतील आणि लोकांची टीकाही सहन करावी लागेल याची मला कल्पना आहे. पण मी माइया निश्चयापासून ढळणार नाही आणि कोणी कसंही बोललं तरी विचलित होणार नाही.
परवाच मी विट्टल कामतांचं ‘इडली, ऑर्किड आणि मी’ हे पुस्तक वाचलं, त्यात त्यांनी सांगितलेले अनुभव मी कायम लक्षात ठेवणार आहे. हबूहळू मला जे साध्य करायचं ते मी करणार आहे.
15. ४. ग्रंथ हेच गुरू
“सर्व शंका आणि अज्ञानं जो हरण करतो तो गुरू”, अशा अर्थाचं एक संस्कृत सुभाषित आहे. या अर्थनि ‘ग्रंथ हेच गुरू’ असं जे म्हटलं जातं ते बरोबरच आहे. ग्रंथांच्या वाचनाने माणूस ज्ञानी होतो, प्रगल्भ होतो. आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं ग्रंथवाचनाने मिळू शकतात. अनेक विषयांची माहिती, ज्ञान, रंजक कथा, बोधकथा, चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णनं यांच्या वाचनाने माणसाचं व्यक्तिमत्त्व समृद्ध होतं, इतिहास तर आपल्याला ग्रंथातूनच समजावून घ्यावा लागतो. कारण ऐतिहासिक व्यक्ती तर काळ्यच्या पडद्याआड गेलेल्या असतात. ‘ग्रंथ आणि ग्रंथालये ज्ञानाची सदावर्ते आहेत’, असं म्हटलं जातं ते खरं आहे.
गुरूची आपल्याल्या सदैव सोबत असते. मार्गदर्शन असतं. आपण कोठे चुकत असू तर गुरू आपल्याला योग्य मार्ग दाखवितात. ग्रंथ गुरूची ही भूमिकाही प्रामाणिकपणे बजावतात. ज्याला वाचायला आवडतं त्याला आयुष्यात कधीही एकटं वाटत नाही. त्याचा फुरसतीचा वेळ अगदी मजेत जातो. पुस्तकातल्या विषयाशी त्याची गट्टी जमते. त्यातल्या अनुभवांशी तो एकरूप होतो. त्याला एकाकीपणाचाच नक्हे तर सगळ्या दुःखांचा, व्यथांचा विसर पड़तो.
अर्थात, वाचण्यावर विचार करण्याची क्रिया झाली पाहिजे. पुस्तकातल्या माहितीचा उपयोग आपली जाण वाढविण्यासाठी झाला पाहिजे. ग्रंथातले चांगले विचार प्रत्यक्ष कृतीत आले पाहिजेत. जगातल्या थोर व्यक्तीनी हेच केलं. महात्मा गांधी, डॉ राधाकृष्णन आणि डॉ. आंबेडकर यांनी काही ग्रंथांचं ॠण मानलं आहे. त्यातल्या विचारांनी ते इपाटले आणि त्या विचारांना कृतीची जोड त्यांनी दिली. त्यामुळे त्यांच्या हातून महान कार्य झालं.
ग्रंथामध्ये समाजपरिस्थितीचं प्रतिबिंब पडलेलं असतं. त्या-त्या काळातले ग्रंथ वाचून आपण त्या वेळची सामाजिक परिस्थिती, प्रथा आणि परंपरा जाणून घेऊ शकतो, तसंच समाजाचं प्रबोधन करण्याची फार मोठी ताकद ग्रंथांमध्ये असते. वृत्तपत्रीय लिखाण असू दे नाही तर कविता, नाटक, कादंबरी असो. कोणताही वाड्मयप्रकार असू दे, समाज-परिवर्तनाचं साधन म्हणून साहित्य खूप प्रभावी ठरतं. स्वातंत्यपूर्व काळ्ठत टिळकांच्या ‘ केसरी’ तल्या लेखांनी ब्रिटिश सरकारला धडकी भरवली होती. शि.म. परांजपे यांच्या ‘काळ’ मधल्या उपरोधिक भाषेने भारतीयांना त्यांच्या गुलामगिरीची जाणीव करून दिली होती. ह. ना आपटे यांच्या ‘ पण लक्षात कोण घेतो ?’ या कादंबरीने हिंदू धर्मातल्या घराघरातल्या विधवांचं दु:ख वेशीवर टांगलं आणि कुसुमाग्रजांच्या ‘गर्जा जयजयकार’ या कवितेने क्रांतिकारकांच्या मनातला स्फुल्लिंग धगधगीत केला. आचार्य अव्यांच्या ‘नवयुग’, ‘मराठा’ मधल्या लेखांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळ्ठीत मोलाची कामगिरी बजावली आणि मुंबई महाराष्ट्रातच राहिली. प्रत्येक काळ्यात गीता हा ग्रंथ तर समाजाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत राहिला
आहे. असं ग्रंथाचं अपार ऋण आपल्यावर असतं. निरपेक्षपणे आणि मूकपणे ग्रंथ मानवजातीची सेवा करतात. मानवी गुरूला गुरुदक्षिणा देकन अंशत: उतराई होता येतं. ग्रंथांच्या ऋणातून कसं उतराई क्हायचं?
