SSC HISTORY AND POLITICAL SCIENCE Marathi Medium MARCH 2019 solved paper

Day
Night

MARCH 2019

HISTORY AND POLITICAL SCIENCE

इतिहास

प्रश्न १. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिह्ह :

(१) ‘प्रिमिटिक्ह कम्युनिझम टु स्लेन्हरी’ हे पुस्तक ………………………. इतिहासलेखनाचे उदाहरण आहे.
(अ) वसाहतवादी
(ब) प्राच्यवादी
(क) राष्ट्रवादी
(ड) मार्क्सवादी

(२) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागारं ……………….. येथे आहे.
(अ) दिल्ली
(ब) कोल्काता
(क) मुंबई
(ड) चेन्नई

(३) भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ……………… ‘यांनी सुरू केले.
(अ) जेम्स ऑगस्टस हिकी
(ब) सर जॉन मार्शले
(क) अलन ह्यूम
(ड) बाळशास्त्री जांभेकर

(४) ऑलिंपिक स्पर्धांची परंपरा……………………येथे सुरू झाली.
(अ) ग्रीस
(ब) रोम
(क) भारत
(ड) चीन

(ब) पुढील्यैैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा ल्हि :
(१) (1) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगल रिझन इन हिस्टरी
(2) ल्लिओॉल्ड व्हॉन रांके द थिअरी अण्ड प्रैंक्टिस ऑफ हिस्टरी
(3) हिरोडोटस द हिस्टरींज
(4) कार्ल मार्क्स डिसकोर्स ऑन द मेथड

(२) (1) कुतुबमिनार मेहरौली
(2) गोलघुमट विजापूर
(3) छत्रपती शिवाजी महाराज रेलवे टर्मिनस दिल्ली
(4) ताजमहाल आग्रा

(३) (1) कीचकवध कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
(2) एकच प्याला राम गणेश गडकरी
(3) इथे ओशाळला मृत्यू वसंत कानेटकर
(4) नटसम्राट विजय तेंडुलकर

(४) (1) घारापुरी (एलिफंटा) लेणी

(2) पंढरपूर देवस्थान

(3) सागरेश्वर धरण

(4) पाचगणी थंड हवेचे ठिकाण

उत्तर १. (अ)

(१) (ड) मार्क्सवादी (२) (अ) दिल्ली

(३) (अ) जेम्स ऑगस्टस हिकी (४) (अ) ग्रीस

(ब)

(१) चूक-कार्ल मार्क्स-डिस्कोर्स ऑन द मेथड-

उत्तर-कार्ल मार्क्स-दास कैपिटल

(२) चूक-छत्रपती शिवाजी महाराज रेलवे टर्मिनस-दिल्ली

बरोबर-छत्रपती शिवाजी महाराज रेलवे टर्मिनस-मुम्बई

(३) चूक-नटसम्राट-विजय तेंडुलकर

बरोबर-नटसम्राट-कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर

(४) चूक-सागरेश्वर-धरण

बरोबर-सागरेश्वर-अभयारण्य

प्रश्न २. (अ) दिलेल्री संकल्पनाचित्रे तयार करा (कोणतेही दोन) :

(१)

(२) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा :

(३) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा :

(ब) थोडक्यात टिपा ल्रिता (कोणत्याही दोन) :
(1) भारतीय संस्कृती कोश
(2) प्रसार माध्यमांची आवश्यकता
(3) खेळणी आणि उत्सव

(३)

(ब) (१) भारतीय संस्कृती कोश

उत्तर-पंडित महादेवशास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली १९६२ ते १९७९ या प्रदीर्घ काळात ‘ भारतीय संस्कृती कोशांचे’ दहा खंड तयार करण्यात आले. संपूर्ण भारताच्या इतिहास, भूगोल, भिन्न भाषक लोक, त्यांनी घडवलेल्ग इतिहास इत्यार्दींची माहिती या कोशातदिली आहे. महाराष्ट्रीय आणि भारतीय संस्कृतीची तपशीलवार माहिती, लोकांचे सण उत्सव, रूढी परंपरा, पारंपारिक वस्तू आणि विचार, विविध लल्तिकला, देवता या सर्वांची दखल या कौशल घेण्यात आलेली आहे. आवश्यकतेनुसार वाचकांना, अभ्यासकांना अधिक कल्पना आणि अवलोकनासाठी चित्रांचाही वापर करण्यात आलेला आहे.

