SSC HISTORY & POLITICAL SCIENCE Marathi Medium April 2022 solved paper

Day
Night

APRIL 2022

HISTORY & POLITICAL SCIENCE

प्रश्न 1.

(अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवड्डून विधाने पूर्ण करा :

(1) भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र …………………………… यांनी सुरू केले.
(अ) जेम्स ऑगस्टस हिकी
(ब) सर जॉन मार्शल
(क) अलन ह्यूम
(ड) मायकेल फुको

(2) भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक हे होते.
(अ) अलेक्झांडर कनिंगहूम
(ब) विल्यम जोन्स
(क) जॉन मार्शल
(ड) फ्रेडरिक मॅक्सम्युलर

(3) कोलकाता येथील …………………….. हे भारतातील पहिले संग्रहालय होय.
(अ) गव्हर्म्मेंट म्युझियम
(ब) राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय
(क) छत्रपति शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय
(ड) भारतीय संग्रहालय

(ब) पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओक्खून पुन्हा लिहा :
(1)

(i) बेंजामिन ट्युडेला स्पेन
(ii) मार्को पोलो इटली
(iii) इब्न बतूता भारत
(iv) युआन श्वांग चीन
(2)

(i) मल्लखांब शारीरिक कसरतीचा खेळ
(ii) कबड्डी मैदानी खेळ
(iii) आईस हॉकी साहसी खेळ
(iv) आट्यापाट्या बैठे खेळ

(3)

(i) जेम्स ऑंगस्टस् हिकी बेंगॉल गेझेट

(ii) बाळ्शास्त्री जांभेकर दर्पण

(iii) भाऊ महाजन ज्ञानोदय

(iv) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक केसरी

उतर 1 :

(अ)

(1) (अ) जेम्स ऑगस्टस हिकी

(2) (अ) अलेक्झांडर कनिंगहैम

(3) (ड) भारतीय संग्रहालय

(ब)

(1) चुकीची जोड़ी : इब्न बतूता – भारत

(2) चुकीची जोड़ी : आट्यापाट्या – बैठे खेळ

(3) चुकीची जोडी : भाक महाजन – ज्ञानोदय

प्रश्न 2.

(अ) दिलेल्या सूचनेनुसार कृती करा (कोणतेही दोन) :

(1) इतिहास विषयाशी संबंधित कोशांच्या संदर्भातील पुढील कालरेषा पूर्ण करा :

(2) पुढ़ील संकल्पनाचित्र पूर्ण करा :

(3) पुढ़ील संकल्पनाचित्र पूर्ण करा :

(ब) थोडक्यात टिपा लिहा (कोणतेही दोन) :

(1) वंचितांचा इतिह्हास

(2) व्हॉल्टेअर

(3) लुव्र संग्रहालय

उत्तर 2 :

(अ) (1)

(2)

(3)

(ब) (1) वंचितांचा इतिहास : मार्क्सवादी इतिहासलेखन परंपरेतून वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. समाजाने ज्या समूहांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले. अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात. इटालियन तत्त्वज्ञ अंटोनिओ ग्रामचीने इतिहासलेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करायला पाहिजे ही कल्पना मांडलीत्र भारतीय इतिहासकार रणजित गुहा यांनी वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य केले. लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहासलेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो.

(2) व्हॉल्टेअर : फ्रान्स्वा मरी अरूए अले क्हॉल्टेअरचे मूळ नाव होते. क्हॉल्टेअरने इतिहासलेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यांवरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजातील परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था आणि शेती या गोष्ठींचाही विचार करणे आवश्यक आहे हा विचार मांडला. या त्याच्या मतांमुळे इतिहासाची, मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार क्हायला हवा, हा नवीन विचार पुढे आला. म्हणूनच क्हॉल्टेअरला ‘आधुनिक इतिहासलेखनाचा जनक’ असे म्हटले जाते.

(3) लुव्र संग्रहालय : लुत्र संग्रहालयाची स्थापना पैरिस शहरात अठराव्या शतकाते झाली. फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कलावस्तूंचा संग्रह लुव्र संग्रहालयात प्रथम प्रदर्शित केला गेला. जगप्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्दो-द-विंची याने रेखाटलेले ‘मोनालिसा’ या बहुचर्चित चित्राचाही या संग्रहालयात समावेश आहे. नेपोलियन बोनापार्टंने आपल्या स्वातयांच्या दरम्यान आणलेल्या कलावस्नूमुळे लुत्र संग्रहालयातील संग्रह खूपच वाढला आहे. सध्या या संग्रहालयात अश्मयुगीन ते आधुनिक काळ्वती 3 लाख 80 हजारांहून अधिक कलावस्तू आहेत.

प्रश्न 3.

पुढील विधाने सकारण स्पष्ट करो (कोणतेही दोन) :

(1) आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.