काही गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. ग्रंथप्रसारासाठी मदत करायची ग्रंथातले विचार कृतीत आणायचे, ग्रंथ स्वत: विकत घेऊन वाचायचे, ग्रंथ चांगल्या प्रकाराने हाताव्यायचे. ग्रंथाची अनेक भाषांमध्ये भाषांतरं करण्यासाठी प्रयल करायचे. आपल्याबरोबर आणखी चार जणांना ग्रंथाची गोडी लावून आनंदात सहभागी करून घ्यायचं. तरच ग्रंथाकड्ड आपण जे काही घेक त्यांची थोडीशी परतफेड केल्यासारखं होईल. ज्ञानदेवांनीही पसायदानात-
“आणि ग्रंथोपजीविये। विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये। होआवे जी।।”
असं लिहून ग्रंथ हेच ज्यांचं उपजीवन आहे, त्यांना इह आणि पारलौकिक जगात वैभव लाभो, असं मागणं मागितलं आहे. धर्म संस्कृती आणि इतिहास यांना जिवंत ठेवण्याचं काम ग्रंथांनीच केलं आहे. जे-जे गुरूकड्डून मिळ्ण शक्य आहे ते-ते सर्व ग्रंथ देतात म्हणून ग्रंथ हे आपले गुरू होत.
५. मोबाईल (फोन) : शाप की वरदान ?
गाडी चालवित असताना मोबाईलवरून बोलणं हा गुन्हा आहे. त्यासाठी कायदा करून शिक्षेची तरतूद केली आहे. तरीही आज मोबाईल एका हाताने कानाला लावून हाताने भन्नाट गाडी चालविणारे तरुण पाहिले की, काळ्ञाचा ठोका चुकतो. कोणत्याही नाटकाला, मैफलीला, कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी संयोजक प्रेक्षकांना आपले मोबाईल बंद करण्याचं आवाहन करतात. ही शिक्षेची व्यवस्था, ही विनंती मोबाईलच्या वापराच्या अतिरेकाचा दुष्परिणाम दर्शविणारी आहेत. खरोखर दूरसंचार व्यवस्था शाप आहे की वरदान, हा विचार करायला लावणारी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे.
विज्ञानातल्या ज्या शोधामुळे जग जवळ आलं, त्यातला दूरध्वनी हा महत्त्वाचा शोध. जगाच्या एका टोला असलेला माणुस क्षणात दुसन्या टोकवर असलेल्या माणसाशी संपर्क साधू शकतो, ही थक्क करणारी क्रांती होती. त्यामुळे माहितीच्या देवाणघेवाणीचा आवाका खूप वाढला. दूर असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा आवाज सहज ऐकता येत असल्यामुळे अंतराचा दुरावा सुसहय झाला. नैसर्गिक आपत्ती ज्या आधी कूू शकतात त्याबद्दलची माहिती सर्वाना लगेच कळविता येण्याची सोय झाली. त्यामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी टाळता येक लागली. रेल्वे आणि विमानं वेळेवर सुटणार की उशीर होणार, त्यात जागा आहे किंवा नाही ही माहिती बसल्याजागी मिळू लागली. महानगराच्या गर्दीत, बस-लोकलच्या जाळ्यात सोडलेल्या आपल्या एकट्यादुकट्या मुलाच्या आई-बापांना आज फोनचा केवढा आधार वाटतो. चटकन आपलं लेकरू कोठे आहे, हे माहीत करून
घेता येतं. एकूणच फोनमुळे भावनिक आणि भौतिक अशी जी सोय झाली आहे त्याला तोड नाही.