(२) प्रसारमाध्यमांची आवश्यकता

उत्तर-प्रसारमाध्यमांमुळे जग अधिक जवळ आले आहे. आजच्या आधुनिक युगात माहिती क्षणार्धात जगाच्या एका टोकापासून दुस या टोकापर्यंत पोहोचते. समाजात माहितीचा मुक्त प्रवाह पसरविण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते. प्रसारमाध्यमांमुळे अद्ययावत ज्ञानाचा प्रसार होऊन माहितीची देवाणघेवाण होते. प्रसारमाध्यमांमुळे लोकांना घटना प्रत्यक्ष पाहावयास मिळतात. शैक्षणिक, व्यावसायिक प्रगतीस आवश्यक असलेली माहिती ग्रामीण आणि दुर्गम भागांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम प्रसारमाध्यमेच करत असतात. प्रसारमाध्यमांमुले लोकशाही अधिक सुदृढ़ होण्यास हातभार लगतो. प्रसारमाध्यमांद्वारे मनोरंजन ही होते. समाजजाग्रतीचे काम आज प्रसारमाध्यमे करत आहेत. म्हणून प्रसारमाध्यमे अतिशय महत्त्वाची आहेत.

(३) खेळणी आणि उत्सव

उत्तर-अगदी प्राचीन काळापासून उत्सव आणि खेळणी यांचा घनिष्ठ संबंध आहे. विविध धर्मांत आणि संस्कृतीमध्ये उत्सवप्रसंगी विविध खेळण्यांनी सजावट केली जाते लहानग्यांना खेळण्यांचे वाटप केले जाते. महाराष्ट्रात दीपावळीच्या उत्सवात मातीच्या किल्ल्यांवर शिवराय आणि मावळ्यांच्या प्रतिमा ठेवतात, ती खेळणीच असतात, गावोगावीच्या यात्रा, जत्रा आणि उत्सवप्रसंगी बाजारात मोठ्या प्रमाणात खेळण्यांची दुकाने लगतात. आजही ग्रामीण भागात नागपंचमी, बैलपोळ्म अशा सणांत मातीचे बैलगाड़ी, नागोबा अशी खेळणी तयार केली जातात.

प्रश्न ३. (अ) पुढील विधाने सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन):

(१) सर्व प्रसारमाध्यमात दूरदर्शन अतिशय ल्रोकप्रिय माध्यम आहे.

(२) प्रादेशिक इतिहासलेखनाल्ग चालना मिळाली.

(३) जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते.

(४) आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे.

(५) महाराष्ट्रातील संत एकनाथांची भारूडे लोकप्रिय झाल्गी.

(ब) थोडक्यात उत्तरे लिहा (कोणतेही दोन):

(१) व्लॉल्टेअर यांना आधुनिक इतिहासलेखनाचे जनक असे का म्हणतात ?

(२) लोक शिल्पकला याविषयी माहिती लिहा.

(३) बाळ ज. पंडित यांच्या क्रिकेट समाल्योचनाची कोणती वैशिष्ट्ये तुम्हाल सांगता येतील ?

उत्तर ३. (अ)

(१) Refer to SSC Paper March 2023, Answer 3. (1).

(२) इंग्रजी शिक्षणाने भारतीयांमध्ये निर्माण झालेल्या आत्मजाणवितेने राष्ट्रवादी इतिहासलेखनास प्रवृत्त केले. ब्रिटिश अधिकान्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वगृहदूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतांमधील इतिहासलेखकांनी विरोध केल, आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे परकीय इतिहासकारांचे लक्ष वेधले. राष्ट्रवादी इतिहासलेखनाच्या प्रभावातूनच प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.

(३) आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कल्रकृती, परंपरा हाच आपला सांस्कृतिक वारसा असतो. त्यांच्याबद्दल आपल्या मनात कुतूहल आणि आत्मियता असते. हा सांस्कृतिक वारसा आपल्या पुठील पिढ्यांच्या हितासाठी जपणे व त्यांचे संवर्धन होणे गरजेचे असते. कालौघात हा ठेवा नामशेष होऊ नये तसेच त्याचे जतन कसे करावे याच्या दिशादर्शक तत्त्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे आणि परंपरा यांची यादी ‘युनेस्को’ या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते.