(2) वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.

(3) खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पड़तो.

(4) बाळ ज. पंडित यांचे आकाशवाणीवरील क्रिकेटचे धावते समालोचन रंजक होत असे.

उत्तर 3 :

(1) आपल्या भारत देशाला संपन्न असा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला असून आपण तो जपला पाहिजे, कारण-आपल्या ऐतिहासिक वास्तू, ठिकाणे आणि किल्ले हे भावी पिढयांसाठी मार्गदर्शक आहेत. या ऐतिहासिक वारशामुळे आपलयाला प्रेरणा आणि स्फूर्ती मिळते. विविधतेने नटलेल्या भारत देशाला नैसर्गिक आनि सांस्कृतिक वारसा लाभला असून ते पाहण्यासाठी हजारो पर्यटक परदेशातून येत असतात. म्हणून आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.

(2) कारण-वर्तमानपत्रांना एखाद्यां बातमीचा खोलवर आढावा घेताना वा तिचे विश्लेषण करताना बातमीच्या भूतळात जावे लागते. वर्तमानपत्रांतील काही सदरे इतिहासावरच अवलंबून असतात म्हणून भूतकाळ्ठतील आर्थिक, सामाजिक आणि

राजकीय घटना समजतात. भूतकाळ्ठतील घटना, युद्धे, नेते इत्यार्दोच्या शताब्दी निमित्ताने विशेष पुखण्या वा सदरे, लेख प्रकाशित करत असतात. अशा वेळी संबंधित घटनेचा इतिहास अभ्यासणे आवश्यक ठरते. म्हणून वर्तमानपंत्राना इतिहास या विषयाची गरज असते.

(3) कारण-खेळांमधून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा पाहण्यात मिळते. महाराष्ट्रात दिवाळीत मातीचे किल्ले बनवून त्यावर शिवकालीन देखावा केला जातो, त्यावरून इतिहासाला उजाळा मिळतो व किल्ल्यांच्या रचनेचा अभ्यासही होतो. भारत आणि रोम यांच्यातील परस्परसंबंध खेळणीतूनच समोर येतो. इटलीतील पॉपेई शहराच्या उत्बननात भारतीय बाहुली सापडली होती. म्हणूनज खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.

(4) कारण-बाळ ज. पंडित हे क्रिकेट सामन्याचे धावते समालोचन करण्याबरोबरच ते तेथील मैदानाचा इतिहास सांगत असत. तसेन्च खेळाडूंची माहिती आणि त्यांचा इतिहास सांगत असत. त्या खेळडूने पूर्वी केलेले विक्रम आणि त्यासंबंधीच्या आठवणीसुद्धा सांगत. खेळाचे व खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान त्यांना होते. याबरोबरच त्यांची बोलण्याची शैली ही उत्तम असल्यामुळे बाळ ज. पंडित यांचे आकाशवाणीवरील क्रिकेटचे धावते वर्णन रंजक होत असे.

प्रश्न 4.

दिलेल्या उतान्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

सोहगौडा ताम्रपट : हा ताम्रपट सोहगौडा (जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश) येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे. लेखान्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत (एकावर एक असलेल्या तीन कमानी) ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात. चार खांबांवर उभे उसलेले दुमजली. इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठारघरांचे निदर्शक असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठरघरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे, असा आदेश त्या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी, या संदर्भातील हा आदेश असावा, असे मानले जाते.

(1) सोहगौडा ताम्रपट कोठे सापडला ?

(2) सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख कोणत्या लिपीमध्ये लिहिलेला आहे?

(3) सोहगौडा ताम्रपटाचे इतिहासाचे साधन म्हणून महत्त्व स्पष्ट करा.

उत्तर 4 :

(1) सोहगौडा ताम्रपट सोहगौडा, जिल्हा गोरखपूर, उत्तरप्रदेश येथे सापडला.

(2) सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राम्ही लिपीमध्ये लिहिलेला आहे.

(3) या ताम्रपटावर अनेक चिन्हे कोरली आहेत. वृक्ष व त्याभोवती बांधलेला पार असे एक चित्र आहे, एकावर एक अशा तीन कमानी असे एका पर्वताचे चिन्ह आहे. चार खांबावर दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे एक कोठारघरांचे चिन्ह असावे. दुष्काळाची परिस्थिती आल्यास कोणती खबरदारी घ्यावी, धान्य जपून वापरावे, याबाबतीतचा आदेश असावा, त्याकाळी असे आदेश राजे लोक ताम्रपटाद्वारे देत असत.

प्रश्न 5.

पुठील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन) :

(1) उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा सहसंबंध असतो ?

(2) आकाशवाणीचा इतिहास लिहा.

(3) मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा.

(4) पर्यटन आणि आतिथ्यक्षेत्रात इतिहासाच्या विद्यार्थ्यांना कोणत्या व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत ?

