SSC GEOGRAPHY Marathi Medium MARCH 2019 solved paper

Day
Night

MARCH 2019

GEOGRAPHY

प्रश्न १. दिलेल्या पर्यायाँपैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा ल्हि :

(१) ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग………………………………
(अ) उच्चभूमीचा आहे
(ब) मैदानी आहे
(स) पर्वतीय आहे
(द) विखंडित टेकड्यांचा आहे

(२) भारताचे हवामान ………………………….. प्रकारचे आहे.
(अ) दमट
(ब) मान्सून
(स) विषुववृत्तीय
(द) शीत

(३) साग हा वृक्ष प्रामुख्याने ……………………….. वनात आढळतो.
(अ) समुद्रकाठ
(ब) काटेरी
(स) पानझडी
(द) सूचीपर्णी

(४) ब्राझील हा देश……………………….. च्या निर्यातीत अग्रेसर आहे.
(अ) खनिज तेल
(ब) चहा
(स) बाजरी
(द) कॉफी

उत्तर १.

(१) ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे.

(२) भारताचे हवामान मान्सून प्रकारचे आहे.

(३) साग हा वृक्ष प्रामुख्याने पानझडी वनात आढळतो.

(४) ब्राझील हा देश कॉफीच्या निर्यातीत अग्रेसर आहे.

प्रश्न २. वेगळा घटक ओळखा :

(१) भारतातील राज्ये:
(अ) मध्यप्रदेश
(ब) महाराष्ट्र
(स) मेघालय
(द) मारान्हाओ

(२) भारतीय वनस्पती :
(अ) देवदार
(ब) अंजन
(स) ऑर्किड
(द) वड

(३) त्रिक्स संघटनेतील सदस्य देश :
(अ) ब्राझील
(ब) भारत
(स) चीन
(द) सौदी अरेबिया

(४) लोकसंख्येचा वितरणावर परिणाम करणारे अनुकूल घटक :
(अ) सागरी सान्निध्य
(ब) रस्त्यांची कमतरता
(स) सुपीक जमीन
(द) नवीन शहरे आणि नगरे

उत्तर २.

(१) (द) मारान्हाओ

(२) (स) ऑर्किड

(३) (द) सौदी अरेबिया

(४) (ब) रस्त्यांची कमतरता

प्र० ३. खाल्रिल विधाने चूक की बरोबर ते ल्मिहा व चुकीची विधाने दुरुस्त करून ल्हित (कोणतेही चार) :

(१) क्षेत्रभेटीदरम्यान पर्जन्यमानातील फरक वनस्पतीवरून समजत नाही.

(२) गंगा नदीचा उगम यम्नोत्री हिमनदीतून होतो.

(३) ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे.

(४) ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे.

(५) भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्था सुद्धा मिश्र स्वरूपाची आहे.

उत्तर ३.

(१) हे विधान चूक आहे.

दुरुस्त विधान- क्षेत्रभेटी दरम्यान पर्जन्यमानातील फरक वनस्पतीवरून समजतो.

(२) हे विधान चूक आहे.

दुरुस्त विधान-गंगा नदीचा उगम गंगोत्री हिमनदीतून होतो.

(३) हे विधान बरोबर आहे.

(४) हे विधान चूक आहे.

दुरुस्त विधान -ब्राझीलच्या पश्चिम भागात विरळ लोकवस्ती आहे.

(५) हे विधान बरोबर आहे.

प्रश्न ४. (अ) तुम्हास पुरविलेल्या ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा तसेच त्यांची नावे द्या व चिन्हांची सूची द्या (कोणतेही चार) :

(१) माराजॉ बेट (२) पिको दी नेब्लीना
(३) पँटनाल दल्दलीचा प्रदेश (४) अवर्षण चतुष्कोन
(५) कटिंगा (६) सोनेरी तामरिन

(आ) दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही चार) :

(१) वरील नकाशा काय दर्शवितो ?

(२) नकाशातील पूर्व किनारपट्टीवरील कोणत्याही दोन विमानतळांची नावे लिहा.

(३) नकाशात कोणत्या राज्यात लोहमार्ग आढळत नाहीत ?

(४) भारताच्या अति दक्षिणेकडील रेल्वेस्थानकाचे नाव लिहा.

(५) मुंबई-मंगलूरू दरम्यान असलेले रेल्वेस्थानक कोणते ?

(६) नकाशातील सर्वात उत्तरेकडील विमानतळाचे नाव लिहा.

(आ)

१. वरील नकाशा भारतातील प्रमुख रेलमार्ग आणि विमान तळ दर्शवितो.