(४) आर्थिक उदारीकरणामुळे तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीने जग जवळ आले आहे. आज विमान, रेल्वे, जहाज या वाहतुकीच्या क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे पर्यटन करणे अधिक सोपे झाले आहे. खेळ, आंतरराष्ट्रीय परिषद, विविध स्पर्धा, संमेलने, ऐतिहासिक व धार्मिक स्थळ्ठाना भेटी, व्यवसाय, सहली यांसारख्या अनेक इतर उद्देशाने लोक जगभर प्रवास करत असतात. त्यामुळे पूर्वीपेक्षा आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढले आहे.

(५) संत एकनाथांनी लोकप्रबोधन आणि लोकशिक्षणासाठी भारूडांची रचना केली. संत एकनाथांच्या भारूडांच्या विषयात विविधता तर होतीच पण ती नाट्यात्मकही होती. दैनंदिन जीवनातील आणि व्यवहारातील अगदी साध्या साध्या उदाहरणांमधून रचलेल्री विनोदी आणि गेयता या विशेषतेमुळे त्यांची भारूडे लोकप्रिय झाली. विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा आणि उपदेश करण्याचा हा प्रकार लोकांनाही आवडला.

(ब) थोडक्यात उत्तरे

(१) क्हॉल्टेअर हे फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहास लेखनासाठी घटनांचा कालक्रम आणि वस्तुनिष्ठ सत्य या गोर्ष्टीकडे लक्ष्य केंद्रित करून थांबले नाहीत तर तत्कालीन समाजाच्या परंपरा, आर्थिक व्यवस्था, व्यापार, शेती इत्यादि गोष्ट्टींचा विचार करणे आवश्यक आहे. असा विचार मांडला, त्यांच्या या विचारांमुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार क्हायल्गा हवा, हा विचार पुढे आल्ग. यामुळेच व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहासलेखनाचा जनक असे म्हणतात.

(२) लोक शिल्पकला ही चित्रकलेप्रमाणेच अशमयुगीन काळ्ठपासून चालत आलेली परंपरा आहे. भारतात धार्मिक प्रसंगी मातीच्या मूर्ती तयार करून त्यांची पूजाअर्चा करण्याची किंवा त्या अर्पण करण्याची प्रथा हड़प्पा संस्कृतीच्या काळापासून होती. आजमितीलाही बंगाल, बिहार, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र अशा अनेक राज्यांत मातीच्या गणेशाच्यां आणि गौरीच्या मूर्ती तयार केल्या जातात. महाराष्ट्रात बैलपोक्याला मातीचे बैल तयार केले जातात. पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लकड़ी खांब, वीरगळ, तसेच आदिवासी घरांमधील साठवणीच्या मातीच्या कोठ्या या गोष्टी लोकशिल्पकलेच्यां परंपरेची साक्ष देतात.

(३) बाळ ज. पंडित क्रिकेटच्या सामन्याचे धावते वर्णन करण्याबरोबरच मैदानाचा इतिहास सांगत असत. खेळाडूसंबंधीची माहिती आणि त्यांचा इतिहासही सांगत असत. खेळाडूने पूर्वी केलेले विक्रम आणि खेळाशी संबंधित आठवणीही सांगत असत. खेळाबरोबरच खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान त्यांना होते. या गुणांबरोबरच त्यांची समालोचन शैलीही उत्तम होती. त्यांनी केलेले सामन्याचे धावते वर्णन ऐकण्यासाठी आतुर असायचे. वरीलप्रमाणे बाळ ज. पंडित यांच्या क्रिकेट समालोचनाची वैशिष्ट्ये सांगता येतील.

प्रश्न ४. दिलेल्या उताभ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे ल्हिए:

‘भारत एक खोज’

भारताच्या प्राचीन ते अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शनवरून प्रसारित झालेली ‘ भारत एक खोज’ ही मालिका महत्त्वाची आहे. पंडित नेहरू यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या ग्रंथावर आधारित ही मालिका होती. श्याम बेनेगल दिग्दर्शित या मालिकेने प्राचीन काळ ते अर्वाचीन काळाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास मांडला. सखोल संशोधन आणि सादरीकरण या पातळीवर ही मालिका सरस ठरली.

हडप्पा संस्कृती, वैदिक काल, रामायण-महाभारताचा अन्वयार्थ, मौर्य कालखंड, तुर्क-अफगाण आणि मोगलांचे आक्रमण, मुघल कालखंड आणि मुघल बादशहांचे योगदान, भक्तिचळवळ, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, समाजसुधारणा चळवळी आणि स्वातंत्रसंग्राम अशा अनेक घटना या मालिकेतून मांडल्या गेल्या.

या मालिकेत नाट्य, लोककला, प्रबोधनपर माहिती असा आधार घेत नेहरूंच्या रूपातील कल्गवंत रोशन सेठ प्रास्ताविक व अन्वयार्थ सांगत असत. नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याचे प्रभावी सादरीकरण यामुळे ही माल्कि संपूर्ण भारतभर वाखाणली गेली.

(१) ‘भारत एक खोज’ ही मालिका कोणत्या ग्रंथावर आधारित आहे?

(२) ‘भारत एक खोज’ या मालिकेचे दिग्दर्शन कोणी केले?

(३) ‘भारत एक खोज’ मालिका लोकप्रिय ठरण्यास कोणते घटक कारणीभूत असावेत असे तुम्हास वाटते ?

उत्तर ४.

(१) ‘भारत एक खोज’ ही मालिका पंडित जवाहरलाल नेहरूंच्या ‘ डिस्कव्करी ऑफ इंडिया’ या ग्रंथावर आधारित आहे.

(२) श्याम बेनेगल यांनी ‘भारत एक खोज’ या मालिकेचे दिग्दर्शन केले.

(३) प्राचीन ते अर्वाचीन काळापासूनचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास अगदी सखोल संशोधन करून मांडला. अगदी हडप्पा संस्कृतीपासून ते स्वातंत्र संग्रामापर्यंतच्या अनेक घटनांचे या मालिकेतून सादरीकरण झाले. या मालिकेत नाट्य, लोककला, परंपरा आणि प्रबोधनपर माहिती असा आधार घेत नेहरूंची इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्याचे तितकेच प्रभावी सादरीकरण यामुळे ही मालिका संपूर्ण भारतभर वाखाणली गेली.

प्रश्न ५. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे ल्हित (कोणतेही दोन) :

(१) नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात ?

(२) ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे ?

(३) पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय होऊ शकतो याविषयी तुमचे मत व्यक्त करा.

(४) कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धांत स्पष्ट करा.

उत्तर ५. (१) नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन या प्रकल्पांतर्गत वारसास्थळांचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाची कामे करणे शक्य होते. स्थानिक समाजाची जडणघडण, मानसिकता आणि वर्तमानातील आव्हाने, स्थानिकांच्या अपेक्षा यांचा आलावा घेता येतो. तसेच स्थानिकांच्या भावनांचा विचार करून उपाययोजनांचे नियोजन करता येते. प्रकल्पात स्थानिकांना सहभागी करून घेता येते. स्थानिकांच्या परंपरागत प्रोत्साहन देऊन त्यांच्या उद्योगव्यवसायांना चालना मिळावी व मराठी पद्धतशीर नियोजन करणे शक्य होते. नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून वरील सर्व गोष्टी साध्य होतात.

(२) ग्रंथांच्या पद्धतशीर मांडणीमुळे वाचकांना हवी ती पुस्तके ‘लागलीच’ मिळू शकतात, कोणते पुस्तक कोणत्या ठिकाणी ठेवले आहे ते त्वरित सांगता येते ग्रंथालय व्यवस्थापनामुळे, वाचकांचा आणि ग्रंथालय कर्मचाय्यांचा वेळ वाचतो. उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथालयात दर्जेदार ग्रंथांच जतन व संवर्धन चांगल्या प्रकारे होते. पुस्तकांचा विद्ध्वंस होत नाही. एकाच प्रकारच्या पुस्तकांचा संग्रह न होता विविधप्रकारच्या ग्रंथानां ग्रंथालयात स्थान मिळते. उत्तम व्यवस्थापनामुळे संगणकीय प्रणाली, ग्रंथांची सूची यांसारख्या आधुनिक सोई वाचकांना उपलब्ध होतात. ग्रंथांचे जतन आणि संवर्धन चांगल्याप्रकारे करण्यासाठी ग्रंथालय व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

(३) पर्यटन व्यवसाय हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय ठरू शकतो, कारण

पर्यटनस्थळ्वांच्या परिसरात बाजारपेठांचा विस्तार होऊन रोजगारनिर्मिती होते. विविध हस्तोद्योग आणि कुटीरोद्योगांचा विकास होऊन त्यात वाढ होते. आपण पर्यटनाकडे व्यावसायिक पद्धतीने पाहिले तर एक कायमस्वरूपी व्यवसाय मिळू शकतो. या व्यवसायात अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यास प्रचंड संधी आहेत. प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बस, रिक्षा, टैक्सी अशा वाहतूक क्षेत्रातील व्यवसाय वाढतात. स्थानिक खाद्य पदार्थ, निवासी हॉटिलस्, दुभाषी, वर्तमानपत्रे, संदर्भ साहित्य, पर्यटन मार्गदर्शक असे विविध रोजगार निर्माण होतात. आधुनिक काळात पर्यटन व्यवसाय हा रोजगाराभिमुख आणि देशाच्या विकासाला मदत करणारी बाब ठरली आहे.

(४) एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स या जर्मन विचारवंताच्या वर्ग सिद्धान्ताने इतिहासाच्या दृंिटकोनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारी विचार प्रणाली अस्तित्वात आली. त्याच्या मते-इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जीवंत माणसांचा असतो. मानवाच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी उपलब्ध उत्पादन साधनांच्या स्वरूपावर आणि मालकीवर त्यांच्यातील नातेसंबंध अवलंबून असतात. उत्पादनाची ही साधने समाजातील सर्वच घटकांना समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत आणि त्यातूनच समाजाची वर्गाधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष सुरू होतो. ज्या वर्गाच्या ताब्यात ही उत्पादन साधने असतात तो वर्ग इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे.

राज्यशास्त्र

प्रश्न ६. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय लिक्हा :

(१) लोकशाहीचा गाभा म्हणजे’………………………
(अ) प्रौढ मताधिकार
(ब) सत्तेचे विकेंद्रीकरण
(क) राखीव जागांचे धोरण
(ड) न्यायालयीन निर्णय

(२) शेतकरी चळवळीची ……………………. ही प्रमुख मागणी आहे.

(अ) वनजमिनीवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा (ब) शेतमालाला योग्य भाव मिळावा

(क) ग्राहकांचे संरक्षण करणे (ड) धरणे बांधावित

(३) ‘जस्टीस पार्टी’ या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर …………………. या राजकीय पक्षात झाले.
(अ) आसाम गण परिषद
(ब) शिवसेना
(क) द्रविड मुन्नेत्र कळघम
(ड) जम्मू अणि काश्मीर नेशनल कॉन्फरन्स

(४) जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे ……………………….
(अ) धार्मिक संघर्ष
(ब) नक्षलवादी कारवाया
(क) लोकशाहीची पाळ्ठमुळे आणखी खोलवर नेणे
(ड) गुंडगिरीला महत्त्व

उत्तर ६. (१) (ब) सत्तेचे विकेन्द्रीकरण

(२) (ब) शेतमालाल योग्य भाव मिळ्ववा

(३) (क) द्रविड मुन्नेत्र कळघम

(४) (क) लोकशाहीची पाठेमुळे आणखी खोलवर नेणे

प्रश्न ७. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन) :

(१) संविधानाचे स्वरूप एखाद्या जीवंत दस्तऐवजाप्रमाणे असते.

(२) एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टफ्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार उरवते.

(३) निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळ लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उड्डू शकतो.

उत्तर ७. (१) Refer to SSC Paper March 2023, Answer 7. (1).

(२) हे विधान चूक आहे; कारण-

निवडणूक ही जबाबदारी पार पाडण्यासाठी संविधानाने स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे. त्यामुळे निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणुक आयोगाची आहे. राज्य सरकार ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंवेल, म्हणून एखाद्या घटकराज्यात केन्हा आणि किती टप्यांत निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते.

(३) हे विधान बरोबर आहे; कारण-

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी न्याय्य आणि खुल्या वातावरणात निवडणुका होणे आवश्यक असते. पण काही वेळा निवडणूक प्रक्रियेत मोठा भष्टाचार होतो. बनावट मतदान होणे, मतदारांना लाच देंणे, वस्तूंचे वाटप, मतदार वा मतपेट्या पळविणे असे प्रकार वाढत जातात. त्यामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.

प्रश्न ८. (अ) पुढील संकल्पना स्पष्ट करा (कोणतेही दोन) :
(१) प्रादेशिकता (२) जलक्रांती (३) माहितीचा अधिकार.

(ब) दिलेल्या सूचनेनुसार कृती करा (कोणतेही दोन) :

(१) निवडणूक प्रक्रिया :

निवडणुकांची संबंधीच्या वादयांचे निराकरण

(२) भारतातील राष्ट्रीय पक्षांच्या स्थापनेसंदर्भातील पुछ्धिल काल्ग्रेषा पूर्ण करा :

(३) पुढील संकर्पनाचित्र पूर्ण करा :

उतर ८.

(अ) (१) भारत हा बहुसांस्कृतिक, बहुभाषिक आणि विविध परंपरांनी नटलेल देश आहे. भौगोल्कि विविधतेबरोबरच इतिहास, साहित्य, शिक्षण आद्दीबाबंत ही भारतात विविधता आढळते प्रत्येकाल्रंच आप्ली भाषा, साहिस्य, परंपरा, इतिहास, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळी इत्यार्दीबाबत अभिमान वाटू लगतो आणि भाषिक अस्थिता प्रबल होन ल्गगते. आपल्या भाषेच्या, प्रदेशाच्या विकासाला लोक प्राधान्य देऊ लगतात, यालाच प्रादेशिकता असे म्हणतात.

(२) जलक्रांती अभियान ४ जून २०१५ पासून संपूर्ण भारत देशात सुरू करण्यात आले. ही जलक्रांती असूम विविध संघटना, सामाजिक संस्था व अशासकीय संस्थांच्या (NGOs) तसेच ल्रोकसहभागावर है आधारित आहे. यामध्ये जलप्रदूषणाल्त आळा बसविणे, नमुनेदार प्रकल्पांची उभारणी करणे जसे-नमामि गंगे अभियान, लोक जागृती करून ल्रेकसहभागातून ग्रामीण स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत प्रकल्पांची उभारणी करण्यास प्रोत्साहन देणे है उद्देश डोळ्यांसमोर आहेत. पाणी अडविणे, पाणी जमिनीत मुरवणे, मोठ्या प्रमाणात जल्साव करणे, पाण्याचा अपव्यय टाळणे या सर्व बाबी जल्क्रांतीत येतात.

(३) पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही शासनाची दोन वैशिष्ट्ये प्रत्यक्ष कारभारात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार प्रदान करण्यात आला. शासनाने केलेले व्यवहार जनतेला कळावेत, शासन आणि जनता यांच्यात सुंसवाद साधला जाऊन परस्पर विश्वास वाढीस लागावा म्हणून शासनाने २००५ साली माहितीचा अधिकार नागरिकांना दिला. माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे सक्षमीकरण झाले. गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार या अधिकारामुळे दडपले जाऊ शकत नाहीत. शासनव्यवहार पारदर्शी आणि खुले होण्यास मदत झाली.

(ब) दिल्लेल्या सूचनेनुसार कृती करा (कोणतेही दोन) :

(१) निवडणूक प्रक्रिया :

(२) भारतातील राष्ट्रीय पक्षांच्या स्थापनेसंदर्भातील पुढील कालरेषा पूर्ण करा :

(३) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा :

प्रश्न ९. पुछ्टिल प्रश्नांची थोडक्यात उत्तरे ल्मित्र (कोणतेही दोन) :

(३) स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या ?

(२) राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात ?

(३) पहिल्या ल्रोकसभा निवडणुकीच्या मतदान पद्धतीचे कोणते वैशिष्ट्य तुम्हाला जाणवले?

(४) कोणत्या कायद्यांमुळे महिलांना आपले स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे ?

उत्तर ९.

(१) Refer to SSC Paper March 2020, Answer 9. (1).

(२) निवडणुका खुल्या आणि न्याय्य वातावरणात घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक यंत्रणेची निर्मिती केली जाते. न्यायाल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे आणि भ्रष्टाचारी व्यक्ती अशांना राजकीय प्रक्रियेतील सहभागास बंदी घातली आहे. निवडणुकीत आणि राजकारणात भ्रष्टाचार होऊ नये म्हणून कायदेनिर्मिती केली जाते.

(३) पहिल्या ल्रोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदारयाद्या तयार करणे आव्हानात्मक होते देशात निरक्षरतेचे प्रमाण अधिक होते म्हणून मतदान करण्यासाठी विशेष पद्धती वापरली गेली. जवळजवळ २० लाख स्टीलच्या मतपेट्या तयार केल्या आणि त्या मतपेट्यांवर पक्षांची निवडणूक चिन्हे चिकटवली. ज्या पक्षाला मतदान करायचे आहे. त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या पेटीत मतदारांनी कोरा कागदाची घडी करून टाकायची अशी पद्धती ठरवण्यात आली. यामुळे निरक्षर मतदारांना मतदान करता आले.

(४) वडिलांच्या व पतीच्या संपतीत स्त्रियांना समान हिस्सा, हुंडा प्रतिबंधक कायदा, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा यांसारख्या महत्त्वपूर्ण तरतुर्दींनी महिलांना आपले स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.