उत्तर 5 :

(1) इतिहासातून भूतकालीन घटनासंबंधीचे ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग वर्तमान व भविष्यकाळ्ठात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. भूतकाळ्ठतील घटनांच्या आधारावरच मानव वर्तमानकालीन वाटचाल निश्चित करतो. आपले पूर्वज, त्यांचे कर्त्तृत्व, त्यांचा वारसा यांच्याबद्दल आपल्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अपूयासाने आपल्याला मिळते. उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करता येते. उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमानकाळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन होते.

(2) 1929 साली अमेरिकेतील पिट्सबर्ग येथे जगतील पहिले आकाशवाणी केंद्र स्थापन झाले. 1922 साली ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी स्थापन झाली. त्यानंतर आकाशवाणीचा जगभरात विस्तार झाला॰ स्वातंत्रपूर्व कालखंडात 1924 साली इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या नावाने दररोज कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खासरी रेडियो केंद्र सुरू झाले. याच कंपनीचे पुढे ‘इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्विसेज’ असे नामकरण केले. 8 जून 1936 रोजी या कंपनीचे नामकरण ‘ऑल इंडिया रेडिओ’ असे झाले.

भारतात आकाशवाणीचा प्रारंभ मद्रास (चेन्नई) येथे झाला. आकाशवाणीला प्रथम नभोवाणी असे म्हटले जायचे. 1935 साली म्हैसूर संस्थानने आपल्या रेडिओ केंद्रास ‘आकाशवाणी’ असे नाव दिले. भारत सरकारने हेच नाव सर्व रेडिओ केंद्रांना दिले:

(3)

मैदानी खेळबैठे खेळ
(1)मैदानी खेळ हे मैदानात उभे राहून खेळायचे असतात.(1)
बैठे खेळ बसून खेळावे लागतात आणि ते कोठेही
बसून खेळ्ठता येतात.
(2)मैदानी खेळात कसरतींची आवश्यकता असते.(2)
बैठ्या खेळ्मत तुलनेने कमी कौशल्यांची गरज
असते.
(3)
मैदानी खेळात शारीरिक क्षमतेची आणि शक्तीचीही
गरज असते.
(3)
बैठ्या खेळ्ठत शारीरिक क्षमतेची व शक्क्तींची
गरज नसते.
मैदानी खेळात थकवा लवकर येतो.बैठ्या खेळत थकवा लवकर येत नाही.
(5)
शारीरिक कौशल्याची गरज असल्याने प्रशिक्षण
आणि सरावाची गरज असते.
(5)
शारीरिक कौशल्याची गरज नसल्याने प्रशिक्षण
आणि सरावाची तितकीशी गरज नसते.
(6)
मैदानी खेळात हॉकी, कबड्डी, खो-खो, क्रिकेट,
फुटबॉल यां सारख्या देशी-विदेशी खेळांचा समावेश
होतो.
(6)
बैठ्या खेळत सारीपाट, पत्ते, बुद्धिबळ, कैरम
इत्यादी खेळांचा, समावेश होतो.

(4) पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग आहे. हा कायमस्वरूपी व्यवसाय असून नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यास प्रचंड संधी आहेत. आधुनिक काळात पर्यटन हा एक स्वतंत्र असा स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय बनला आहे. पर्यटनामुळे अनेक लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. परदेशी पर्यटकाने भरलेल्या न्हिसा फीमुळे आपल्या देशाला महसूल मिळतो. पर्यटन केंद्राच्या परिसरातील बाजारपेठांचा विस्तार होऊन तेथील हस्तोद्योग व कुटीरोद्योग यांचा विकास होतो. दुभाषे आणि मार्गदर्शक यांना रोजगार मिळ्तो. आधुनिक काळ्ठत पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रात इतिहासाच्या विद्यार्थ्यांला प्रचंड संधी उपलब्ध होताना दिसतात.

प्रश्न 6.

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवड्डून विधाने पूर्ण करा :

(1) लोकशाहीचा गाभा म्हणजे ……………………..
(अ) प्रौढ मताधिकार
(ब) सत्तेचे विकेंद्रीकरण
(क) राखीव जागांचे धोरण
(ड) न्यायालयीन निर्णय

(2) स्वातंत्यपूर्व काळात ओडिशातील ………………………. या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरोधातं उठाव केला.
(अ) कोळी
(ब) गोंड
(क) भिल्ल
(ड) रामोशी

उत्तर 6 :

(1) (ब) सत्तेचे विकेंद्रीकरण।

(2) (ब) गोंड

प्रश्न 7.

पुमील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन) :

(1) न्यायालयाच्या विविध विषषंवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे.

(2) एखाद्या घटकराज्यात केव्हा व किती टप्यात निवडणुका घ्यायच्या है राज्यसरकार ठरविते.