२. विशाखापट्टणम आणि चेन्नई ही दोन नकाशातील पूर्व किनारपट्टीवरील विमानतळे आहेत.

३. नकाशात सिक्किम या राज्यात लोहमार्ग आढळत नाहीत.

४. कन्याकुमारी हे भारताचे अति दक्षिणेकडील रेल्वेस्थानक आहे.

५. वास्को-द-गामा हे मुंबईं-मंगलुरू दरम्यान असलेले रेल्वेस्थानक आहे.

६. दिल्ली हे नकाशातील सर्वांत उत्तरेकडील विमानतळ आहे.

प्रश्न ५. भौगोलिक कारणे ल्हित (कोणतेही दोन) :

(१) भारताच्या पूर्व किनान्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.

(२) ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांना जगाची फुफ्फुसे म्हणतात.

(३) ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.

(४) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे विकसित झाले आहे.

उत्तर : ५.

(१) भारताच्या पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लगून आहे. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनाने पूर्व किनारा बनलेल्रा आहे. त्यामुळेच पूर्व किनान्यावर पाण्याची पातळी खूप खोल आढळत नाही. नद्या पूर्व किनान्यावर आल्यावर जमिनीच्या मंद उताराने कमी वेगाने वाहतात. नद्यांनी वाहून आणलेला गाळ साठत जाऊन नद्यांच्या मुखाशी त्रिभूज प्रदेश तयार होतात. म्हणून भारताच्या पूर्व किनान्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.

(२) ब्राझील देशात अमेझॉन नदीच्या खो-्यात उत्तरेकडे सदाहरित घनदाट वर्षावने आहेत. ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट अरण्याने व्यापलेला आहे. या भागात वर्षभर भरपूर पाऊस पडतो. या भागात झपाट्याने वनस्पतीची वाढ होते व त्यांचा जीवनकालही मोठा असतो. या वनस्पती वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड चे शोषण मोठ्या प्रमाणात करतात व ऑक्सिजनचे उत्सर्जन करतात, परिणामी वर्षावनामुले कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. म्हणूनच या वर्षावनांना ‘जगाची फुफ्फसे’ असे संबोधतात.

(३) ब्राझीलचा ईशान्य भाग हा उच्चभूमीच्या पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. या भागात पर्जन्याचे प्रमाण 600 मिमी इतके कमी आहे. त्यामुळेच हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखल्ता जातो. पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा विकास मर्यादित झाला आहे. परिणामी या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात म्हणूनच ईशान्य ब्राझीलमध ये वस्ती विरळ आंहेत.

(४) उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा सखल प्रदेश असून या प्रदेशात लोकसंख्येचे दाट वितरण आढळते. या प्रदेशात शेती आणि विविध उद्योग धंदे भरभराटीस आले आहेत. या प्रदेशात वस्तूंची वाहतूक करण्यासाठी तसेच प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसन्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीच्या साधनांची मागणी असते! म्हणूनच उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे विकसित झाले आहे.

प्रश्न ६. खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभलेख काढ़ा व खालील प्रश्नांची उतरे लिहा :

भारत-नागरीकरणाचा कल्र(1961-2011)

वर्ष
नागरीकरणाचा कल
(टक्केवारी)
196118.0
197118.2
198123.3
199125.7
200127.8
201131.2

(१) वरील आकडेवारीतील वर्षांतर किती आहे ?

(२) कोणत्या दशकात नागरीकरणाचा कल सर्वांत कमी दिसतो ?

(३) कोणत्या दशकात नागरीकरणाचा कल सर्वात जास्त आहे ?

किंवा

(आ) दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिक्हा :

लिंग गुणोत्तर रचना

(१) वरील दोन्ही आलेख काय दर्शवितात?

(२) कोणत्या देशात पुरुषांची संख्या जास्त आहे ?

(३) कोणत्या देशात दरहजारी स्त्रियांची संख्या जास्त आहे ?

(४) 2001 नंतर कोणत्या देशाची स्त्रियांची संख्या झपाट्याने वाढली आहे?

(५) 1961 मधे भारतातील दरहजारी स्त्रियाँची संख्या किती होती?

(६) कोणत्या देशात दरहज़ारी स्त्रियांची संख्या 1000 पेक्षा जास्त आहे?

उत्तर : ६. (अ)

(१) वरील आकडेवारीतील वर्षांतर दहा वर्षांचे आहे.

(२) 1961 ते 1971 या दशकात नागरीकरणाचा कल सर्वांत कमी दिसतो.

(३) 2001 ते 2011 या दशकात नागरीकरणाचा कल सर्वांत जास्त आहे.

किंवा

(आ) ( १)वरील दोन्ही आलेख भारत आणि ब्राझील या देशांची लिंगगुणोत्तर रचना दर्शवितात.

(२) भारत देशात पुरुषांची संख्या जास्त आहे.

(३)ब्राझील देशात दरहजारी स्त्रियांची संख्या जास्त आहे.

(४) 2001 नंतर ब्राझील या देशाची स्त्रियांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

(५) 1961 मधे भारतातील दरहजारी स्त्रियांची संख्या 940 झपाट्याने वाढली आहे.

(६) ब्राझील देशात दरहजारी स्त्रियांची संख्या 1000 पेक्षा जास्त आहे.

प्रश्न ७. खाल्गिल प्रश्नांची सविस्तर उत्तरे ल्हित्रा (कोणतेही दोन) :

(१) क्षेत्रभेटीदरम्यान कचन्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे कराल ?

(२) भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील कोणकोणत्या बाबी वेगळ्या आहेत ?

(३) ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा.

(४) भारत व ब्राझील या देशात चालणान्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते ?

उत्तर ७. (१) क्षेत्रभेटीदरम्यान आम्ही कचंचाचे व्यवस्थापन पुढीलग्रमाणे करू.

क्षेत्रातील पडलेला कचरा गोळ्ठ करण्यासाठीं मोठ्या आकाराच्या गोव्या व पिशव्या सोबत नेऊ. क्षेत्रभेटीत सामील झालेलयांकडून कचरा पसरणार नाही याची खबरदारी घेऊ. क्षेत्रभेटीसाठी गेलेल्या क्षेत्रात माहिती फलक, सूचना फलक, पथनाट्ये याद्वारे स्वच्छतेविषयी जाणीव-जागृती वाढवू, क्षेत्रभेटीदरम्यान वापरलेल्या कागदी पिशव्या, खाद्यपदार्थांची वेष्टने, पाण्याच्या बाटल्या, कागदी प्लेट्स, उरलेले खाद्यपदार्थ इत्यादी एकत्र जमा करून कचरा पसरणार नाही याची काळजी घेऊ.

(२) भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील वेगळ्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोल्र्धात आहे. तर ब्राझीलचे स्थान उत्तर, दक्षिण आणि पश्चिम गोलार्धात आहे. भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. तर ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे.

(३) ब्राझीलची उच्चभूमी, विषुववृत्तीय सान्निध्य, अजस्न कड़ा इत्यादि घटक ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करतात, ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात पर्जन्याचे प्रमाण माध्यम स्वरूपाचे असते. ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात तापमानही तुलनेने कमी असते. ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात विषुववृतीयच्या सान्निध्यामुळे तुलनेने जास्त तापमान आढळते तर दक्षिणेकडील भागात तुलनेने तापमान कमी असते. उत्तरेकडील अमेझॉचच्या खान्यात सरासरी तापमान सुमारे से. ते से. असते. त्या भागातील हवामान रोगट, दमट व उष्ण स्वरूपाचे असते.

ब्राझीलमध्ये पूर्व किनारपट्टीवर पर्जन्याचे प्रमाण वार्षिक सरासरी 1000 तो 1200 मिमी असते तर अमेझॉनच्या खोन्यात वार्षिक सरासरी पर्जन्य 2000 मिमी आहे. ब्राझीलच्च्या अजस्न कड्याजवळील किनारी भागात प्रतिरोध प्रकाराचा पाऊस पडतो. कारण अटलांटिक महासागराकड्डन आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे व्यापारी वारे अजस्र कड्यामुळे अडवले जातात, उच्च भूमी पलीकडे या व्यापारी वान्यांचा प्रभाव कमी होता. ब्रांझीलचा ईशान्य भाग हा ‘पर्जन्यछायेचा प्रदेश’ ‘अवर्षण चतुष्कोन’ म्हणून ओळखल जातो, कारण तिथे तापमान तुलनेने जास्त असते. पाऊसही या भागात अत्यल्प प्रमाणात पडतो.

(४) (अ) भारत आणि ब्राझील या देशांत चालणान्या मासेमारी व्यवसायातील साम्य : भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांतील किनारपट्टीच्या भागात मासेमारी व्यवसाय विकसित झाला आहे. उभय देशांमध्ये खान्या पाण्यातील मासेमारी केली जाते.

(ब) भारत आणि ब्राझील या देशांत चालुणान्या मासेमारी व्यवसायातील फरक : भारतात नद्या, तळी, सरोवरे अशा ठिकाणी गोड्या पाण्यातील मासेमारी केली जाते. परंतु ब्राझील देशाची प्राकृतिक रचना घनदाट वने, वेगाने वाहणान्या नद्या यांमुळे गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली नाही.