साध्या डायल फोनपासून मोबाईलपर्यत झालेले बदल विलक्षण झपाट्याने झाले. विशेषतः ८० सालानंतर मोबाईलप्रसार झंझावाताप्रमाणे होत असलेला दिसतो. दोन-तीन वर्षापूर्वी मोबाईल एक क्रेझ, एक प्रतिष्ठा होती. आज ती अनिवार्य गरज झालेली आहे. धुण्याभांड्यांची कामं करणा य्या बायका सर्वांच्याच हातात मोबाईल असतो. दूरसंचारचा हा सर्वसंचार सर्वानी सहज स्वीकारला आहे. त्यातलं नावीन्य आता संपलं आहे. आपल्या जीवनाचं तो एक अविभाज्य अंग झालेला आहे आणि इथेच तो धोक्याची घंटी बाजवू लागला आहे.
आजकाल एखाद्या लग्नसमारंभाची किंवा कार्यक्रमाची आमंत्रणं फोनवरून केली जातात. त्यात खूप सोय होते, दगदग वाचते. वाहनांच्या वापरात बचत होऊन प्रदूषण कमी होतं, पण ही माणसं प्रत्यक्ष भेटतात तेब्हाही त्यांच्यामध्ये फोन असतोच. डॉक्टर रुग्णाशी अगदी महत्त्वाचं बोलतात तेन्हा त्यांच्या खिशातला फोन वाजतो आणि इकडे पेशंटचा जीव टांगणीला लागतो. बरं, बोलणाज्या त्या परिस्थितीची कल्पना नसते. त्याच्या अघळपघळ गप्पा एखाद्याला धाम फोडत असतात.
वाहनं चालविताना तर मोबाईलवर बोलणं स्वतःच्या आणि दुसच्याच्या जीवालाही धोकादायक ठरतं. तोच प्रकार शाळा-कॉलेजात शिक्षक शिकवत असताना मोबाईल सुरू ठेवण्याचा. त्यालाही कायद्याने बंदी आणली आहे. विद्याध्याप्रमाणेच ती शिक्षकांनाही बंधनकारक आहे. प्रत्येक व्यवसायात या साधनाने प्रचंड सोय होते आणि प्रचंड अडचणीही निर्माण होतात. पेपरफुटीचे प्रकार आज वारंवार घडताना दिसतात. त्यामागे हे प्रभावी साधन आहे. बाँबस्फोट प्रकरणात मोबाईलने गुन्हेगारांना विलक्षण मदत केलेली आहे. तसेच अनेक गुन्हे शोधून काढण्यासाठीही तितक्याच तत्परतेने मदत केलेली आहे. एक गोष्ट एकाच वेळ्ठी अनेकांना कळविण्यासाठी किती उपयुक्त आहे फोन! ‘जे जे आपणांसी ठावे। ते ते दुसन्यासी सांगावे शहाणे करून सोडावे। सकल जन।’ या संतवचनाची पूर्तता करायला साहाय्यभूत ठरणारं साधन त्याच तत्परतेने अश्लील संदेश, अंधश्रद्धा जोपासणान्या (गणपती दूध पितो, एखाद्या मूतींच्या डोळ्यांतून पाणी येते) गोष्टीही जगभर कळवितं.
म्हणूनच हे साधन वापरणारा माणूस विवेकी आणि तारतम्य असलेला पाहिजे. सगळ्याच विज्ञानाची स्थिती भस्मासुरासारखी आहे. त्यावर नियंत्रण ठेवलं नाही तर तो सर्वनाशच करणार. दूरसंचार हेसुद्धा विज्ञानाचं शक्तिमान, सर्वदूर प्रभार असलेलं असं अपत्य आहे. पण त्याचा वापर माणसाच्या हातात आहे. याच्या साहाय्याने सगळं जग जरी मुठीत ठेवता आलं तरी याला मुठीत ठेवलं नाही तर सगळंच तुमच्या हातातून निसटून जाणार आहे. म्हणूनच त्याचा वापर करणारा अधिक जबाबदार, समंजस आणि प्रगल्भ पाहिजे; तरच ते वरदान ठरेल.