SSC HISTORY & POLITICAL SCIENCE Marathi Medium MARCH 2023 solved paper

Day
Night

MARCH 2023

HISTORY & POLITICAL SCIENCE

प्रश्न 1.

(अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :

(1) लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या ……………………… या चित्राचा समावेश लुत्र संग्रहालयात आहे.
(अ) नेपोलियन
(क) हैंस स्लोअन
(ब) मोनालिसा
(ड) दुसरा जॉर्ज

(2) थॉमस कुकने ……………………. विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला.
(अ) हस्तकौशल्याच्या वस्तू
(क) खादयवस्तू
(ब) खेळणी
(ड) पर्यटन तिकिटे

(3) एकोणिसाव्या शतकाल स्त्रियांविषयी लेखन करणाच्या लेखिकांमध्ये …………………….. यांचे नाव अग्रणी आहे.
(अ) ताराबाई शिंदे
(क) मीरा कोसंबी
(ब) पंडिता रमाबाई
(ड) शर्मिला रेगे

(ब) पुछीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळसून पुन्ता लिहा :

(1)

शहरे ग्रंथालय

(i) कोलकाता नेशनल लायब्ररी

(ii) दिल्ली नेहरू मेमोरियल म्युझियम अंड लायब्ररी

(iii) हैदराबाद स्टेट सेंट्रल लायब्ररी

(iv) पुणे लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी

(2)

विचारवंत देश

(i) कार्ल मार्क्स इंगलंड

(ii) मायकेल फुको फ्रांस

(iii) लिओपॉल्ड क्हॉन रांके जर्मनी

(iv) हिरोडोटस ग्रीस

(3)

नियतकालिके कालावधी

(i) साप्ताहिक सात दिवस

(ii) पाक्षिक पंधरा दिवस

(iii) मासिक एक महिना

(iv) त्रैमासिक दोन महिने

उतर 1 :

(अ)

(1) (ब) मोनालिसा (2) (ड) पर्यटन तिकिटे (3) (अ) ताराबाई शिंदे

(ब). (1) चुकीची जोड़ी : (iv) पुणे – लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी

बरोजर: मुंबई – लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी

(2) चुकीची जोड़ी: (i) काल मार्क्स – इंगलंड

बरोबर: कार्ल मार्क्स – जर्मनी

(3) चुकीची जोड़ी: (iv) त्रैमासिक – दोन महिने

करोबर: और्रमासिक-तीन महिने

प्रश्न 2.

(अ) दिलेल्या सूचनेनुसार कृती करा (कोणतेही दोन) :

(1) पुढ्डील संकल्पनाचित्र पूर्ण करा :

(2) पुढ़ील संकल्पनाचित्र पूर्ण करा :

(3) पुढ़ील संकल्पनाचित्र पूर्ण करा :

(ब) थोडक्यात टिपा लिहा (कोणतेही दोन) :
(1) द्वंद्ववाद (2) जनांसाठी इतिहास (3) मराठी रंगभूमी.

उत्तर 2 :

(अ) (1)

(ब) (1) द्वंद्ववाद : जॉन हेगेल याने या सिद्धान्ताची मांडणी केली. एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्परविरोधी दोन सिद्धान्त मांडून त्यांतून योग्य असा तर्क लावला जातो. या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात. दोन परस्परविरोधी सिद्धान्तांची तर्काघिष्ठित मांडणी करून चर्चा केल्यानंतर दोन्ही सिद्धान्तातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. त्यशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन नीट होत नाही.

(2) जनांसाठी इतिहास: इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमान जीवनशैलीशी जोडणारे क्षेत्र तयार झाले आहे. त्यांलच आपण जनांसाठी इतिहास असे म्हणतो. वर्तमानकालीन प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी भूतकालीन घटनाचे ज्ञान उपयुक्त ठरू शकते. इतिहासविषयी लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. परंतु इतिहासाद्वारे भूतकालीन घटनांचे ज्ञान मिळते आणि या ज्ञानाचा उपयोग वर्तमान व भविष्यकाळात कसा करता येईल याचा विचार ‘जनांचा इतिहास’ यामध्ये केला जातो. ‘उपयोजित इतिहास’ या संजेलाच ‘जनांचा इतिहास’ असे संबोधले जाते.

(3) मराठी रंगभूमीः व्यक्तीने किंवा समुदायाने ललित कला सादरीकरणाचे स्थान म्हणजे ‘रंगभूमी होय. मराठी रंगभूमीच्या विकासात 19 व्या शतकाचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. विष्णुदास भावे यांना ‘मराठी रंगभूमीचे जनक’ म्हणून ओळखले जाते. सुरूवातीच्या काळातील नाटकांना लिखित संहिता नसे. 1861 सालाच्या ‘थोरले माधवराव पेशवे’ या नाटकामुळे सम्पूर्ण लिखित संहिता असलेल्या नाटकांची परंपरा सुरू झाली. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात संगीत नाट्यपरंपरा सुरू झाली. संगीत नाटकांमधून ऐतिहासिक विषय आणि अनेक सामाजिक प्रश्न हाताळले गेले. मराठी रंगभूमीला पडत्या काळात आचार्य अत्रे यांच्या लोकप्रिय नाटकांनी सावरले.

प्रश्न 3.

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन) :

(1) सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.

(2) महाराष्ट्रात संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली.

(3) आयुर्वेदिक उपचारासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात.

(4) मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगर म्हणतात.

उत्तर 3 :

(1) दूरदर्शन हे एक प्रभावी दृकश्राव्य माध्यम असल्याने आपण ऐकत असलेल्या माहितीशी संबंधित चलचित्रही पाहता येतात. जगभरातील सर्व घडामोडी घरात बसून दूरदर्शनवर पाहायला मिळतात. सामाजिक समस्या, आर्थिक चढ-उतार; राजकीय घडामोडी, शैक्षणिक माहिती, खेळ, चित्रपट पाहावयास मिळतात. विविध क्षेत्रांतील माहितीचा खजिना म्हणजे दूरदर्शन. म्हणून सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय असे माध्यम आहे.

(2) संत एकनाथांनी लोकप्रबोधन आणि लोकशिक्षणासाठी भारुडाची रचना केली. त्यांच्या भारुडांच्या विषयात विविधता तर होतीच पण भारुडे नाट्यान्मकही होती. दैनंदिन जीवनातील आणि व्यवहारातील साध्या-साध्या उदाहरणांतून रचलेली विनोदी आणि गेयता या विशेषतेमुळे त्यांची भारुडे महाराष्ट्रात लोकप्रिय झाली.

(3) भारतातील वैद्यकीय सेवा व सुविधा पाश्चात्त्यांच्या मते स्वस्त आणि दर्जेदार आहेत. या कारणास्तव परदेशी लोक भारतात येऊ लागले आहेत. भारतात मुबलक सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. त्याचा लाभ घेण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक भारतात येतात. योगशिक्षण आणि आयुर्वेदिक उपचारांसाठी परदेशी पर्यटक भारतात येतात.

आरोग्य पर्यटनामध्ये भारत जगात सहाव्या क्रमांकावर आहे.

(4) मेजर ध्यानचंद हे त्या वेळचे भारतीय हॉकी संघाचे प्रमुख खेळडू आणि कर्णधार होते. मेजर ध्यानचंद यांनी 1928, 1932 आणि 1936 अशा सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांत भारताचे प्रतिनिधित्व करून भारताला हॉकीची सुवर्णपदके मिळ्वून दिली. 1932 व्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी जापान आणि अमेरिकेविरुद्ध 25 गोल केले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांत 400 पेक्षा जास्ता गोल केले. त्यांच्या हॉकीतील या देदीप्यमान कामगिरीमुळे त्यांना ‘हॉंकीचे जादूगार’ असे म्हणतात.

प्रश्न 4.

दिलेल्या उताच्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनचे आहे. खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिले. धावणे, चाळ्फेक, रथ व घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध इत्यार्दींचे सामने त्यांनी सुरू केले. प्राचीन ऑलिंपिक ही खेळाची स्पर्धा आलिंपिया या ग्रीक शहरात घेतली जात असे. या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे मानाचे समजले जाते.

(1) प्राचीन ऑलिंपिक खेळाची स्पर्धा कोणत्या शहरात घेतली जात असे ?

(2) खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते कोणत्या काळापासूनचे आहे?

(3) ऑलिंपिक स्पर्धाविषयी आपले मत मांडा.

उतर 4.

(1) प्राचीन ऑलिम्पिक खेळाची स्पर्धा ऑलिम्पिया या ग्रीक शहरात घेतली जात असे.

(2) खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनचे आहे.

(3) ऑलिम्पिक खेळ्ठांचा इतिहास 3000 वर्षांचा आहे. ऑलिम्पिक खेळांमध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारात पदके दिली जातात. त्यामध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांचा समावेश आहे. ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन दर चार वर्षानी केले जाते.

प्रश्न 5.

पुढ़ल प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन) :

(1) बखर म्हणजे काय ते सांगून बखरीच्या प्रकारांविषयी सविस्तर माहिती लिहा.

(2) इतिहासाच्या साधनांचे जतन क्हावे यासाठी किमान सहा उपाय सुचवा.

(3) पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा.

(4) अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महप्वाची आहेत?

उत्तर 5 :

(1) ‘बखर’ या शब्दाचा कोशातील अर्थ हकीकत बातमी, इतिहास, कथानक, चरित्र, असा आहे. खबर या फारसी शब्दापासून बखर शब्द बनला असावा. ज्या काळात मराठी भाषेवर फारसींचा प्रभाव होता, त्याकाळात मराठीत बखरी लिहिल्या गेल्या. ‘बखर’ हा ऐतिहासिक साहित्यातील एक महप्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी,. लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते. तसेच तात्कालीन सामाजिक, धार्मिक

आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. अशी वर्णने इतिहासलेखनाला उपयुक्त ठरतात. बखरीचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतिपर असे प्रकार आहेत.

(2) इतिहासाच्या साधनांमध्ये मौखिक लिखित आणि भौतिक साधने यांचा समावेश होतो. या साधनांचे वेगवेगळ्या पद्धतीने जतन करावे लागते. त्यासाठी पुप्रमाणे उपाययोजना करता येतील.

(i) किल्ले, स्मारके, राजवाडे अशा ऐतिहासिक वास्तूंची नियमितपणे डागडुजी करावी.

(ii) वास्तूंची नासधूस करू नये. त्यांवर नावे लिहिणे आणि कोरणे टाळण्याबाबत उपाय योजावेत.

(iii) ओव्या, लोकगीते इत्यादि मौखिक साहित्य संकलित करून ते लिखित स्वरूपात आणावे.

(iv) ऐतिहासिक साधनांचे जतन करण्यासाठी कडक कायदे करावेन.

(v) ऐतिहासिक नाणी, हत्यारे, इत्यादी वस्तू सावधानतेने हाताळ्ठव्यात. त्या चोरी होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.

(vi) ऐतिहासिक साधनांच्या जतनात सामान्य जनता तसेच स्थनिकांना सामील करून ध्यावे.

(3)

(i) पर्यटकांच्या राहण्यासाठी असणरी निवासस्थाने (लॉज) चालवणे, ती बांधण्यासाठी संबंधित असणारे उद्योग.

(ii) खाद्यपदार्थांची दुकाने, हॉटेलस्, खानावळी इत्यादी उद्योग.

(iii) पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस, रिक्षा, टेक्सी इत्यादी उद्योग.

(iv) हॉटिल व्यवसायाशी संबंधित दूध, भाज्या, किराणा इत्यादी शेती संलग्न उद्योग.

(v) प्रवासी एजंटस्, फोटोग्राफर, मार्गदर्शक ( गाईडस्), ठिकाणांची माहिती प्रकाशित करणारे मुद्रक, प्रकाशक इत्यादी व्यवसायसुद्धा पर्यटनाशी संबंधित असतात.

(4) मागणीनुसार शासनाला आणि नागरिकांना कागदपत्रे उपलब्ध करून देणे. त्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर केला जातो. कागदपत्रांचे वर्गीकरण करून सूची तयार केले जाते. महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवली जातात. विभागीय आणि स्थानिक अभिलेखागारे स्थापन करणे दैनंदिन कामात सुकरता यावी (म्हणून यंत्रणा निर्माण) करणे. (जुन्या कागद्पत्रांचे संरक्षंण कटणे.) महत्त्वाच्या कागदपत्रांविषयी गोपनीयता राखणे. नियतकालिके व अन्य प्रकाशने प्रसिद्ध करणे. भावी पिढीसाठी राष्ट्राचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जतन करणे इत्यादी कामे अभिलेखागार व्यवस्थापनात महत्त्वाची आहेत.

प्रश्न 6.

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवड्डून विधाने पूर्ण करा :

(1) पुढ़ल कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे?
(अ) माहितीचा अधिकार कायदा
(क) अन्नसुरक्षा कायदा
(ब) हुंडाप्रतिबंधक कायदा
(ड) शिक्षण हक्क कायदा

(2) 1986 साली ‘……………… अस्तित्वात आला.

(अ) ग्राहक संरक्षण कायदा

(क) माहितीचा अधिकार कायदा

(ब) कामगार कायदा

(ड) हुंडा विरोधी कायदा

उत्तर 6 :
(1) (ब) हुंडाप्रतिबंधक कायदा
(2) (अ) ग्राहक संरक्षण कायदा

प्रश्न 7.

पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन) :

(1) संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते.

(2) विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात ?

(3) चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते.

उत्तर 7 :

(1) हे विधान बरोबर आहे. कारण-संविधान लिखित स्वरूपात असला तरीदेखील ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही असते. संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा, ते संसाधित करण्याचा अधिकार संसदेला असतो. संविधानाच्या. मूलभूत चौकटीला धक्का न लवता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते. आपल्या संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळेच त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमा असते.

(2) हे विधान बरोबर आहे. कारण-काही वेळा विधानसभा, लोकसभा आणि स्थनिक शासन मंधील एखाद्या लोकप्रतिनिधीने राजीनामा दिल्यास, किंवा एखादा लोकप्रतिनिधी अकस्मात मृत्यु पावलयास, किंवा निवडून आलेल्या सदस्याने पक्षांतर केल्यास, पक्षांतर कायद्याअंतर्गत त्याचे सदस्यत्व रद होते. या कारणांमुळे ती जागा रिकामी होऊन त्या जागेसाठी निवडणूक आयोग पोटनिवडणूक करतो.

(3) हे विधान चूक आहे. कारण-कोणतीही चळवळ ही त्या चळवळीच्या खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते. तसेच ती क्रियाशील सुद्धा राहते. त्या चळ्वळीचे यशापयशसुद्धा खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते. चळवळीचा कार्यक्रम, तिची दिशा आणि तीव्रता केन्हा कमी-अधिक करावी यांबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकते. चळवळीला जनाधार मिळवून देण्याचे कामही चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते..

प्रश्न 8.

(अ) पुढील संकल्पना स्पष्ट करा (कोणतेही एक) :
(1) राष्ट्रीय पक्ष (2) भ्रष्टाचार.

(ब) दिलेल्या सूचनेनुसार कृती करा (कोणतीही एक) :

(1) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा :

(2) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा :

उत्तर 8 :

(अ) (1) राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाच्या पक्षांना ‘राष्ट्रीय पक्ष’ असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष निश्चित केले आहेत.

(i) किमान चार राज्यांमध्ये मागील लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत कमीत कमी सहा टक्के वैध मते मिळणे आवश्यक किंवा चार सदस्य लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे किंवा.

(ii) मागील लोकसभा निवडणुकीत किमान तीन राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी दोन टक्के जागा निवड्डन येणे आवश्यक आहे. किंवा

(iii) किमान चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे.

(2) कायद्यानुसार वाजवीपेक्षा अधिक पैसे वा मोबदला घेणे, दुसज्यांना नाडणे यालाच भ्रष्टाचार असे म्हणतात. आपल्या अधिकारांचा गैरवापर करणे हाही भ्रष्टाचारच असतो. निवडणुकीतील गैरप्रकार, लांच देणे वा घेणे, मालाची साठवणूक करून चढ्य भावात विकणे, हे सर्व भ्रष्टाचाराचेच प्रकार होत. भ्रष्टाचार केवळ आर्थिक स्वरूपाचाच असतो असे नाही: तर ती सामाजिक, धार्मिक, राजकीय तसेच सरकारी पातळीवर असा सर्वत्र होत असतो. भ्रष्टाचार हो भारतासमोरील समस्यांपैकी एक प्रमुख समस्या बनली आहे. वाढता भ्रष्टाचार लोकशाहीस मारक ठरत आहे.

(ब) (1)

(2)

प्रश्न 9.

पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा (कोणतेही एक) :

(1) सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय ?

(2) मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने कोणती आहेत ?

उत्तर 9 :

(1) ज्या सामाजिक बार्बीमुळे किंवा विचारामुळे एखाद्या व्यक्तीवर वा समाजगटावर अन्याय होतो, त्या बाबी वा ते विचार न करणे. सर्व नागरिकांचा समान दर्जा मानणे व तशी धोरणे आखणे. धर्म, जात, वंश, लिंग, भाषा, जन्मस्थान, संपत्ती यासारख्या बार्बीवर आधारित श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक देणे. सर्वांना विकासाच्या समान संधी देणे, म्हणजेच सामाजिक न्याय प्रस्थापित करणे होय.

(2) (i) आपल्या देशाचा विस्तार आणि मतदारसंख्या विचारात घेऊन निवडणुकांचे नियोजन करणे.

(ii) निवडणुकांमध्ये होणारा आर्थिक गैरव्यवहार रोखणे.

(iii) गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना राखणे. तसेच राजकारणाचे गुन्हेगारीकरण होऊ घातलेल्या वातावरणात निवडणुका यशस्वी करून दाखविणे.

(iv) निवडणूक काळातील वादती हिंसा रोखून निवडणुका यशस्वीपने घेणे. निवडणूक आयोगाला वरील सर्व आव्हानांचा सामना मुक्त व न्याय्य निवडणुका घेताना येतात.