(3) ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.

उतर 7 :

(1) है विधान बरोजर आढे. कारण-आजवर न्यायालयाने संविधानातील मूलभूत हक्कांद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने अनेक निर्णय दिले आहेत. त्यात, बालकांचे हक्क, मानवी हक्कांची जपणूक, महिळ्यंची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखण्याची गरज, व्यक्तिस्वांतंत्र, आदिवार्सींचे सक्षमीकरण यासारख्या विषयांचा समावेश होतो. न्यायालयाच्या या विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे.

(2) है विधान चूक आरे कारण-निवडणुकांची जबाबदारी पार पाडण्यासाठी संविधानाने, स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे. त्यामुळे निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. राज्य सरकारवर ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंवेल. म्हणून एखाद्या घटकराज्यात केन्हा व किती टष्यांत निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते.

(3) हि विधान बरोबर आढे. कारण-बदललेल्या समाजव्यवस्थेचा आणि अर्थव्यवस्थेतील बदलांचा ग्राहकांवर परिणाम होत असतो. ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जसे भेसळ, वजन-मापातील फसवणूक, वाढविलेली किंमत इत्यादी. अशा फसवणुकींपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला त्यानंतर ग्राहकांना आपन्या हक्कांची जाणीव क्हावी आणि त्यांचे संरक्षण क्हावे यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.

प्रश्न 8.

(अ) पुर्तिल संकल्पना स्पष्ट करा (कोणतेही एक) :

(1) बहुपक्ष पद्धती

(2) जलक्रांती.

(D) दिलोस्या सूचनेनुसार कृती करा (कोणतीही एक) :

(1) पुठील ओषतक्ता पूर्ण करा :

निवडणूक प्रक्रिया :

(2) दिलेला आकृतिबंध पूर्ण करा :

उत्तर 8 :

(अ) (1) बहुपक्ष पद्धती: बहुपक्ष पद्धतीत अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात. ज्या राष्ट्रात धार्मिक, भाषिक आणि प्रांतिक विविधता जास्त असते तिथे अनेक राजकीय पक्ष निर्माण होण्याची शकयता जास्त असते. या सर्व राजकीय पक्षांचा कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो. अशी पद्धती बहुपक्ष पद्धती म्हणून ओळखली जाते. भारत, फ्रान्स, इटली आणि स्वित्झर्लंड या देशांत बहुपक्ष पद्धती आहे.

(2) जलक्रांती-4 जून 2015 रोजीपासून संपूर्ण भारतात जलक्रांती अभियान सुरू करण्यात आले. भारताचे जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे डॉ. राजेन्द्रसिंह राणा यांनी राजस्थानात मोठी जलक्रांती घडवून आणली. हजारो जोहड निर्माण केले. वाळवंटातील नद्या पुनरुज्जीवित केल्या. पाणी अडविणे, पाणी जमिनीत मुरवणे, मोठ्या प्रमाणात जलसाठा करणे, पाण्याचा अपव्यय टाळणे या सर्व बाबी जलक्रांतीत येतात.

(ब) (1) निवडणूक प्रक्रिया :

(2) दिलेला आकृतिबंध-

प्रश्न 9.

पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा (कोणतेही एक) :

(1) न्यायाल्याने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे?

(2) चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज का असते?

उत्तर 9 :

(1) घटस्फोटित महिलांना पोटगी देण्याचे पुरुषांवरील बंधन तसेच समान कामासाठी स्त्रियांना पुरुषाएवढेच वेतन, वडिलांच्या आणि पतीच्या संपत्तीत समान वाटा, प्रार्थनास्थळ्ठी सर्व महिलांना मुक्त स्वातंत्र्य, खात पंचायतीचे अधिकार न्यायालयाने रद्दबातल केल्यामुळे महिलांवंर घातली जाणारी बंधने दूर होऊन त्यांना न्यास मिळाला. तसेच महिला संक्षमीकरणासाठी आणि समाजात महिलांवर होत असलेले अत्याचार रोखण्यासाठी न्यायालयाने काही कायदे केले आहेत. जसे हुंडा प्रतिबंधक कायदा, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा इत्यादी महत्वपूर्ण तरतुदी आणि निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेची जपणूक झाली आहे.

(2) कोणतीही चळवळ ही नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि ती व्यापकही बनते. चळवळीला मिळणारे यशापयशही, खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते. चळवळीचा हेतू, कार्यक्रम, आंदोलनाचा पवित्रा, त्याची दिशा आणि तीव्रता कोणत्या वेळी कमी-अधिक करायची याबाबतचा निर्णय खंबीर नेतृत्वच घेऊ शकते. चळवळीला जनाधार मिळवून देण्याचे काम नेतृत्वच करत असते म्हणूनच चळ्ठळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते.